कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
सर्वांना जयभीम. WhatsApp वर व्हायरल झालेला लेख वाचला. लेख आवडला म्हणून माझ्या ब्लॉग वर हा लेख प्रसिद्ध करीत आहे. --------------------------- कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ -------------------------------- वंचित बहुजन आघाडी ही भाजपची B टीम आहे. असा अपप्रचार सातत्याने 2014 च्या निवडणुकीपासून मीडियाने आणि काँग्रेसने चालविला आहे. आणि कालच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या जवळपास 6 ते 8 महिने अगोदरच काँग्रेस राष्ट्रवादी यांनी वंचित चे मतदार फोडण्यासाठी निरंजन टकले यांना कामाला जुंपले होते. सोबतच विजय मोरे,तिसरा मेंदू लक्ष्मण माने. माने यांनी तर आधीपासूनच वाड्या वस्ती मध्ये जावून वंचित विरोधी वातावरण तयार केले. पत्रकार निखील वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी या सर्वांनी वंचित बहुजन आघाडी विरोधी जनमानस तयार करण्यासाठी भ्रमंती केली. आणि वंचित बहुजनांना संविधान ह्या भावनिक विषया च्या माध्यमातून अलगद फसविले आणि लबाळ काँग्रेस च्या जाळ्यात टाकले. आणि एवढ्यावरच ते थांबले नाही, तर शेवटी त्यांनी जे स्वयं घोषित बौध्द आंबेडकरी विचारवंतांना, साहित्यिकांना हळूहळू गळाला लावले आणि...