Wednesday, February 14, 2024

जाहिर अभिनंदन : एस के भंडारे, जगदीश गवई, एस एस वानखडे यांचे जाहीर अभिनंदन.

 ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा
संस्थापक अध्यक्ष :  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक  : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन  :  डॉक्टर हरीश रावलिया
राष्ट्रीय कार्याध्यक्ष  : आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

=================================

                  *🌹 जाहिर अभिनंदन*🌹

राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या आदेशानुसार म्हाडा मागासवर्ग कक्ष प्रमुख व समन्वय अधिकारी (Liaison Officer) पदी आयु.एस.के.भंडारे साहेब यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा!!!
दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी आंबेडकर भवन दादर येथे भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया यांच्या उपस्थितीत  राष्ट्रीय कार्यकारणीचे पदाधिकारी ,महाराष्ट्र राज्य शाखेचे पदाधिकारी,मुंबई प्रदेश शाखेचे पदाधिकारी, प्रशिक्षण विभागाचे पदाधिकारी,महिला विभागाचे पदाधिकारी आणि समता सैनिक दलाचे अधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आदरणीय एस. के. भंडारे यांचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय जगदीश गवई, आणि केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय एस. एस. वानखेडे  यांना मेक्सिको विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट पदवी जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सुद्धा ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरेश रावलिया यांनी आणि उपस्थित केंद्रीय पदाधिकारी,महाराष्ट्र राज्य शाखेचे पदाधिकारी,मुंबई प्रदेशशाखेचे पदाधिकारी, प्रशिक्षण विभागाचे पदाधिकारी,महिला विभागाचे पदाधिकारी, आणि समता सैनिक दलाचे अधिकारी यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन जाहीर अभिनंदन करण्यात आले.
































































विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...