वर्षावास प्रवचन मालिका नियोजन संदर्भात बुधवार दि. 07 जुन 2023 रोजी आंबेडकर भवन दादर येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई केंद्रीय कार्यालयातील केंद्र , महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रदेश, , केंद्रीय महिला विभाग, केंद्रीय प्रशिक्षण विभाग आणि केंद्रीय संरक्षण विभाग इत्यादी सर्व विभागांच्या पदाधिका-यांची बैठक संपन्न झाली.
आद. एस.के.भंडारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत.
1) चैत्यभूमी येथील वर्षावास प्रवचन मालिका 2023 च्या तारखा, वार, वेळ व 39 विषय निश्चित करण्यात आले.
2) चैत्यभुमी येथील वर्षावास प्रवचन मालिका 2023 चे विषयवार प्रवचन देणारे केंद्रीय शिक्षक / शिक्षिका यांची नावे निश्चित करण्यात आली.
3) सर्व राज्य, प्रदेश, जिल्हा, झोन, तालुका, शहर, ग्राम तथा वार्ड शाखांसाठी वर्षावास प्रवचन मालिका 2023 चे 23 विषय निश्चित करण्यात आले.
4) चैत्यभूमी दादर येथे प्रवचन देणाऱ्या शिक्षक शिक्षिका यांचे निरीक्षण करण्याची जबाबदारी मुंबई प्रदेश वर सोपविण्यात आली. तसेच निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय कमिटी सुद्धा नियुक्त करण्यात येईल असेही ठरविण्यात आले.







No comments:
Post a Comment