Monday, June 12, 2023

भगवान बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा.

 ***** भारतीय बौद्ध महासभा शाखा: अहमदनगर जिल्हा , लुंबीनी बुध्दविहार श्रीरामपूर भगवान बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा.                       रविवार दिनांक:११जून २०२३ दुपारी ११ वाजता . प्रमुख मार्गदर्शक :आद.डाॅ. भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते व पुज्यभन्ते महाथेरो बी. संघपाल व भन्ते बी.सारिपुत्त आणि भिक्षु संघ यांनी घेतलेल्या बुध्द पुजा विधिने संपन्न झाला . 

आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की

भगवान गौतम बुद्धाचा धम्म  विज्ञानावर आधारित आहे.जगाने भगवान बुद्धांच्या धम्माला वैज्ञानिक पातळीवर तपासून  धम्माला  सत्य म्हणून  स्वीकारला आहे.

जगात शिक्षणाच्या बाबतीत अंधकार होता त्यावेळी भारतात 19 विद्यापीठे होती व जगातील विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येत होते. हा कालखंड बौद्ध राजांचा कालखंड होता.

 त्यांनी पुढे आपल्या भाषणा मध्ये  असेही सांगितले की,संसदेचे उद्घाटन होत असताना देशाच्या राष्ट्रपती एक महिला असल्यामुळे तसेच त्या आदिवासी समूहातून येत असल्यामुळे यांना जाणीवपूर्वक डावललं गेले आहे.भारताचा प्रथम नागरिक  राष्ट्रपती आहे .दुसरा नागरिक डेप्युटी स्पीकर आहे .आणि तिसरा नागरिक हा प्रधानमंत्री असतो  परंतु पहिल्या दोघांना मनुवादी प्रवृत्तीने जाणीव पूर्वक टाळले आहे.

राष्ट्रीय सचिव आद. वसंत पराड, राजेश पवार ,अरुण साळवे या अ.नगर जिल्हा भुमीपुत्रासह महाराष्ट्र राज्यशाखेचे सरचिटणीस आद.सुशिल वाघमारे, उपाध्यक्ष आद.वि.म.रुपवते व नाशिक जिल्हा सचिव आद. मनोज मोरे यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. सभाअध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्ष आद. सुगंधराव इंगळे हे होते.














 


1 comment:

  1. अतिशय सुंदर कार्यक्रम आणि शब्दांकन.

    ReplyDelete

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...