Wednesday, July 12, 2023

आद.बाळासाहेव आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्याचे केले कौतुक..

 



दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

संस्थापक अध्यक्ष  : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संरक्षक  : महाउपासिका मीराताई आंबेडकर

ट्रस्टी चेअरमन  : डॉक्टर हरेश रावलिया

राष्ट्रीय कार्याध्यक्ष  : डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

                    आढावा बैठक संपन्न.

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

आज दिनांक १२/७/२०२३ रोजी आंबेडकर भवन दादर येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय एस के भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे दिनांक ९/७/२०२३ रोजी संपुर्ण महाराष्ट्रात चिंतन शिबिर संपन्न झाले. चिंतन शिबिरात

 १) प्रबोधनाची आचारसंहिता 

२) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान कशी करावी ? 

३) शाखांचा हिशोब कसा ठेवावा.

 हे तीन विषय घेण्यास सांगितले होते.

तसेच आजीवन सभासद नोंदणी करणे आणि ऑडीट साठी इच्छुक पदाधिकाऱ्यांची नावे आणण्यासाठी सांगितले होते. या सर्व बाबींचा आजच्या सभेत आढावा घेण्यात आला.

आढावा बैठक सुरू असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर  यांनी सभेस भेट दिली. आद.एस. के.भंडारे साहेब यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर  यांना चिंतन शिबिरात घेण्यात आलेल्या विषया संदर्भात माहिती दिली.आद. बाळासाहेब आंबेडकरांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व लवकरच पदाधिकाऱ्यांची सभा घेण्यात येईल असे सांगितले.

आमच्या सभेत खालील ठराव घेण्यात आले.

१) सभासद मोहिम चे बॅनर बनवून सभासद मोहिम राबविणे.

२) तालुक्यात चिंतन शिबिर घेणे.

३) आजीवन सभासदांना ओळखपत्र देण्यात येईल.

पूज्य भंते बी संघपाल (राष्ट्रीय अध्यक्ष भिक्षु  संघ) यांनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.

===================================          Programme of BSI या ब्लॉगच्या माध्यमातून संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली जाते म्हणून आपण programme of BSI  ची लिंक इतर ग्रुप वर शेअर करा ही विनंती.

 नमो बुद्धाय |      जयभीम.  ||     जय संविधान |||

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️



























No comments:

Post a Comment

ग्राम जालूकी में आयोजित हुआ एक दिवसीय बौद्ध कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर

  डीग/अलवर, 24 मई 2026 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उत्तरी राजस्थान की जिला शाखा डीग के तत्वावधान में ग्राम जाल...