Thursday, July 6, 2023

प्रबोधनाची आचारसंहिता



प्रबोधनाची आचारसंहिता

( दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद. डॉ. भीमराव य. आंबेडकर यांनी दिनांक 25.06.2023, रोजी डॉ. आंबेडकर भवन, दादर (पू), मुंबई- 14 येथे केलेल्या मार्गदर्शनाच्या आधारे) संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आद. एस. के. भंडारे आणि संस्थेचे राष्ट्रीय सचिव आद.बी.एच. गायकवाड यांनी प्रबोधनाची आचारसंहिता प्रसिद्ध केली आहे. 

संस्थेच्या कार्याचा प्रचार प्रसार अधिक गतीने व्हावा म्हणून programme of BSI या ब्लॉग वरून प्रबोधनाचे आचारसंहिता काय आहे ते समजून घेऊया.

1. प्रबोधन करतांना संस्थेच्या चालू घडामोडी व उपक्रमा बाबतची माहिती जनतेला द्यावी,

जसे सभासद नोंदणी अभियान इत्यादी.

2. प्रबोधनकार हा बौध्दाचार्य, प्रशिक्षित श्रामणेर, प्रशिक्षित अंधश्रध्दा निर्मुलन शिबीर, व्यक्तिमत्व विकास शिबीर, केंद्रीय शिक्षक / शिक्षिका शिबीर यामध्ये बसलेला असावा.

3. प्रबोधन / प्रवचन करतांना, विषय मांडतांना महापुरुषांचे वचन सांगतांना भेसळ करु नये. 

4. प्रबोधन करतांना विषय समजून घेणे, विषयाला सोडून बोलू नये.

5. बोलतांना प्रस्तावना खूप लांबलचक नसावी. 

6. सकारात्मक पध्दतीने बोलावे.

7. आपल्या कामामध्ये आणि हिशेबामध्ये पारदर्शकता असावी. 

8. सभागृहामध्ये समोर बघून बोलावे.

9. सामाजिक व धार्मिक भान ठेवून बोलावे. (टीका/ टीप्पणी करु नये, देवाधर्मावर बोलू नये.)

10. कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद राहील असे प्रबोधन करावे.

11. प्रत्येक धम्मप्रचारकाचा विषय लिखित असावा.

12. दिलेल्या वेळेत विषय संपवावा.

13. कार्यकर्त्याने वाचेवर संयम ठेवावा, सम्यक वाचेचे पालन करावे.

14. मार्गदर्शन करतांना किंवा विधी करतांना आपले उच्चार स्पष्ट असावेत. 

15. मार्गदर्शन करतांना स्वत:चा इतिहास, प्रौढी, मोठेपणा सांगत बसू नये.

16. मार्गदर्शकाने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म, शुद्र पूर्वी कोण होते ? अस्पृश्य मुळचे कोण ? पाकिस्तानची फाळणी, जातीअंताचा लढा आणि मुक्ती कोण पथे ?, क्रांती आणि प्रतिक्रांती किमान ही पुस्तके वाचावीत.


टीप : 1) संस्थेने ठरवून दिलेले धम्मदानच घ्यावे.

2) पदाधिकारी यांनी आपला हिशेब (जमाखर्च अहवाल) चोख ठेवावा.

केंद्रीय शिक्षक ,शिक्षिका ,बौद्धाचार्य माजी श्रामनेर, पदाधिकारी यांच्यासाठी प्रबोधनाची आचारसंहिता उपयुक्त असल्यामुळे program of BSI ची लिंक प्रत्येक ग्रुप वर शेअर करावी ही विनंती.

नमो बुध्दाय! जय भीम !! जय संविधान !!!

No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...