भारतीय बौद्ध महासभेची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 महापरिनिर्वाण दिन अभिवादन व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. मुंबई -दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा ) राष्ट्रीय कार्यकारिणीची कामकाज वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ. आंबेडकर भवन, दादर (पूर्व), मुंबई येथे ट्रस्टी/ राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य.आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत दि 7/12/2024 रोजी संपन्न झाली. सूत्रसंचालन राष्ट्रीय उपाध्यक्ष /मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख अॅड. एस. के. भंडारे यांनी केले.या सभेत अध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर, डॉ हरीश रावलिया, ट्रस्टी कॅप्टन प्रविण निखाडे, अँड. एस. के. भंडारे यांनी मार्गदर्शन केले. मध्यप्रदेश( दक्षिण) उत्तर प्रदेश (पश्चिमांचल, पूर्वांचल, बुंदेलखंड ), छत्तीसगड,पश्चिम बंगाल,कर्नाटक ( उत्तर, दक्षिण),हरियाणा, दिल्ली प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, ग्रेटर हैद्राबाद ( तेलंगणा) इत्यादी प्रमुख राज्यांच्या अध्यक्ष / सरचिटणीस यांनी आपल्या राज्यातील प्रश्न, समस्या व भारतीय बौद्ध महासभेचे कार्य गतिमान कसे करता येईल, याबाबत ...