_दिनांक 3/07/2023 स . 11 वा. सुप्पारक स्तुप नालासोपारा पश्चिम या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष , समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षावस प्रवचन मालिकेचे उद्घाटन करण्यात आले.
आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी आदर्शाची पुष्पपुजा , दिपप्रज्वलन , सामुदायिक त्रिशरण पंचशील झाल्यानंतर मार्गदर्शनपर भाषणात देशवासीयांना आषाढ पौर्णिमेच्या व वर्षावास प्रवचन मालिकेच्या शुभेच्छा दिल्या .
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुशील वाघमारे साहेब , मुंबई प्रदेश अध्यक्ष आदरणीय उत्तम मगरे साहेब, चैत्यभूमी व्यवस्थापक प्रदीप कांबळे सर तसेच पालघर जिल्हा पदाधिकारी , मीरा-भाईंदर शहर , नालासोपारा शहर , वसई तालुका पश्चिम पदाधिकारी , समता सैनिक दल पालघर बटालियन अधिकारी , सैनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच झोन क्रमांक 5 . गोराई शाखा , कांदिवली चारकोप शाखा . , झोन क्रमांक 4 च्या उपसिका , वसई पुर्व पश्चिम गावातील ग्रामस्थ , ओबीसी समाज कायकर्ते सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होते.
तसेच समता सैनिक दल यांनी सुद्धा वेळेवर उपस्थित राहिले . सैनिक सुभाष ठोंबरे गुरुजी , सैनिक देवता ताई जाधव, सैनिक संजना ताई जाधव , सैनिक विनोद यादव , सैनिक संजय जाधव , सैनिक महेश हाटे इत्यादी सैनिकांनी सुप्पारक स्तुपाला समता सैनिक दलाची मानवंदना दिली
. सुत्रसंचालन संरक्षण विभाग प्रमुख पालघर बटालियन मेजर जनरल आयु . संतोष जयवंत जाधव यांनी उत्तमरित्या पार पाडले .
तसेच उपस्थित सर्वांचे नालासोपारा शहर शाखा यांनी प्रामुख्याने आजच्या कार्यक्रमांमध्ये सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आणि उपस्थित सर्व जन समुदायाचे संतोष जाधव यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले .
No comments:
Post a Comment