आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी):
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले. या मालिकेतील विशेष प्रवचन “विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध” या विषयावर दिनांक ३१ ऑगस्ट २०२५, रविवार रोजी संपन्न झाले. प्रवचनकार म्हणून केंद्रीय शिक्षक व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय डॉ. राजेश पवार गुरूजी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या प्रवचनात त्यांनी “विश्वगुरु कसा असावा?” या विषयावर सखोल विचार मांडले. सत्य, करुणा, अहिंसा, समता, विज्ञाननिष्ठ विचार, शांती व बंधुत्व हे विश्वगुरुचे गुण असल्याचे सांगून, भगवान बुद्ध हेच खरे विश्वगुरु आहेत, असा ठाम संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. भरत कडू तायडे यांनी भूषविले. सरचिटणीस आयु. काशिनाथ अनाजी ढोले यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशासाठी योगदान देणारे पदाधिकारी व कार्यकर्ते: संरक्षण सचिव : आयु. बाजीराव काशिनाथ चंद्रमोरे. प्रचार व पर्यटन सचिव : आयु. शाम पांडूरंग पगारे.कार्यालयीन सचिव : आयु. गजानन त्रंबक मेढे. हिशोब तपासनीस : आयु. उत्तम तुकाराम डावरे.विहार व्यवस्थापक : आयु. सुरेश दोंदे.संघटक: आयु. विलास बापूराव घोडेस्वार, आयु. सचिन आनंद हिरे, आयु. एल. जी. त्रिभुवन, आयु. देवराम निवृत्ती शिंदे, आयु. रामभाऊ लिंबाजी जोगदंड, आयु. अशोक शामसुंदर रोकडे, आयु. प्रमोद पोपट सोनावणे, आयु. अमित अशोक गायकवाड संघटीका: आयुनी. सुनिताताई जीवन तायडे, आयुनी. नेहाताई सूर्यकांत रामटेके, आयुनी. हर्षाताई विनोद जाधव
👉 आयुष्यमानिनी राजश्रीताई राजेंद्र कदम यांच्या कडून खीरदान करण्यात आले.विशेष उपस्थिती: आयुष्यमान उत्तम सोनवणे (ठाणे जिल्हा संस्कार सचिव)या प्रवचनास परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमामुळे वातावरण धम्ममय भावनेने भारावून गेले.
🙏 जय भीम – नमो बुद्धाय 🙏
📌 बॉक्स न्यूज : “विश्वगुरु कसा असावा?” – डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन
१️⃣ सत्याचा उपदेशक – अनुभव, प्रज्ञा व सत्यावर आधारित ज्ञान देणारा. उदा. बुद्धांचे “आंधळा विश्वास ठेवू नका.”
२️⃣ करुणा व अहिंसेचा मार्गदर्शक – हिंसेने नव्हे तर मैत्रीने जिंकणारा. उदा. अंगुलीमालाचे परिवर्तन.
३️⃣ समानतेचा प्रवक्ता – जात, धर्म, लिंग यांवर भेदभाव न करणारा. उदा. स्त्रियांना संघात स्थान, शूद्रांना समता.
४️⃣ विज्ञान व तर्काचा आदर्श – अंधश्रद्धा टाळून तर्कशुद्ध विचार करणारा. उदा. कलाम सुत्त.
५️⃣ शांती व बंधुत्वाचा ध्वजवाहक – संघर्षावर मात करून शांततेचा मार्ग दाखवणारा. उदा. मेत्ता सुत्त – “सर्व प्राणी सुखी होवोत.”
६️⃣ आदर्श वर्तन असलेला – बोलण्यापेक्षा आचरणाने शिकवणारा. उदा. बुद्धांचा गृहत्याग.
७️⃣ जगाला एकत्र आणणारा – मानवजातीला एक कुटुंब मानणारा. उदा. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय.”
👉 त्यामुळे तथागत भगवान बुद्ध हेच खरे विश्व
गुरु आहेत.
No comments:
Post a Comment