Tuesday, May 23, 2023

केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिराला भोजन दान

 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून चैत्यभूमी दादर, मुंबई येथे महिला केंद्रिय शिक्षिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 या केंद्रीय शिक्षिका प्रमाणपत्रक प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यात घेण्यात आलेल्या निवड परीक्षेसाठी एकूण ३०९ महिला उपासिका बसल्या होत्या. या परीक्षेत बसलेल्या महिला उपासिकांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. या यादीत सर्वात जास्त गुण मिळविलेल्या ५९ महिला उपासिका यांची केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिरासाठी प्रविष्ट करण्यात आले. 

चैत्यभूमी दादर, मुंबई येथे सुरू असलेल्या केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिराला पालघर जिल्ह्यातील पालघर जिल्हा शाखा, बोईसर विभाग शाखा व डहाणू शहर शाखा यांच्या वतीने भोजनदानासाठी  १२०००/- ( बारा हजार रुपये)  धम्मदान देण्यात आले. हे धम्मदान केंद्रीय प्रशिक्षण विभागाकडे आज सुपूर्त करण्यात आले. त्याचे क्षणचित्रे.















No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...