मंत्रालयावर आरक्षण हक्क कृती समितीचे प्रचंड आक्रोश धरणे आंदोलन संपन्न.
आरक्षण व संविधान विरोधकांना मतदान न करण्याचा ठराव.
मुंबई - आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने सर्व मागासवर्गीय संघटनांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिनी दि 11/4/2023 रोजी महात्मा फुले , छत्रपती शिवाजी महाराज , राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून खाजगीकरणाचा व ज्यात आरक्षण नसलेला दि.14/3/2023 चा काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा ,मा.सर्वोच्य न्यायालयाने दि 28/1/2022 रोजी आदेश दिले असून त्या अनुषंगाने केंद्र सरकारने (डीओपीटी) दि 12/4/2022 रोजी निर्देश देऊन सुद्धा सरकारने पदोन्नतीतील आरक्षण न देणे,जुनी पेन्शन योजना सर्व निम सरकारी महामंडळे /प्राधिकरण यांसह सर्वाना सुरू करणे ,सरकारने नेमलेल्या समितीने तीन महिन्यातच अहवाल द्यावा , नवीन संसद भवनला डॉ बाबासाहेब आंबेडकर संसद भवन नाव द्यावे ,नवीन शैक्षणिक धोरणात आरक्षण ठेवावे , बार्टीच्या 862 विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती घ्यावी ,बेरोजगाराना 15 हजार बेरोजगार भत्ता द्यावा,
मागासवर्गीयांच्या वरील अन्याय अत्याचारबाबत प्रत्येक तालुका स्तरावर न्यायालय करावे इत्यादी विविध 20 मागण्यांसाठी सर्व मागासवर्गीय - बहुजन संघटनांचे आयबीसेफच्या पुढाकाराने मंत्रालयावर आझाद मैदान येथे प्रचंड जन आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले व त्यामध्ये संविधान प्रास्ताविकेची व आरक्षण विरोधी - संविधान विरोधकांना मतदान न करण्याची सामुहिक शपथ घेण्यात येऊन
सरकारने मागण्याची दखल घेतली नाही तर पुढील रस्त्यावरचे प्रचंड जन आक्रोश आंदोलन स्वातंत्र्याच्या दिनी - दि 15/8/2023 रोजी करण्यात येईल असे ठरविण्यात आले.या आंदोलनात आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य निमंत्रक अनुक्रमे मा. हरिभाऊ राठोड (माजी खासदार-एस सी एस टी ओबीसी संघटना ),
मा.सुनिल निरभवने ( केंद्रीय अध्यक्ष आयबीसेफ - कास्टट्राइब राज्य परिवहन ), मा.एस के भंडारे ( केंद्रीय सरचिटणीस ,आयबीसेफ -म्हाडा गृहनिर्माण ),मा .सिद्धार्थ कांबळे (खजिनदार,आयबी सेफ - सेंट्रल रेल्वे युनियन ) जगदिश गायकवाड ( महापालिका शिक्षक संघटना ) , आर डी सोनकर (खाटिक समाज संघटना ), प्रा डॉ महिंद्र दहिवले ( ठाणे निमंत्रक - बिदाता ), इत्यादीनी मार्गदर्शन केले, सूत्र संचालन एस के भंडारे आणि आभार प्रदर्शन दिपक मोरे ( मुंबई निमंत्रक -मुंबई विद्यापीठ) यांनी केले .या धरणे आंदोलनात राज्य परिवन , म्हाडा ,बी एम सी शिक्षक,मुंबई विद्यापीठ , इंडियन ऑइल, समता सैनिक दल , परिसंघ , शासकीय मुद्रणालय , बीदाता प्राध्यापक संघटना,बेस्ट इत्यादी विविध संघटनांचे पदाधिकारी , प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे आरक्षण हक्क कृती समिती राज्य समन्वयक व आयबी सेफचे केंद्रीय सरचिटणीस एस के भंडारे यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment