मुंबई (दि.7/12/2024 ) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया केंद्रीय कमिटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज आंबेडकर भवन दादर येथे संपन्न झाली.
संस्थेचे ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. संस्थेचे राष्ट्रीय रिपोर्टिंग ट्रस्टी एडवोकेट सुभाष जंजाळ यांनी अभिवादन सभेस आले असता सांगितले होते की ,'उद्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जे ठराव मंजूर होतील त्यास माझा पूर्ण पाठिंबा असेल .'असे राष्ट्रीय उपाध्यक्ष एडवोकेट एस के भंडारे यांनी सभेस सांगितले .संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर एस .एस .वानखेडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले.
संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, ट्रस्टी कॅप्टन प्रवीण निखाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष एडवोकेट एस के भंडारे यांनी सभेस संबोधित केले. संस्थेचे माजी कोषाध्यक्ष राजेश पवार यांनी सन 2019 - 20 या आर्थिक वर्षाच्या आर्थिक अहवालाचे वाचन केले. संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश गवई यांनी सन 2020 - 21 व 2021 - 22 या आर्थिक वर्षांच्या आर्थिक अहवालाचे वाचन केले. संस्थेचे विद्यमान राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी.बी .तेलतुंबडे यांनी आर्थिक वर्ष 2022 - 23 व 2023 - 24 या आर्थिक वर्षाच्या अहवालाचे वाचन केले.यानंतर संस्थेच्या अजेंड्याप्रमाणे इतर विषयांवर चर्चा झाली चर्चेमध्ये देशभरातून आलेल्या प्रदेश अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या महत्वाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केंद्रीय पदाधिकारी , सर्व राज्य/प्रदेश अध्यक्ष, महासचिव, कोषाध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे मेजर जनरल आणि त्यांच्या वरच्या दर्जाचे सर्व अधिकाऱी उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कपुरसिंह हितैषी, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमाताई पवार, राष्ट्रीय सचिव बी.एच गायकवाड, राष्ट्रीय सचिव बी .एम. कांबळे राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे, समता सैनिक दलाचे हेडक्वार्टर डि.एम.आचार्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment