मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1907 साली शिक्षण घेतलेल्या एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबईला त्यांच्या नातवांनी – डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी नुकतीच भेट दिली. हीच ती ऐतिहासिक शाळा आहे जिथून बाबासाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासाला प्रारंभ केला होता.
ही भेट 2 जुलै 2025 रोजी झाली. 1970 सालच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून डॉ. भीमराव आंबेडकर यांनी येथे येऊन त्या ऐतिहासिक क्षणांना उजाळा दिला. शाळेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या संविधान मंदिरात बाबासाहेबांचे छायाचित्र आणि संविधानाची प्रस्तावना प्रदर्शित करण्यात आली आहे.
या प्रसंगी डॉ. भीमराव आंबेडकर यांनी शाळेच्या प्रशासनाला सूचना केली की, प्रवेशद्वारावर बाबासाहेबांनी येथे शिक्षण घेतल्याचा फलक लावण्यात यावा, ज्यामुळे भावी पिढ्यांना या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा मिळेल.
ही भेट केवळ आठवणींना उजाळा देणारी नव्हे, तर शैक्षणिक व सामाजिक क्रांतीच्या बीजस्थानाला मानाचा मुजरा ठरली.
No comments:
Post a Comment