Saturday, May 6, 2023

महाउपासिका मिराताई आंबेडकर यांना पद्म भूषण पुरस्काराची मागणी

चैत्यभूमीमध्ये बुद्ध जयंती व आदरणीय  महाउपासिका मिराताई आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समता सैनिक दल  पुस्तकाचे प्रकाशन

केंद्रीय शिक्षक शिबिराचा समारोप

महाउपासिका मिराताई आंबेडकर यांना पद्म भूषण पुरस्काराची मागणी


मुंबई -(5/5/2023)  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दल यांच्या वतीने  बुद्ध जयंती व आदरणीय महाउपासिका मिराताई आंबेडकर यांचा वाढदिवस  चैत्यभूमी ,दादर येथे सायंकाळी दर्शनाताई  भीमराव आंबेडकर ,मनीषाताई  आनंदराज आंबेडकर , सुजात प्रकाश आंबेडकर  इत्यादी सर्व आंबेडकर परिवारा च्या उपस्थित  मोठ्या उत्सहात साजरा केला .

हा कार्यक्रम आद.डॉ भीमराव य. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. 

या प्रसंगी भन्ते सुमेध बोधी, डॉ. हरिष रावलिया (ट्रस्टी चेअरमन )कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय विभाग  सचिव ) ,एस के भंडारे(राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल ) ,सुषमाताई  पवार( राष्ट्रीय उपाध्यक्ष  व केंद्रीय महिला विभाग प्रमुख ), बी एम कांबळे (राष्ट्रीय सचिव ) सुप्रियाताई  कासारे (उप प्रमुख केंद्रीय प्रशिक्षण विभाग ), डी एम आचार्य ( समता सैनिक दल हेड क्वार्टर सचिव ), भिकाजी कांबळे(अध्यक्ष महाराष्ट्र राज्य )उत्तम मगरे (अध्यक्ष ,मुंबई प्रदेश ) इत्यादी पदाधिकारी यांनी आदरणीय मिराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या  विविध आठवणी सांगितल्या. 

यावेळी आदरणीय मिराताई आंबेडकर यांच्या 45 वर्षाची अध्यक्षीय कारकीर्द , धम्म सेवा  व हजारोंना भारताचे आदर्श नागरिक बनविल्याबद्दल सरकारने त्यांना पद्म भूषण सन्मान दिला पाहिजे, अशी मागणी एस के भंडारे यांनी केली. त्यानुसार सभेत ठराव करण्यात आला व  त्याप्रमाणे सर्व शाखांतून सरकारकडे ठराव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले.

आदरणीय मिराताई आंबेडकर यांना समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. तसेच याप्रसंगी आदरणीय मिराताई आंबेडकर यांना  त्यांच्या 45 वर्षांच्या धम्म कार्याला व समता सैनिक दलाच्या योगदानाला अर्पित केलेले एस के भंडारे लिखित  *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समता सैनिक दल*  या पुस्तकाचे प्रकाशन आदरणीय मिराताई आंबेडकर व डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

आदरणीय मिराताई यांना दि बुद्धिस्ट सोसायटी व समता सैनिक दलाच्यावतीने केंद्र, महाराष्ट्र ,मुंबई, विविध जिल्हा व मुंबई शहरातील शाखांच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

  संस्थेच्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्यावतीने  दि. 25/4/2023 ते 5/5/2023 या कालावधीत आयोजित केलेले 18 जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे केंद्रीय शिक्षक श्रामनेर शिबिराचा समारोप करण्यात आला. 

शिबिरात बसलेले सर्व  48 शिबिरार्थीना  शिक्षक व श्रामनेर प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिर भन्ते  सुमेध बोधी (सचिव बौद्ध महासभा भिक्खु संघ )व अॅड. एस. एस. वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख )  यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनंदाताई पवार (सचिव केंद्रीय प्रशिक्षण विभाग )यांनी केले. शिबिर व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदिप कांबळे (चैत्यभूमी व्यवस्थापक ), अनिल मनोहर (सचिव केंद्रीय प्रशिक्षण विभाग ),

सुनिल बनसोडे (केंद्रीय प्रशिक्षण विभाग सदस्य ), शामराव कांबळे (सचिव ,महाराष्ट्र राज्य शाखा ) , मिलिंद कदम (चैत्यभूमी बुक स्टाॅल प्रभारी व फोटोग्राफर ) इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.













No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...