Friday, January 26, 2024

बौद्ध राजवतीत भारत महासत्ता व महागुरु होता आता त्याचा तो पायाच नाही तर पुन्हा महासत्ता कसा बनणार : डॉ भीमराव य आंबेडकर.

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

संस्थापक अध्यक्ष  : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संरक्षक  : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर

ट्रस्टी चेअरमन  : डॉक्टर हरीश रावलिया

राष्ट्रीय कार्याध्यक्ष : आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर.

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

बौद्ध राजवतीत भारत महासत्ता व महागुरु होता आता त्याचा तो पायाच नाही तर पुन्हा महासत्ता कसा बनणार  : डॉ भीमराव य आंबेडकर.

 ===========================================    

खजगी विदयापीठातील आरक्षणासाठी लवकरच बैठक घेऊ - मंत्री संजय बनसोडे.

 ===========================================                    

विरोधकांना निवडून देऊ नये नाहीतर आपल्याला पुन्हा गुलामी करावी लागेल - एस के भंडारे .

============================================

लातूर (दि.21/1/2024) देशात विषमता पितृ सत्ताकपद्धतीमुळे आहे जेथे मातृसत्ताक  आहे तेथे प्रगती झाली, परदेशात काही देशात आहे त्यामुळे ते देश प्रगती पथावर आहेत.1200 वर्षे बौद्ध राजाने राज्य केले त्यावेळी भारत महासता व महागुरु होता, देशात 19 विदयापीठ होते त्यावेळो जगात अंधाकर होता.  त्यावेळी भारतात येऊन लोक शिकत होते असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ) यांनी लातूर येथील सिद्धार्थ हौसिंग सोसायटीच्या सभागृहात तथागत भगवान बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापना त्यांच्या हस्ते झाल्यानंतर झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात केले.ते पुढे म्हणाले की,जगात पहिला ग्रंथ बौद्ध ग्रंथ होता तो म्हणजे इतिका ग्रंथ, त्यातून देशाचे  चित्र रेखाटले आहे त्यावेळी साक्षर होते,धम्म लिपी होती.यावेळी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक मंत्री संजय बनसोडे, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष ) यांची भाषणे झाली. मंत्री संजय बनसोडे यांनी बौद्ध समाजाचा मी एकमेव मंत्री सरकार मध्ये असून समाजाचे प्रश्न, कामे इत्यादीसाठी मी सतत पाठपुरावा करत असून खाजगी विदयापीठातील आरक्षणासाठी लवकरच बैठक घेऊ असे एस के भंडारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सांगितले.तसेच त्यांनी इंदू मिलच्या जागेवरील  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जगातील सर्वात उंच स्मारक होणार, उदगीर येथे 20 कोटीचे बुद्ध विहार गुलबर्गा सारखे बांधणार असल्याचेही सांगितले.

        एस के भंडारे यांनी असे सांगितले की, आता कोणाचेही दुकान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय चालत नाही त्यामुळे नुसते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन , फोटोलावून , झेंडा घेऊन चालणार नाही तर खऱ्या अर्थाने त्यांचे विचार कृतीत आणणाऱ्या, संविधान समर्थक व आरक्षण समर्थक व्यक्तीला,पक्षालाच

 मतदान करावे विरोधकांना निवडून देऊ नये नाहीतर आपल्याला पुन्हा मनुस्मृतीची गुलामी करावी लागेल.कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी भन्ते डॉ उपगुप्त महाथेंरो होते.

      प्रतिस्थापना विधी भन्ते डॉ उपगुप्त महाथेरो, भन्ते महाविरो भन्ते सुमेध नागसेन आणि इतर भन्ते गण यांनी केला.  

    तसेच संध्यकाळी डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या उपस्थित सुभेदार रामाजी नगर येथील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा सुभेदार नगर व रहिवाशी यांच्या वतीने दुसरी धम्म परिषद आयोजित केली होती त्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ भीमराव य आंबेडकर असे म्हणाले की,लातूर हा आंबेडकारी चळवळीचे केंद्र बनत असून आता धर्मातर वाढत आहे, अनेक वंचित समाज धर्मातरित होत आहेत, देशातील obc धर्मांतरित होत आहेत ते आमचे पूर्वज बौद्ध आहोत असे सांगतायत.जनगणना झली तर काही करोडो बोद्ध असतील, बौद्ध सायंटिफिक आहे त्यात पाखंडवाद नाही, विज्ञानावर धारित आहे युरोपचे 34 लोक चैत्याभूमीत आले होते त्यात अमेरिका , ग्रीक कॅनडा, आर्यलंड इत्यादी देशातून आले होते, त्यातील काहींनी 10 वर्षांपूर्वी आम्ही ख्रिश्चन होतो आता बौद्ध आहोत असे सांगत होते, तसेच त्यांतील काहीनी बाबासाहेब सुद्धा वाचले आहेत असे त्यांच्याशी संवाद साधताना लक्ष्यात आले. आम्ही मायनॉरिटीत आहोत पण त्याचा बाऊ करू नका आपल्याबरोबर मुस्लिम, शीख, जैन आहेत.

आपण राजकीय विचार करायला पाहीजे जेणेकरून आपला प्रतिनिधी निवडून येणे गरजेचे आहे.नागपूरची दिक्षा मनुवाद्याच्या ताब्यात आहे, मी गेली चार वर्षे दिक्षा भूमीत धम्मचक्र प्रवर्तन दिनी जात आहे, पत्राव्यवहार केला एकत्र कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही.हीच परिस्थिती महू येथे आहे. त्यासाठी काम करावे लागेल.संविधान कलम 50,51 च्या तरतुदीनुसार विज्ञानने चालले पाहिजे,सरकारचे

मंदिर बांधने काम नाही असे सांगून संविधानाला मानणाऱ्यांना बरोबर घेऊन काम करावे लागलं, 2024 महत्वाचे आहे निवडणूकीत EVM वापरला विरोध केला पाहिजे .निवडणुकीचे खरे प्रतिनिधी निवडण्यासाठी 

 Evm बंद करावे लागेल असे सांगून त्यासाठी प्रत्यक्ष संघर्ष सुरु केल्याचे सांगितले देशात कुट नीती चालू आहे, गोळवलकर यांच्या बंचऑफ थॉट्स मध्ये आर्थिक नाडी बंद करा म्हणजे ते आपल्याकडे येतील, गुलाम बनतील त्यामुळे आपणास स्वतःचे आर्थिक नीती करून उद्याग सुरु कारबे लागतील असे सांगितले.

   एस के भंडारे यांनी या प्रसंगी असे सांगितले की, डॉ भीमराव य आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची सूत्रे सन 2014 मध्ये घेतल्यापासून जाणीवपूर्वक त्यांनी समाजातील सर्व विविध संस्था, संघटना, भिक्खू व त्यांच्या संस्था यांच्याशी समन्वय साधला असून त्यांच्या नेतृत्वखाली संपूर्ण समाज एकत्रित होत असल्याने आता आपनातील हेवे दावे, कुरबुरी संपवून सर्वांशी धम्माच्या तत्वप्रमाणे मैत्री करावी असे सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करायची आहे.तसेच धम्म गाथेमधील देव म्हणजे सद्गुणी माणूस आहे दगडाचा देव नव्हे की, ज्याच्यात प्राणप्रतिष्ठा करून जिवंतपणा आणू शकत नाही असेही सांगितले.

या परिषदेच्या सुरवातीला भन्ते महाविरो भन्ते सुमेध नागसेन यांनी धम्म देसना दिली. या परिषदेमध्ये आंबेडकरी जलसा स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये विविध कॉलेजचे विदयार्थी संघ सहभागी झाले होते.

     या वेळी भिकाजी कांबळे,(अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य ),प्रा बापू गायकवाड (राज्य संघटक ), दैवशाला गायकवाड (राज्य संघटक ) यांनी शुभेच्छा दिल्या.या दोन्ही कार्यक्रमास  एम एम बलांडे,( अध्यक्ष,लातूर पूर्व जिल्हा ), समता सैनिक दलाचे राजाराम साबळे व  विलास आल्टे, हिराचंद गायकवाड, डॉ लहू वाघमारे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या दोन्ही कार्यक्रमास बौद्ध महिला व समता सैनिक दलाचे सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.








Monday, January 8, 2024

श्रामणेरी / बौद्धाचार्या शिबिरास दान देण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन

 ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

भारतीय बौद्ध महासभा
संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक :  आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया
राष्ट्रीय कार्याध्यक्ष :  आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

  दिनांक ०२/०२/२०२४ ते दिनांक ११/०२/२०२४ पर्यंत चैत्यभूमी दादर येथे संपन्न होणाऱ्या श्रामणेरी/बौद्धाचार्या शिबिरास चहा नाश्ता दान , भोजन दान,फल आहार दान करण्यासाठी खालील धम्म उपासक, उपासिका यांनी आपली नावे केंद्रीय प्रशिक्षण विभागाकडे देऊन दान पारमिता पूर्ण करण्याचा संकल्प केल्याबद्दल  केंद्रीय प्रशिक्षण विभागाकडून सर्वांना धन्यवाद व त्यांचे हार्दिक अभिनंदन.

==========================================


1) दि. 02/02/2024

*फल आहार दान दाते*..आयु जयवंत लव्हांडे, नवी मुंबई जिल्हा 

2) दि. 03/02/2024, शनिवार 

*चहा नाश्ता दान दाते*...आयु. विलास ढोबळे 

*भोजन दान दाते*..आयुनि स्नेहल सुनिल केदारी 9967598495

*फलाहार दान दाते*..आयु विजय गायकवाड़ ठाणे 

3) दि. 04/02/2024, रविवार 

*चहा नाश्ता दानदाते* आयुनि. प्रेमाताई मिसळे

*भोजन दान दाते*..आयुनि. संगिता ताई पारखे 

*फलाहार दानदाते*..आयुनि. सुरेखा ताई लोखंडे नाशिक (पश्चिम)

4) दि.05/02/2024, सोमवार 

*चहा नाश्ता दानदाते*..महाराष्ट्र राज्य महिला शाखा

*भोजन दानदाते*.आयु. प्रदिप मोहिते, डोंबिवली 

*फलाहार दानदाते*..आयुनि. वत्सला ताई निकाळजे 

5) दि.06/02/2024, मंगळवार 

*चहा नाश्ता दानदाते*..आयु.भालचंद्र गायकवाड, मोखाडा

*भोजन दानदाते*..आयु. भालचंद्र गायकवाड, मोखाडा 

*फलाहार दानदाते*..आयु. भालचंद्र गायकवाड, मोखाडा 

6) दि.07/02/2024, बुधवार 

वनंद, ता दापोली जि रत्नागिरी 

7) दि. 08/02/2024, गुरुवार 

*चहा नाश्ता दानदाते*.अॅंटाॅप हिल शाखा 

*भोजन दानदाते*..आयु. आर.के.गायकवाड, बुद्ध काॅलनी कुर्ला

*फलाहार दानदाते*.आयु बबन येडे 

8) दि.09/02/2024, शुक्रवार 

*चहा नाश्ता दानदाते*..आयु. भास्कर न्यायनीत 

*भोजन दानदाते*..आयुनि. रत्नमाला ताई संतोष जाधव 

*फलाहार दानदाते*.आयु विजय गायकवाड़, रायगढ़ उत्तर 

9) दि. 10/02/2024, शनिवार 

*चहा नाश्ता दानदाते*..आयु. संजय काकडे, संघटक, मुंबई प्रदेश 

*भोजन दानदाते*..आयु. विलास वानखेडे, विक्रोळी 

*फलाहार दानदाते*..आयुनि. भारती ताई साबळे, जुईनगर 

10) दि. 11/02/2024 ,रविवार 

*चहा नाश्ता दानदाते*. एडवोकेट सुषमा ताई सोहनी, माटुंगा लेबर कॅंप शाखा 

*भोजन दानदाते*..आयु. राजेश पवार, राष्ट्रीय सचिव 

*फलाहार दानदाते*.ठाणे जिल्हा महिला शाखा 


*सर्व दानदात्यांना लाख लाख  धन्यवाद*🌹🙏🌷

आपले नम्र धम्म सेवक / सेविका,

सर्व राष्ट्रीय पदाधिकारी

केंद्रीय प्रशिक्षण विभाग पदाधिकारी

केंद्रीय महिला विभाग पदाधिकारी

महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी 

महाराष्ट्र राज्य महिला कार्यकारिणी 

मुंबई प्रदेश कार्यकारिणी 

मुंबई प्रदेश महिला कार्यकारिणी









Sunday, January 7, 2024

श्रामणेरी/बौद्धाचार्या धम्म प्रशिक्षण शिबिरास भोजनदान, चहा नाश्ता दान, व फल आहार दान करण्याची सुवर्णसंधी

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️ 

भारतीय बौद्ध महासभा
संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक  : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन  : डॉक्टर हरीश रावलिया
राष्ट्रीय कार्याध्यक्ष  : आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

श्रामणेरी / बौद्धाचार्या धम्म प्रशिक्षण शिबीरात इतिहासात प्रथमच चैत्यभुमी येथे दि. 02/02/2024 ते 11/02/2024 पर्यंत पूजणीय भिक्खुनी संघाला भोजनदान, चहा नाश्ता दान व फल आहार दान करण्याची सुवर्ण संधी.

ज्यांना या श्रामनेरी /बौद्धाचार्या शिबिरास दान द्यायचे आहे त्यांनी केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख एडवोकेट एस एस वानखडे यांच्या या 9967484524  मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

तसेच केंद्रीय प्रशिक्षण विभाग सदस्य सुनील बनसोडे यांच्या 9967349170 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.


सर्व दानदात्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, ही विनंती .

1) दि. 02/02/2024

फल आहार दान दाते..............

2) दि. 03/02/2024, शनिवार 

चहा नाश्ता दान दाते...आयु. विलास ढोबळे 

भोजन दान दाते.आयुनि स्नेहल सुनिल केदारी 9967598495

फलाहार दान दाते.आयु विजय गायकवाड़ ठाणे 

3) दि. 04/02/2024, रविवार 

चहा नाश्ता दानदाते. आयुनि. प्रेमाताई मिसळे

भोजन दान दाते..आयुनि. संगिता ताई पारखे 

फलाहार दानदाते. आयुनि. सुरेखा ताई लोखंडे नाशिक (पश्चिम)

4) दि.05/02/2024, सोमवार 

चहा नाश्ता दानदाते.........

भोजन दानदाते.आयु. प्रदिप मोहिते, डोंबिवली 

फलाहार दानदाते ................

5) दि.06/02/2024, मंगळवार 

चहा नाश्ता दानदाते..............

भोजन दानदाते...............

फलाहार दानदाते...............

6) दि.07/02/2024, बुधवार 

चहा नाश्ता दानदाते.....

भोजन दान दाते........

फलाहार दानदाते............

7) दि. 08/02/2024, गुरुवार 

चहा नाश्ता दानदाते.............

भोजन दानदाते..................

फलाहार दानदाते...............

8) दि.09/02/2024, शुक्रवार 

चहा नाश्ता दानदाते.............

भोजन दानदाते.आयुनि. रत्नमाला ताई संतोष जाधव 

फलाहार दानदाते................

9) दि. 10/02/2024, शनिवार 

चहा नाश्ता दानदाते..आयु.भास्कर न्यायनीत 

भोजन दानदाते.................

फलाहार दानदाते...................

10) दि. 11/02/2024 ,रविवार 

चहा नाश्ता दानदाते...............

भोजन दानदाते...............

फलाहार दानदाते....................

तरी, दानदात्यांना तारखा देतांना पदाधिकारी यांनी या पत्रकात नोंद करुनच होकार द्यावा, ही विनंती 🌹🙏🌷

आपले नम्र धम्म सेवक / सेविका,

केंद्रीय प्रशिक्षण विभाग पदाधिकारी

केंद्रीय महिला विभाग पदाधिकारी

महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी 

महाराष्ट्र राज्य महिला कार्यकारिणी 

मुंबई प्रदेश कार्यकारिणी 

मुंबई प्रदेश महिला कार्यकारिणी

Saturday, January 6, 2024

माता रमाईच्या जयंती ( ०७/०२/२०२४) निमित्त माता रमाईच्या लेकी होणार श्रामणेरी व बौद्धाचार्या

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

भारतीय बौद्ध महासभा
संस्थापक अध्यक्ष :  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक  : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन  : डॉक्टर हरीश रावलिया
राष्ट्रीय कार्याध्यक्ष  : आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

मुंबई : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी / राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. डाॅ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख आद. एस. के. भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. ०४/०१/२०२४ रोजी डाॅ. आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता रोड, दादर येथे केंद्रीय प्रशिक्षण विभाग ,केंद्रीय महिला विभाग ,महाराष्ट्र राज्य महिला शाखा आणि मुंबई प्रदेश महिला शाखा  पदाधिकारी यांच्या संपन्न झालेल्या महत्त्वपुर्ण बैठकीनुसार  खालील निर्णय घेण्यात आले आहेत.

१) श्रामणेरी / बौद्धाचार्या धम्म प्रशिक्षण शिबिरासाठी महाराष्ट्रातील ५८ जिल्हा शाखा व मुंबई प्रदेशातील ६ झोन शाखांमधून प्राप्त झालेल्या अर्जातून श्रामनेरी-बौद्धाचार्या  शिबिर घेण्याचे  ठरले.

२) प्रामुख्याने सन २०१९ पर्यंत केंद्रीय शिक्षिका झालेल्या महिलांचे  माता रमाई जयंती निमित्त चैत्यभुमी येथे दि. ०२/०२/२०२४ ते दि. ११/०२/२०२४ या कालावधीत श्रामणेरी - बौद्धाचार्या शिबिर घेण्यात येणार आहे.(शिबिरार्थीची यादी सोबत जोडली आहे)

३)उर्वरित प्राप्त अर्जातील सन  २०२० पासून  केंद्रीय शिक्षिका झालेल्या महिलांना माता रमाई स्मृती दिन ( २७/०५/२०२४)निमित्त चैत्यभुमी येथे श्रामणेरी -बौद्धाचार्या शिबिर घेण्यात येईल.

४)प्राप्त अर्जातील केंद्रीय शिक्षिका नसलेल्या मात्र उपासिकांचे  चैत्यभुमी येथे  श्रामणेरी शिबिर घेण्यात येईल.

५)शिबिराची प्रवेश फी फक्त ₹.२५०/- असून भरणा गुगल पे द्वारे केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिव आयुष्य मानिनी सुनंदाताई पवार( मोबाईल नंबर 93244313894 )किंवा आयु. अनिल मनोहर (मोबाईल नंबर 7083910856 ) यांना पाठवावे आणि दि. 02/02/2024 रोजी दुपारी 2.30 वाजता चैत्यभुमी येथे 10 दिवसाच्या शिबिरासाठी सर्व आवश्यक साहित्यासह, मुंडन करुन उपस्थित रहावे.

नमो बुध्दाय!जयभिम!!जय संविधान!!!

आपले धम्म बंधु / धम्म भगिनी,

सुषमाताई पवार,

राष्ट्रीय उपाध्यक्षा/ केंद्रीय महिला विभाग प्रमुख.

सोपान वानखडे,

राष्ट्रीय सचिव/ केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

दि. 6/1/2024

बौद्धाचार्य परीक्षेत 302 विद्यार्थी पास

   ===============================      

 भारतीय बौद्ध महासभा
संस्थापक :अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन :  डॉक्टर हरीश रावलिया
राष्ट्रीय कार्याध्यक्ष : आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर 

============================================


मुंबई :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ( भारतीय बौद्ध महासभा) या धम्म संस्थेच्या वतीने मुंबई प्रदेश व महाराष्ट्र राज्यातून श्रामणेर / बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर पुर्ण केलेल्या 521 पैकी 376 परीक्षार्थींची 19 परीक्षा केंद्रांवर लेखी व तोंडी परीक्षा दि. 05/11/2023 रोजी झाली .त्यामध्ये 80.32% विदयार्थी पास झाले आहेत. एकुण 302 परिक्षार्थी पास झाले असून, 74 परिक्षार्थी नापास झाले. 200 पैकी 174 मार्क मिळवून पालघर चे आयु. कुणाल अरुण जगताप व आयु. दिपक नाना कडलक यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, दुसरा आयु. सुमेध संजय साळवे 173 मार्क आणि तिसरा आयु. संजय पांडुरंग साळवे 170 मार्क मिळवून पटकावला आहे. 

या परीक्षेत प्रथम 5 क्रमांक पालघर जिल्हा शाखेने पटकावले असून, 

सहावा क्रमांक पालघर व नांदेड उत्तर जिल्हा शाखेने पटकावला आहे. 

सातवा क्रमांक ठाणे जिल्हा शाखा, तर आठवा व नववा क्रमांक पालघर जिल्हा शाखेने आणि दहावा क्रमांक मुंबई प्रदेश शाखेने पटकावला आहे .

मुंबई प्रदेश शाखेचे 54 पैकी 53,

नवी मुंबई शाखेचे 22 पैकी 22, 

ठाणे जिल्हा शाखेचे 46 पैकी 39,

पालघर जिल्हा शाखेचे 32 पैकी 32,

 सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे 6 पैकी 6,

यवतमाळ पश्चिम जिल्हा शाखेचे 10 पैकी 8, 

अकोला जिल्हा शाखेचे 20 पैकी 17, 

 चंद्रपूर पूर्व जिल्हा शाखेचे 7 पैकी 7,

नांदेड उत्तर जिल्हा शाखेचे 23 पैकी 16, 

पुणे पश्चिम जिल्हा शाखेचे 26 पैकी 18, 

 सातारा पूर्व जिल्हा शाखेचे 12 पैकी 11, 

परभणी उत्तर जिल्हा शाखेचे 19 पैकी 13,  

हिंगोली जिल्हा शाखेचे 16 पैकी 6

,जळगाव पूर्व जिल्हा शाखेचे 16 पैकी 15, 

रायगड उत्तर जिल्हा शाखेचे 8 पैकी 5,

 नाशिक पूर्व जिल्हा शाखेचे 7 पैकी 7, 

नाशिक पश्चिम जिल्हा शाखेचे 25 पैकी 9,  

रायगड दक्षिण जिल्हा शाखेचे 13 पैकी 10, 

 छ. संभाजीनगर ( औरंगाबाद) जिल्हा शाखेचे 14 पैकी 8, 

असे एकूण 302 परिक्षार्थी पास झाले आहेत. या सर्व यशस्वी बौद्धाचार्यांचे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आद.डाॅ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी अभिनंदन केले आहे अशी एस.के.भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष / मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख )व एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख) यांनी माहिती दिली.

























ग्राम जालूकी में आयोजित हुआ एक दिवसीय बौद्ध कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर

  डीग/अलवर, 24 मई 2026 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उत्तरी राजस्थान की जिला शाखा डीग के तत्वावधान में ग्राम जाल...