Posts

Showing posts from February, 2025

जिल्हा परिषद शाळा मोखावणेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

Image
मोखावणे, दि. ७ फेब्रुवारी २०२५ – जिल्हा परिषद शाळा मोखावणेची शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची माहिती देण्याच्या उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीची सुरुवात धम्मगिरी (इगतपुरी) येथून झाली. तेथील सुंदर गार्डन पाहून विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. तथागत भगवान बुद्धाच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन आणि आनापान ध्यान पद्धतीवरील माहितीपट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. यानंतर त्रिरश्मी बौद्ध लेणी (नाशिक) येथे भेट देण्यात आली. ऐतिहासिक बौद्ध लेणींमध्ये विद्यार्थ्यांनी प्राचीन स्थापत्यशैलीचा अभ्यास केला. लेणीच्या खाली असलेल्या बुद्ध विहारात जाऊन त्यांनी शांततेचा अनुभव घेतला. यानंतर पेरूची वाडी या ठिकाणी सहलीचा पुढील टप्पा पार पडला. येथे सर्वांनी प्रसिद्ध मिसळपाव चाखला. विद्यार्थ्यांनी विविध पक्षी व प्राण्यांची निरीक्षणे केली, त्यांना हाताळण्याचा आनंद घेतला. पक्ष्यांसोबत खेळण्याचा अनोखा अनुभवही घेतला. त्यानंतर विविध खेळ, होडीची सफर आणि डीजेवर नृत्य करत विद्यार्थ्यांनी भरभरून आनंद लुटला. परतीच्या प्रवासात काळाराम मंदिर आणि सीता गु...

५ वी राष्ट्रीय बालपरिषद : विद्यार्थ्यांचा तंबाखू-मुक्त शाळांसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार

Image
मुंबई, ५ फेब्रुवारी २०२५: सलाम मुंबई फाउंडेशनतर्फे आयोजित ५ वी राष्ट्रीय बालपरिषद अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाली. या परिषदेमुळे तंबाखू-मुक्त शाळा, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांची कटिबद्धता अधिक दृढ झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, राजस्थान आणि गुजरात येथील युवा नेत्यांनी या मंचावर सहभाग घेतला. त्यांनी आरोग्य जनजागृती आणि धोरणात्मक चर्चांमध्ये मोलाचे योगदान दिले. महत्त्वपूर्ण मान्यवरांचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून – डॉ. स्वप्निल लाळे (संचालक, आरोग्य विभाग) डॉ. नागनाथ मूदम (सहसंचालक, आरोग्य विभाग, महाराष्ट्र) तर, तज्ज्ञ पॅनेलमध्ये – डॉ. प्राची राठी (राष्ट्रीय सल्लागार, NTCP, आरोग्य मंत्रालय, भारत) डॉ. सचिन जाधव (सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र) डॉ. वंदना वाहूळ (उपसंचालक, शिक्षण विभाग, पुणे) डॉ. मुकेश मतनहेलिया (राज्य नोडल अधिकारी, NTCP, उत्तर प्रदेश) श्री. योगेश जवादे (सहआयुक्त, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र) यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू...

"दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या केंद्रीय शिक्षिका शिबिराचे उद्घाटन डॉ. भीमराव आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) यांच्या हस्ते"

Image
  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया    संस्थापक: बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर   संरक्षक : अदा. महाउपासिका मीराताई आंबेडकर  ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीष रावलिया  रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲड जौंजाळ साहेब  राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब  ================================= दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन. मुंबई, २ फेब्रुवारी २०२५ – दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या विद्यमाने केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सुभेदार रामजी बाबा सपकाळ यांच्या स्मृति दिना पासून (२ फेब्रुवारी २०२५) ते माता रमाई जयंती दिना पर्यंत (७ फेब्रुवारी २०२५) चालणार आहे. शिबिराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर पश्चिम, मुंबई येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आदरणीय डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते दि.२/२/२०२५ रोजी झाले. या शिबीरात संस्थेचे राष्ट्रीय सचिव राजेश पवार यांनी भारतीय बौद्ध महासभा व ...