Thursday, January 5, 2023

A January Day of Valor १ जानेवारी शौर्य दिन

*Our forefathers fought this battle for social freedom and self-respect*

People should be elected who respect the constitution and who can provide social justice

*-Dr. Bhimrao Y.Ambedkar*

Bhimakoregaon (Pune) - For the past many years, January 1 is a day of celebration and energy for everyone. Because social and religious restrictions were imposed on the untouchable community in the Peshwa kingdom. Very rude and cruel treatment was given. Our forefathers fought this battle for social freedom and self-respect against this restriction. Our heroic forefathers won this battle and destroyed social and religious constraints. People have forgotten many battles fought in the world but we cannot forget this battle because it was the battle of our identity so we have created a glorious history that should be written on a golden page by the people of Rakhine. In the meeting organized to salute the pillar, Trustee / National Working President of the organization and National President of Samata Sainik Dal and grandson of Dr. Babasaheb Ambedkar, Dr. Bhimrao Y. Ambedkar did. He further said that before the start of this historic battle, Chhatrapati Sambhaji Maharaj was killed three kilometers away from Bhimakoregaon, the place where Chhatrapati Sambhaji Raja was brutally murdered and bowed down at the Samadhi of Chhatrapati Sambhaji Maharaj at Vaduj and swore that we will avenge the mark of Sambhaji Maharaj.

- The *history* of *our* *ancestors* is *glorious*.*

After the independence of India on 15th August, Kashmir issue came up and at that time Pakistani gangs invaded our country. At that time, Dr. Babasaheb Ambedkar was the Law Minister and he advised the then Prime Minister Jawaharlal Nehru and Home Minister to send Mahar Battalion to settle Pakistan and said that Mahar Battalion would drive Pakistan Army away in two days. Similarly, in the battle of China and Bengal, our Mahar battalion had done a great feat. Such is our glorious Shali history and it should be written in golden letters.

- *Elect people who believe in the Constitution* and who can give justice.*

The system here opposed Babasaheb's social, educational, political and religious revolution during his lifetime, but our society organized and supported Babasaheb's revolution and fought against these opponents. Although times and times have changed, the Manuwadi government is making many laws, among them the anti-conversion law and also the bill about what we should eat and how we should dress has been passed recently fifteen days ago. It looks like your freedom is about to be compromised. Want to capture your intelligence. So we have to be careful and we have to be organized and fight with the opponents. Therefore, in the coming 2024, Dr. Bhimrao Ambedkar also appealed to elect people who respect the constitution and who can provide social justice.

On this occasion, Trustee Chairman of the organization, Dr. Harish Ravalia, said that Dr. Babasaheb Ambedkar's constitution has made him a chai-wala Prime Minister, and appealed to all to participate, saying that the Indian Buddhist Mahasabha will convert crores of people to speed up the Dhamma revolution of Dr. Babasaheb Ambedkar.

Also, National Vice President of the organization and Staff Officer of Samata Sainik Dal, SK Bhandare, while wishing the day of bravery, said that history happened 205 years ago, 500 Mahar soldiers did not complete 28,000 Pesh Vyas, so the necks and backs of the veterans were scratched.

If you see 56 like you, it means that if you divide 28 thousand by 500, you get 56, so Mahar says that you see 56 like you. At that time Peshwa ended, but now another Peshwa came, now they are not ready to accept the equality given by the constitution and the constitution, to implement the agenda of Hindu nation, to change the constitution,

to bring Manusmriti again. Symbolic peshwas have to end.

of the Constitution

SK Bhandare also asserted that we should start working for the opponents and the opponents of equality have to be eliminated from the ballot box. The president of Pune District East Raghunath Salve presided over this meeting. Prakash Oval, President of Pune District West, made the introduction. The reception chairman was Sunil Awachar. Vijayastambhas Bhimrao Ambedkar, Dr Harish Ravalia, SK Bhandare, Sushmatai Pawar, Bhikaji Kamble Ashok Kadam, on behalf of Samata Sainik Dal on the occasion of Shaurya Day.

Dadasaheb Bhosle, DM Acharya, Sushil Waghmare, PS Dhoble, Raghunath Salve, Prakash Oval, Rajaratan Thorat etc. officers and soldiers of the force paid their respects in large numbers. Before the meeting, Jolly More and Seema Patil of the cultural department of the organization performed a song singing program among the people. Enthusiasm was created. Huge number of people attended the salute and the meeting.



*आपल्या पूर्वजानी  सामाजिक स्वातंत्र्य व स्वाभिमानासाठी ही लढाई लढली होती*
     संविधानाला मानणारे व जे सामाजिक न्याय देऊ शकतील अशाच लोकांना निवडून दयावे.
 
-डॉ भीमराव य.आंबेडकर*

भिमाकोरेगाव (पुणे )- गेल्या अनेक वर्षांपासून 1 जानेवारी हा दिवस सर्वासाठी नवीन वर्षाची पर्वणी व ऊर्जेचा दिवस आहे. कारण पेशवाई राज्यामध्ये सामाजिक व धार्मिक बंधने येथील अस्पृश्य समाजावर लादली गेली होती. अतिशय आपणास्पद व क्रूर वागनूक दिली जात होती. या बंधनाविरुद्ध आपल्या पूर्वजानी  सामाजिक स्वातंत्र्य व स्वाभिमानासाठी ही लढाई लढली होती. आपल्या शूरवीर पूर्वजानी ही लढाई जिंकून सामाजिक व धार्मिक बंधने उध्वस्त करून टाकली. जगामध्ये अनेक लढाया झाल्या त्या लढाया लोकांनी विसरल्या पण ही लढाई आपण विसरू शकत नाही कारण ही आपल्या अस्मितेची लढाई होती त्यामुळे रकानेच्या रकाने सोनेरी पानाने लिहून काढावे असा गौरवशाली इतिहास आपला त्यांनी निर्माण केला आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा शाखेच्या वतीने 205 व्या शोर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत  संस्थेचे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य. आंबेडकर  यांनी केले. पुढे ते म्हणाले की ही ऐतिहासिक लढाई सुरु होण्यापूर्वी ज्या छत्रपती संभाजी राजांना फसवणूक करून त्यांचा अमानुषपणे  खून करण्यात आला होता ते ठिकाण भिमाकोरेगाव पासून तीन किलोमीटर अंतरावरचे  वडूज येथील  छत्रपती संभाजी महाराज्यांच्या समाधीला नतमस्तक होऊन शपथ घेतली की, संभाजी महाराजांच्या खुणाचा आम्ही बदला घेणार आहोत. अश्या प्रकारे अत्यंत त्वेषाने हे युद्ध झाले आहे.1 जानेवारी 1927 रोजी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी भेट दिली होती त्यावेळी घेतलेल्या फोटो सुद्धा विजयी स्तंभाजवळ त्यावेळच्या आठवणी  म्हणून लावण्यात आल्याबद्दल आयोजकांचे भीमराव आंबेडकर यांनी अभिनंदन  केले 
- *आपल्या* *पूर्वजांचा *इतिहास* *गौरवशाली* *आहे.*
  आपला भारत देश 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीर मुद्दा उपस्थित झाला व त्यावेळी पाकिस्तानी टोळ्यांनी आपल्या देशावर आक्रमण केले. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते व त्यांनी पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल  नेहरू व गृहमंत्री यांना महार बटालियन पाठविण्याचा सल्ला देऊन  महार बटालियन पाकिस्तान सैन्यास दोन दिवसात पळवून लावतील असे सांगितले होते . चीन व  बांगलाच्या लढाईत सुद्धा अगदी त्याचप्रमाणे आपल्या महार बटालियनने फार मोठा पराक्रम केला होता. असा आपला गौरव शाली इतिहास आहे व तो सोनेरी अक्षराने लिहावे असा आहे.
  - *संविधानाला* *मानणाऱ्या व जे न्याय देऊ शकतील अशा लोकांनाच निवडून दया.* 
     बाबासाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक क्रांतीला येथील व्यवस्थेने त्यांचाच हयातीत विरोध केला पण बाबासाहेबांनाच्या या क्रांतीला आपल्या समाजाने संघटित होऊन बाबासाहेबांना साथ दिली व येथील या विरोधकांना मुकाबला केला . काळ आणि वेळ बदलेली असली तरी मनुवादी सरकार अनेक कायदे करीत आहे त्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा व तसेच आपण काय खावे, कसा पेहराव असावा अश्या प्रकारचे नुकतेच पंधरा दिवसापूर्वी बिल पास केले आहे. यावरून असे दिसते की तुमचे स्वातंत्र्य धोक्यात आणायचे आहे. तुमच्या बुद्धिवर कब्जा करायचा आहे. त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे आणि आपण संघटित राहून विरोधकांसोबत मुकाबला केले पाहिजे. म्हणून येणाऱ्या 2024 मध्ये संविधानाला मानणारे व जे सामाजिक न्याय देऊ शकतील अश्याच लोकांना निवडून दयावे  असे आवाहनही डॉ भीमराव य आंबेडकर यांनी केले.  
  या प्रसंगी संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने एक चाय वाला पंतप्रधान बनला आहे असे सांगून भारतीय बौद्ध महासभेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी करोडो लोकांना धर्मांतरित करणार असल्याचे सांगून त्यासाठी सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन आवाहन केले.
      तसेच संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे  यांनी शौर्य  दिनाच्या शुभेच्छा देताना असे सांगितले की,205 वर्षांपूर्वी इतिहास घडला 500 महार सैनिकांनी 28 हजार पेश व्या ना संपविले त्यामुळे पुर्वज्याच्या गळ्यातील मडके व पाठीचा खराटा गेला .
तुझ्यासारखे 56 बघितलेत म्हणजे 28 हजार भागिले 500 केल्यास 56 येते म्हणून   तुझ्यासारखे 56 बघितलेत असे महार म्हणतात असे सांगून त्यावेळी पेशवाई संपली आता मात्र दुसरी पेशवाई आली आता संविधान व संविधानाने दिलेली समता मानायला तयार नाहीत , हिंदू राष्ट्राचा अजेंडा राबविणे, संविधान बदलणे ,
मनुस्मृती पुन्हा आणणे या सांकेतिक पेशवाई ला संपवावे लागेल .
संविधानाच्या
विरोधकांना व समतेच्या विरोधकांना , मतदानाच्या पेटीतून संपवावे लागेल त्यासाठी आपण कामाला लागले पाहिजे असेही प्रतिपादन एस के भंडारे यांनी केले.या सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा पूर्व चे अध्यक्ष रघुनाथ साळवे हे होते.सूत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस मेजर रजरतन थोरात यांनी केले. प्रास्ताविक पुणे जिल्हा पश्चिम चे अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ यांनी केले. स्वागतअध्यक्ष सुनिल अवचार होते. शौर्य दिना निमित्त समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास भीमराव य आंबेडकर , डॉ हरीश रावलिया,एस के भंडारे ,सुषमाताई पवार ,भिकाजी कांबळे अशोक कदम,
दादासाहेब भोसले , डी एम आचार्य , सुशील वाघमारे , पी एस ढोबळे ,रघुनाथ साळवे ,प्रकाश ओव्हाळ ,राजरतन थोरात इत्यादी दलाचे अधिकारी व सैनिक यांनी मोठ्या संख्येने मानवंदना दिली.सभेच्या पूर्वी संस्थेच्या सांकृतिक विभागाच्या जॉली मोरे आणि सीमा पाटील यांनी गीत गायनाचा कार्यक्रम करून जनतेमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला .मानवंदना व सभेस प्रचंड संख्येने जनता उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...