Sunday, April 16, 2023

चैत्यभूमी दादर येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिराचा समारोप कार्यक्रम व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती संपन्न


 दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभा  शाखा मुंबई प्रदेश यांच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती व दहा दिवसीय श्रामनेर शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न.

आज दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या हस्ते सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या नुतनीकरण केलेल्या स्मारकाचे उद्घाटन उद्घाटन करण्यात आले. यावेळी आंबेडकर परिवार या कार्यक्रमास उपस्थित होता.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मुंबई प्रदेश शाखेच्या वतीने राजगृह ते चैत्यभूमी अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

सायंकाळी चैत्यभूमी दादर येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई प्रदेश शाखेचे अध्यक्ष आदरणीय उत्तम मगरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.

 भंते सुमेध बोधी ,भंते धम्मप्रिय, भंते श्रद्धा पाल यांनी आदर्शांचे पूजन केले.

बहुजन पंचायत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सभेस संबोधित केले.

संस्थेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय बी .एम. कांबळे साहेब, संस्थेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय राजेश पवार साहेब आणि संस्थेच्या केंद्रीय महिला विभागाच्या सदस्या आदरणीय रागिनीताई पवार यांनी  शुभेच्छा पर मार्गदर्शन केले .

महाराष्ट्र राज्य शाखेचे संस्कार सचिव आदरणीय शामराव कांबळे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य शाखेचे संरक्षण सचिव आदरणीय रवींद्र इंगळे साहेब यांची या सभेसाठी प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई प्रदेशाचे सरचिटणीस रवींद्र गवई साहेब यांनी केले.

दहा दिवसीय श्रामनेर शिबिर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यशस्वी करण्यात मुंबई प्रदेश शाखेच्या खालील पदाधिकाऱ्यांचे खूप मोलाचे योगदान होते.

कोषाध्यक्ष आयु. विलास खाडे, उपाध्यक्ष आयु. विलास ढोबळे (संस्कार), आयु सुनिल बनसोडे (प्रचार पर्यटन) आयु. प्रदिप कांबळे (संरक्षण) आयुनि- उज्वलाताई खरात (महिला) सचिव- आयु. पंढरीनाथ कांबळे (संस्कार), आयु. अमर कांबळे (संस्कार), आयु. बाजीराव ठोकळे (कार्यालयीन सचिव) आयु. संजय काकडे (प्रचार पर्यटन, आजमगरे (प्रचार पर्यटन) आयु. मोहन सावंत (संरक्षण), आयुनि. चंदाबाई कासले (संरक्षण), आयुनि. स्वाती गायकवाड (महिला), आयुनि. दिप्ती लोखंडे (महिला)

संघटक:- सर्जेराव गायकवाड, महादेव गायकवाड, संतोष मटकर, सुरेश कांबळे, युवराज सोनवणे, भरत गायकवाड, सुरज चव्हाण 



















No comments:

Post a Comment

ग्राम जालूकी में आयोजित हुआ एक दिवसीय बौद्ध कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर

  डीग/अलवर, 24 मई 2026 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उत्तरी राजस्थान की जिला शाखा डीग के तत्वावधान में ग्राम जाल...