☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया
राष्ट्रीय कार्याध्यक्ष : आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर.
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
बौद्ध राजवतीत भारत महासत्ता व महागुरु होता आता त्याचा तो पायाच नाही तर पुन्हा महासत्ता कसा बनणार : डॉ भीमराव य आंबेडकर.
===========================================
खजगी विदयापीठातील आरक्षणासाठी लवकरच बैठक घेऊ - मंत्री संजय बनसोडे.
===========================================
विरोधकांना निवडून देऊ नये नाहीतर आपल्याला पुन्हा गुलामी करावी लागेल - एस के भंडारे .
============================================
लातूर (दि.21/1/2024) देशात विषमता पितृ सत्ताकपद्धतीमुळे आहे जेथे मातृसत्ताक आहे तेथे प्रगती झाली, परदेशात काही देशात आहे त्यामुळे ते देश प्रगती पथावर आहेत.1200 वर्षे बौद्ध राजाने राज्य केले त्यावेळी भारत महासता व महागुरु होता, देशात 19 विदयापीठ होते त्यावेळो जगात अंधाकर होता. त्यावेळी भारतात येऊन लोक शिकत होते असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ) यांनी लातूर येथील सिद्धार्थ हौसिंग सोसायटीच्या सभागृहात तथागत भगवान बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापना त्यांच्या हस्ते झाल्यानंतर झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात केले.ते पुढे म्हणाले की,जगात पहिला ग्रंथ बौद्ध ग्रंथ होता तो म्हणजे इतिका ग्रंथ, त्यातून देशाचे चित्र रेखाटले आहे त्यावेळी साक्षर होते,धम्म लिपी होती.यावेळी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक मंत्री संजय बनसोडे, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष ) यांची भाषणे झाली. मंत्री संजय बनसोडे यांनी बौद्ध समाजाचा मी एकमेव मंत्री सरकार मध्ये असून समाजाचे प्रश्न, कामे इत्यादीसाठी मी सतत पाठपुरावा करत असून खाजगी विदयापीठातील आरक्षणासाठी लवकरच बैठक घेऊ असे एस के भंडारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सांगितले.तसेच त्यांनी इंदू मिलच्या जागेवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जगातील सर्वात उंच स्मारक होणार, उदगीर येथे 20 कोटीचे बुद्ध विहार गुलबर्गा सारखे बांधणार असल्याचेही सांगितले.
एस के भंडारे यांनी असे सांगितले की, आता कोणाचेही दुकान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय चालत नाही त्यामुळे नुसते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन , फोटोलावून , झेंडा घेऊन चालणार नाही तर खऱ्या अर्थाने त्यांचे विचार कृतीत आणणाऱ्या, संविधान समर्थक व आरक्षण समर्थक व्यक्तीला,पक्षालाच
मतदान करावे विरोधकांना निवडून देऊ नये नाहीतर आपल्याला पुन्हा मनुस्मृतीची गुलामी करावी लागेल.कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी भन्ते डॉ उपगुप्त महाथेंरो होते.
प्रतिस्थापना विधी भन्ते डॉ उपगुप्त महाथेरो, भन्ते महाविरो भन्ते सुमेध नागसेन आणि इतर भन्ते गण यांनी केला.
तसेच संध्यकाळी डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या उपस्थित सुभेदार रामाजी नगर येथील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा सुभेदार नगर व रहिवाशी यांच्या वतीने दुसरी धम्म परिषद आयोजित केली होती त्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ भीमराव य आंबेडकर असे म्हणाले की,लातूर हा आंबेडकारी चळवळीचे केंद्र बनत असून आता धर्मातर वाढत आहे, अनेक वंचित समाज धर्मातरित होत आहेत, देशातील obc धर्मांतरित होत आहेत ते आमचे पूर्वज बौद्ध आहोत असे सांगतायत.जनगणना झली तर काही करोडो बोद्ध असतील, बौद्ध सायंटिफिक आहे त्यात पाखंडवाद नाही, विज्ञानावर धारित आहे युरोपचे 34 लोक चैत्याभूमीत आले होते त्यात अमेरिका , ग्रीक कॅनडा, आर्यलंड इत्यादी देशातून आले होते, त्यातील काहींनी 10 वर्षांपूर्वी आम्ही ख्रिश्चन होतो आता बौद्ध आहोत असे सांगत होते, तसेच त्यांतील काहीनी बाबासाहेब सुद्धा वाचले आहेत असे त्यांच्याशी संवाद साधताना लक्ष्यात आले. आम्ही मायनॉरिटीत आहोत पण त्याचा बाऊ करू नका आपल्याबरोबर मुस्लिम, शीख, जैन आहेत.
आपण राजकीय विचार करायला पाहीजे जेणेकरून आपला प्रतिनिधी निवडून येणे गरजेचे आहे.नागपूरची दिक्षा मनुवाद्याच्या ताब्यात आहे, मी गेली चार वर्षे दिक्षा भूमीत धम्मचक्र प्रवर्तन दिनी जात आहे, पत्राव्यवहार केला एकत्र कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही.हीच परिस्थिती महू येथे आहे. त्यासाठी काम करावे लागेल.संविधान कलम 50,51 च्या तरतुदीनुसार विज्ञानने चालले पाहिजे,सरकारचे
मंदिर बांधने काम नाही असे सांगून संविधानाला मानणाऱ्यांना बरोबर घेऊन काम करावे लागलं, 2024 महत्वाचे आहे निवडणूकीत EVM वापरला विरोध केला पाहिजे .निवडणुकीचे खरे प्रतिनिधी निवडण्यासाठी
Evm बंद करावे लागेल असे सांगून त्यासाठी प्रत्यक्ष संघर्ष सुरु केल्याचे सांगितले देशात कुट नीती चालू आहे, गोळवलकर यांच्या बंचऑफ थॉट्स मध्ये आर्थिक नाडी बंद करा म्हणजे ते आपल्याकडे येतील, गुलाम बनतील त्यामुळे आपणास स्वतःचे आर्थिक नीती करून उद्याग सुरु कारबे लागतील असे सांगितले.
एस के भंडारे यांनी या प्रसंगी असे सांगितले की, डॉ भीमराव य आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची सूत्रे सन 2014 मध्ये घेतल्यापासून जाणीवपूर्वक त्यांनी समाजातील सर्व विविध संस्था, संघटना, भिक्खू व त्यांच्या संस्था यांच्याशी समन्वय साधला असून त्यांच्या नेतृत्वखाली संपूर्ण समाज एकत्रित होत असल्याने आता आपनातील हेवे दावे, कुरबुरी संपवून सर्वांशी धम्माच्या तत्वप्रमाणे मैत्री करावी असे सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करायची आहे.तसेच धम्म गाथेमधील देव म्हणजे सद्गुणी माणूस आहे दगडाचा देव नव्हे की, ज्याच्यात प्राणप्रतिष्ठा करून जिवंतपणा आणू शकत नाही असेही सांगितले.
या परिषदेच्या सुरवातीला भन्ते महाविरो भन्ते सुमेध नागसेन यांनी धम्म देसना दिली. या परिषदेमध्ये आंबेडकरी जलसा स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये विविध कॉलेजचे विदयार्थी संघ सहभागी झाले होते.
या वेळी भिकाजी कांबळे,(अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य ),प्रा बापू गायकवाड (राज्य संघटक ), दैवशाला गायकवाड (राज्य संघटक ) यांनी शुभेच्छा दिल्या.या दोन्ही कार्यक्रमास एम एम बलांडे,( अध्यक्ष,लातूर पूर्व जिल्हा ), समता सैनिक दलाचे राजाराम साबळे व विलास आल्टे, हिराचंद गायकवाड, डॉ लहू वाघमारे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या दोन्ही कार्यक्रमास बौद्ध महिला व समता सैनिक दलाचे सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment