दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
संस्थापक: बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संरक्षक : अदा. महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीष रावलिया
रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲड जौंजाळ साहेब
राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब
=================================
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
मुंबई, २ फेब्रुवारी २०२५ – दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या विद्यमाने केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सुभेदार रामजी बाबा सपकाळ यांच्या स्मृति दिना पासून (२ फेब्रुवारी २०२५) ते माता रमाई जयंती दिना पर्यंत (७ फेब्रुवारी २०२५) चालणार आहे.
शिबिराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर पश्चिम, मुंबई येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आदरणीय डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते दि.२/२/२०२५ रोजी झाले.
या शिबीरात संस्थेचे राष्ट्रीय सचिव राजेश पवार यांनी भारतीय बौद्ध महासभा व कार्य हा विषय शिकविला.
हा विषय पुढीलप्रमाणे आहे.
युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रहादेशातील रंगुन येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत दि.४/१२/ १९५४ रोजी सहभागी झाले. तिथे त्यांनी 'बुद्धिस्ट मुव्हमेंट इन इंडिया' अर्थात 'भारतातील बौद्ध चळवळ' या विषयावर सविस्तर भूमिका विषद केली. भारतात परतल्यानंतर त्यांनी 'दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया' या धम्मसंस्थेची स्थापना केली. स्वतः या संस्थेची घटना, अध्यक्षीय लोकशाही पद्धती अनुसार लिहिली. त्यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांपैकी केवळ याच संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःकडे ठेवले. ही संस्था 'सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट-१८६०' अन्वये नोंदणीकृत केली. दि. ४ मे १९५५ रोजी रजिस्ट्रेशन क्रमांक ३२२७ मिळाला. तसेच ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट-१९५० अन्वये धर्मादाय आयुक्तांकडे पंजीकृत केली. तिचा नोंदणी क्रमांक ९८२ (एफ) मुंबई दि.१८ मे १९५५ रोजी प्राप्त केला.
या दोन कायद्यांच्या अंतर्गत रजिस्टर्ड केलेल्या 'दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया' या धम्मसंस्थेच्या घटनेत
12 अनुच्छेद आहेत.
१) नाव
२) पत्ता
३) 10 ध्येय उदिदष्ट
४)दान स्विकारण्याची अनुमती
५) सभासद कसा असावा. सर्वसाधारण सभासद सक्रिय सभासद आजीवन सभासद
6) सभासद फी...20/- 100/-, 1000/-
7) अध्यक्ष कसा निवडावा,
8) सरचिटणीस आणि खजिनदार कसा निवडावा
९) संस्थेचे व्यवस्थापन कसे असावे
१०) बँक खाते कसे असावे
११) संस्थेचे बैठका AMG, जनरल बैठका, मासिक बैठका
१२) संविधानात परिस्थितीनुसार बदल / दुरुस्ती करणे.
अनुच्छेद एक नुसार संस्थेचे नाव दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असे ठेवण्यात आले आहे.
अनुच्छेद दोन नुसार संस्थेचा पत्ता पुढील प्रमाणे आहे.
डॉक्टर आंबेडकर भवन गोकुळदास पास्ता रोड, दादर पूर्व मुंबई 400014
अनुच्छेद 3 नुसार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खालील १० ध्येय आणि उद्दिष्ट्ये नमूद केली आहेत.
१) भारतभर बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणे,
२) बौद्ध पूजापाठासाठी गावोगावी बुद्ध विहार बांधणे.
३) धार्मिक व शास्त्रीय शिक्षणाकरिता शाळा व कॉलेज काढणे.
४) अनाथालय, दवाखाने व विविध सहाय्यता केंद्र काढणे.
५) बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ प्रशिक्षण शिबीरे राबविणे.
६) सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
७) बौद्ध साहित्याचे प्रकाशन करून सामान्य माणसांपर्यंत पत्रके, पॅम्पलेट्स, पुस्तके पोहोचविणे,
८) गरज पडल्यास धर्मगुरूंचा नवा वर्ग निर्माण करणे,
९) बौद्ध साहित्याची छपाई करण्याकरिता प्रेस, छापखाने, मुद्रणालये चालविणे
१०) भारतीय बौद्धांमध्ये एकसूत्रता आणण्याकरिता व बंधुभाव संवर्धनाकरिता संमेलन, मेळावे, परिषदा व अधिवेशने भरविणे.
डॉ .बाबासाहेब अबिडकरांनी 'जनता' पाक्षिकाचे नामांतर दि. ४ फेब्रुवारी १९५६ रोजी 'प्रबुद्ध भारत' असे केले. भारतातील बौद्धांसाठी 'बुद्ध पूजा पाठ' ही पुस्तिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. २४ फेब्रुवारी १९५६ रोजी पालि भाषेत लिहून, गाथांचा मराठी अनुवाद सुद्धा त्यात लिहिला. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटीश ब्रॉड कास्टींग (बी.बी.सी.) लंडन वर 'मला बौद्ध धम्म का पसंत आहे.' या विषयावर दि. १२ मे १९५६ रोजी तर्कशुद्ध भाषण दिले
दिल्ली येथील जाहीर सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'धम्मपद आणि गीता' या विषयावर दि.१० जून १९५६ रोजी तुलनात्मक विश्लेषण केले. धम्मदीक्षा घेण्यासाठी शुभ्र वस्त्र परिधान करून नागपूरच्या नाग भूमिवर अशोका विजयादशमीला येण्याचे जाहीर आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दि.२३ सप्टेंबर १९५६ रोजी प्रेस कॉन्फरन्स घेऊन व जाहीर पत्रक काढून देशभरातील जनतेला केले
पुज्य भन्ते महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोका विजयादशमीच्या दिवशी दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी 'दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया', नागपूर जिल्हा शाखेच्या धम्मपीठावर स्वतः धम्मदीक्षा घेतली, त्यानंतर २२ कागदावर लिहिलेल्या २२ प्रतिज्ञा, डोळ्यावरील चष्मा काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जमलेल्या ५ लाख जनसमुदायाकडून जाहीरपणे वदवून घेतल्या. मग त्यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हे जगातील सर्वात मोठे धर्मातरण ठरले. तसेच तथागत भगवान बुद्ध व चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या नंतर हे धर्मांतर तिसरे विश्व विख्यात 'धम्म चक्र प्रवर्तन' ठरले. दर एकाने - दर एकाला धम्मदीक्षा देण्याचा अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व उपस्थितांना दिला.
पुढील धम्मदीक्षेचा भव्य सोहळा मुंबईत घेण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केले. परंतु अल्पावधीतच त्यांचे दिल्ली येथे दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यांचा अंत्यविधी दादर (पश्चिम) येथे चौपाटीवर दि. ७ डिसेंबर १९५६ रोजी करण्यात आला. त्यांच्या अंत्यदर्शनाला जमलेल्या १० लाख 'अनुयायांना पुज्य भदन्त डॉ. आनंद कौसल्यायन यांनी धम्मदीक्षा दिली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांची शेवटची इच्छा त्यांच्या अंत्यविधीमध्ये, त्यांच्या चितेला साक्ष ठेऊन पूर्ण केली.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 'संपूर्ण भारत देश बौद्धमय करण्याचा' सम्यक संकल्प साकार करण्यासाठी त्यांच्या पश्चात 'भारतीय बौद्ध महासभेच्या' राष्ट्रीय अध्यक्ष पदावर त्यांचे एकमेव सुपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची सर्वानुमते निवड झाली, ती जहांगीर हॉल, मुंबई येथे संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत दि. ३ जानेवारी १९५७ रोजी, सूचक होते आयु हिंदळेकर भय्यासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा सोहळे घेऊन धर्मांतर करण्यासाठी काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत देशभर दौरे करून हजारो लोकांना बौद्ध बनविले थायलंड मधील बँकॉक शहरात संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत दि. २४ नोव्हेंबर १९५८ रोजी भय्यासाहेब आंबेडकर सहभागी झाले. विविध बौद्ध राष्ट्रांतील सहभागी भिडूंना आणि प्रतिनिधींना डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित 'बुद्धा अँड हीज धम्मा' हा इंग्रजी ग्रंथ, भय्यासाहेब आंबेडकरांनी सप्रेम भेट देऊन, बौद्ध धम्माचा जगभर प्रसार करण्याचा कुशल प्रयास केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ७५व्या जयंती निमित्त त्यांच्या जन्म ठिकाणी महु (मध्यप्रदेश) येथे संपन्न झालेल्या अमृत महोत्सवी भीम-जयंती सोहळ्यात भय्यासाहेब आंबेडकर सहभागी झाले केंद्रीय मंत्री बाबु जगजीवनराम यांच्या हस्ते उद्घाटन करून, महपासून भय्यासाहेब आंबेडकरांनी 'भीम-ज्योत' काढली. तो धम्मरथ पायी पायी इंदौर, छापरा, खातेगाव, हरदा, चिमुरनी, चिचोली, बेतुल, मुलताई, सावनेर मार्गे नागपूर (दीक्षाभूमी) व महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतून दादर चौपाटीला आणला. या धम्म प्रचारात जमा झालेल्या धम्मदानातून भय्यासाहेब आंबेडकरांनी आपल्या वडिलांचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चैत्यस्मारक 'चैत्यभूमी' या नावाने, त्यांच्या अंत्यविधीच्या जागेवर बांधले.
बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी स्वतः प्रव्रज्जीत होणे गरजेचे आहे. याची जाणीव ठेऊन, भय्यासाहेब आंबेडकरांनी दि. ८ ऑक्टोबर १९६७ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनी पूज्य भन्ते यु. वज्रबोधी यांच्याकडून श्रामणेर प्रव्रज्जा घेतली. १० दिवस मुंडण करून, चिवर परिधान करून, १० शिलांचे पालन करून, ७५ विनयांचे अनुपालन करून 'पंडीत काश्यप' या प्रव्रज्जीत नावाने भय्यासाहेब आंबेडकरांनी धम्मज्ञान व संघज्ञान आत्मसात केले. त्यांनी श्रामणेर दीक्षा घेऊन, त्यागमय जीवनाचा अनुभव घेतला.
बौद्धांचे संस्कार विधी कसे असावेत, कोणकोणते असावेत, त्यात कोणकोणत्या गाथा असाव्यात आणि मांडणी व कृती कशी असावी, हे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून व त्यांनी लिहिलेल्या 'बौद्ध पूजा पाठ' या पुस्तिकेशी सुसंगत असे 'बौद्ध जीवन संस्कार पाठ' हे पुस्तक तयार करण्यासाठी भय्यासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दि. २३ मे १९६८ रोजी २७ बौद्ध विद्वानांची संस्कार समिती' स्थापन करण्यात आली. या संस्कार समितीमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, भदन्त आनंद कौसल्यायन, दा ता.सपवते, बी.पी. मौर्य, शंकरानंद शास्त्री.डी.ए. कट्टी, आर.एस.गवई, शांताबाई दाणी, हंसराज गजभिये, हरिहरराव सोनुले, पंडीत रेवारामजी कवाडे, भ.स.गायकवाड, जी. के. माने, एन.एम. कांबळे, घनःश्याम तळवटकर, भदंत शांतीभद्र, भदन्त वज्रयोधी, भदंत के. आनंद, भदंत रामानंद, भदंत शिवली बोधी, हरीभाऊ पगारे, बी.एस. ताम्हाणेकर हे सदस्य होते आणि आर.जी. सके, सुमंत गायकवाड व डी.बी सचाव हे निमंत्रक होते. या समितीने सर्वानुमते 'बौद्ध जीवन संस्कार पाठ' या पुस्तिकेची निर्मिती सहा महिन्याच्या कालावधीत केली. भारतीय बौद्ध महासभेचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन दि.२८ ऑक्टोबर १९६८ रोजी भय्यासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पुरंदरे स्टेडीयम मुंबई येथे संपन्न झाले. परम पावन दलाई लामा यांनी या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन केले. यामध्ये विविध देशांचे व राज्यांचे भन्तेगण आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या अधिवेशनात 'बौद्ध जीवन संस्कार पाठ' या पुस्तकाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या पुस्तकानुसार सर्व संस्कार विधी पार पाडण्यासाठी 'बौद्धाचार्य वर्ग निर्माण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बौद्धांच्या हितासाठी राखीव जागा, शिष्यवृत्ती मिळण्याकरिता अनेक ठराव पारीत करण्यात आले. सदर 'बौद्ध जीवन संस्कार पाठ' पुस्तक दि.२३ नोव्हेंबर १९६८ रोजी भय्यासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मुंबईत प्रकाशित केले.
श्रीलंकेतील कोलंबो येथे 'वर्ल्ड फेलोशीप ऑफ बुद्धिस्ट' च्या १०व्या बौद्ध धम्म परिषदेमध्ये भय्यासाहेब आंबेडकर सहभागी झाले. तसेच लंडन येथील 'धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी भय्यासाहेब आंबेडकर दि.९ ऑक्टोबर १९७२ रोजी रवाना झाले होते. दिल्ली येथे भरलेल्या आशियाई बौद्ध शांतता परिषदेत भय्यासाहेब आंबेडकरांनी दि. २३ फेब्रुवारी १९७४ रोजी ऐतिहासिक भाषण केले.
बौद्धांना सवलती मिळविण्यासाठी भय्यासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळ तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांना दि.१७ ऑगस्ट १९७७ रोजी दिल्ली येथे भेटले. त्या भेटीत मोरारजी देसाई कुत्सीतपणे भय्यासाहेब आंबेडकर यांना म्हणाले, 'तुम्हाला बौद्ध व्हायला कुणी सांगितले?' असा खोचक प्रश्न ऐकून भय्यासाहेब आंबेडकर सडेतोड बोलले की, 'माझ्या बापाने आम्हाला बौद्ध व्हायला सांगितले.' हा प्रसंग भय्यासाहेब आंबेडकरांच्या जिव्हारी लागला. मुंबईला आल्यावर ते आजारी पडले व के.ई. एम. हॉस्पिटलमध्ये त्यांचे दि. १७ सप्टेबर १९७७ रोजी दुःखद निधन झाले.
भय्यासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दि. २ ऑक्टोबर १९७७ रोजी सर्वसाधारण सभा झाली. तत्कालीन सरचिटणीस आयु.ज.वी. पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सूनबाई व भय्यासाहेब आंबेडकरांची धर्मपत्नी आयुष्यमती मीराताई आंबेडकर यांच्या नावाची सूचना मांडली. सर्वांचे अनुमोदन मिळाल्यावर मीराताई आंबेडकरांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी देशभर दौरे करून, राज्या-राज्यात, जिल्ह्या-जिल्ह्यात, भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा उघडून गाव तिथे बौद्धाचार्य व घरा-घरात समता सैनिक दलाचा सैनिक निर्माण करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण भारत देश बौद्धमय करण्याचा सम्यक संकल्प साकार करावयाचा निर्धार जाहीर केला.
चैत्यभूमी, दादार येथे वर्षावास प्रवचन मालिकेची सुरुवात आषाढी पौर्णिमा, १९८० पासून मीराताई आंबेडकरांनी केली. धम्मकार्याला गतीमान करून एकसूत्रता आणण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन अंबाझरी मैदान, नागपूर येथे दि. २६, २७ व २८ डिसेंबर १९८० रोजी मीराताई आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली हजारोंच्या उपस्थितीत संप झाले. या अधिवेशनात एकूण २४ ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आले तसेच बौद्ध जीवन संस्कार पाठाची नवीन आवृत्ती या अधिवेशनात प्रकाशि करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बोधीसत्व होते आधि भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष भय्यासाहेब आंबेडकर 'माजी श्रामणेर होते. हा त्यागाचा वारसा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जतन करावा म्हणून मीराता आंबेडकरांनी दि. १४ एप्रिल १९८२ रोजी 'श्रामणेर शिबीरांची' सुरुवात केली या सुवर्ण संधीचा लाभ सर्व वरिष्ठ बौद्धाचार्य/पदाधिकाऱ्यांनी घेऊन १० दिवा मुंडन करून चिवर परिधान करून १० शीलांचे पालन करून ७५ सेखीयांचे (विनयांचे) अनुपालन करून धम्मज्ञान व संघज्ञान आत्मसात केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेचा ५० वा वर्धापः दिन येवला येथे दि.१३ ऑक्टोबर, १९८५ रोजी आद. मीराताई आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भव्य दिव्य स्वरूपात व भीम अनुयायांच्या प्रचंड उपस्थितीः संपन्न झाला. या महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्य उपस्थितीत हजारो बंधु, भगिनींनी बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली.
बुद्धगया, लुम्बिनी, कपीलवस्तु, सारनाथ, वस्ती, राजगृह, नालंदा वैशाली, कुशीनगर इत्यादी. बौद्ध पर्यटन स्थळांचे धम्म-पर्यटन, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षा आद. मीराताई आंबेडकरांच्य मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रात प्रथमच ऑक्टोबर १९८५ पासून आयोजिर करण्यात येत आहे. यावर्षी पहिली धम्म सहल ५० जणांची नेण्यात आले होती. तेव्हापासून दरवर्षी असे धम्म पर्यटन संस्थेच्या प्रत्येक जिल्हा शाखेतू नेण्यात येत आहे.
बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 'संपूर्ण भारत देश बौद्धमर करण्याचा' सम्यक संकल्प साकार करण्यासाठी 'भंतेजींची' भूमिका अत्यंत मोलाची आहे. म्हणून भारतातील तमाम भंतेजींची तीन दिवसीय 'भिक्खू परिषद भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षा आद. मीराताई आंबेडका यांच्या अध्यक्षतेखाली दि.१४, १५ व १६ मे १९८६ रोजी डॉ. आंबेडका भवन, दादर ३ (पूर्व), मुंबई-१४ येथे संपन्न झाली. या भिक्खू परिषदेचे उद्घाटन 'दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया' च्या भिक्खू संघाचे संघनायक पूज्य भन्ते आनंद मित्र महाथेरो (कोलकता) यांनी केले. या भिक्खू परिषदेत देशभरातील अनेक भिक्खूगण सहभागी झाले होते. तसेच धम्मसंस्थेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा श्रामणेर प्रव्रज्जा घेऊन या भिक्खू परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत अनेक विषयांवर चर्चासत्र संपन्न झाले.
पूज्य भन्ते ठित्तबोधी यांनी सूचना मांडली की, सन १९७७ पासून १९८६ पर्यंत आद. मीराताई आंबेडकर ह्या 'दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया' या धम्मसंस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत चोखपणे सांभाळत असून प्रत्येक कार्यकर्त्याला श्रामणेर, बौद्धाचार्य बनवून, राष्ट्रीय धम्मपर्यटने काढून, धम्माचा रथ देशाच्या काना-कोपऱ्यात नेऊन, विविध राज्यांत शाखा उघडून, 'धम्मध्वज फडकवत आहेत. म्हणून त्यांच्या या योगदानामुळे त्यांना 'महाउपासिका' या उपाधीने सन्मानित करण्यात यावे. त्यांच्या या सूचनेला उपस्थित सर्व भिक्खूनी व श्रामणेरांनी आनंदाने व एकमुखाने साधुकार देऊन अनुमोदन दिले. संघनायक महाथेरो आनंद मित्र (कोलकत्ता) यांच्या शुभहस्ते दि. १६ मे १९८६ रोजी भिक्खु संघाच्या वतीने आद. मीराताई आंबेडकर यांना 'महाउपासिका' उपाधी देऊन गौरवण्यात आले. तेव्हापासून आजतागायत जगभर आद. मीराताई आंबेडकरांना, 'महाउपासिका' असे गौरवपूर्ण संबोधण्यात येत आहे.
देशातील सर्व बौद्ध समाजात एकवाक्यता आणि एकसूत्रता आणण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन दि. १८ व १९ मार्च १९८९ रोजी डॉ. आंबेडकर भवन, राणी झांसी मार्ग, दिल्ली येथे घेण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर यांनी या अधिवेशनाचे अध्यक्षपद भुषविले. बौद्धांच्या अस्मितेसाठी व उत्थानासाठी या अधिवेशनात २४ मागण्यांचे ठराव पारीत करण्यात आले. त्यातील महत्वपूर्ण ठराव असे होते - बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी देशभर भव्य दिव्य स्वरूपात साजरी करणे, संसद भवनासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे, संसदेच्या हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र लावणे, पोस्टाच्या तिकीटावर व नाण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा छापणे, बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा करणे, बुद्धगया महाबोधी विहाराचा ताबा बौद्धांकडे देणे, सर्व बौद्ध लेण्या, गुंफा, चैत्य यांचे संरक्षण व संवर्धन करणे इत्यादी मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे सर्वानुमते ठरले. बौद्ध जीवन संस्कार पाठ या मराठी पुस्तिकेच्या चौथ्या आवृत्तीचा हिंदी भाषेमध्ये अनुवाद करण्याची हिंदी भाषिक राज्य शाखांची मागणी सर्वानुमते मान्य करण्यात आली. उत्तर भारतीयांसाठी विधी संस्कारात एकसूत्रता आणण्याचा ठराव संमत करण्यात आला,
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दि. २९ मे १९५० रोजी जाट समाजाच्या हजारो संघु आणि भगिनीना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. २२ धम्म प्रतिज्ञा ग्रहण करून धर्मातर सोहळा आनंदोत्सवात संपन्न झाला. तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात ठरल्याप्रमाणे हिंदी भाषिकांसाठी 'बौद्ध जीवन संस्कार पाठ' या पुस्तकाची । पहिली हिंदी आवृत्ती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांच्या हस्ते. १४ ऑक्टोबर १९९० रोजी प्रकाशित करण्यात आली.
धम्मचक्र प्रवर्तक बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी दि.१४ एप्रिल १९९१ रोजी देशभर अतिशय धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे भीमरावांच्या जन्मस्थळी मध्यप्रदेशातील महु (सद्याचे डॉ. आंबेडकर नगर) येथे भीमजयंतीचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देशभरातून लाखो भीम-अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. याच दिवशी संसदेसमोर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेले नाणे व पोस्टाची तिकीटे जारी करण्यात आली. देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मरणोत्तर गौरव केला आहे. या भीम जयंती-शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने प्रधानमंत्र्यांनी भारतीय बौद्धांना राखीव जागा व सवलती जाहीर केल्या.
उत्तर भारतातील मुंबईत वास्तव्य करणाऱ्या हिंदी भाषिक ७ हजार बंधु आणि भगिनींना, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दि. १७ ऑक्टोबर, १९९१ रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांनी चैत्यभूमी, दादर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. याच दिवशी देशभरातील शेकडो शाखांच्या वतीने, धम्मदीक्षेचे सोहळे पार पाडून लाखो लोकांना बौद्ध धम्माच्या सावलीत आणले.
भारतभर एकसूत्रता आणून बंधुभाव संवर्धनासाठी भारतीय बौद्ध महासभेचे ४ थे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन चैत्यभूगी, दादर येथे दि. २७, २८ व २५ नोव्हेंबर १९९२ रोजी घेण्यात आले. या अधिवेशनाचे उद्घाटन धम्मगुरू परम पावन दलाई लामा यांनी केले. अध्यक्षपदाची जबाबदारी महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर यांनी सांभाळली. या अधिवेशनात ऐतिहासिक व आकर्षक स्मरणिका संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आली,
धम्मप्रचाराचे मुखपत्र असलेल्या 'धम्मयान' या मासिकाचे खंडीत झालेले प्रकाशन पुनः निर्धाराने व जोमाने सुरू करण्यात आले. १४ राज्य शाखांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आले की, प्रत्येक शाखेत ४ विभाग कार्यरत राहतील. संस्कार विभाग, प्रचार/पर्यटन विभाग, महिला विभाग व संरक्षण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले 'समता सैनिक दल' स्वतंत्र न ठेवता, भारतीय बौद्ध महासभेचा 'संरक्षण विभाग' म्हणून कार्य करेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय या अधिवेशनात सर्वानुमते घेण्यात आला. तसेच समता दैनिक दलाच्या 'कमांडर इन चिफ' या प्रमुख पदावर भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बुद्ध वंदना-सूत्र पठणाची कॅसेट प्रथमच काढण्यात आली. बौद्धाचार्यांना व उपासिका/उपासकांना खिशात ठेवता येईल अशी छोटी, बुद्ध वंदना सूत्रपठणाची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा असावा, बौद्धांना केंद्र शासनाच्या आरक्षणाचा लाभ मिळावा, 'राजगृह' हे बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक बनवावे, असे विविध ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आले.
देशभर बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार गतीमान करण्यासाठी केंद्रीय शिक्षक व केंद्रीय शिक्षिका निर्माण करण्याचा व त्यांना उचित असे उच्च दर्जाचे धम्म प्रशिक्षण देण्याचा क्रांतीकारक निर्णय भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर यांनी घेतला. त्यानुसार दि. १८ फेब्रुवारी १९९५ ते २७ फेब्रुवारी १९९५ असे १० दिवसीय केंद्रीय शिक्षिका व केंद्रीय शिक्षक श्रामणेर शिबिर चैत्यभूमी, दादर येथे संपन्न झाले. प्रथम शिबीराचे उद्घाटन भिक्षु संघाचे संघनायक पूज्य भन्ते बुद्धपालजी यांनी केले. या शिबीरात २१ पुरुष पदाधिकाऱ्यांनी मुंडन करून, चिवर परिधान करून, प्रतज्जीत होऊन धम्मज्ञान ग्रहण केले तसेच १८ महिला पदाधिकाऱ्यांनी पूर्ण वेळ शिबीरात शुभ्र वस्त्र परिधान करून धम्मज्ञानाचा लाभ घेतला. अशा रितीने प्रथमच २१ केंद्रीय शिक्षक व १८ केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासभेच्या धम्मकार्याला देशभर गती देण्यासाठी प्रशिक्षित होऊन सज्ज झाल्या.
देशभरातील कार्यकर्त्यांना, उपासक, उपासिकांना, युवक, युवतींना व बालक, बालिकांना धम्माचे यथोचित ज्ञान देण्यासाठी ३९ केंद्रीय शिक्षक व शिक्षिकांच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांनी केंद्रीय प्रशिक्षण विभागाची सुरुवात दि.२ एप्रिल १९९५ रोजी चैत्यभूमी, दादर येथे केली. अशा रितीने भारतीय बौद्ध महासभेचे 'धम्म विद्यापीठ' म्हणून चैत्यभूमीला सुसंस्कृती, सुसंस्कार व सद्धम्माचे प्रशिक्षण देणारे केंद्र घोषित करण्यात आले. या धम्म विद्यापीठाच्या प्रमुख (कुलपती) महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर आहेत. प्रथम या केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख (कुलगुरु) आद.डी.डी. कसबे गुरुजी यांची नियुक्ती करण्यात आली होती. उपप्रमुख आद. बी. के. अहिरे गुरूजी आणि सचिव १) आद.बी.एच.गायकवाड गुरूजी व २) आद. वसंत पराड गुरुजी यांनी देशभर विविध धम्म प्रशिक्षण शिबीरे घेऊन, धम्म प्रचार प्रसाराला गती दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला चैत्यभूमी येथे त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम-अनुयायी येतात. त्यांना रांगेत दर्शन घेता यावे भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून सेवा करावी व भारतीय बौद्ध महासभेच्या 'समता सैनिक दलाच्या' सैनिकांनी युनिफॉर्म मध्ये सैनिक म्हणून सेवा करावी, असा निर्णय संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांनी घेतला. दि.७ डिसेंबर १९९६ रोजी चैत्यभूमी येथे प्रथमच संपन्न झालेल्या राष्ट्रीय सर्वसाधारण बैठकीत महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांनी अनेक निर्णय जाहीर केले. तेव्हापासून आजतागायत संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची सर्वसाधारण बैठक दरवर्षी ७ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे संपन्न होत असून, धम्मचळवळ गतीमान करण्यासाठी नवनवीन योजना आखून देशभरातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यात येते.
मुंबई प्रदेश शाखा, महाराष्ट्र राज्य शाखा व महाराष्ट्राच्या अंतर्गत असलेल्या ३६ जिल्हा शाखांच्या पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय प्रतिनिधी अधिवेशन दि.६ व ७ जुलै १९९७ रोजी चैत्यभूमी, दादर येथे राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. दोन दिवस विविध सत्रांमध्ये बौद्धांच्या न्याय्य मागण्या व समस्यांवर चर्चा करण्यात आली. एकूण १४ मागण्यांसाठी सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आले. ह्या मागण्यांचे निवेदन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, भारत सरकारला व महाराष्ट्र सरकारला सादर करण्यात आले.
महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा क्रांतीदिन, श्रामणेर शिबीराच्या समारोपाने संपन्न व्हावा, असा धम्म प्रेरक निर्णय महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांनी जाहीर केला. दि.२० मार्च १९९८ रोजी महाड येथे चवदार तळ्याशेजारी घेण्यात आलेल्या पहिल्या १० दिवसीय श्रामणेर शिबीराचा समारोह क्रांती स्तंभाला अभिवादन करून जाहीर सभेच्या माध्यमातून संपन्न झाला. तेव्हापासून आजतागायत महाड येथे १० दिवसीय श्रामणेर शिबीर घेण्यात येते व त्याचा समारोप क्रांती स्तंभाजवळ महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असतो. त्यातून प्रेरणा घेऊन अनेकांनी श्रामणेर दीक्षा ग्रहण केली आहे आणि धम्म अंगीकारला आहे.
देशभर बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार अधिक गतीमान करण्यासाठी २८ आसनांची 'धम्मयान' चार चाकांची गाडी (मिनी बस) भारतीय बौद्ध महासभेच्या देशभरातील कार्यकर्त्यांच्या धम्मदानातून दि. २४ जुलै १९९८ रोजी घेऊन, राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर यांना डॉ. आंबेडकर भवन, दादर येथे सुपुर्द करण्यात आली. या धम्मयान गाडीवर भारतीय बौद्ध महासभेचे नाव ठळक अक्षरात लिहिले होते. या गाडीने देशभरातील सर्व राज्यात व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत जाऊन धाग्मप्रचाराला गती देण्यास फार मोठे योगदान दिले आहे.
भीमा कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ जानेवारीला जात असत, तसेच त्यांच्या सुनबाई महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा या नात्याने दि. १ जानेवारी १९९९ रोजी पहिल्यांदा गेल्या. तिथे श्रामणेर शिबीराचा सांगता समारंभ होऊन, समता सैनिक दलाची मानवंदना देण्यात आली. तेव्हापासून आजतागायत भीमा-कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारीला भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आद. मीराताई आंबेडकर जाऊन, श्रामणेर शिबीराचा सांगता समारंभ करतात आणि समता सैनिक दलाची मानवंदना देतात. याद्वारे अनेकजण प्रेरणा घेऊन श्रामणेर प्रवज्जा घेत आहेत. तसेच धम्माचे काया, वाचा, मनाने पालन करीत आहेत.
देशभरातील धम्मकार्याला अधिक सक्रीय करण्यासाठी उत्तर प्रदेशातील खुर्जा, बुलंदशहर येथे भारतीय बौद्ध महासभेचे ५ वे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन दि. १२, १३ व १४ मार्च १९९९ रोजी घेण्यात आले. राजगृहावरून चैत्यभूमिला आणि चैत्यभूमिवरून खुर्जा बुलंदशहरला संस्थेच्या 'धम्मयान' गाडीने २८ राष्ट्रीय व महाराष्ट्र, मुंबईचे प्रमुख पदाधिकारी रवाना झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्षपद महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर यांनी भूषविले. या अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. या अधिवेशनात देशभरातील शाखांचे पदाधिकारी व लाखोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. या अधिवेशनात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे ४ राष्ट्रीय उपाध्यक्ष नियुक्त करण्यात आले. धम्मकार्य अधिक गतीमान करण्यासाठी विविध सत्रांमध्ये विचार मंथन करून निर्णय घेण्यात आले. या अधिवेशनात एकूण २४ महत्त्वपूर्ण ठराव पारीत करण्यात आले. या मागण्यांचे निवेदन केंद्र व राज्य सरकारांना सादर करावयाचे ठरले.
'बौद्ध जीवन संस्कार पाठ' या पुस्तकातील त्रुटी दुरुस्त करून महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यासाठी दि. १४ एप्रिल १९५५ रोजी २२पदाधिकाऱ्यांची उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या प्रमुख आद. महाउपासिका मीराताई आंबेडकर होत्या. सदस्य एस.के. भंडारे, भन्ते शिलप्रियजी, भन्ते नागसेनजी, भन्ते बी. संघपालजी, सुषमाताई पवार, एन.एम. आगाणे, एम.डी.सरोदे, एस.आर. कांबळे, बी.एच.गायकवाड, वसंत पराड, एच. एस.अहिरे, एस.एस. वानखडे, जगदिश गवई, ज्योतीताई तायडे, एस. के. खैरे, डी. के.तांबे होते. या समितीने अनेक बैठकांतून विचार मंथन करून सदर पुस्तकातील त्रुटींचा दुरूस्ती अहवाल सादर केला.
बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार गतीमान करण्यासाठी धम्मचळवळीत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महिला अधिवेशन दि. १६ जानेवारी २००० रोजी चैत्यभूमी येथे घेण्यात आले. या अधिवेशनात महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ४ सत्रे घेण्यात आली. या अधिवेशनात प्रथमच राष्ट्रीय महिला विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या महिला विभागाच्या प्रमुख म्हणून आद. सुषमाताई पवार यांची नियुक्ती करण्यात आली. 'जिच्या हाती धम्माची शिदोरी, तिच जगाचा उद्धार करी' अशी नवी म्हण या अधिवेशनापासून देशभर रूढ झाली.
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय, राज्य, प्रांत, जिल्हा, तालुका, ग्राम, वॉर्ड, विभाग इत्यादी स्तरावरील कामकाज ज्या घटना व नियमावलीनुसार चालते, त्या 'कामकाज व नियम-उपविधी' या पुस्तकाचे दि.२१ मार्च २००० रोजी चैत्यभूमी, दादर येथे महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांच्या हस्ते, सर्वसाधारण सभेत प्रकाशन करण्यात आले.
भारतातील तमाम बौद्धाचार्यांची 'अखिल भारतीय बौद्धाचार्य परिषद' चैत्यभूमी, दादर येथे दि. १९ ऑगस्ट, २००० रोजी संपन्न झाली. या परिषदेचे अध्यक्षपद महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर यांनी भूषविले. या परिषदेला एकूण ९०० बौद्धाचार्य उपस्थित होते. या परिषदेत 'बौद्धाचार्यांची आचार-संहीता' सर्वानुमते ठरविण्यात आली. या आचार-संहीतेचे देशातील सर्व बौद्धाचार्यांनी तंतोतंत पालन करण्याचा निर्धार केला.
भारतातील सर्व केंद्रीय शिक्षक व शिक्षिकांची 'अखिल भारतीय केंद्रीय शिक्षक/शिक्षिका परिषद' चैत्यभूमी, दादर येथे दि. २० ऑगस्ट २००० रोजी संपन्न झाली. या परिषदेचे अध्यक्षस्थान महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर यांनी भूषविले. या परिषदेत सर्वांनुमते 'केंद्रीय शिक्षक/ शिक्षिकांसाठी आचार-संहिता' ठरविण्यात आली. जिथे बौद्धाचार्य नसतील, तिथे संस्कार विधी पार पाडण्याचा अधिकार केंद्रीय शिक्षिकांना देण्याचा क्रांतीकारक निर्णय या परिषदेत घेण्यात आला. २४ प्रकारची प्रशिक्षण शिबिरे केंद्रीय शिक्षक / शिक्षिकांनी देशभर जोमाने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ३६ प्रकारची धम्म कार्याची उद्दिष्टट्ये / लक्ष्य साध्य करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
'अखिल भारतीय कार्यकर्ता परिषद' चैत्यभूमी, दादर येथे दि. १७सप्टेंबर २००० रोजी सूर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीदिनी घेण्यात आली. या परिषदेचे अध्यक्षस्थान महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांनी भुषविले. 'कार्यकर्त्यांची आचारसंहिता' सर्वांनी काटेकोरपणे पाळण्याचा दृढ
निश्चय या परिषदेत करण्यात आला. देशभरातील पदाधिकाऱ्यांनी आपले अधिकार आणि कर्तव्ये जबाबदारीने व इमानदारीने पार पाडण्याचा पक्का निर्धार या परिषदेत करण्यात आला, धम्मसंस्थेच्या कामकाजात विश्वासार्हता व पारदर्शकता आणण्यासाठी सर्व शाखांचे आर्थिक अहवाल चार्टर्ड अकाऊंटंटकडून ऑडीट करूनच केंद्राला सादर करण्याचा सम्यक संकल्प करण्यात आला. केंद्राचा सुद्धा आर्थिक अहवाल सी.ए. कडून ऑडीट करून घेण्याचा ठराव पारीत करण्यात आला.
'अखिल भारतीय भिक्षु परिषद' दि. १७ सप्टेंबर २००० रोजी दुपारच्या सत्रात, चैत्यभूमी, दादर येथे संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेच्या भिक्षु पूज्य भन्ते बुद्धपालजी यांनी केले. अनेक भिक्षुनी या परिषदेत सक्रीय सहभाग घेतला. विविध विषयांवर चर्चा सत्र संपन्न झाले. कोणत्याही संस्कार- विधीमध्ये, पूज्य भन्तेजीना प्रथम याचना केल्यावर त्यांनी उपस्थितांना त्रिसरण व पंचशील प्रदान करावे व धम्मदेसनाद्यावी आणि शेवटी सर्वांना शुभाशिर्वाद द्यावेत. संपूर्ण विधी संस्कार नियोजित बौद्धाचार्यास करू द्यावा, असे सर्वानुमते ठरले.
दि २ फेब्रुवारी २००१ रोजी प्रथमच 'रामजी बाबा स्मृतीदिनानिमित्त त्यांचे मूळगावी, आंबडवे येथे, संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांनी 'आंबडवे स्मारका'ची घोषणा केली. तसेच दरवर्षी संस्थेच्या वतीने रामजी बाबांचा स्मृतीदिन येथे संपन्न करण्याची घोषणा केली. या प्रसंगी तत्कालीन राष्ट्रीय महासचिव एस. के. भंडारे, राष्ट्रीय सचिव एन. एम.आगाणे, केंद्रिय महिला विभाग प्रमुख सुषमाताई पवार व महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष बी.एच.गायकवाड गुरुजी उपस्थित होते.
भारतीय बौद्धांच्या न्याय्य हक्कांसाठी पहिल्यांदाच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मंत्रालयावर मुंबई येथे दिनांक ४ मार्च २००२ रोजी धडक मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. २४ मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र शासनाला देण्यात आले.
बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांनी 'ड्राफ्टींग कमिटी' ची नियुक्ती केली. या कमिटीचे चेअरमन अॅड.डी.एस. सपकाळे (डेप्यूटी सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य, न्याय व विधी मंत्रालय, गुंबई) हे होते. त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव आद, एस. के. भंडारे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष आद. राष्ट्रपाल बोड, राष्ट्रीय सहसचिव आद. जगदीश गवई, राष्ट्रीय सहसचिव अॅड. संतोष सावंत व राष्ट्रीय सहसचिव अॅड. एस.एस. वानखडे, अॅ ड. सुधाकर पराड यांच्यासह कायद्याचे व चळवळीचे ११ जाणकार सदस्य होते. या ड्राफ्टींग कमिटीने सर्वानुमते तयार केलेला 'बौद्ध पर्सनल लॉ-२००२-बी.एस.आय.' राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दि.१४ एप्रिल २००२ रोजी महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांनी मंजूर केला. सदर कायद्याचा मसूदा दिल्लीला जाऊन महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रत्यक्ष राष्ट्रपतींना कार्यालयात सादर करून बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा अंमलात आणण्याची विनंती केली. तसेच सदर कायद्याचा मसूदा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना सादर करून, बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा लागू करण्याची विनंती केली.
अनेक बौद्ध राष्ट्रांच्या भिक्षूच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दि. १० ऑक्टोबर २००२ रोजी जे.पी. मैदान, बुद्धगया येथे भव्य धम्मपरिषद घेण्यात आली. या धम्मपरिषदेचे उद्घाटन पुज्य भन्ते राष्ट्रपालजी यांनी केले. देश विदेशातील भिधुंचे महाउपासिका आद. मीराताई आंबेडकरांच्या शुभहस्ते स्वागत करून, त्यांना चिवरदान व भोजनदान देण्यात आले. देशातील जिल्ह्या जिल्ह्यातून आलेले अनेक पर्यटक या धम्मपरिषदेला उपस्थित होते.
समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, व्यसनाधिनता काढून टाकण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने १० दिवसांची 'भीम संदेश यात्रा' काढण्यात आली. त्या भीम संदेश यात्रेचा समारोप दि.२ मार्च २००३ रोजी 'संघर्ष अधिवेशन' घेऊन मुंबई येथे करण्यात आला. धम्म रूजवण्यासाठी अधम्मासी संघर्ष करण्याचा सम्यक संकल्प महाउपासिका आद. मीराताई आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते घेण्यात आला.
No comments:
Post a Comment