Posts

Showing posts from August, 2024

लोकसभा निवडणुकीत संविधान मानणाऱ्यांचा विजय झाला ! संविधान पुढील शेकडो वर्षे अबाधित राहो !! -डॉ.भीमराव य. आंबेडकर

Image
🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞 मुंबई /ठाणे -  भारतीय संविधान सक्षम नसते, तर देशात बांगला देशासारखी अराजकता झाली असती. मागील दहा वर्षे आणि पुढील पाच वर्षे SC, ST साठी धोक्याची घंटा होती. परंतु संविधानाला न मानणारे सत्तेत आले. त्यांनी चारशे पार ची घोषणा करून, संविधान बदलण्याची भाषा केल्याने, SC, ST,बहुजनांच्या भावना दुखावल्या, संविधानाला खुले आम आव्हान दिले.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत संविधान मानणाऱ्यांचा विजय झाला, इंडिया गटबंधनचा नाही ! जे सत्तेत बसले आहेत, ते EVM च्या माध्यमातून बसले आहेत, जनतेच्या माध्यमातून नाही ! तर पाच कोटी मतांचा घोटाळा झाला आहे, असे सारांशाने प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांनी दि. 15/8/2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर मुंबई आणि शहीद अरुण कुमार वैद्य सभागृह (टाऊन हॉल), उल्हासनगर  येथील भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ठाणे जिल्हा शाखेच्या 37 वा वर्धापन दि...

"चंद्र बोधी पाटील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे चेअरमन नाहीत – सत्य माहिती जाणून घ्या"

चंद्रबोधी पाटील ट्रस्टी चेअरमन नाहीत. डॉ भीमराव य आंबेडकर यांचे आयु. चंद्रबोधी पाटील यांच्या दि. 21/7/2024 रोजीच्या ज्ञापनला जाहीर उत्तर. मुंबई -दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियात अनेक वर्षे अध्यक्ष/चेअरमन पदाचा वाद होता. मीराताई आंबेडकर आणि पी. जी. ज्योतीकर यांच्या नंतर, दोन्ही पक्ष रावलिया / चंद्रबोधी पाटील आणि आम्ही एकत्र येऊन निर्णय घेतला की, कोर्ट कचेऱ्या पासून अलिप्त राहायचे, वेळ, पैसा खर्च होणार नाही, एकत्र धम्म कार्य करू या ! त्यानुसार एकत्र आलो, परंतु त्यांनी एकता मोडण्याचीच कार्यवाही केली. उदा. घरी बसून परस्पर नियुक्त्या करणे, कमिटी बरखास्त करणे इत्यादी करुन मला विचारल्याशिवाय काहीही करायचे नाही, असे सुनावणे, संस्थेची (मीराताई युनिट) जिथे मालमत्ता आहे तेथे अडचणी निर्माण करणे, चेअरमन शिवाय परस्पर ट्रस्टीची बैठक बोलावणे, पत्र व्यवहार करणे, एवढेच नाही तर त्यांनी दि. 29/7/2023 च्या पत्रान्वये, ज्यांनी 45 वर्षे संस्थेचे अध्यक्ष पद भुषवून संस्था व धम्म देशभर रुजवला त्या संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया, ट्रस्टी/कार्याध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...

डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांची भुमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक किरण कांबळे आणि माझी भेट.

Image
  मुंबई (दि.4/8/2024) आज आंबेडकर भवन दादर येथे मला भेटण्यासाठी दानशूर चित्रपटाचे दिग्दर्शक किरण कांबळे आले होते.पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील लेणी अंबा अंबिका अंबालिका या लेण्यांवर वर्षावास प्रवचन मालिका उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आयु.किरण कांबळे साहेब यांची आणि माझी ओळख झाली.दानशूर चित्रपट हा मेडिटेशन वर आधारित आहे.सदर चित्रपट शाळा कॉलेज आणि बुद्ध विहारा मध्ये प्रदर्शित करण्यासाठी माझ्यासोबत चर्चा केली. त्यांचा दानशूर चित्रपट विहारा मध्ये दाखवण्या बाबत चा विषय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आद.एस के भंडारे साहेब यांच्या पर्यंत पोहोचवुन त्यांची भेट घडवून आणण्यासाठी आश्वासन दिले. या दानशूर चित्रपटाचे विशेष असे कि या चित्रपटात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब याची छोटीशी भूमिका आहे. आजच्या भेटीत दिग्दर्शक किरण कांबळे साहेब यांनी मला त्रिपिटक ग्रंथ भेट दिला. या भेटीच्या वेळी राष्ट्रीय सचिव बि.एम.कांबळे मुंबई प्रदेश शाखेचे पदाधिकारी रवींद्र गवई,खाडे गुरुजी उपस्थित होते.