75 वर्ष होऊन देश एक संघ नाही, धर्माच्या नावावर विभाजन करीत आहेत
75 वर्ष होऊन देश एक संघ नाही, धर्माच्या नावावर विभाजन करीत आहेत. सर्वाना एकत्रित बांधण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले .
डॉ भिमराव यशवंत आंबेडकर
सांगली : (11/12 मे 2023)ब्रिटिश राजवटीत मेथ्थले यांनी शिक्षणाचा व्यवस्थित प्लॅन करून शिक्षण दिले. त्यांच्यामुळे महात्मा फुले शिकले व फुलेंनी सावित्रीला शिकविले.महात्मा फुले यांनी पहिली शाळा काढली त्यावेळी पहिली विद्यार्थीनी खान ही मुस्लिम होती व शाळेसाठी जागा मुस्लिम ने दिली होती.त्यामुळे आपण शिकलो . नाहीतर...त्यावेळच्या व्यवस्थेमुळे आपण शिकुच शकलो नसतो व आताची जी प्रगती झाली आहे ती होऊच शकली नसती.
75 वर्ष होऊन देश एक संघ नाही, धर्माच्या नावावर विभाजन करीत आहेत. सर्वाना एकत्रित बांधण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने केलेले आहे. आपण संघटनांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देश घडविला आहे.डॉ बाबासाहेब हे आधुनिक भारताचा निर्माता आहेत हे सर्वांना सांगावे. तसेच बौद्ध धम्म हा मातृ सत्ताक आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे बौद्ध धम्म प्रचार- प्रसार केला पाहिजे व होऊ घातलेल्या व्यवस्थेला विरोध केला पाहिजे असे सारांशाने मार्गदर्शन बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भिमराव य आंबेडकर ( राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष,समता सैनिक दल ) यांनी केले.
कर्नाटक सीमेवरील दुर्गम भाग असलेल्या करजगी ता.जत येथील भव्य बौद्ध धम्म परिषद व श्रामनेर शिबिर (करजगी ) बाल श्रमनेर शिबिर (जत ) चा समारोप तसेच वांगी ता.कडेगाव येथील श्रामनेर शिबिरास भेट आणि एरंडोली ता मिरज येथील पंचशील मित्र मंडळ आयोजित बुद्ध जयंती कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमात डॉ भीमराव आंबेडकर साहेब यांनी मार्गदर्शन केले.
करजगी येथे सन 1984 साली एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे आले होते असे त्यावेळचे आणि आताचे आयोजक एम एस नवराज यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख वक्ते एस. के .भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफीसर) यांनी असे सांगितले की, आपण म्हणजे अस्पृश्य चार वर्णात नव्हतो तर वर्णाच्या बाहेर म्हणजे अवर्णात होतो. शिवशिव होती, थुंकीचा व पावलांचा विटाळ होऊ नये म्हणून गळ्यात मडके व कमरेला खराटा होता .अस्पृश्य ओळखण्यासाठी काळा धागा बांधायला लागायचा. डॉ बाबासाहेबांनी पाणी पिण्याचा चवदार तळे सत्याग्रह केला . काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रहात पाच वर्षे चालला शेवटी मंदिर प्रवेश सत्याग्रह बंद करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा 13/10/1935 रोजी केली. आणि 14/10/1956 रोजी समानतेचा बौद्ध धम्म दिला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न 2014 पासून मोठ्या प्रमाणात होत आहे .संविधानाने दिलेला समतेचा व स्वातंत्र्याचा अधिकार काढून घेऊन धर्मावर आधारित संविधान राबवायचा मनसुबा चालू आहे. त्यामुळे संविधानाचे विरोधक कोण आहेत हे वेळीच ओळखले पाहिजे .नाहीतर पुन्हा पेशवाई येऊन गळ्यात मडके व पाठीला खराटा येईल. म्हणून डॉ भिमराव यशवंत आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभा यांच्या बाबासाहेबांची धम्म क्रांती गतिमान करण्याच्या कार्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
या दौऱ्यात डॉ.भिमराव य आंबेडकर यांनी, तासगाव येथील भारतीय बौद्ध महासभेचे प्रस्तावित बुद्ध बिहारची जागेची पाहणी केली .माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नाने मिरज येथे बांधकाम सुरू असलेल्या लायब्ररीच्या ठिकाणी वृक्षारोपण केले.
दिल्लीच्या धर्तीवर थोरात यांच्या संकल्पनेतून बनविलेल्या अद्यावत महानगरपालिकेची प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र यास भेट दिली. तसेच पलूस येथील ओव्हाळ यांच्या पोलीस व मिलिटरी भरतीच्या पंचशील अकॅडमीस भेट दिली.
जिल्ह्यातील या कार्यक्रमात भन्ते धम्म प्रिय (चैत्यभूमी ), रुपेश तामगावकर (जिल्हा अध्यक्ष ),जितेंद्र कोलप (जिल्हा उपाध्यक्ष ), रतन तोडकर (जिल्हा सरचिटणीस ),ए जी . तायडे (केंद्रीय शिक्षक ) इत्यादीनी आपले मनोगत व्यक्त केले.
कडेगांव तालुक्यातील वांगी येथील श्रामनेर शिबिरात माळी समाजाचा एक युवक बसला असून त्याने या पुढे बुद्ध व बाबासाहेब यांच्या विचाराने काम करण्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
डॉ भिमराव आंबेडकर यांचे मिरज ,जत , तासगाव ,कडेगांव तालुक्यातील प्रवासात ठीक ठिकाणी फटाके वाजवून उस्फूर्तपणे स्वागत केले. भीमराव आंबेडकर यांच्या दौऱ्याने जिल्ह्यातील धम्म चळवळीला चैतन्य प्राप्त झाले.
हे कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी उत्तम साबळे (मुंबई बौद्धाचार्य),संजय कांबळे (जिल्हा खजिनदार ),विशाल कांबळे(जिल्हा सचिव ) , दलाचे शैलेश दंडवते,शशिकांत दंडवते(कडेगांव ता ), शरद सूर्यवंशी(जत तालुका अध्यक्ष ) इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.









Comments
Post a Comment