आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधून चैत्यभूमी दादर येथे मुंबई प्रदेश शाखेच्या वतीने श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी मुंबई प्रदेश शाखेच्या वतीने आयोजित श्रामनेर शिबिराचे उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरेश रावलिया साहेब उपस्थित होते. तसेच संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय एस. के. भंडारे साहेब, संस्थेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय बी .एच. गायकवाड साहेब, संस्थेचे राष्ट्रीय सचिव आणि प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय एस .एस .वानखडे साहेब, संस्थेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय राजेश पवार साहेब, संस्थेचे राष्ट्रीय सदस्य आदरणीय एम .डी . सरोदे तसेच महाराष्ट्र राज्य शाखेचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय रवींद्र इंगळे साहेब उपस्थित होते.
आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या लग्नाचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या नात सुनेने म्हणजेच दर्शनाताई भीमराव आंबेडकर यांनी उपस्थितांना लाडू देऊन सर्वांचे तोंड गोड केले.
भंते सुमेध बोधी यांनी 50 उपासकांना श्रामणेरची दीक्षा दिली.
मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय उत्तम मगरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली श्रामणेर शिबिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई प्रदेश शाखेचे सरचिटणीस आदरणीय रवींद्र गवई साहेब यांनी केले.
No comments:
Post a Comment