Sunday, April 2, 2023

संविधान उध्वस्त करू पाहणारे सरकारच उध्वस्त करा. -डॉ भीमराव यशवंत आंबेडकर

 संविधान उध्वस्त करू पाहणारे सरकारच उध्वस्त करा.

  -डॉ भीमराव यशवंत आंबेडकर

 मुंबई (30/3/2023): सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यानी आमच्या  महापुरुष्यांचा आपण केला ते सहन न झाल्यामुळे समता सैनिक दलाचे सैनिक मनोज गडबडे यांनी त्या मंत्र्यास अद्दल घडवली व यापुढे आमच्या महापुरुष्यांचा अपमान सहन करणार नाही असा   ईशाराही त्यांनी दिला. आंदोलनास सहभागी व पाठिंबा देणाऱ्यांच्या   सन्मान व सलामी देण्यासाठी  पहिल्यांदाच समता सैनिक दलाच्या 96 व्या वर्धापन दिनानिमित्त  पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात हेलिकॉप्टर मधून डॉ बाबासाहेब पुतळा व उपस्थित हजारो जनतेवर पुष्पव्रष्टी माझ्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने जनता उपस्थित  होती. यावरून असे दिसते की आता समाज जागृत होत आहे. विविध जिल्ह्यातील  धम्म मेळाव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असून  धम्माच्या माध्यमातून एकत्र येऊन  येणाऱ्या काळात उत्पन्न होणाऱ्या समस्यावर, अडचणीवर आपण मात करू शकतो  असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव य  आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या  ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या (झोन 6)वतीने आयोजित केलेल्या माता रमाई यांची 125 वी जयंती, धम्म दीक्षा व महाधम्म मेळाव्यात दिवंगत हरिषचंद्र मैदान , पवई येथे केले .पुढे ते म्हणाले की बाबासाहेबांची धम्म क्रांती अधिक गतिमान करण्यासाठी आपण ती धम्म क्रांती एका समाजापूर्ती सीमित न ठेवता त्याच्या कक्षा वाढवाव्या लागतील. कारण आता बौध्द धम्मामध्ये ओबीसी, मातंग , चर्मकार समाज आकर्षित होत आहे. त्याचे कारण त्यांच्या मध्ये आता या धम्म मेळाव्यामुळे अशी चर्चा होत आहे की पूर्वाश्रमीचा महार समाज बोद्ध झाला व त्यांच्यामध्ये धम्मामुळे अवघ्या 60-65 वर्षामध्ये  अमूलाग्र बदल होऊन प्रगती झाली व ते पुढे गेले आम्ही मात्र मागे राहिलो कारण आमच्या पूर्वजानी चूक केली की त्यानी बौद्ध धम्म घेतला नाही. हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये आपली प्रगती होणार नाही. आपण अंधश्रध्येमध्येच गुरफुटून राहू अशा प्रकारच्या परिवर्तन वादी विचारांची चर्च्या त्यांच्या मध्ये होत आहे. त्याची सुरुवात म्हणून येणाऱ्या 9 एप्रिल,2023 रोजी मातंग समाजाचे 100 कुटुंब डॉ आंबेडकर भवन, पुणे येथे बौध्द धम्म स्वीकारणार आहेत. त्याचे कारण त्यामध्ये एकंदरीत डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक व वकील यांचा समावेश आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.यावेळी ते असेही  म्हणाले की ,राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी भारत देशामध्ये 84000 हजार स्तुपाची निर्मिती करून भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने दुसऱ्यांदा धम्म चक्र अनुप्रवर्तन करून बौद्ध धम्म पुनर्जिवीत केला व देशामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. लोकांभीमुख योजना आखल्या.समता प्रस्थापित केली.तो बौध्द धम्माचा सांस्कृतिक वारसा म्हणजे विहार, लेणी, स्तूप, चैत्य याचे जतन, संवर्धन व संरक्षण  करणे बौद्ध म्हूणन आपले नैतिक कर्तव्य आहे. म्हणून भारतीय बौद्ध महासभा व लेणी संवर्धन समिती यांच्या  संयुक्त विद्यमाने 'लेणी बचाव'अभियान गेली दोन वर्ष राबवले जात आहे. त्याचाच भाग म्हणून  प्रत्येक लेणीच्या अग्रभागी लेणी माहिती फलक लावण्याचे व लेणीवरील अतिक्रमण हटवण्याचे काम हाती घेतलेले आहे.  यापुढे आपण सांस्कृतिक वारसा जपून ठेवण्यासाठी समाजातील तरुण वर्गाणी समता सैनिक दलामध्ये मोठया संख्येने भाग घ्यावे व  यापुढे राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती सुद्धा मोठया प्रमाणावर साजरी केली पाहिजे.असे आवाहन त्यानी उपस्थितांना केले. बाबासाहेबाच्या धम्म क्रांतीला सत्तेमधील असलेले सरकार दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.कारण त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह उभा राहतो की या समाजाने शून्यापासून सुरुवात केली आणि हा समाज 60-65 वर्षांमध्ये पुढे गेला कसा? त्यावर ते विचार करतात आणि त्याचे कारण आहे संविधान. संविधानातील तरतुदीमुळे हा समाज शिकला.म्हणून  संविधानच बदलण्यासाठी ते तयार आहेत. त्यांचे संविधान तयार आहे. त्यांनी शिक्षण महाग केले आहे.सरकारी कंपन्या विकल्या जात आहेत. जर सरकारी कंपन्याच नसतील तर आरक्षण देणार कुठून? अशा प्रकारचे षढयंत्र रचले जात आहे.संविधान उध्वस्त करणारे सत्तेत बसले आहेत.त्यामुळे प्रगतीचा मार्ग रोखला जाणार. म्हणून बाबासाहेबानी आपल्याला अगोदरच म्हणजे 14 ऑक्टोबर,1956 सालीच धोके सांगितलेले  आहेत. प्रत्येक क्रांतीच्या मागे प्रतिक्रांती असते. येणाऱ्या काळामध्ये गंभीर समस्यांचा सामना आपणास करावा लागणार आहे.त्यामुळे आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत.अजिबात हार मानणार नाही. आपण असा निर्धार करू या की बाबासाहेबांची धम्म क्रांती आम्ही पुढे घेऊन जाऊ. हे सर्व करण्याकरिता बाबासाहेबानी आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे. 2024 हे वर्ष हे फार कठीण (Crucial ) असणार आहे.म्हणून संविधान उध्वस्त करू पाहणारे सरकारच उध्वस्त करून टाका व संविधान मानणाऱ्या लोकांनाच येणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सुरवातील धम्म रथातून रॅली   काढण्यात आली .पहिल्या सत्रामध्ये 'बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये 'या  विषयावर संस्थेचे राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड गुरुजी व दुसऱ्या सत्रा मध्ये राष्ट्रीय सचिव तथा केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ऍड एस. एस. वानखडे यांनी 'डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान करणे 'या विषयावर सखोल व मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया यांनी सुद्धा उपस्थितांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमामध्ये संस्थेचे ट्रस्टी कॅप्टन प्रवीण निखाडे,राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे, जगदीश गवई,राष्ट्रीय सचिव बी. एम. कांबळे, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष उत्तम मगरे, सरचिटणीस रवींद्र गवई व केंद्रीय सदस्य भरत गायकवाड हे प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  ईशान्य मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष एल.वाय. घोडेराव यांनी भूषविले व सूत्रसंचालन दयानंद बडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखेचे कोषाधक्ष मधुकर निरभवणे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास ईशान्य मुंबई जिल्हा अंतर्गत सर्व शाखेचे पदाधिकारी, उपासक, उपासिका व जनसमुदाय  प्रचंड संख्येने उपस्थित होता.







No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...