Tuesday, February 14, 2023

धम्म मेळावा ,( वणी)

मानवतावादाचा पुरस्कर्ता होण्यासाठी मनातील जातीचा लंगडेपणा बाहेर काढा  : ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

 विषमतेच्या मनुस्मृतीने या देशातील मानवतावाद संपविला होता. त्या मनुस्मृतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपवून टाकले. म्हणून मानवतावादाचा पुरस्कर्ता व्हायचे असेल तर मनातील जातीचा लंगडेपणा बाहेर काढावा लागेल, तरच आपण खऱ्या अर्थाने मानवतेचे पाईक होऊ, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले.

 त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते. 

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भगवान इंगळे होते, तर उद्घाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चंद्रबोधी पाटील उपस्थित होते. 

प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय जगदीश गवई उपस्थित होते.

तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी एम. डी. सरोदे, शरद वसतकर, कुशल मेश्राम, रवी भगत, लक्ष्मीकांत लोळगे,डॉ. रमेश गजभिये, उपस्थित होते.  स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. नीरज वाघमारे उपस्थित होते.

समाज व्यवस्थेतील दुकानदाऱ्या आपण ओळखल्या पाहिजे. यातच समाजाचे हित आहे. नैतिकता ही समाज व्यवस्थेतील सर्वात मोठे भांडवल आहे. म्हणून नैतिकता शाबूत ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. हल्ली बॅगांची संस्कृती वाढली आहे. ती चळवळीसाठी बाधक ठरत आहे. अशा संस्कृतीला समाजाने बाजूला ठेवले पाहिजे, तरच समाजाचे हित आहे, असे सांगून आपण सर्वांनी आपल्यातील जात सोडून मानवतावादाची कास धरली पाहिजे तरच सामाजिक उद्दिष्ट पूर्ण करू शकू, असे मत . प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

मेळाव्याचे प्रास्ताविक प्रवीण वनकर यांनी केले तर आभार आनंद पाटील यांनी मानले. संचालन रमेश तेलंग यांनी केले. या धम्म मेळाव्याला वणी विभागातील हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





Dhamma Melawa, (Vani)


To be an advocate of humanism, remove the lameness of caste in the mind : Adv. Prakash Ambedkar's appeal


The Manusmriti of inequality had ended humanism in this country. That Manusmriti Dr. Babasaheb Ambedkar ended it. Therefore, if we want to be a supporter of humanism, we have to remove the lameness of caste in the mind, only then we will truly become a pike of humanity, asserted the National Advisor of Indian Buddhist Mahasabha and founder president of Vanchit Bahujan Aghadi Adv. Prakash alias Balasaheb Ambedkar expressed here.


He was speaking at the Dhamma Mela organized by the Indian Buddhist Mahasabha on the occasion of the 125th birth anniversary of Tyagamurthy Mata Ramai.


Bhagwan Ingle, District President of Indian Buddhist Mahasabha presided over this meeting, while Honorable Chandrabodhi Patil, National President of Indian Buddhist Mahasabha was present as the inaugural function.


Venerable Jagadish Gavai, National Vice President of Indian Buddhist Mahasabha was present as the Chief Guest.

Also the official of Indian Buddhist Mahasabha M. D. Sarode, Sharad Vasatkar, Kushal Meshram, Ravi Bhagat, Laxmikant Lolge, Dr. Ramesh Gajbhiye, were present. Dr. as the chief guest. Neeraj Waghmare was present.

We should recognize the shopkeepers in the social system. This is the interest of society. Morality is the greatest asset of a social system. Therefore, it is our duty to keep morals intact. Bag culture has increased recently. It is hindering the movement. Prakash Ambedkar opined that the society should keep such culture aside, only if it is in the interest of the society, we all should leave our caste and embrace humanism. expressed.

Introduction of the gathering was done by Praveen Vankar and vote of thanks was given by Anand Patil. Directed by Ramesh Telang. Thousands of community members from Vani Division attended this Dhamma gathering in large numbers. All the female and male officers and workers of Indian Buddhist Mahasabha and Vanchit Bahujan Aghadi worked hard to make the gathering a success.



No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...