Sunday, March 5, 2023

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती अधिक गतिमान करण्यासाठी आठ गोल्डन मार्गाचा अवलंब करावा : एस. के. भंडारे.

दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा ठाणे यांच्या विद्यमाने ,आज दिनांक पाच मार्च 2023 रोजी नूतन ज्ञान मंदिर काटे मानवली कल्याण पूर्व येथे बौद्धाचार्य ,केंद्रीय शिक्षक व शिक्षिका मेळावा संपन्न झाला.

प्रमुख मार्गदर्शक आदरणीय एडवोकेट एस. के. भंडारे साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय एस के भंडारे साहेब यांनी आपला मार्गदर्शनपर भाषण सांगितले की,"ज्यांचे 1985 मध्ये दोन खासदार होते ते 2014 मध्ये सत्तेत आले. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे विरोधक असून समतेचे आणि संविधानाचे विरोधक आहेत. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान करण्याचा प्रश्न आता आला आहे.

संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्या सरकारच्या विरोधात काऊंटर प्रोग्राम म्हणून डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनी 'चलो बुद्ध की ओर' हा जातीअंताच्या लढाईचा नारा दिला आहे.

समविचारी संघटनांना सोबत घेऊन चलो बुद्ध की और हा कार्यक्रम आपल्याला राबवावा लागेल. आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी 2025 मध्ये दहा करोड लोकांना धम्मदीक्षा देण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने आपण समविचारी संघटनांना सोबत घेऊन कार्यक्रम केले पाहिजेत.

गोल्डन वे ऑफ लाइफ च्या आर्य अष्टांग मार्गाप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्म क्रांती अधिक गतिमान करण्यासाठी 8 गोल्डन  मार्गाचा अवलंब करावा

1) चला बुद्धाकडे जाऊया

२) आचार्य हा सर्वोच्च धम्म आहे.

३) बौद्ध आयडेंटिटी निर्माण करणे.

४) टीम वर्कने काम केले पाहिजे.

५) धर्मांतरित बौद्धांबरोबर रोटी बेटी व्यवहार झाले पाहिजेत तसेच धम्म संस्थेत त्यांना पदावर घेतले पाहिजे.

६) बुद्ध विहार जोडो अभियान राबविला पाहिजे.

७) मंडळ जोडो अभियान राबविला पाहिजे.

८) समाजातील डॉक्टर ,वकील ,प्राध्यापक ,शिक्षक ,सरकारी /निमसरकारी खाजगी कंपनी नोकरवर्ग आणि व्यावसायिक यांच्याशी संपर्क व समन्वय करून समाजाला मदत करणे.

आदरणीय भिकाजी कांबळे साहेब महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी बौद्ध संस्कार विधीचे महत्त्व आणि विधी मधील झालेले बदल या विषयावर मार्गदर्शन केले.

आदरणीय अशोक केदारे साहेब केंद्रीय कार्यालय सचिव यांनी बौद्ध धम्माचे खास वैशिष्ट्ये या विषयावर मार्गदर्शन केले.

आदरणीय  बी .एच .गायकवाड साहेब राष्ट्रीय सचिव यांनी बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक शिक्षिका यांची जबाबदारी आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले.

आदरणीय एडवोकेट एस. एस. वानखेडे साहेब केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान करणे या विषयावर मार्गदर्शन केले.

आदरणीय राजेश पवार राष्ट्रीय सचिव यांनी शुभेच्छा पर मार्गदर्शन केले.

आदरणीय सुषमाताई पवार (राष्ट्रीय उपाध्यक्ष :  महिला विभाग )यांनी शुभेच्छा पर मार्गदर्शन केले.

आदरणीय सुप्रियाताई कासारे प्रशिक्षण विभाग उपप्रमुख यांची मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती होती.

प्रशिक्षण विभागाचे सचिव आदरणीय अनिल मनोहर गुरुजी यांची या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती होती.

आदरणीय डी टी सोनवणे माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष यांची या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती होती.

आदरणीय विजय गायकवाड ठाणे जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा संपन्न झाला.

ठाणे जिल्हा शाखेचे सरचिटणीस आदरणीय प्रभाकर सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

ठाणे जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष उत्तम सोनवणे गुरुजी. माजी राष्ट्रीय सचिव आदरणीय अशोक गमरे गुरुजी यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती.


























No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...