बौद्ध महासभा भिक्खू संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
भिक्खूंचा प्रभाव जास्त पडतो त्यामुळे भिक्खूनी समाजासाठी जास्त काम करावे.-
डॉ भिमराव यशवंत आंबेडकर .
बौद्ध महासभा भिक्खू संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर.
मुंबई - (24/6/2023)
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या बौद्ध महासभा भिक्खू संघाचे अत्यंत महत्वपूर्ण विशेष शिबिर डॉ आंबेडकर भवन ,दादर पूर्व येथे दि बुद्धिस्ट सोसायटीने आयोजित केले होते.या विशेष शिबिराचे उदघाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भिमराव य आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष ,समता सैनिक दल ) यांनी केले. त्यावेळी बोलताना डॉ भिमराव आंबेडकर यांनी आमच्या पेक्षा भिक्खूंचा प्रभाव जास्त पडतो त्यामुळे भिक्खूनी समाजासाठी जास्त काम करावे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी मी भिक्खू आहे याची जाणीव ठेऊन समाजासाठी काय देऊ इच्छितो याचा विचार करावा असे प्रतिपादन केले .
या शिबिरात महाराष्ट्र ,मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश ,कर्नाटक ,दिल्ली या राज्यातून 45 भन्ते जी सहभागी झाले होते. या शिबिरात
(१) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान कशी करावी.
(२),श्रामनेर शिबिर कार्यपध्दती .
(३)भिक्खू केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य आणि पदाधिकारी यांचा समन्वय .
या विषयावर चर्चा होऊन सर्व भिक्खूनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा व अखिल भारतीय भिक्खू संघ यांचे सभासदत्व घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या बौद्धाची शिखर धार्मिक संघटना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला व शेवटी चर्चेअंती डॉ भिमराव य आंबेडकर यांनी बौद्ध महासभा भिक्खू संघाची पुढील कार्यकारिणी जाहीर केली .
राष्ट्रीय प्रमुख - भंते बी संघपाल महाथेरो (अकोला ),
राष्ट्रीय उपप्रमुख -भंते बुद्धपाल महाथेरो (अकोला)
ज्ञानलोक थेरो ( कर्नाटक ),
राष्ट्रीय सरचिटणीस - ए सुमेध बोधी (पुणे ),
राष्ट्रीय कोषाध्यक्ष -बी सुमेध बोधी (नाशिक ),
राष्ट्रीय सचिव - दीपंकर (मध्यप्रदेश ),विनय दत्त (उत्तर प्रदेश ),बुद्ध रतन (दिल्ली ),धम्म प्रिय (मुंबई ),
राष्ट्रीय सहसचिव -ज्योती धम्मो (कर्नाटक )
राष्ट्रीय संघटक - धम्मरक्षित थेरो (गोंदिया ), विशुद्धि बोधी (पालघर ) ,धम्म रत्न ( नाशिक )कुशल धम्मो (नागपूर )
संघाची कार्यकारिणी ही 27 भंते जी यांची असेल असे ठरविण्यात आले. जे भंते जी काही कारणांमुळे सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना रिक्त पदावर घेतले जाईल असेही ठरविण्यात आले.
भंते बी संघपाल महाथेरो यांनी श्रामनेर व भिक्खू आणि केंद्रीय शिक्षक ,पदाधिकारी यांचा शिबिरात कसा समन्वय राहील या बाबत विचार मांडले .
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेची भूमिका एस. के .भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख ) यांनी केंद्रीय कार्यकारिणी , भिक्खू संघ ,महाराष्ट्र व मुंबई प्रदेशच्या संयुक्त बैठकीत ठरविण्यात आल्यानुसार मांडली व त्यांनी असे सांगितले की , भिक्खूसंघाला सर्वप्रकारची मदत व सहकार्य देण्यात येईल.
या शिबिरात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय पदाधिकारी अनुक्रमे बी. एच .गायकवाड (राष्ट्रीय सचिव ),ॲड .एस. एस. वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ),बी. एम. कांबळे (राष्ट्रीय सचिव ), राजेश पवार (राष्ट्रीय सचिव) सी. बी. तेलतुंबडे (राष्ट्रीय कोषाध्यक्ष ), रागिणीताई पवार ( राष्ट्रीय सदस्य व केंद्रीय महिला विभाग उपप्रमुख ),चंदाताई कासले (केंद्रीय महिला विभाग सदस्य ) , भिकाजी कांबळे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य),उत्तम मगरे (अध्यक्ष ,मुंबई प्रदेश ) इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .
या ऐतिहासिक शिबिराचे सूत्र संचालन भंते बी सुमेध बोधी यांनी केले भिक्खू संघाचे शिबिर झाल्याने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भिक्खू संघामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.






Comments
Post a Comment