सर्वांना जयभीम.
WhatsApp वर व्हायरल झालेला लेख वाचला. लेख आवडला म्हणून माझ्या ब्लॉग वर हा लेख प्रसिद्ध करीत आहे.
---------------------------
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
--------------------------------
वंचित बहुजन आघाडी
ही भाजपची B टीम आहे.
असा अपप्रचार सातत्याने 2014 च्या निवडणुकीपासून मीडियाने आणि काँग्रेसने चालविला आहे.
आणि कालच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या जवळपास 6 ते 8 महिने अगोदरच काँग्रेस राष्ट्रवादी यांनी वंचित चे मतदार फोडण्यासाठी निरंजन टकले यांना कामाला जुंपले होते.
सोबतच विजय मोरे,तिसरा मेंदू लक्ष्मण माने. माने यांनी तर आधीपासूनच वाड्या वस्ती मध्ये जावून वंचित विरोधी वातावरण तयार केले. पत्रकार निखील वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी या सर्वांनी
वंचित बहुजन आघाडी
विरोधी जनमानस तयार करण्यासाठी भ्रमंती केली. आणि वंचित बहुजनांना संविधान ह्या भावनिक विषया च्या माध्यमातून अलगद फसविले आणि लबाळ काँग्रेस च्या जाळ्यात टाकले.
आणि एवढ्यावरच ते थांबले नाही, तर शेवटी त्यांनी जे स्वयं घोषित बौध्द आंबेडकरी विचारवंतांना, साहित्यिकांना हळूहळू गळाला लावले
आणि हे सर्व अखेर काँग्रेसच्या षडयंत्राला अलगदपणे बळी पडले.
त्यामध्ये शेवटचा हातोडा डॉ.कसबे, सुनिल खोब्रागडे,डॉ.मुणगेकर, तुषार गांधी यांनी मारला. ह्यांनी दलाली घेऊन वंचितांच्या राजकारणाला थोपविण्याचा डाव रचला*.आणि या सर्वानी *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन २०१४ पासून ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचिताची जी मोट राजकीय बांधली होती तिला सुरुंग लावला
दलित,आदिवासी,शोषित, पीडित वंचित ह्या सर्वहारा वर्गाच्या राजकारणाला संपवण्यासाठी बुद्ध आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक म्हणवून घेणाऱ्या वर्गाने खूप मोठ्ठा हातभार लावला. हे आपण गेल्या ५/६ महिन्यापासून पाहत आहोत. वंचितला भाजपची B टीम ठरवत राजकारणातून हद्दपार करण्याची आणि वंचितांचे स्वाभिमानी आणि सन्मानाचे आंबेडकरी बाण्याचे राजकारण चिरडून टाकण्याचे मनसुबे काँग्रेसने या सर्वांच्या साथीने नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केले.
काँग्रेस यात सर्वार्थाने यशस्वी झाली. हरकत नाही काँग्रेस ने आज वंचितांना पुन्हा फसविले. हे वंचिताच्या लक्षात येईलच आणि परत आम्ही वंचित बहुजनाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर लढत राहू.
कारण आम्हाला माहित आहे की तुम्ही जनतेला एकदा दोनदा फसवू शकता, पण वारंवार जनतेला फसवू शकत नाही.फसवू शकत नाही. दलित, आदिवासी,भटका विमुक्त समाज,शोषित पीडित ,सर्वहारा वंचित समुहाचे स्वाभिमानी आणि सन्मानाचे आंबेडकरी बाण्याचे राजकारण करणाऱ्या ऍड.बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाला भाजपाला मदत करनारे राजकारण करतात. अशाप्रकारचे अत्यंत तकलादू आणि विवेकशून्य विश्लेषण करणाऱ्या स्व बुद्धिवादी/स्व बुद्धिजीवी स्वयंघोषित विचारवंतांची काँग्रेसी मानसिकता या निमित्ताने उघडपणे चव्हाट्यावर आली आहे.हे आपल्या सर्वांच्या लक्षात आले. खरं तर आपल्या नेत्यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन आपले सर्व पत्ते माध्यमाच्या समोर खुले केल्यामुळे हे घडले. जर मा. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वारंवार पत्रकार परिषदा घेतल्या नसत्या, तर आपली रणनीती भाजप आणि काँग्रेस यांना समजली नसती.आणि त्यांना आपल्या विरुद्ध हे स्वयं घोषित आंबेडकर वादी सोडता आले नसते. *नेमके काँग्रेस ने शेवट च्या क्षणा पर्यंत आपल्याला त्यांचा डाव कळू दिला नाही. कारण त्यांना संविधान वाचवायचे नव्हते तर ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित नेतृत्वाला सत्ते बाहेर ठेवायचे होते. ही त्यांची हुशारी त्यांनी साधून घेतली. व ते यशस्वी झाले.पण आपल्याला मात्र त्यांनी बाहेर झूलवत ठेवलं. जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा आपणही आपले हुकमी पत्ते हे उघड करायला हवे होते पण bjp काँग्रेस चे दलाल मीडिया वाले ऍड. मा. बाळासाहेब आंबेडकर यांना उलट सुलट असे प्रश्न विचारून सर्व डाव वंचिताच्या राजकारणावर उलटवला. मला वाटते की युतीचे राजकारण करण्यासाठी आपण कुठेच काहीच न बोलता अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत आपले पत्ते उघड करू नये. व पत्रकार परिषद घेऊन आपली रणनीती वेळेच्या अगोदर उघड करू नये.मीडियावाले हे पत्रकार नाही तर काँग्रेस बीजेपी चे दलाल आहे. ते सत्य कधीच जनते समोरमांडत नाही. उलट जनता बुचकळ्यात कशी पडेल,आणि वंचिताचे राजकारण कसे अपयशी होईल, हे त्यांचे प्रमुख काम आहे. कोणी किती भ्रष्टाचार केला?, गरिबांचे जगण्याचे प्रश्न, रोजगारीचे प्रश्न, महागाई गगनाला भिडली. शिक्षनाचे खाजगी करण केल्यामुळे गरिबांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. मेडिसिन आव्याक्याच्या बाहेर महाग झालं. सर्व जनता या गोष्टीमुळे होरपडून निघत आहे. मात्र दुर्दैव हे की ही परिस्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांना बदलवण्याची मानसिकता ह्या गुलाम असलेल्या मेंदू मधून जात नाही आग लागलेली सर्व जण पाहत पण ती विझवण्यासाठी कोणी प्रयत्न करीत नाही. आणि जे तन मन धनाने प्रयत्न करतात. त्यांच्यावर यांचा विस्वास नाही. म्हणून हे सर्व फक्त आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत नाही. फक्त दुरून गंम्मत पाहत आहे. यांना आस लागत आहे तरी हे बदल स्वीकारत नाही. कारण मानसिकता जातीची, धर्माची,पक्षाची यांच्या मध्ये ठासून भरली आहे. काँग्रेस भाजप ने मुस्लिम,मराठा, धनगर, यांना आरक्षणाच्या नावे हातचे बाहुले करुन ठेवले आहे.ह्यांना फक्त आस्वासन देता. पण त्यांच्या अडचणी सोडवत नाही. सोडवण्याचे नाटकं मात्र करतात. आणि हेच सामाजिक प्रश्न विचारण्याचे कार्य आपल्या मिडीया चे आहे अगदी पण अगदी महत्वाच्या विषयवार सरकार किंवा विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याची एकाही पत्रकारा मध्ये हिम्मत नाही. कारण भारतामधील लोकशाहीचा चौथा स्तंभ हा गुलाम झालेला आहे. त्यामुळे तो सत्ये कथन करीत नाही, तर समाजाच्या अहिताचे काय आहे. कश्यामुळे समाजाचे अहित होईल यांच्या बातम्या जाहिराती ह्या वारंवार दाखवून लोकांना फसविले जात आहे. हे देशाचे सर्वात मोठे दुर्देव आहे.असो पत्रकार हे निपक्ष असतात पण येथे क्वचित एखादा अपवादाणे पत्रकार असेल जो नेहमी सत्याची बाजू घेतो बाकी तर बिन बुडाचे लोटे आहे. तरिही तेजनतेचे नाही म्हणून त्यांच्यावर रोष नाही. असे नाही जे कारणीभूत आहे. दोषी आहेत, ते दोषी आहेतच. पण जे स्वतः ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी समजता ते जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पायमल्ली करुन इतरांना मदत करता तेव्हा त्यांची कीव येते. की यांना कोणत्या प्रकारचे आंबेडकर वादी म्हणावे खरं तर हे *कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ* असे आहेत हे आज जर उद्याच्या पिढ्यांचे नुकसान लक्षात घेणार नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली क्रांती कधीच होणार नाही.म्हणून मला माझे मत मांडवे वाटते की जर चळवळी ला मदत करता येत नसेल तर करू नका. काही फरक पडणार नाही. पण चळवळीचे नुकसान होईल असे पाऊल ही तुम्ही उचलता कामा नये. कारण गेल्या १९६७/६८ सालापासून हे असे नेहमी होत आहे. असे म्हटल्या पेक्षा काँग्रेस भाजप च्या नेत्यांनी आपल्यातील काही बळीचे बकरे हाताशी धरून वंचित बहुजनांचे राजकारण संपविण्याचे कट कार्यस्थान केले व त आजही अविरत सुरु आहे. हे स्वतःला बौध्द म्हणणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.
नाही तर एवढ्या अथक परिश्रमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याचा समाजाला काय फायदा ? ह्या अश्या वागणुकीमुळं आपलं अस्तित्व कधी निर्माण होईल.आणखी किती दिवस इतरांची गुलामी करायची? इतरांचे चे गुलाम म्हणून मोठेपण माणण्यात काय अर्थ ? आपल्या मातीवर राष्ट्रवादी काँग्रेस सेना मनसे भाजप किंवा इतर कुणीच येणार नाही. हे कायम लक्षात ठेवा.करिता आता तरी विचार बदलवा.आता जर आपण सावध पवित्रा घेऊन लढलो नाही तर आज वरील सर्व काँग्रेस भाजप ला मदत करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवा तुम्ही गेल्यावर तुमच्या मुलांना कुणी विचारणार नाही. उदा. गवई साहेब यांचा मुलगा राजेंद्र गवई यांची आजची परिस्थिती काय आहे. हे समजून घ्या. समाजाला आणि आंबेडकर घराण्याला विरोध करणाऱ्या प्रत्येकाणे विचार करुन वागावं.शत्रू कोण मित्र कोण हे ओळखलं पाहिजे. काँग्रेस ने संविधान आणि लोकशाही च्या विषयावर निवडणुका लढून काही अंशी लोकांना फसविले आहे.ते संविधान वाचणार की नाही? तर मुळीच नाही. हे कोण संविधान वाचवणार ? हे फक्त सत्ता आपल्या हाती कशी येईल.... हा विचार करीत असतात .आणि एकदा का, यांना सत्ता मिळाली की यांना
... संविधानाशी काही घेणे देणे नाही.संविधान वाचविण्याची लढाई कोण लढणार आहे -- काँग्रेस की राष्ट्रवादी सेना की मनसे कोणीच नाही ? आता याविषयी कोणीच काही बोलत नाही. आणि बोलणार सुद्धा नाही. कारण त्यांचा स्वार्थ आपल्यातील काही स्वयंघोषित आंबेडकर वादी समजणाऱ्या लोकां मुळे साध्य झाला आहे. लोकशाही आणि संविधाना च्या नावे वंचितांचे राजकारण मात्र उद्ध्वस्त करण्यासाठी हा खटाटोप राष्ट्रवादी काँग्रेस सेना बीजेपी यांचा कावा आहे.हे आपण विसरता कामा नये.हे मात्र नक्की.
लक्षात घ्या.
आंबेडकरी चळवळ ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय चालणार नाही.
कारण ते स्वाभिमाणाचा निर्भीड,अभ्यासू ब्रँड आहे.
म्हणून सावध व्हा. आणि वंचित बहुजन आघाडीचे सच्चे. स्वाभिमानी, निष्ठावंत कार्यकर्ता व्हा. नेता व्हा व आपल्या येणाऱ्या पिढ्याचे भवितव्य उज्वल करण्यासाठी मदत करा.नाही तर इतर पक्षावाले तुम्हाला गुलाम म्हणून वागवतील हे मात्र निश्चित आहे.
जयभीम.
विजय झनके
नेरूळ
No comments:
Post a Comment