धम्म कार्य करताना सामाजिक ,धार्मिक भान ठेऊन बोलावे लागेल . तरच धम्म क्रांती गतिमान होईल.
डॉ भिमराव यशवंत आंबेडकर.
=================================
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे दिनांक 25 जून 2023 रोजी आंबेडकर भवन दादर येथे राज्यस्तरीय चिंतन शिबिर संपन्न झाले.राज्यस्तरीय चिंतन शिबिरात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
=================================
प्रबोधनाची आचारसंहिता या विषयावर उद्घाटन पर मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब (राष्ट्रीय कार्याध्यक्ष व अध्यक्ष समता सैनिक दल ) यांनी केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रदेश, सर्व झोन, शाखाध्यक्ष ,सरचिटणीस, कोषाध्यक्ष ,समता सैनिक दलाचे अधिकारी यांना महत्वपूर्ण सूचना दिल्या. आणि दिशादर्शक असे बहुमोलाचे मार्गदर्शन केले.
=================================
प्रबोधनाची आचारसंहिता या विषयावर उद्घाटन पर मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब (राष्ट्रीय कार्याध्यक्ष व अध्यक्ष समता सैनिक दल ) यांनी केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रदेश, सर्व झोन, शाखाध्यक्ष ,सरचिटणीस, कोषाध्यक्ष ,समता सैनिक दलाचे अधिकारी यांना महत्वपूर्ण सूचना दिल्या. आणि दिशादर्शक असे बहुमोलाचे मार्गदर्शन केले.
(१) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या शिक्षक -शिक्षिका व पदाधिकारी यांनी आपला विषय मांडतांना किंवा प्रबोधन करतांना सामाजिक व धार्मिक भान ठेऊन जाहीरपणे कोणत्याही टीका टिपणी करू नयेत.
(२) प्रवचनातील आपला विषय छापील स्वरूपात असला पाहिजे .
(३) विषय सोडून बोलू नये.
(४) कारभार हिशोब पारदर्शक असला पाहिजे .
या चिंतन शिबिरात धम्माचार्य करुणाशील रोशन (दिल्ली ) यांनी महामानवांचा इतिहास तथा वारसा व भारतीय संविधानाची प्रास्ताविका या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच कॅप्टन प्रविण निखाडे ( ट्रस्टी व आंतरराष्ट्रीय सचिव ) यांनी बी.एस.आय. मिशन अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान कशी करावी ? या विषयावर सखोल मार्गदर्शन केले .आणि एस. के.भंडारे ( राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख ) व ॲड .एस. एस .वानखडे ( राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ) यांनी शाखांचा हिशोब कसा ठेवावा -प्रात्यक्षिक व शंका समाधान याविषयावर मार्गदर्शन केले.
या वेळी पुढील निर्णय घेण्यात आले.
1) प्रत्येक शाखेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी 8 गोल्डन मार्गाप्रमाणे कार्य करणे.
2) गावा - गावा पर्यंत बौद्ध सभासद अभियान राबविणे.
3)केंद्रीय शिक्षक/शिक्षिका केंद्राबरोबरच जिल्हा शाखा यांच्या अंतर्गत असतील , प्रथम ओळखपत्र केंद्रीय प्रशिक्षण विभाग देईल व त्यानंतर दरवर्षी त्यांचे ओळखपत्र नूतनीकरण जिल्हा शाखा करेल.
4) धम्म प्रचारात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी 2 दिवसांचे उपासिका शिबिरही घेण्यात येईल.
5) महिलांसाठी श्रामनेरी शिबिर शिबिर घेण्यात येईल.
6) जिल्हा शाखांना नियमित धम्मदान देणाऱ्यां किमान 100 मान्यवरांची यादी दि 31 जुलै पर्यंत केंद्र /महाराष्ट्र यांना पाठविणे.
7) मासिक कार्य अहवाल - प्रत्येक पदाधिकारी,केंद्रीय शिक्षक /शिक्षिका व बौद्धाचार्य यांनी आपल्या वरिष्ठ शाखेला दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी द्यावा.
8) बुद्धगया पर्यटन - रु 17000( खाटमांडू ,
दिल्ली ,आग्रा सह ) व रु.15000( खाटमांडू ,दिल्ली ,आग्रा सोडून)
9) हिशोबातील एकसूत्रतासाठी केंद्राकडून कॅश बुक व भरणा पावती उपलब्ध करून दिले जाईल इत्यादी.
यावेळी पुज्य भंते बी संघपालजी महाथेरो( राष्ट्रीय उपाध्यक्ष व बौद्ध महासभा भिक्खू संघ प्रमुख),
जगदीश गवई (राष्ट्रीय उपाध्यक्ष ), रागिणीताई पवार ( राष्ट्रीय सदस्य व केंद्रीय महिला विभाग उपप्रमुख ), भीमराव फूसे (नागपूर ),रुपेश तामगावकर (सांगली) नीता गंगावणे (नवी मुंबई ),अमरसिंग ढाका ( बीड) इत्यादीनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन एस .के. भंडारे व बी .एच. गायकवाड (राष्ट्रीय सचिव ) यांनी केले व आभार प्रदर्शन भिकाजी कांबळे (अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य शाखा ) यांनी केले.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या इतिहासातील या ऐतिहासिक चिंतन शिबिरासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील व मुंबई च्या सर्व झोन शाखेतील प्रमुख पदाधिकारी व सक्रीय केंद्रीय शिक्षक / शिक्षिका मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
एस .के. भंडारे
राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख
No comments:
Post a Comment