भारतभर बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा संपन्न – दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ऐतिहासिक उपक्रम
बिदर, ३० मार्च २०२५ – दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया, रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲड. जौंजाळ साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारतात बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा आयोजित करण्यात आली. कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील सिद्धार्थ कॉलेज येथे ही परीक्षा पार पडली. परीक्षेचे प्रमुख परीक्षक म्हणून संस्थेचे राष्ट्रीय सचिव राजेश पवार, तर सहाय्यक परीक्षक म्हणून कर्नाटक राज्याचे अध्यक्ष मनोहर मोरे होते. तसेच परीक्षक म्हणून समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष जगन्नाथ कांबळे आणि बिदर जिल्हा अध्यक्ष राजप्पा गुणाळीकर यांनी जबाबदारी पार पाडली. या परीक्षेत एकूण १८ विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षेच्या दोन टप्प्यांत शंभर गुणांची लेखी परीक्षा आणि शंभर गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या आयोजनात बिदर जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत शिंगे, जिल्हा कोषाध्यक्ष नरसप्पा मेथै, बिदर तालुका अध्यक्ष शिवकुमार सदाफुले, तालुका सरचिटणीस सम्राट जी आणि तालुका कोषाध्यक्ष कांताप्पा रुदनूर यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच...