Friday, August 16, 2024

लोकसभा निवडणुकीत संविधान मानणाऱ्यांचा विजय झाला ! संविधान पुढील शेकडो वर्षे अबाधित राहो !! -डॉ.भीमराव य. आंबेडकर

🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞

मुंबई /ठाणे -  भारतीय संविधान सक्षम नसते, तर देशात बांगला देशासारखी अराजकता झाली असती. मागील दहा वर्षे आणि पुढील पाच वर्षे SC, ST साठी धोक्याची घंटा होती. परंतु संविधानाला न मानणारे सत्तेत आले. त्यांनी चारशे पार ची घोषणा करून, संविधान बदलण्याची भाषा केल्याने, SC, ST,बहुजनांच्या भावना दुखावल्या, संविधानाला खुले आम आव्हान दिले.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत संविधान मानणाऱ्यांचा विजय झाला, इंडिया गटबंधनचा नाही ! जे सत्तेत बसले आहेत, ते EVM च्या माध्यमातून बसले आहेत, जनतेच्या माध्यमातून नाही ! तर पाच कोटी मतांचा घोटाळा झाला आहे, असे सारांशाने प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर यांनी दि. 15/8/2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर मुंबई आणि शहीद अरुण कुमार वैद्य सभागृह (टाऊन हॉल), उल्हासनगर  येथील भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ठाणे जिल्हा शाखेच्या 37 वा वर्धापन दिन या कार्यक्रमात केले. डॉ. भीमराव य. आंबेडकर  पुढे म्हणाले की,आम्ही बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीसाठी कटीबद्ध आहोत ! आमच्याबरोबर SC, ST, OBC आहेत, ते धर्मांतर करीत आहेत. बौद्ध संघटना काय करीत आहेत ? याकडे विरोधकांचे लक्ष आहे. गेले दहा वर्षे धम्म दीक्षा कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विविध कायदे केले.

धर्मांतराची संविधानात थेट तरतूद आहे. पण आता जिल्हाधिकारी यांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे धर्मांतरावर मर्यादा आणल्या आहेत. लोकांना पाखंडवादा पासून मुक्ती मिळायला पाहिजे. आंध्र, तेलंगाणा इत्यादी राज्यात लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेवटच्या म्हणजे धम्म क्रांती चे अनुसरण करत नाहीत ! त्यासाठी आपण तिकडे लक्ष दिले पाहिजे ! 

     तसेच नागपूरची दिक्षा भूमी ही ऊर्जा स्त्रोत व प्रेरणा भूमी आहे. त्यावर मनुवादींचा कब्जा आहे. विकले गेलेले लोक दिक्षा भूमी समितीत आहेत. आता दिक्षा भूमी आम्ही वाचविली आहे !  ती दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया ची आहे. येणाऱ्या अशोका विजयादशमी ला आमचा  कार्यक्रम सर्व लोक व भिक्खुंसह असेल, असे सांगून, आम्ही राजकारण करणार नाही, पण मतदार असल्याने कुणाला सत्तेत बसवायचे,  हे ठरविणार ! असे सांगितले.

      चैत्यभूमी, दादर येथील ध्वजारोहण ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी समता सैनिक दलाची मानवंदना झाली. या प्रसंगी भन्ते धम्म रतन  (दिल्ली ), भन्ते विशुद्धी बोधी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस. के. भंडारे, महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष भिकाजी कांबळे, मुंबई प्रदेश शाखा अध्यक्ष विलास वानखडे, मुंबई प्रदेश महिला शाखा अध्यक्ष वैशालीताई अहिरे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. समता सैनिक दलाचे अशोक कदम, डी एम आचार्य, प्रदीप कांबळे, चंदाताई कासले,रविंद्र इंगळे इत्यादी अधिकारी व सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई प्रदेशचे सरचिटणीस दयानंद बडेकर व आभार प्रदर्शन मुंबई प्रदेश शाखेचे कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वधीर यांनी केले.

     त्यानंतर दुपारच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया, ट्रस्टी व आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रविण निखाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख  एस. के. भंडारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ जगदीश गवई,राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय महिला विभाग प्रमुख सुषमाताई पवार, राष्ट्रीय सचिव बी.एच.गायकवाड, राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख अॅड. डॉ. एस. एस.  वानखडे, राष्ट्रीय सचिव वसंत पराड,महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष भिकाजी कांबळे,महाराष्ट्र राज्य महिला शाखा  सरचिटणीस चंदाताई कासले यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी जिल्हा शाखा अध्यक्ष विजय गायकवाड होते. या कार्यक्रमासाठी पुज्य भंते धम्म प्रिय जी,  राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी.बी.तेलतुंबडे, राष्ट्रीय सचिव राजेश पवार, केंद्रीय सदस्य एम.डी.सरोदे, केंद्रीय  प्रशिक्षण विभाग उपप्रमुख सुप्रियाताई कासारे, समता सैनिक दल हेड क्वार्टर सचिव डी. एम. आचार्य, केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिव अनिल मनोहर, केंद्रीय महिला विभाग सचिव भारतीताई शिराळ, महाराष्ट्र राज्य शाखेचे संस्कार उपाध्यक्ष यु.जी. बोराडे, प्रचार / पर्यटन उपाध्यक्ष डी टी सोनवणे, महाराष्ट्र राज्य महिला शाखेच्या कोषाध्यक्षा सुनंदा ताई वाघमारे, महाराष्ट्र राज्य शाखा सचिव रमेश शिराळ, पालघर जिल्हा शाखेचे संघटक भालचंद्र गायकवाड हे प्रमुख उपस्थित होते. तसेच ठाणे जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष अनुक्रमें के.बी.हंडोरे, के.पी.गायकवाड, ए. जी. तायडे, अशोक गमरे हे विशेष उपस्थित होते. 

       यावेळी दरवर्षीच्या प्रथेनुसार जिल्हा शाखेचा जमाखर्च व कार्य अहवाल सरचिटणिस प्रभाकर सुर्यवंशी यांनी जाहीर वाचून दाखविला. त्याच बरोबर 1 वर्ष पूर्ण केलेल्या ठाणे जिल्हा महिला शाखेचा सुद्धा जमाखर्च, कार्य अहवाल सरचिटणिस निर्मला ताई कांबळे यांनी  सादर  केला. 37 व्या वर्धापन निमित्त समता सैनिक दलाच्या बँड पथकाचे उदघाटन डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आदर्श तालुका, आदर्श बौद्धाचार्य, आदर्श के़द्रीय शिक्षक, आदर्श केंद्रीय शिक्षिका, आदर्श पुरुष  कार्यकर्ता, आदर्श महिला कार्यकर्ता, आदर्श सैनिक, जेष्ठ बौद्धाचार्य , जेष्ठ केंद्रीय शिक्षक, जेष्ठ केंद्रीय शिक्षिका, महान दानदाते, सैनिक कल्याण निधी दानदाते असे विविध पुरस्कार देण्यात आले. या वर्धापन दिन कार्यक्रमास पुरुष, महिला व सैनिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.






























1 comment:

  1. Khup Chan Zala Program. BSI che sampurna bharatbhar karya khup jomana chalu aahe, he samazle.

    ReplyDelete

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...