आंतरराष्ट्रीय बोद्ध भिक्खू संघ थायलंड येथील ११० भिक्खूचा सहभाग असलेली तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थीधातु कलश घेऊन परभणी ते चैत्यभूमी अशी निघालेल्या देशातील पहिल्या बौद्ध धम्म पदयात्रेचा दिनांक १५/०२/२०२३ रोजी चैत्यभूमीवर लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत समारोप झाला .यावेळी बौद्ध विचार जागृत करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत असे आवाहन थायलंड येथील भदंत ब्रम्हवरजीराकॉर्न यांनी केले. परभणी ते चैत्यभूमी दादर अशी भारतातील पहिली बोद्ध धम्म पदयात्रा होती.
या धम्म पदयात्रेत तथागत गौतम बौद्ध यांचे अस्थिकलश घेऊन घायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाचे ११० भिक्खु सहभागी झाले होते.
दिनांक १५/०२/२०२३ रोजी तब्बल ५७० किलोमीटरचा प्रवास करून ही बौद्ध धम्म पदयात्रा दादर येथील चैत्यभूमीवर सकाळी ११ वाजता पोहोचली.
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चैत्यभूमीवर या धम्म पदयात्रेचा समारोप झाला . समारोप कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते... यावेळी थायलंड येथील भदंत ब्रम्हवरजिराकॉर्न यांनी धम्म देसना दिली.
भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांनी लाखोच्या जनसमुदायाला आपल्या भाषणातून सांगितले की ,"भारतीय बौद्ध महासभा ,आश्रय फाउंडेशन, आणि गगन मलिक फाउंडेशन यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे".
"जी भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली आहे. ज्या भारतीय बौद्ध महासभेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले अध्यक्ष होते. त्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या देशामध्ये क्रांती झाली. अशी ही भारतीय बौद्ध महासभा या कार्यक्रमाला कधीही कमी पडू देणार नाही अशी मी त्यांना ग्वाही दिली.
आज महाराष्ट्रामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. कुठल्याही मोठ्या मीडियाने आपल्याला दाखवलेले नाही. त्याची नोंद घेतली नाही. परंतु त्याची उणीव सोशल मीडियाच्या माध्यमातून, युट्युब च्या माध्यमातून आपण भरून काढली.
हा जो संदेश देशात देण्यात आला. देशांमध्ये पुन्हा एकदा भगवान बुद्धांच्या अस्थी भारतामध्ये आल्या आणि अस्थी मुळे देशामध्ये बौद्ध धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झालेला आहे.
भारत ही भगवान बुद्धाची भूमी आहे. आज आपल्याकडे अस्थी नाहीत असे आपल्याला वाटत असेल पण आपणाला सांगू इच्छितो, येणाऱ्या 2024 मध्ये जनरल इलेक्शन मध्ये, माझे जर पाच खासदार निवडून आले तर हे सरकार मी हलवून ठेवीन.
देशामध्ये भगवान बुद्धाच्या अस्थी आहेत त्याची गोष्ट आज आपणापर्यंत कोणाला कळलेली नाही. दिल्लीमध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये, नॅशनल लायब्ररी मध्ये भगवान बुद्धांच्या अस्थि आहेत. भगवान बुद्धांच्या अस्थी बडोद्यामध्ये सुद्धा आहेत. बडोद्याच्या युनिव्हर्सिटी मध्ये भगवान बुद्धाच्या अस्थी आहेत .अनेक सरकारे आली परंतु ही गोष्ट इथल्या बौद्धांना सांगितली नाही. म्हणून म्हणतो जर पाच खासदार निवडून आले तर हे सरकार हलवून ठेवीन आणि अस्थी रिलीफ करेन.
हिंदी भाषिक बेल्ट मध्ये हजारोच्या संख्येने धम्म परिवर्तन झाले आहे. त्याच्यामुळे देशांमध्ये या सरकारने परिवर्तन करणाऱ्या संस्थांवर केसेस दाखल करण्याचा प्रयत्न केला अनेक कायदे केले की, परिवर्तन होऊ नये म्हणून परंतु त्याला मी घाबरत नाही.
येणाऱ्या ५ मार्चला मेरठ मध्ये ५० हजार लोकांना 22 धम्म प्रतिज्ञा देऊन धम्मदीक्षा देणार आहे.
येणाऱ्या 26 फेब्रुवारीला कर्नाटकच्या मैसूर मध्ये मी उभा राहील मैदानामध्ये .आणि धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांचा धम्मचक्र मी गतिमान करण्याचा, माझ्यामध्ये जेवढी अबिलिटी आहे, माझ्यामध्ये जेवढी ताकद आहे, तेवढा मी करण्याचा प्रयत्न करीन.
येणाऱ्या 19 फेब्रुवारीला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे उत्तर भारतीय २० हजाराचा जनसमुदाय बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे.
म्हणून ज्या ज्या संघटना पुढे येत आहेत त्या प्रत्येकाला मी हातभार लावण्याचा प्रयत्न करतो."
.https://youtu.be/oAoIZkGLLJQ
===============================
At the conclusion of the historic Buddhist Dhamma Padayatra, the Chaitya Bhoomi fell Millions of people.
The first Buddhist Dhamma Padayatra in the country, with the participation of 110 monks from the International Buddhist Bhikkhu Sangha and carrying the ashes of Tathagata Gautama Buddha from Parbhani to Chaityabhoomi, concluded on 15/02/2023 in the presence of lakhs of people at Chaityabhoomi. This appeal was made by Bhadanta Brahmavarjirakorn from Dhyaland. Parbhani to Chaityabhoomi Dadar was the first Buddhist Dhamma Padayatra in India.
110 Bhikkhus of the International Bhikkhus Association of Gayland participated in this Dhamma Padayatra carrying the ashes of Tathagata Gautama Buddha.
On 15/02/2023, this Buddhist Dhamma Padayatra reached Chaityabhoomi at Dadar at 11 am after traveling about 570 kms.
The Dhamma Padayatra concluded at Chaityabhoomi in the presence of various dignitaries. Lakhs of people attended the concluding program... This time Bhadanta Brahmavarjirakorn from Thailand gave Dhamma Desana.
Honorable Dr. Bhimrao Ambedkar Saheb, Trustee and National Working President of the Indian Buddhist Mahasabha, in his address to the crowd of lakhs, said that the event is being held under the auspices of the Indian Buddhist Mahasabha, Asray Foundation, and Gagan Malik Foundation.
Which Indian Buddhist Mahasabha was created by Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was the first president of Indian Buddhist Mahasabha. A revolution took place in this country through that Indian Buddhist Mahasabha. I assured him that this Indian Buddhist Mahasabha will never let this program go down.
Today there is an atmosphere of vitality in Maharashtra. No major media has shown us. It was not recorded. But we made up for its lack through social media, through YouTube.
This is the message that was given in the country. Once again the bones of Lord Buddha came to India and the bones have changed the attitude towards Buddhism in the country.
India is the land of Lord Buddha. You may think we have no bones today, but I want to tell you, in the coming 2024 general election, if my five MPs are elected, I will move this government.
Till now, no one has known about the fact that there are bones of Lord Buddha in the country. In Delhi, the remains of Lord Buddha are housed in the Delhi University Library, the National Library. Lord Buddha's bones are also in Baroda. The University of Baroda houses the bones of Lord Buddha. Many governments came but did not tell this story to the Buddhists here. So says if five MPs are elected then I will move this government and relieve the bones.
In the Hindi speaking belt thousands have converted to Dhamma. Due to him, this government tried to file cases against the transforming organizations in the countries and passed many laws to prevent the transformation but I am not afraid of it.
On March 5th, he will give Dhammadiksha to 50,000 people in Meerut by giving 22 Dhamma pledges.
On February 26, I will stand in the field in Mysore, Karnataka. And I will try to accelerate Babasaheb's Dhammachakra by taking the Dhammadiksha program, I will try to do as much as I have the ability, as much strength as I have.
On February 19, a crowd of 20,000 North Indians will take initiation into the Buddhist Dhamma at the Bandra Kurla Complex.
So I try to contribute to every organization that comes forward.
==============================
Touch the link below to listen to the full speech of respected Dr. Bhimrao Ambedkar.
https://youtu.be/oAoIZkGLLJQ
No comments:
Post a Comment