Posts

Showing posts from May, 2024

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांचा पंजाब मधील होशियारपुर लोकसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात

Image
🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞 होशियारपूर - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर हे त्यांच्या  नुकत्याच स्थापन केलेल्या ग्लोबल रिपब्लिकन पार्टी या पक्षातून गॅस सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.  तेथे 1 जूनला मतदान आहे.       या पूर्वी सन 1962 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भय्यासाहेब तथा यशवंत आंबेडकर हे या होशियारपूर लोकसभा मतदार संघातून उभे राहिले होते, त्यावेळी ते केवळ 10301 मताने हरले होते. यावेळी त्यांचा मुलगा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव यशवंत आंबेडकर जे सन 2014 साली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्यापासून सार्वजनिक समाज कार्यात सहभागी झाले. त्यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी व समता सैनिक दलाची जबादारी आल्यापासून सर्व देश, विदेशात कार्य सुरु करून भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज इत्यादी सर्व  समतावादी विचाराचे, संविधान संरक्षणाचे काम काम करत आहेत.       डॉ भीमराव य आंबेडकर हे कार्यकर्त्यांच्य...

Seminar and press conference on the special occasion of Buddha Purnima

Image
Hoshiarpur 23/05/2024 Seminar and press conference on the special occasion of Buddha Purnima Hoshiarpur 23/05/2024

प्रधानमंत्री मोदींच्या राजकीय सभेमुळे हजारो आंबेडकर अनुयायी यांना तब्बल चार तास चैत्यभुमी येथे जाण्यापासून रोखण्यात आले व श्रामनेरी शिबिर सुद्धा खोळंबले

Image
 प्रधानमंत्री मोदींच्या राजकीय सभेमुळे हजारो आंबेडकर अनुयायी यांन मोदींच्या भेटीची चैत्यभूमी ट्रस्टीला माहिती दिली नाही मुंबई - भाजपा च्या वतीने दि 17/5/2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांची शिवाजी पार्क येथे लोकसभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदीजी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी येणार आहेत, याची चैत्यभुमीचे विश्वस्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांना आगाऊ माहिती देण्यात आली नाही.3 त्यामुळे चैत्येभुमी येथे महारष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महिलांचे बुद्ध जयंती व माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त दि 17/5/2024 ते 27/5/2024 या कालावधीत आयोजित केलेल्या श्रामणेरी शिबीराचा उदघाटन कार्यक्रमाला मोठी अडचण निर्माण झाली.चैत्यभुमी येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित केला होता शिबिरार्थी महीला, कार्यकर्ते, ट्रस्टी , पदाधिकारी यांना मोदीजींच्या मुळे खुप मोठी झळ सोसावी लागली आहे.तसेच दर्शनाला आलेल्या हजारो लोकांना या सभेमुळे खुप त्रास सहन करावा लागला आहे. कारण मोदीजी यांचे चैत्यभुमी येथे आगमन सा...