Monday, May 29, 2023

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे विशेष चिंतन शिबिर

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विशेष चिंतन शिबिर आयोजन करण्यासंदर्भात संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय एडवोकेट एस. के. भंडारे यांनी खालील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
===================================

विशेष चिंतन शिबीर (दि. २५/६/२०२३- - मुंबई)

दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे केंद्रीय, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रदेश मधील नियमीतपणे विषय देणारे / प्रबोधन करणारे वरिष्ठ पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक / शिक्षीका व सर्व जिल्हा अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यांचे कार्यकर्ता विशेष चिंतन शिबीर आद. डॉ. भिमराव य. आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रविवार दि. २५/६/२०२३ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ पर्यंत) डॉ. आंबेडकर भवन, दादर (पूर्व), मुंबई-14 आयोजित करण्यात आलेले आहे.

चिंतन शिबीरामध्ये सहभागी होणा-या केंद्रीय शिक्षक/शिक्षीका यांची नावे केंद्रीय कार्यालकाडून निश्चीत केले जातील. तरी संबंधितांनी आपली नावे  ॲड. एस. एस. वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण

विभाग प्रमुख मो. 9967484524) यांच्याकडे नोंदवावित, ही विनंती.

नमो बुद्धाय! जयभीम !! जय संविधान !!!

(एस. के. भंडारे) राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख


No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...