Wednesday, February 22, 2023

ऐतिहासिक दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भव्य बौद्ध धम्म परिषद संपन्न

 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया  जिल्हा शाखा चंद्रपूर पश्चिम च्या वतीने ऐतिहासिक दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भव्य बौद्ध धम्म परिषद दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक दीक्षाभूमी चंद्रपूर येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली.

 आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब  यांनी आपल्या भाषणात सांगितले की, 'चंद्रपूर ची दीक्षाभूमी ही ऐतिहासिक भूमी आहे. दिनांक 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी लाखोच्या संख्येने धम्मदीक्षा घेऊन या देशांमध्ये पुन्हा एकदा बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. तशाच प्रकारे दुसऱ्यांदा दिनांक 16 ऑक्टोबर 1956 ला चंद्रपूर येथील भूमीवर धम्मदीक्षा कार्यक्रम घेऊन धम्मचक्र गतिमान केले.  जेवढे महत्व नागपूरच्या दीक्षाभूमीला आहे, तेवढेच महत्त्व चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला सुद्धा आहे. त्याची साक्ष येथील बुद्ध विहार आणि बाजूला असलेले कॉलेज  देत आहेत.'

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय जयसेन बौद्ध जगदीश गवई साहेब हे ही या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

भंते सुमेध बोधी यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले.

 बौद्ध धम्म परिषदेमध्ये आदरणीय वसंत पराड गुरुजी, राष्ट्रीय सचिव यांनी बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये या विषयावर मार्गदर्शन केले.

आदरणीय एम.डी. सरोदे गुरुजी, राष्ट्रीय संघटक यांनी बौद्ध धम्मातील धार्मिक संस्कार व विधी ,काय करावे व काय करू नये या विषयावर मार्गदर्शन केले.

आदरणीय बी. एम. कांबळे राष्ट्रीय सचिव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा चंद्रपूर पश्चिम चे अध्यक्ष आदरणीय नेताजी भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही भव्य बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली.

आदरणीय अरुण घोटेकर साहेब  यांनी या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. 

आदरणीय अशोक घोटेकर, आदरणीय देवेंद्र मेश्राम विभागीय सचिव. आदरणीय भीमराव फुसे. आदरणीय वामन सरदार विभागीय सचिव. आदरणीय राजपाल खोब्रागडे. आदरणीय प्रफुल भगत.आदरणीय रमेश मानकर. इत्यादी प्रमुख पदाधिकारी यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती.

बौद्ध धम्म परिषदेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा चंद्रपूर पश्चिम चे सरचिटणीस आदरणीय एडवोकेट जगदीप खोब्रागडे साहेब यांनी केले.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा चंद्रपूर पश्चिम शाखेचे उपाध्यक्ष आदरणीय संदीप सोनोने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

चंद्रपूर जिल्हा शाखेच्या उपाध्यक्षा आयुष्मानिनी सपना ताई कुंभारे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.











A grand Buddhist Dhamma Parishad was held at the historical initiation site Chandrapur

On behalf of the Buddhist Society of India District Branch Chandrapur West, a grand Buddhist Dhamma Parishad was organized on 19th February 2023 at the historic Deekshabhumi Chandrapur.

The Buddhist Dhamma Conference was concluded at the historical Deekshabhumi Chandrapur under the leadership of the Honorable Dr. Bhimrao Ambedkar Saheb, the National Working President of the Buddhist Society of India.

Respected Dr. Bhimrao Ambedkar Saheb said in his speech that 'Chandrapur's Dikshabhumi is a historical land. On October 14, 1956, Dr. Babasaheb Ambedkar once again revived Buddhism in these countries by conducting Dhammadiksha in the number of lakhs at Nagpur. Similarly, on 16th October 1956, Dhammadiksha was set in motion on the land of Chandrapur for the second time. Dikshabhoomi of Nagpur is as important as Dikshabhoomi of Chandrapur. It is witnessed by the Buddha Vihara here and the college next to it.'

The National Vice President of The Buddhist Society of India Venerable Jaysen Buddhist Jagadish Gavai Saheb was present as the Chief Guide for this event.

Bhante Sumedh Bodhi gave Trisaran Panchsheel to the attendees.

In the Buddhist Dhamma Parishad, Venerable Vasant Parad Guruji, National Secretary gave guidance on the special features of Buddhist Dhamma.

Respected M.D. Sarode Guruji, National Organizer, gave guidance on religious rites and rituals, do's and don'ts in Buddhism.

Dear B. M. National Secretary Kamble gave guidance on Dr. Babasaheb Ambedkar's contribution to the country.

The grand Buddhist Dhamma Conference concluded under the chairmanship of Venerable Netaji Bharne, President of The Buddhist Society of India District Branch, Chandrapur West.

Respected Mr. Arun Ghotekar took charge of the function of the reception chairman of this program.

Hon'ble Ashok Ghotekar, Hon'ble Devendra Meshram Divisional Secretary. Respected Bhimrao Phuse. Hon'ble Vaman Sardar Divisional Secretary. Respected Rajpal Khobragade. Respected Praful Bhagat. Respected Ramesh Mankar. Major officials etc. were prominently present for this program.

The program of the Buddhist Dhamma Parishad was moderated by the Honorable Advocate Jagdeep Khobragade, General Secretary of The Buddhist Society of India Branch Chandrapur West.

Venerable Sandeep Sonone, Vice President of The Buddhist Society of India District Branch, Chandrapur West Branch, introduced the programme.

Ayushmanini Sapna Tai Kumbhare, Vice President of Chandrapur District Branch thanked everyone.


No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...