Friday, May 24, 2024

प्रधानमंत्री मोदींच्या राजकीय सभेमुळे हजारो आंबेडकर अनुयायी यांना तब्बल चार तास चैत्यभुमी येथे जाण्यापासून रोखण्यात आले व श्रामनेरी शिबिर सुद्धा खोळंबले

 प्रधानमंत्री मोदींच्या राजकीय सभेमुळे हजारो आंबेडकर अनुयायी यांन


मोदींच्या भेटीची चैत्यभूमी ट्रस्टीला माहिती दिली नाही

मुंबई - भाजपा च्या वतीने दि 17/5/2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांची शिवाजी पार्क येथे लोकसभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदीजी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी येणार आहेत, याची चैत्यभुमीचे विश्वस्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांना आगाऊ माहिती देण्यात आली नाही.3 त्यामुळे चैत्येभुमी येथे महारष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महिलांचे बुद्ध जयंती व माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त दि 17/5/2024 ते 27/5/2024 या कालावधीत आयोजित केलेल्या श्रामणेरी शिबीराचा उदघाटन कार्यक्रमाला मोठी अडचण निर्माण झाली.चैत्यभुमी येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित केला होता शिबिरार्थी महीला, कार्यकर्ते, ट्रस्टी , पदाधिकारी यांना मोदीजींच्या मुळे खुप मोठी झळ सोसावी लागली आहे.तसेच दर्शनाला आलेल्या हजारो लोकांना या सभेमुळे खुप त्रास सहन करावा लागला आहे. कारण मोदीजी यांचे चैत्यभुमी येथे आगमन सायंकाळी सात वाजता झाले आहे.परतुं चैत्यभुमी कड़े येणारा रस्ता बबन प्रभू चौक येथे दुपारी पासूनच बंद करण्यात आला होता.म्हणजें तब्बल लोकांना पांच तास त्रास सहन करावा लागला आहे. दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा पुर्व नियोजित कार्यक्रम पाच वाजता सुरू होणार होता.तो कार्यक्रम आठ वाजता सुरू झाला आहे आणि या कार्यक्रमाची पुर्व कल्पना देखील चैत्यभुमीचे विश्वस्त यांना दीलेली नव्हती.त्यामुळे पोलिस प्रशासन यांच्याशी ट्रस्टी संस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे कार्यकर्ते यांची खुप बाचाबाची झाली आहे. रात्री आठ वाजता चैत्यभुमी येथील शिबीर उदघाटन संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुज्य भंते बोधी रत्न यानी सर्वांना त्रिसरण पंचशील नंतर आशिर्वाद दिला व ४७ केंद्रीय शिक्षिकांना श्रामणेरी प्रवज्जा दिली. एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ) सुषमाताई पवार (राष्ट्रीय उपाध्यक्षा व केंद्रीय महिला विभाग प्रमुख ) बी एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव ), भारतीताई शिराळ (केंद्रीय महिला विभाग सचिव ), वैशालीताई अहिरे ( मुंबई प्रदेश महिला शाखा अध्यक्ष) यांनी यथोचित मार्गदर्शन केले. या मंगल प्रसंगी राष्ट्रीय सचिव बी एम कांबळे, केंद्रीय महिला विभाग उपप्रमुख रागीणीताई पवार, महाराष्ट्र राज्य महिला शाखा कोषाध्यक्ष सुनंदा ताई वाघमारे, मुंबई प्रदेश शाखेचे कोषाध्यक्ष विलास खाडे, उपाध्यक्ष सुनील बनसोडे, सचिव पंढरीनाथ कांबळे, संघटक महादेव गायकवाड़, मुंबई प्रदेश महिला शाखा कोषाध्यक्ष दिप्ती ताई लोखंडे, उपाध्यक्ष वंदना सावंत, माजी न्यायाधिश व नांदेड़ उत्तर जिल्हा शाखेचे अध्यक्ष डाॅ यशवंत चावरे व माजी न्यायाधिश व बौद्धाचार्य / माजी श्रामणेर डाॅ सोनवणे आणि राज्य / प्रदेश / दोन / जिल्हा शाखांचे अनेक पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक / शिक्षिका / कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये प्रशासन,पोलीस प्रशासन आणि संबंधीत यंत्रणेचा जाहीर निषेध व्यक्त करून, सामान्य माणसांना राजकीय कार्यक्रमासाठी अशा पध्दतीने वेठीस धरू नये, असा ठराव करण्यात आला. या शिबिरात एकूण 47 महिलांनी सहभाग घेतला आहे. या महिलांनी केस मुंडन करून आपल्या कुटुंबाचा 10 दिवस त्याग केला आहे. शिबिराचा समारोप माता रमाई यांचे माहेर वणंद (दापोली ) येथे होणार आहे. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ अॅड एस एस वानखडे होते व सूत्रसंचालन केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या सचिवा सुनंदाताई पवार यांनी केले.

बी एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव )

अनिल मनोहर (सचिव, केंद्रीय प्रशीक्षण विभाग)

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया






No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...