Wednesday, January 4, 2023

Dhamma Parishad

 *

Dhamma Parishad of Javali Taluka 
: On 3rd January 1940, Dr. *Babasaheb Ambedkar* had gone to Medha place and on January 3, the birthday of Kranti Jyoti *Savitribai Phule*, the Ninth Dhamma Parishad was organized at Medha (Police Maidan) on behalf of Javali Taluka.

Honorable President of Maharashtra State *Bhikaji Kamble* Saheb, General Secretary *Susheel* *Waghmare*, Sanskar Secretary *Ad.Shamrao Kamble* Saheb, V.R.Thoravade Saheb, Ay.Vidyadhar Gaikwad etc. .

On the occasion of the said Dhamma Parishad, Buddhacharya Shramner Camp, Women Upasika Dhamma Training Camps were organized. In the beginning, the Samata Sainik Dal was led by Major Ayu Dadasaheb Bhosale. General Secretary Parihar informed the President of Dhamma Parishad that Taluka President *B.P. Treasurer Kamble approved the proposal in favor of Gade* and announced that Taluka President Gade Tatya was accepting the post.

Venerable Bhante Dhammapriyaji gave Trisaran Panchsheel to the attendees. On behalf of the Taluka Branch, everyone was welcomed with shawls and bouquets. Taluka Treasurer Kamble made the introduction. The guidance meeting of the Dhamma Parishad began. On this occasion, V.R. Thoravade presented an overview of the dhammakarya taking place in Satara district.

Sanskar Secretary of Maharashtra State Branch Etc. Shamrao Kamble Saheb told how the profile of Bhimrao Saheb's work is rising all over the world,

Maharashtra State General Secretary Sushil Waghmare said that we should preserve the Buddhist culture and the places that are known for Buddhist culture of this country, they should be conserved,

Honorable President of Maharashtra State Honorable Bhikaji Kamble In his instructive speech, Saheb gave instructions and guidance regarding the work being done by the organization through various camps across the country and to create more equality soldiers from each district.

In his presidential speech, Taluka President Gade Tatya thanked all those who had cooperated from the planning of the Dhamma Parishad to its success.

After that, Taluka President Gade Tatya and General Secretary Bhimrao Parihar were felicitated by Honorable President of Maharashtra Honorable Bhikaji Kamble Saheb for their social and religious work by giving certificates, medals, shawls and bouquets.

In the end, General Secretary Bhimrao Parihar thanked the participants and concluded the Dhamma Conference.



*भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सातारा अंतर्गत जावळी तालुक्याची धम्मपरिषद मेढा या ठिकाणी उत्साहात संपन्न*

 : 3 जानेवारी 1940 रोजी डॉ. *बाबासाहेब आंबेडकर* हे मेढा या ठिकाणी गेले होते तसेच 3 जानेवारी हा क्रांतीज्योती *सावित्रीबाई फुले* यांचा जन्मदिन यांच्या अवचित्य साधून जावळी तालुक्याच्या वतीने नवव्या धम्म परिषदेचा आयोजन मेढा ( पोलिस मैदान) या ठिकाणी करण्यात आले होते . 

सदर धम्म परिषदेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय *भिकाजी कांबळे* साहेब, सरचिटणीस *सुशील* *वाघमारे* , संस्कार सचिव *आद.शामराव कांबळे* साहेब, व्हि.आर.थोरावडे साहेब,आयु.विद्याधर गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

सदर धम्म परिषदेच्या निमित्ताने बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर, महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. 

सुरुवातीस समता सैनिक दलाचे मेजर आयु दादासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना देण्यात आली. धम्म परिषदेच्या अध्यक्ष सणाची सूचना सरचिटणीस परिहार यांनी तालुकाध्यक्ष *बी.पी. गाडे* यांच्या नावे मांडली त्यास कोषाध्यक्ष कांबळे यांनी अनुमोदन देऊन तालुका अध्यक्ष गाडे तात्या यांनी अध्यक्षस्थान स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

 पुज्यनिय भंते धम्मप्रियजी यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले व तालुका शाखेच्या वतीने सर्वांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . प्रास्ताविक तालुका कोषाध्यक्ष कांबळे यांनी केले व धम्म परिषदेच्या मार्गदर्शन सभेस सुरुवात झाली. यावेळी व्हि.आर.थोरावडे यांनी सातारा जिल्ह्यामध्ये होत असलेल्या धम्मकार्याचा आढावा सादर केला,

 महाराष्ट्र राज्य शाखेचे संस्कार सचिव आद. शामराव कांबळे साहेब यांनी भीमराव साहेबांच्या कार्याचा आलेख संपूर्ण जगभरामध्ये कसा उंचावत चालला आहे हे सांगितले, 

महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुशील वाघमारे यांनी या देशाच्या बौद्ध संस्कृती व बौद्ध संस्कृतीची ओळख असलेली ठिकाणे आपण जपली पाहिजे त्यांचे संवर्धन केले पाहिजे असे सांगितले,

 महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्था विविध शिबिरांच्या माध्यमातून देशभरात करीत असलेले कार्य तसेच प्रत्येक जिल्ह्यातून अधिकाधिक समता सैनिक तयार करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. 

अध्यक्ष भाषणात तालुकाध्यक्ष गाडे तात्या यांनी धम्म परिषदेच्या नियोजनापासून ते यशस्वीतेपर्यंत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांना धन्यवाद दिले.

 त्यानंतर बंधुत्व प्रतिष्ठान तर्फे तालुका अध्यक्ष गाडे तात्या व सरचिटणीस भिमराव परिहार यांना सामाजिक व धार्मिक कार्याबद्दल महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शेवटी सरचिटणीस भीमराव परिहार यांनी उपस्थितांचे आभार मानले व सरणंतय होऊन धम्म परिषदेची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...