Friday, August 9, 2024

"चंद्र बोधी पाटील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे चेअरमन नाहीत – सत्य माहिती जाणून घ्या"



चंद्रबोधी पाटील ट्रस्टी चेअरमन नाहीत.


डॉ भीमराव य आंबेडकर यांचे आयु. चंद्रबोधी पाटील यांच्या दि. 21/7/2024 रोजीच्या ज्ञापनला जाहीर उत्तर.

मुंबई -दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियात अनेक वर्षे अध्यक्ष/चेअरमन पदाचा वाद होता. मीराताई आंबेडकर आणि पी. जी. ज्योतीकर यांच्या नंतर, दोन्ही पक्ष रावलिया / चंद्रबोधी पाटील आणि आम्ही एकत्र येऊन निर्णय घेतला की, कोर्ट कचेऱ्या पासून अलिप्त राहायचे, वेळ, पैसा खर्च होणार नाही, एकत्र धम्म कार्य करू या ! त्यानुसार एकत्र आलो, परंतु त्यांनी एकता मोडण्याचीच कार्यवाही केली. उदा. घरी बसून परस्पर नियुक्त्या करणे, कमिटी बरखास्त करणे इत्यादी करुन मला विचारल्याशिवाय काहीही करायचे नाही, असे सुनावणे, संस्थेची (मीराताई युनिट) जिथे मालमत्ता आहे तेथे अडचणी निर्माण करणे, चेअरमन शिवाय परस्पर ट्रस्टीची बैठक बोलावणे, पत्र व्यवहार करणे, एवढेच नाही तर त्यांनी दि. 29/7/2023 च्या पत्रान्वये, ज्यांनी 45 वर्षे संस्थेचे अध्यक्ष पद भुषवून संस्था व धम्म देशभर रुजवला त्या संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया, ट्रस्टी/कार्याध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  डॉ. भीमराव य. आंबेडकर आणि ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रविण निखाडे यांनाच पदावरून दूर करून एकत्रिकरणाला तिलांजली दिली. 

1)या सर्व पार्श्वभूमीवर नाईलाजाने, मुंबई केंद्रीय कार्यालयात दि. 2/8/2023 रोजी केंद्रीय बैठक संपन्न झाली. त्यामध्ये चंद्रबोधी पाटील यांनी संरक्षक -महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन-डॉ. हरीश रावलिया, ट्रस्टी/कार्याध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  डॉ. भीमराव य. आंबेडकर आणि ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रविण निखाडे यांच्या विरुध्द केलेल्या कारवाईमुळे कार्यकर्ते व जनतेमध्ये प्रचंड असंतोष, चीड निर्माण झालेली असल्यामुळे चंद्रबोधी पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येऊन, मीराताई युनिटमध्ये कोणतीही ढवळाढवळ, मनमानी केली, तर होणाऱ्या  परिणामांना  चंद्रबोधी पाटील स्वतः जबाबदार राहतील व  यापुढे त्यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून लेटर हेडवर असणार नाही, असेही  एकमताने ठरविण्यात आले.

2) त्यानंतर संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉ. हरिश रावल‍िया यांनी संस्थेच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीची दि. 24/8/2023 व दि. 5/9/2023 रोजी बैठक डॉ. आंबेडकर भवन, दादर येथे बोलाविण्यात आली. त्यानुसार आयु. चंद्रबोधी पाटील आणि इतर तीन यांना ट्रस्टी पदावरुन कमी करण्यात आले. तसेच ॲड. सुभाष जौंजाळे (ट्रस्टी चेअरमन) यांनी चंद्रबोधी पाटील यांच्या हुकुमशाही कार्यपध्दतीमुळे व डॉ. भीमराव य. आंबेडकर यांना  विश्वासात न घेता त्यांचेबरोबर एकत्रिकरण केले असल्याचे निदर्शनास आल्याने आयु. चंद्रबोधी पाटील यांना संस्थेच्या कामकाजातून बेदखल करण्यात आले.

3)धर्मदाय आयुक्त, बृहन्मुंबई यांना जा.क्र. BSI/CC/MUMBAI/07/2024 दि. 19/1/2024 अन्वये संस्थेच्या ट्रस्टीची बैठक बोलविणे, पत्र व्यवहार करणे इत्यादी बाबतचे सर्व अधिकार ट्रस्टी चेअरमन यांना असून त्याप्रमाणे कार्यवाही होतांना दिसून येत नाही. केवळ ट्रस्टी असलेले आयु.चंद्रबोधी पाटील यांनी परस्पर बैठका घेणे, पत्र व्यवहार करणे, नियुक्त्या करणे इत्यादी बाबी ट्रस्टी चेअरमन यांच्या संमतीशीवाय व सर्व ट्रस्टीच्या बैठकीशिवाय केलेल्या आहे. ते सर्व बेकायदेशीर आहे व आयु. चंद्रबोधी पाटील यांनी दि. 31/5/2022 नंतर केलेले सर्व पत्रव्यवहार/प्रस्तावांचा विचार करु नये असे कळविलेले आहे. तसेच सदर पत्राची प्रत चंद्रबोधी पाटील यांना दिलेली आहे.

4)ट्रस्टी चेअरमन डॉ. हरिश रावल‍िया व ट्रस्टी / राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांनी प्रसिध्दी पत्र जा.क्र. BSI/CC/MUMBAI/15/2024 दि. 14/2/2024 अन्वये, दि. 31/5/2022 रोजीची हैदराबाद (तेलंगणा) येथील ट्रस्टी, केंद्रीय कार्यकारिणी, विविध राज्याचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यांच्या संयुक्त मिटींगमध्ये सर्वानुमते डॉ. हरीश रावलिया यांचा ट्रस्टी चेअरमन पदाचा कार्यकाळ 5 वर्षे वाढविणे, ट्रस्टी बैठक केवळ ट्रस्टी चेअरमन यांनी बोलविणे, संस्था व्यवस्थापन बाबतचे सर्व अधिकार ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांना देणे इत्यादी निर्णय घेतले, त्यानुसार, आयु. चंद्रबोधी पाटील व आयु. शंकर ढेंगरे यांना विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) मधील दि. 26/2/2024 रोजी बैठक बोलविण्याचा अधिकार नसल्याने सदरची मिटींग बेकायदेशीर आहे, असे कळविलेले आहे. (तरी सुध्दा त्यांनी अनधिकृतपणे बैठक घेतली असून, सदर बैठकीस 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित नव्हते.)

5) सन 1982 साली नागपूर दिक्षाभूमीचे पूर्वीचे ट्रस्टी व तत्कालीन सभापती यांच्या आर्थिक सहयोगाने एस. व्ही. रामटेके आणि सहकारी यांनी मीराताईंना विरोध केला. 1982 पासून ते आजपर्यंत बौध्दधम्माच्या चळवळीचे नुकसान केले. कोर्ट केस यामुळे धम्मकार्यासाठी श्रम, पैसा, वेळ गेल्याने धम्माच्या चळवळीला अडथळे निर्माण केले. चंद्रबोधी पाटील हे त्यांचेच  प्रतिनिधी आहेत.

6)दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या आमच्या मीराताई युनिटने देशभर 27 राज्य/प्रदेश शाखा निर्माण केल्या असून, संस्थेच्या 24 प्रकारच्या धम्म प्रशिक्षण शिबीरांच्या माध्यमातून बौध्द सदस्य, सक्रिय बौध्द सदस्य, आजीवन बौध्द सदस्य,  केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, बौद्धाचार्य, समता सैनिक दल - सैनिक, वार्षिक शिबीर गॅझेट, वार्षिक सैनिक शिबीर गॅझेट असे संपूर्ण लेखाजोखाचे वार्षिक गॅझेट दि. 21/7/2024 रोजी चैत्यभूमीमध्ये प्रकाशित केलेले आहे. त्याप्रमाणे आयु. चंद्रबोधी पाटील यांनी 34 वर्षाच्या कालावधी मधील लेखा-जोखा बौध्द जनतेला द्यावा की, ज्याच्यावरुन त्यांचे कार्य लोकांना समजून येईल ! 

7) आमचा संपूर्ण देशभर (महाराष्ट्रातील 58 जिल्हा शाखा व देशातील 27 राज्य शाखामध्ये) वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा कार्यक्रम होत आहे. चैत्यभूमीमध्ये आषाढ पौर्णिमा दि. 21/7/2024 पासून ते आश्विन पौर्णिमा दि. 17/10/2024 पर्यंत 30 प्रवचन मालिकेचा कार्यक्रम सुरु केलेला आहे. आयु. चंद्रबोधी पाटील वर्षावासाचा कार्यक्रम घेत नाहीत. त्यांचा यावर्षीही नाही, याबाबत त्यांनी खुलासा करावा.

8)आयु. चंद्रबोधी पाटील हे नागपूर मधील रहिवासी असून, नागपूर दिक्षाभूमी ही दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची असून सुध्दा त्यांनी त्याबाबत काहीही केलेले नाही. तसेच त्यांच्याकडे चारच कार्यकर्ते असल्याने, त्यांनी नागपूर दिक्षाभूमीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा एकही जाहीर कार्यक्रम केलेला नाही. दीक्षाभूमीसमोर एक स्टॉल लावून बसतात, देशभर त्यांच्याकडे कार्यकर्तेच नाहीत. मागील महिन्यापासून दीक्षाभूमी आंदोलन चालू आहे, द‍िक्षाभुमी सध्या मनुवाद्यांच्या ताब्यात आहे. परंतू आयु. चंद्रबोधी पाटील तिकडे फिरकले सुध्दा नाही. याचा त्यांनी खुलासा करावा.  

9) बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केलेली असून, ते स्वतः पहिले अध्यक्ष राहिले आहेत, याचे भान चंद्रबोधी पाटील यांना आहे काय ? ज्याला जन मान्यता नाही, तो चेअरमन /अध्यक्ष कसा होऊ शकतो ? गल्लीत ओळखत नाहीत, पण दिल्लीचा बॅनर घेऊन फिरतात ! त्यांचे ऑफीस नाही, त्यांच्याकडे संस्थेचे दफ्तर /स्टेशनरी सुद्धा नाही. सन 2000 पासून ते स्वयंघोषित अध्यक्ष, सर्वेसर्वा म्हणून मिरवत आहेत, 2000 ते 2024 या कालावधीमध्ये त्यांनी लाखो रुपयांचा निधी गोळा केलेला आहे. परंतु त्याचा हिशोब त्यांनी दिलेला नाही.मात्र जे खरे धम्म कार्य करतात त्यांना आयु.चंद्रबोधी पाटील अडचण आणत आहेत. ते धम्माचे प्रचारक नसून, मारक आहेत ! अशा लोकांमुळे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे नाव उंचावत नसून, खुजे होत आहे ! तसेच बौध्दांची पत खालावली जात आहे, त्यामुळे जनतेने चंद्रबोधी पाटील यांना कोणीही मदत /सहकार्य करू नये आणि आयु. चंद्रबोधी पाटील ट्रस्टी चेअरमन असतील तर त्यांनी धर्मादाय आयुक्त यांच्या मान्यतेची कागदपत्रे जनतेसमोर उघड करावीत अन्यथा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि नातू डॉ भीमराव य आंबेडकर यांची दि 29/7/2023 व 21/7/2024 च्या पत्रान्वये म्हणजे दोन वेळा कमी केल्याच्या बदनामीबद्दल त्यांच्या विरुद्ध न्यायालयीन कारवाई करावी असा ठराव संस्थेच्या  डॉ आंबेडकर भवन, दादर (पूर्व ),मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात दि. 24/7/2024 रोजी ट्रस्टी व केंद्रीय, केंद्रीय विभाग, महाराष्ट्र राज्य , मुंबई प्रदेश शाखेचे पदाधिकारी यांच्या बैठकीत  करण्यात आला.

10) संस्थेचे देशातील जे कामकाज चालू आहे, ते आयु. चंद्रबोधी पाटील मुळे नाही, तर आम्ही खाली सह्या करणारे आणि आमच्या बरोबरचे हजारो पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते करीत आहोत.

11)धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ट्रस्टी बाबतचे बरेच चेंज रिपोर्ट प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत आयु. चंद्रबोधी पाटील यांना इतरांना नोटीस/ज्ञापन देण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी वरीलप्रमाणे मीराताई आंबेडकर व डॉ भीमराव य आंबेडकर यांच्यावर वरीलप्रमाणे दोन वेळा कारवाई केली असल्याचे सोशल मीडिया वर प्रसारित करून डॉ आंबेडकर घराण्याची बदनामी केलेली आहे. त्यामुळे आयु चंद्रबोधी पाटील यांच्या विरुद्ध आंबेडकरी समाजात, संस्थेच्या देशभर पदाधिकारी /कार्यकर्त्यांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.त्यांनी प्रसिद्ध केलेले ज्ञापन / मेमोरॅंडम दि 14/8/2024 पर्यंत मागे घ्यावे, अन्यथा आम्ही कायद्यानुसार न्यायालयीन कार्यवाही करू आणि त्याच्या खर्चाची व परिणामाची संपूर्ण जबाबदारी चंद्रबोधी पाटील यांच्यावर राहील याची त्यांनी नोंद घ्यावी.असे प्रसिद्धी पत्रक /नोटीस पत्रक द्वारे,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर ( ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष ), डॉ हरीश रावलिया (ट्रस्टी चेअरमन ), कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव ), एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष /मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख ), अँड डॉ एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ) यांनी आयु. चंद्रबोधी पाटील यांना  व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या देशभरातील सर्व शाखांना पाठविले आहे.

No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...