दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा शाखेत धम्म संदेश यात्रा आणि बौद्ध धम्म मेळावा घेण्याचे ठरले आहे.
दिनांक 16 एप्रिल 2023 पासून सुरू झालेली धम्म संदेश यात्रा आणि दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी बदलापूर येथे आदरणीय एडवोकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब आणि डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होणारा बौद्ध धम्म मेळावा यशस्वी करण्यासाठी आज दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी ठाणे जिल्हा कार्यालयात नियोजन सभा संपन्न झाली.
कल्याण तालुका शाखेचे अध्यक्ष आदरणीय अशोक जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.
या सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सचिव तथा गुजरात, मध्य प्रदेश ,झारखंड राज्याचे प्रभारी आदरणीय बी. एच. गायकवाड साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष आदरणीय उत्तम सोनवणे साहेब यांनी केले.
कल्याण तालुका शाखेचे कोषाध्यक्ष आदरणीय घोडेस्वार गुरुजी, पर्यटन विभागाचे प्रमुख आदरणीय जितेंद्र पवार गुरुजी ,महिला विभागाच्या सदस्या आदरणीय वंदनाताई जाधव ,शशिकलाताई खोब्रागडे आणि पंचशीलाताई सुरवाडे आजच्या सभेसाठी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment