दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यक्रम programme of BSI या ब्लॉगच्या माध्यमातून प्रसिद्ध करत असताना ठाणे जिल्हा शाखेने दिनांक १ जुलै २०२३ रोजी आयोजित केलेल्या चिंतन शिबिराची विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे देत आहे.
===================================
संविधान वाचविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरची लढावी लागेल.
एस के भंडारे
===================================
धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात 1लाख बौद्ध सभासद करण्याचा ठराव.
पहिल्याच जिल्हा चिंतन शिबिरात 35 बौद्ध आजीवन सभासद झाले.
कल्याण ( 1/7/2023) - संविधानाचे विरोधक धर्मावर आधारित संविधान आणण्यासाठी सर्वांना समानता देणारे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत .त्यामुळे आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य व स्वाभिमान जाऊन पुन्हा अस्पृश्यता लादण्याचा कारस्थान चालू आहे .त्यासाठी संविधान मानणाऱ्यांच निवडून द्या . प्रसंगी संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर यावे लागले तर त्यासाठी तयारी ठेवा. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी प्रबोधन करताना सामाजिक आणि धार्मिक भान ठेऊन बोलावे असे ठाणे जिल्हास्तरीय चिंतन शिबिर वर्षावास प्रवचन मालिका व बौद्धाचार्य शिबिराचे उदघाटन करताना एस .के .भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ) यांनी प्रतिपादन केले.
बी एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव ) यांनी प्रबोधनाची आचारसंहिता याविषयावर मार्गदर्शन करताना असे सांगितले की , महामानवांचा विचार सांगताना कोणतीही भेसळ करु नये व कोणत्याही धर्मावर टीका टिपणी करू नये.
अँड प्रकाश मौर्य ( राष्ट्रीय संघटक ) यांनी महामानावांचा वारसा या विषयावर मार्गदर्शन केले.
भिकाजी कांबळे ( अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य ) यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती कशी गतिमान करावी अर्थात बीएसआय मिशन या विषयावर मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी प्रत्येक शाखेने 8 गोल्डन मार्गाचा अवलंबून करून गावागावात घरो घरी जाऊन बौद्ध सभासद अभियान राबवावे असे सांगितले .
अँड एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ) यांनी हिशोब कसा ठेवावा व संस्थेचे कार्य कसे करावे हे उदाहरणासह सखोल समजून सांगितले.
शेवटी एस के भंडारे यांनी शंका आणि प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.या कार्यक्रमासाठी डी एम आचार्य (समता सैनिक दल हेडक्वार्टर सचिव ) , शामराव कांबळे ( संस्कार सचिव ,महाराष्ट्र राज्य ) उपस्थित होते .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात 1लाख बौद्ध सभासद करण्याचा ठराव करण्यात आला .
पहिल्याच जिल्हा चिंतन शिबिरात 35 बौद्ध आजीवन सभासद झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय गायकवाड ( ठाणे जिल्हा अध्यक्ष ) होते ,
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रशांत गांगुर्डे ( ठाणे जिल्हा संस्कार सचिव ) यांनी केले. चिंतन शिबिरात केंद्रीय शिक्षक ,शिक्षिका ,बौद्धाचार्य, जिल्हा व तालुका कार्यकारणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
===================================
While publishing the programs of The Buddhist Society of India through this blog, program of BSI is giving detailed information about the meditation camp organized by Thane District Branch on 1st July 2023 as follows.
===================================
In order to save the constitution, we will have to fight on the streets.
- SK Bhandare
===================================
Resolution to make 1 lakh Buddhist members in Thane district to speed up Dhamma revolution.
In the very first District Meditation Camp, 35 Buddhists became lifelong members.
Kalyan (1/7/2023) - Opponents of the constitution are talking about changing the constitution that gives equality to all to bring a constitution based on religion. Because of this, the conspiracy is going on to impose untouchability again by taking away the freedom and self-respect that we have got. For that, elect those who believe in the constitution. If you have to come to the streets to save the constitution, be prepared for it. At the same time, S. K. Bhandare (National Vice President and Staff Officer of Samata Sainik Dal) asserted while inaugurating Thane district level thinking camp Varshavas sermon series and Buddhacharya camp that workers should speak with social and religious consciousness.
BH Gaikwad (National Secretary) while giving guidance on the subject of Code of Conduct for Enlightenment, said that no adulteration should be done while expressing the thoughts of great people and no criticism should be made against any religion.
And Prakash Maurya (National Organizer) gave guidance on the subject of heritage of Mahamanavas.
Bhikaji Kamble (Chairman, Maharashtra State) guided Dr. Babasaheb Ambedkar on how to speed up the Dhamma revolution i.e. BSI Mission.
And SS Wankhade (National Secretary and Head of Central Training Department) gave a thorough understanding of how to keep accounts and work of the organization with examples.
Finally, SK Bhandare gave pertinent answers to the doubts and questions. DM Acharya (Secretary Samata Sainik Dal Headquarters), Shamrao Kamble (Secretary of Sanskar, Maharashtra State) were present for this program.
To speed up the Dhamma revolution of Dr. Babasaheb Ambedkar, it was decided to make 1 lakh Buddhist members in Thane district.
In the very first District Meditation Camp, 35 Buddhists became lifelong members.
The program was chaired by Vijay Gaikwad (Thane District President).
Moderator and vote of thanks was done by Prashant Gangurde (Thane District Sanskar Secretary). There was a large presence of central teachers, teachers, Buddhacharyas, district and taluka functionaries in Chintan camp.
No comments:
Post a Comment