- डॉ भीमराव य आंबेडकर
प्रत्येक जिल्ह्यात धम्म रथ -संविधान रथ काढणार.
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
पुणे /जुन्नर (11,12 नोव्हेंबर 2023) - लेण्याद्री येथील बौद्ध लेण्यांना वंदन करताना लक्षात आले की येथेही अतिक्रमण झाले असल्याने बौद्ध लेण्यांना जागतिक वारसा मिळाला पाहिजे. पुरातत्व विभाग व देशातील लोकांची मानसिकता नाही म्हणून आपल्याला जागरुक व्हावे लागेल .तेथे नियमित कार्यक्रम करावेत ,सम्राट अशोका नंतर 10 राजे झाले असून सातवाहन राजाच्या काळात लेणी निर्माण केल्या आहेत .
आपल्या पंतप्रधान यांनी जी 20 परिषदेच्या वेळी पूर्वीच्या 19 बौद्ध विश्व विद्यापीठ प्रतिकृती लावली आम्ही त्या काळी किती प्रगत होतो हे सांगितले पण आता किती प्रगत आहोत हे नाही दाखविले .छत्रपती
शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब यांचे वेगळे संबंध होते,डॉ बाबासाहेबांनी शिवाजी महाराज यांना
आदर्श मानले होते.चवदार तळ्यावरील सत्याग्रहाच्या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे रायगडावर नतमस्तक होण्यास गेले होते.डॉ बाबासाहेब त्यांच्या लेटर हेडवर जय भवानी जय शिवाजी असे लिहिले होते .ती पत्रे आजही माझ्याकडे असल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव यशवंत आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष,समता सैनिक दल )यांनी लेण्याद्री ,जुन्नर जिल्हा पुणे येथील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा पुणे पश्चिम जिल्हा शाखेच्या वतीने दि 12/11/2023 रोजी आयोजित केलेल्या पुणे विभागीय धम्म अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले.त्यांनी पुढे असे प्रतिपादन केले की ,मनुवादी चुकीचा संदर्भ देतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या ड्राफ्टच्या वेळी मला बुद्ध व शिवराय यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे असे सांगितले होते.
आताचा काळ खूप कठीण आहे .डॉ बाबासाहेब यांना विरोध केला ,त्यांच्या क्रांतीला विरोध केला ते आज सत्तेवर आहेत .ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीला पुढे घेऊन जाऊ देणार नाही. विचारांचे विरोधक आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणणार ,डॉ बाबासाहेब व समतेचे महामानव यांच्या विचारांचे काम करताना परिस्थितची जान पाहिजे अनेक कायदे ,एज्युकेशन बील मूळे जि प व म्युनिसिपल शाळा दिसणार नाही प्रत्येक वर्गात फी द्यावी लागणार,बाबासाहेबांच्या आरक्षणामूळे शिक्षण ,
नोकरी ,अधिकरी झाले हे विरोधकांनी जाणले आहे त्यामुळे शिक्षण बंद करीत आहेत.सरकारी नोकऱ्या बेरोजगारी वाढली ,
कंत्राटी नोकरी, तरुण वर्ग बेरोजगार आहेत डॉ बाबासाहेब यांनी क्रांती आणि प्रतीक्रांती सांगितली नवीन पिढीचा आपला विचार करून प्रतीक्रांतीला दाबावे लागेल , आपला आर्थिक कना मोडला तर पूर्वीप्रमाणे आमच्या गुलामीत राहतील असे त्यांचा मनसुबा आहे,
2023/2024 वर्षं महत्वाचे आहे आता पाच राज्यात निवडणूक व पुढील वर्षी एप्रिल /मे मध्ये देशाची निवडणूक आहे. ओबीसी ,एस सी ,एसटी यांना धोका आहे त्यामुळे संविधान समर्थक कोणता पक्ष आहे त्याला मतदान करावे लागेल.
याप्रसंगी कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव ) हे प्रमुख उपस्थित्त होते तसेच एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर ,समता सैनिक दल ),भिकाजी कांबळे (अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य ) यांनी मार्गदर्शन केले.
एस के भंडारे यांनी, लेण्याद्री येथे बुद्ध लेण्यांमध्ये अतिक्रमण झाले असून तेथील भूत लेणी नामकरण यावरून संस्थेच्या लेणी संवर्धन युनिटच्यावतीने डॉ भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते लेणीचा खरा इतिहास व खऱ्या मानमुकुड बौद्ध लेणी नावाचा बोर्ड लाऊन उपक्रम केला त्याप्रमाणे आता सर्व लेण्यांवर असे खरा इतिहास व खऱ्या नावाचा फलक समता सैनिक दलाचे लेणी संवर्धन युनिट लाऊन जनतेसाठी खरी माहिती उपलब्ध करून देईल असे सांगून बौद्धाचार्य यांनी केवळ विधी आणि निधी साठी काम न करता धम्म प्रचार प्रसाराचे काम करावे. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांती गतिमान करण्यासाठी कोणत्याही धर्मावर टीका टिपणी न करता डॉ भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वखाली 2025 पर्यंत 10 करोड लोकांचे धर्मांतर करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पाच इतर समाजाच्या लोकांना घरवापसीसाठी प्रवृत्त करावे असे सांगितले.
भिकाजी कांबळे यांनी,लेण्याद्री लेण्यांची माहिती सांगून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या शाखेत 50 हजार बौद्ध सभासद व 2 हजार सैनिक करावेत असे सांगितले
तसेच या अधिवेशनास पुणे पश्चिम ,पूर्व , शहर व पिंपरी चिंचवड ,सातारा,
सांगली,कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील अध्यक्षयांनी आपले मनोगत व्यक्त केले.या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पुणे पश्चिम चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस शिंदे यांनी केले.स्वागत अध्यक्षस्थानी जुन्नर तालुका अध्यक्ष राकेश डोळस होते.
अधिवेशनाच्या प्रारंभी सकाळी डॉ भीमराव य आंबेडकर,कॅप्टन प्रविण निखाडे ,एस के भंडारे ,
भिकाजी कांबळे व लेणी संवर्धन युनिटचे रविंद्र सावंत ,
दिनेश ढबाले यांच्यासह समता सैनिक दलाच्या पुणे ,सांगली ,सातारा कोल्हापूर ,सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 300 सैनिकांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी लेण्याद्री व भूत लेणी येथे भेट दिली व खरा इतिहास व खऱ्या नावाच्या इतिहासाचा बोर्ड लावला व अधिवेशनाच्या सुरवातीला जुन्नर शहरातून सैनिक ,
कार्यकर्ते यांनी धम्म रॅली काढली व शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला डॉ भीमराव आंबेडकर यांनी पुष्पहार अर्पण केली व समता सैनिक दलाने मानवंदना दिली .
समता सैनिक दलाच्या वतीने दादासाहेब भोसले (असिस्टंट स्टाफ ऑफिसर )व पी एस ढोबळे (असि.लेफ्टनंट जनरल ) यांनी दलासह मानवंदना दिली. या अधिवेशनास पुणे जिल्हा,सांगली ,कोल्हापूर ,सातारा व सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते व दलाचे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे जिल्हा पूर्व शाखेच्या वतीने दि 1/11/2023 ते 11/11/2023 अखेर 128 गावातून धम्म रथ फिरवण्यात आला त्याचा समारोप वाघोली येथील सिद्धार्थनगर,लुंबिनी बुद्ध विहार येथे डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी डॉ भीमराव य आंबेडकर यांनी असे प्रतिपादन केले की , हा महाराष्ट्रात प्रथम फिरविलेला धम्म रथ, समतेच्या विचारांचा व भाईचाराचा रथ नेला. तो सांकृतिक वारसा जतन करूया.ही अन्यायाच्या विरुद्ध लढाई आहे, भीमा कोरेगांवच्या विजयाने
समता स्थापन करण्याचा पराक्रम केला महारानी केला त्यांच्या बरोबर काही मातंग ,मराठा होते.
भीमा कोरेगाव हे जगात प्रसिद्ध आहे पण त्याचा विकास झाला नाही आराखडा दिला होता ते अधिकारी बदलेले ते काम मागे पडले आहे कारण 205 वर्षा पूर्वीचे विचारांचे लोक सत्तेत आले .पूर्वीप्रमाणे लढाई लढावी लागणार आहे पण ती आता मतदान करून करावी लागेल
विषमतेवर एकाच उपाय आहे तो म्हणजे बौद्ध धम्म आहे,पिढ्यान् पिढ्या गेल्या पण त्यांनी समता दिली नाही ती बौद्ध धम्मात आहे.
यावेळी कॅप्टन प्रविण निखाडे ,एस के भंडारे व भिकाजी कांबळे यांनी धम्म रथा बद्दल जिल्हा शाखा पुणे पूर्व चे खूप खूप अभिनंदन केले व त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात रथ काढून धम्म गावा गावांत पोहचविला पाहिजे असे आवाहन केले. यावेळी रथातील बुद्ध मूर्तीची स्थापना वाघोली येथील लुंबिनी बुद्ध विहारात डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आली.
त्यापुर्वी डॉ भीमराव य आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभला भेट दिली व त्यावेळी त्यांनी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना दिली त्यानंतर स्तंभाची पाहणी केली असता त्यांनी ,क्रांती स्तंभ बरोबर दिसत नाही दुःख वाटते 200 वर्षां पूर्वी ज्या 500 महारानी विषमतेच्या विरुद्ध लढा दिला त्या ऐतिहासिक स्तंभाचा विकास करण्यासाठी
बार्टीला प्लान दिला त्याला लागून असलेली जमीन घेण्यास सुरूवात पण झाली पण सरकारने त्या अधिकाऱ्यांची बदली केली हे बरोबर नाही,हे सरकारचं बदलण्यासाठी काम करावे लागेल असे सांगितले. या धम्म रथ समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष अरुण सोनवणे होते सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस राजरतन थोरात यांनी केले.यावेळी पश्चिमहवेली ,वेल्ला ,भोर,
पुरंदर ,बारामती ,इंदापूर ,दौंड ,शिरूर आणि पूर्व हवेली तालुक्यांचा व रथासाठी आपली स्वतःची गाडी देणाऱ्या आयु.कापरे यांचा सत्कार करण्यात आला.