Wednesday, December 20, 2023

देशात कूटनीती चालली असल्याने आपणास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही संस्था पुढे घेऊन जाव्या लागतील* -डॉ भीमराव य. आंबेडकर

 ,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संरक्षक  : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर

ट्रस्टी चेअरमन :  डॉक्टर हरीश रावलिया

राष्ट्रीय कार्याध्यक्ष : डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️


देशात कूटनीती चालली असल्याने आपणास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही संस्था पुढे घेऊन जाव्या लागतील.

   -डॉ  भीमराव य. आंबेडकर 

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

बसवकल्याण ,कर्नाटक (दि. 16/12/2023) भारत भूमी ही बुद्ध भूमी असून ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला ते जगात पुढे गेले ,त्यावेळी भारत जगात पुढे होता. बुद्धाने समता ,बंधुता दिली पण आता देशात उच्च - नीच बघितले जात आहे. त्यामुळे  एस सी ,एस टी, ओ बी सी,यांना बुद्ध धम्मात जोर जबरदस्ती न करता  आणावे लागेल ,अंध विश्वास ,पाखंड वाद धम्मात नाही ,बुद्धांनी देव ,आत्मा नाकारला. संविधान कलम 50/51 नुसार देशातील सर्व नागरिकांनी विज्ञानावर चालावे लागणार आणि कलम 15 नुसार धर्म ,वंश ,जात , रूढी परंपरा,लिंग यावर आधारलेली  विषमता संपवून  समता प्रस्थापित केलेली आहे त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पूर्ण जगात सन्मान करतात.डॉ बाबासाहेब यांनी मानवता साठी काम केले आहे ,देशाचे नागरिकांचे हक्क आणि अधिकार यासाठी काम केले आहे केवळ  दलितांसाठी  नाही ,डॉ बाबासाहेब हे मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया आहेत त्यामुळे आता देशात कूटनीती चालली असल्याने आपणास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही संस्था पुढे घेऊन जाव्या लागतील असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष ,समता सैनिक दलाचे समूह राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ  भीमराव य आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा बसवकल्याण तालुक्याच्यावतीने बसवकल्याण  येथे संध्याकाळी आयोजित केलेल्या वर्षावास समारोप कार्यक्रमात केले. यावेळी ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रविण निखाडे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथम डॉ भीमराव य आंबेडकर यांना रथात बसवून  शहरातील   मुख्य रस्त्यावरून  बाबासाहेब आंबेडकर चौक  पर्यंत रॅली काढण्यात आली , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून  रॅलीचा समारोप करण्यात आला,रॅलीमध्ये समता सैनिक दलाच्या  सैनिकांची संख्या मोठी होती त्यामुळे रॅलीला विशेष महत्व प्राप्त झाले होते तसेच सभेच्या कार्यक्रमानंतर राहुल अन्विकर (औरंगाबाद ) यांचा बुद्ध - फुले - शाहू -आंबेडकर विचारधारावर आधारलेला गायनाचा अत्यंत उत्कृष्ठ कार्यक्रम संपन्न झाला.  या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने  कर्नाटक उत्तर राज्य शाखेचे अध्यक्ष मनोहर मोरे , देवेंद्र भालके , वैशालीताई  मोरे प्रा बापू गायकवाड (लातूर ), डॉ बाबू अन्दुरे ,मनोहर मैंसे , नागनाथ वाडेकर ,

बिदर जिल्हा ,गुलबर्गा व भालकी शाखेचे पदाधिकारी ,कार्यकर्ते  सामाजिक व स्थानिक ग्रामपंचायतमध्ये  निवडून  असलेले प्रतिनिधी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी गुलबर्गा येथील मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्माण केलेले प्रसिध्दी सिद्धार्थ बुद्ध विहारास डॉ भीमराव य आंबेडकर यांनी भेट दिली असता विहाराचे भन्ते व माजी कुलगुरू व्ही टी कांबळे यांनी स्वागत व सत्कार केला. तसेच रस्त्यात कपनुर येथे प्रकाश कपनुर यांच्या गावात डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्याला  भीमराव य आंबेडकर यांचे हस्ते हार अर्पण करण्यात आला व डॉ  भीमराव य आंबेडकर यांचे बुद्ध मूर्ती देऊन स्वागतही करण्यात आले.

      त्यानंतर दि17/12/2023 रोजी सकाळी कर्नाटक राज्यातील पहिले मोरखंडी येथे  बांधण्यात आलेले जेतवन बुद्ध विहारास डॉ भीमराव य आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांसह भेट दिली त्यावेळी बुद्ध विहार समितीने संस्थेला पाच हजाराचे धम्मदान दिले.




No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...