☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
धर्मांतर घोषणेचा वर्धापन सोहळा संपन्न .
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
निवडणूकच्या वेळी मतदान कबाब , शबाब आणि गांधींच्या पाठीमागे न लागता मतदान करून चळवळीची ताकद दाखवा
-अँड प्रकाश आंबेडकर
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
आता लाखो ओबीसी धर्मांतर करीत आहेत संपूर्ण देशात महापुरुषांचा विचार पसरावा लागेल.
- डॉ भीमराव य आंबेडकर
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
येवला ,जि.नाशिक ( दि.13/10/2023)- आपले डोके आपल्याच खांद्यावर पाहिजे , दुसऱ्याच्या खांद्यावर दिले तर घात होणार आणि त्याचा अनुभव आपण घेतला ,दुसऱ्याच्या डोक्याने चालण्याची सवय झाली आहे ,तसेच आपण एखादे अनुकरण करायला लागलो तर ते हिताचे आहे किंवा नाही याचा विचारच करत नाही असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे सर्वोसर्वो अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व येवला मुक्ती भूमी प्रतिष्ठानच्यावतीने मुक्ती भूमी ,येवला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणेच्या 88 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. यावेळी मंचकावर डॉ भीमराव य आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष ,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व राष्ट्रीय अध्यक्ष ,समता सैनिक दल ),वंचितचे युवानेते सुजात दादा आंबेडकर ,प्रा अंजलीताई आंबेडकर , आनंदराज आंबेडकर व मनीषाताई आंबेडकर , एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष ,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ),भिकाजी कांबळे (अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य ,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ), वंचितचे शमिमा पाटील व पवन पवार इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढे सारांशाने असे म्हणाले की, डॉ बाबासाहेबांची क्रांती वर आरूढ झालो पण ती वाढविण्याचा प्रयत्न केला नाही,डॉ बाबासाहेब का हरले याचा विचार केला नाही , राजकीय भानाचा अभाव होता त्यावेळी दोन मते देण्याचे अधिकार होते ,दोन्ही मते डॉ बाबासाहेबांना दिले असते तर डॉ बाबासाहेब हरले नसते ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक सांकृतिक आविष्कारासाठी आला आहात तर हा परिवर्तन चा लढा चालू राहील एक पिढी दोन पिढी चालू राहील ,जात व्यवस्था मधून मुक्त झालो नाही माणूस म्हणून जगायला पाहिजे पण आपण ते करत नाही, निवडणूकच्या वेळी मतदान करताना कबाब, शबाब आणि गांधींच्या पाठीमागे का लागतो असा प्रश्न विचारून आता चळवळी बरोबर राहावे व चळवळ म्हणजे मतदान करून चळवळीची ताकद दाखविले पाहिजे असे आवाहन केले.
डॉ.भीमराव य आंबेडकर ( ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष ) यांनी असे सारांशाने प्रतिपादन केले की ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्मचक्र आम्ही देशभर घेऊन गेलो ,आता लाखो ओबीसी धर्मांतर करीत आहे त्यामुळे सरकार जनगणना करत नाहीत ,काळाराम मंदिर सत्याग्रहला आता 100 वर्षे होत आहे पण देशात फरक पडला नाही, त्याचा गांभीर्यानं विचार करत नाही, राष्ट्रपती मुर्मु यांना मंदिरात प्रवेश दिला नाही त्याबद्दल कोण बोलत नाही,महाराष्ट्रात काही बदल घडू शकेल असे दिसत नाही इतर राज्यात ओबीसीपुढे आले आहेत , पण महाराष्ट्रात ओबीसीला समजून सांगावे लागेल कारण महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाज संघटनेस 150 वर्ष झाल्याचा कार्यक्रम महाराष्ट्रत झाला नाही पण दिल्लीत सैनी समाजाने कार्यक्रम घेतला.संपूर्ण देशात महापुरुषांचा विचार पसरावा लागेल असे आवाहन केले.
वंचितांचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी, यावेळी वंचित बहुजन आघाडीचा आवाज आर एस एस व दिल्लीत मोदी व अमित शाह पर्यंत पोहचला पाहिजे असे आवाहन केले असता , वंचित बहुजन आघाडी नावाचा प्रचंड जयघोष उपस्थितांनी केला.
एस के भंडारे ( राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर ,समता सैनिक दल ) यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपणास स्वातंत्र्य , स्वाभिमानाचे जीने दिले आहे ते काढून घेऊन संविधान बदलण्याचे कट कारस्थान चालू आहे. त्यामुळे ते हाणून पाडण्यासाठी संविधानाचे विरोधकांना खाली ,घरी बसवावे लागेल आणि संविधानाचे समर्थकांना सत्तेत बसवावे लागेल असे आवाहन करून त्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया / समता सैनिक दल काम करणार व गरज पडल्यास रस्त्यावर येईल असे सांगितले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रविण बागुल होते व सूत्रसंचालन राजू जगताप यांनी केले. यावेळी भंते सुमेध बोधी यांच्या नेतृत्वाखाली श्रामनेर शिबिर घेण्यात आले त्यासाठी केंद्रीय शिक्षक म्हणून मनोज गाडे ,प्रकाश जगताप ,मनोज मोरे यांनी प्रशिक्षण दिले. तसेच यावेळी समता सैनिक दलाच्यावतीने सकाळी अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित मानवंदना व रॅली काढण्यात आली तसेच धावणे ,कब्बडी ,लाठीका ठी इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या ,विजयी महिला /पुरुष सैनिक ,अधिकारी यांना डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते एस के भंडारे ,समता सैनिक दलाचे अशोक कदम ,डी एम आचार्य ,मोहन सावंत यांच्या उपस्थितीत ट्रॉफी देण्यात आल्या. धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन कार्यक्रमास जनता ,
सैनिक , कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment