Saturday, July 8, 2023

भगवान बुद्धाचे चरित्र भाग एक


दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. 
संस्थापक अध्यक्ष : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 
राष्ट्रीय संरक्षक : महाउपासिका मीराताई आंबेडकर . 
ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरेश रावलिया.
राष्ट्रीय अध्यक्ष : आद. चंद्रबोधी पाटील.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष  : आद. डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर.
===================================
मुंबई प्रदेश शाखेच्या वतीने चैत्यभूमी दादर येथे आयोजित बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरात दिनांक ६ जुलै 2023 रोजी आयु. राजेश पवार राष्ट्रीय सचिव यांनी भगवान गौतम बुद्धाचे जीवन चरित्र भाग एक हा विषय शिकविला .
===================================
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या उपक्रमांची माहिती जनते परत पोहोचावी म्हणून programme of BSI या ब्लॉगच्या माध्यमातून संस्थेच्या उपक्रमात प्रसिद्धी देत आहे.
===================================






 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील माहिती जशीच्या तशी देत आहे.

भाग पहिला

जन्मापासून परिव्रज्येपर्यंत

१. कूळ

१ ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. 
२ संबंध देश निरनिराळ्या अनेक लहानमोठ्या राज्यांत विभागाला गेला होता.त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती, तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती. 
३. राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण सोळा होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, ब्रजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत

४. ज्या राज्यावर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत-कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशीनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकपचे वेळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग.

५. ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किवा गणराज्य असे म्हणत असत.

६. कपिलवस्तु येथील शाक्यांच्या शासनपद्धती विषयी विशेष अशी माहिती मिळत नाही .या राज्यांची शासनव्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकाची सत्ता होती हे समजत नाही.

७. तथापि, हे मात्र निश्चित की, शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवीत होते.

८. अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्यांच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती.


९. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोदनाची होती.

१०. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते .ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले .

११ कोषलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते.

१२. तत्कालीन राज्यांत कोशलराज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा पसेनदी (प्रसेनजित) व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते.

२. पूर्वज

१. शाक्यांच्या राजधानीचे नाव "कपिलवस्तु" हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिलमुनी याच्या नावावरुन पडलेले असावे.

२ कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहात होता. सिनहु (सिंहहनु) नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन व अभितोदन असे पाच पुत्र होते. या पाच पुत्राशिवाय सिंहहनूला अमिता व प्रमिता या नावांच्या दोन कन्या होत्या.

३. त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते.

४ शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अञन  व आईचे नांव सुलक्षणा असे होते, अञन हा कोलिय वंशातील होता .तो देवदह नावाच्या गावी राहात होता.

५. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेंव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. 

६. शुद्धोदन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमि विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर-चाकर होते. असे म्हणतात की, त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत.

७. तो ऐषारामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते.

३. जन्म

१. शुद्धोदनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे..

२ शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याचप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत.

३ हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती.

 ४. एकदा महामायेने हा महोत्सव मोठया थाटामाटात, पुष्पमाला, सुगंधादि वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादि उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले. 

५. उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली, सुगधी पाण्याने तिने आंघोळ केली, दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या, मौल्यवान अलंकार घालून साजशृंगार केला,आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करुन निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या मंदिरात ती गेली.

६. त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामाता गर्भसंभव झाला .पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले.

७. स्वप्नात तिला असे दिसते की, चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेउन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत.

८. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेले.

९ त्यांनी तेथे तिला अभंग्यस्नान घालून तिची वेषभूषा केली .तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजविले की, ती कुणा दिव्याशक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले.

 १० इतक्यात सुमेव नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले, "मोठया आनंदाने." त्याच क्षणी महामायेला जाग आली. 

११. दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोदनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राम्हणांना बोलावून घेतले.

१२. त्यांची नावे - राम, धन, लख्खन, मन्ती, यण्ण ,सुयाम,भोग व  सुदत्त अशी होती. शुद्धोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. 

 १३. त्याने सेवकाकडून जमिनीवरफुलांचे सडे घालून त्या ब्राम्हणासाठी उच्चासने मांडली.

१४. त्याने त्या ब्राम्हणांची पात्रे सोन्याचांदीने भरून घृतमधुयुक्त व साखरमिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देउन त्यांस संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इत्यादीचे दान दिले

१५ ब्राम्हण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, 'या स्वप्नाचा अर्थ मला सांगा.

१६ "राजा, चिन्ता करु नकोस ." ब्राम्हण म्हणाले, "तुला एक असा पुत्र होईल की, जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसारत्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अथःकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल".

 १७. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भातधारण केल.तिचा प्रसूतीकाळ जवळ येउ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली .आपल्या पतीला ती म्हणाली "माझ्या पित्याच्या देवदहनगरीला की जाउ इच्छिते ".

१८. "तुझ्या इच्छेप्रमाणे होईल." राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसवुन शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले.

१९ देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय. 

२० .लुबिनी वनातून पालखी नेली जात असता ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभीत केलेल्या मंडपासारखी भासत होते.

२१. बुंध्यापासून फांद्याच्या शेंडयापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानारंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते. आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षिगण मंजुळ स्वरालाप काढीत होते.

२२. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली .म्हणन तिने पालखी वाहणाऱ्या सेवकांस आपली
पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेउन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले.

२३. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळुकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले.

२४ सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवडयावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली .आणि अशा प्रकारे हालल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असतांना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला.

२५ .त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला.

२६. शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होउन पुष्कळ वर्षे झाली होती. परंतू त्याच्या पोटी संतान नव्हते. आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठया हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला.

२७. पुत्रजन्माच्या या वेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले.

४ असितमुनीचे आगमन

१. ज्या वेळी या बालकाचा जन्म झाला त्या वेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता.

२ असित ऋषीने पाहिले की, अंतरिक्षातील देव "बुद्ध" या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे. त्याने पाहिले की, ते आपली वस्त्रभूषणे मिरवित इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत .त्याने विचार केला ,की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाउ नये ?

२. त्याने आपल्या व्यष्टीने सर्व जंबूदीपाचे निरिक्षण केले. तेव्हा शुद्धोदनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले.

४. म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेउन राजा शुद्धोदनाच्या गृही आला व त्याच्या राजवाडयाच्या प्रवेशद्वारी उभा राहिला.

५. तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, "अरे राजाला जाउन सांग की, दाराशी एक तपस्वी उभा आहे"

 ६. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोदनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, "महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येउन उभे राहिले आहेत ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत".

७. राजाने असितमुनीकरीता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला, "त्या ऋषींना आत येउ दे तेव्हा महालाच्या बाहेर येउन तो द्वारपाल असितमुनीला म्हणाला "कृपा करुन आत चला".

८. असितमुनी शूद्धोदन राजाजवळ गेला व त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला “विजय असो ! राजा तुझा विजय असो ! तू आयूष्मान हो आणि आपले राज्य सद्धर्मान चालव.

९. तेव्हा शुद्धोदनाने असितमुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले. असित मुनी सुख पूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोधन म्हणाला. "हे तपस्वीन !   या पूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत  नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू बरे? आपण येथे येण्याचे काय कारण ?"

१० असित ऋषी शुद्धधनाला म्हणाला,  "राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या  इच्छेने मी इथे आलो आहे."

११. शुद्धोदन   म्हणाला,"मुनिवर बालक  आता झोपला आहे,  थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का?" ऋषी म्हणाला,"राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावत:च जागृत असतात.
 १२ इतक्यात त्या महान  ऋषीवर  अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली.

१३. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोदनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला

उचलून  घेऊन ऋषीच्या समोर आणले.

१४. असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते महापुरुषांच्या बत्लतीस क्षणांनी व  ऐंशी  शुभ चिन्हांनी युक्त असलेले त्यात दिसले, त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रम्हा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्याच्यापेक्षा शतसहस्त्र पटीने अधिक दैदीप्यमान  आहे . असित ऋषीच्या  मुखातून त्वरीत उद्गार  निघाले, "निस्संदेह, या पृथ्वीवर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे ."असे म्हणून असित मुनी आपल्या  आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यानी त्या मालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बालकाभोवती  प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेउन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले.

१५ असित  ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती . गौतमाप्रमाणे  महापुरुषांच्या बत्तीस  लक्षणांनी युक्त असलेल्या पुढे दोनच मार्ग असतात. तिसरा नाही ."जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक सम्बुद्ध अशा बुद्ध होईल."

१६.असित ऋषीला  खात्री होती की, हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही.

१७. त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत दीर्घ  नि:श्वास टाकून तो ऋषी रडू लागला.

१८. असित मुनी अश्रू ढाळीत व दीर्घ नि:श्वास टाकीत रडत आहे हे शुद्धोदनाने पाहिले.


१९. असित मुनी रडत असलेला पाहून शुद्धोदनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने अस्तिमुनीला विचारले, "हे मुनीवर, अशा रीतीने का रहत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घ नि:श्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना?"

२०. हे ऐकून ऋषी म्हणाला," राजा मी बालकासाठी रडत नाही. त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे तो माझ्यासाठी."

२५." का बरं?" शुद्धोदनाने विचारले. ऋषी उत्तरला, "मी वयोवृद्ध झालो आहे. माझं आयुष्य आता संपत आलं आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक सम्बोधी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करु शकले नाही, ते धर्मचक्रप्रवर्तन हे बालक करील .जगताच्या सुखसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील."

२२." ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्ये कल्याणकारक आणि अन्ती कल्याणकारक असंच असेल. ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असंच असेल "

२३. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमलेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालांनंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याचप्रमाणे राजा! हा मुलगा सुद्धा निःसंशय परमज्ञान प्राप्त करुन सम्बोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःखसागरातून तरुन नेउन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल .

२४ " परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रहतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निःश्वास टाकीत आहे .कारण मला वा बुद्धाची पूजा कराववास मिळणार नाही.

 २५. तदनंतर राजाने त्या थोर असितऋषीला व त्याचा पुतण्या नरवत्त याला यथायोग्य भोजन देउन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देउन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले.

२६ तेव्हा असितमुनी त्याचा पुतण्या याला म्हणाला," नरदत्त ! जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाउन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल ."असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेउन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला.

५. महामायेचा मृत्यू

१. पाचव्या दिवशी नामकरणविधी करण्यात आला .मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्रनाम गौतम होते. म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले.

२. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरणविधी समारंभ चालू असतानाच महामाचा एकाएकी आजारी पडली व तिचे दुखने बळावू लागले. 

३. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोदनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्ये जवळ बोलविले आणि म्हटले, 'माझ्या मुलाबद्दल अतिमुनीने जे भविष्य वर्तविलं आहे ते खरं होईल, याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढच वाटत की, ते खरं ठरलेलं पाहाण्यासाठी मी जिवंत राहणार नाही.

 ४. माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल !परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनु लक्षून त्याची योग्यप्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही, याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही.

५. "प्रजापती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच  शंका वाटत नाही."

4. "आता कष्टी होऊ नका. मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. देवांच बोलावणं आलं आहे ,त्याचे दूत मला घेउन जाण्यासाठी थांबले आहेत!" असे म्हणून महामायाने प्राण सोडला. शुद्धोदन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश  केला.

७. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा सात दिवसांचा होता.

 ८. सिद्धार्याचा नन्द नावाचा एक धाकटा  भाउ होता. शुद्धोदनाचा महा प्रजापती पासून झालेला तो  पुत्र होता .

९.सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते .महानान व अनिरुद्ध हे त्याचा पुलता शुक्लोदन याचे पुत्र. आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थ पेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. 

१०. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला.

६. बालपण आणि शिक्षण

१. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागता तेका शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोफ एकत्र जमले व त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की, मुलाला "अभया" या ग्राम देवतेच्या देवळाल दर्शनाला नेले पाहिजे. २ शुद्धोदन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला

सांगितले

३. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थने गोड आवाजात आपल्याला
प्रथम

कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की, आपल्याला देवळात नेले जात आहे, तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रीतीरिवाजानुसार तो देवळात गेला

४. वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली . महामावेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोदनाने ज्या आठ ब्राम्हणांना ५

बोलाविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले. ६ त्याना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोदनाने उदिव्य देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले सम्बमित्त हा भाषशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांग आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुद्धोदनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अर यवनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु ७ त्याच्या हातखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शन शास्त्रे आत्मसात

केली

८ याशिवाय त्याने आलारकालामचा शिष्य भारद्वाज याजकडून ध्यानधारणेची विद्या संपादिली भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तु येथे होता

७. सुरुवातीची लक्षणे

१ जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्या वेळी तो एकान्त स्थळी जाउन समाधी लावण्याचा यत्न करत बसे. २ त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते.

३ कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होउ नये याची दक्षता शुद्धोदन घेत असे. ४ सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणसाची पिळवणूक करावी, हे त्याला आवडता नसे

५ एकदा तो आपल्या काही मित्रांच्याबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्यात वस्त्रानिशी अंग भाजून काढणाऱ्या कढत उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले

६ ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला

७. तो आपल्या मित्रांना म्हणाला एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी है। योग्य ठरते काय? मजूराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन



जगावे हे कसे बरोबर असू शकेल?

८. त्याच्या मित्रांना पावर करण उत्तर पाने हे कळेना कारण से जुन्या परंपरे

सत्यज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यात त्याच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे. ९. शाक्य लोक मंगल नावाचा एक उत्सव साजरा करत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होत. शाक्य लोकाच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडद असे.

१०. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे तो स्वतानांगर घरीत असे ११. जरी तो विज्ञान होता तरी त्याने शारीरिक श्रमाया कधी तिरस्कार केला

नाही

१२ तोळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु दुस-याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे, १२. शिकार करणाऱ्याच्या मंडळांत सामील होण्यास तो तयार नसे त्याचे मित्र त्याला म्हणत, "तुला वाघांची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, मला माहीत आहे, तुम्ही यापाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्या सारख्या निरुपद्रवी

प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात" १४. "निदान तुझे मित्र किती बिनाचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, "मला निरुपद्रवी प्राण्यांना भारताना पाहाणे आवडत नाही. " १५. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे.

१६. दातांना ती म्हणे तू विसरतोस की, तू क्षत्रिय आहेस.

लढणे शहर तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते कारण

शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियांचे मुद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे

एक क्षेत्र आहे

१७. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारीत असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि गौतमी उत्तर देई, तो त्यांचा धर्म आहे म्हणून!"

१८ तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी "मला, असे सांग की. माणसाला मारणे हा माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होउ शकतो?" गौतमी उत्तर देई ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे पण सत्रियाने लढलेच पाहिजे जर ते लढणार नाहीत तर राज्याचे रक्षण कोण करील? १२ पण आई जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करु लागले तर हिंसा न करता




प्रथम खंड

ते आपल्या राज्यांचे रक्षण करु शकणार नाहीत काय?" यावर गौतमी निरुत्तर होई. २० तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्यास उयुक्त करण्याचा प्रयत्न करी त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत सर्व प्राणिमात्र सुखी व्हावेत अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी

२१ परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत ते त्याची हसून थट्टा

करीत

२२ ते डोळे बंद करीत पण ते चितनाच्या विषयावर मन एकाग्र करु शकत

नसत उलट त्यांच्या दृष्टीनेपुढे शिकारीची हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत २३ त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वचा विरुद्ध आहे, असे त्यांना वाटे.

२४ योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्यमात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत होते यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणे, "आपण जेव्हा प्राणिमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यांतील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यांवर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्त्र पशूचा द्वेष करतो

२५ ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात

व्यवहारी जीवनाच्या मर्यादिपलीकडे जातो तेव्हांच हे करू शकतो. अशा प्रकारची त्याची विचार

रणा होती

२६ त्याचे बालपण परमोच्य प्रेमभावनेने व्यापले होते.

२७ एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शान्ति व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी

त्याच्यासमोर पडला. १२८ त्या पक्ष्याला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे

तो पक्षी वायाळ होउन तडफडत होता

२९ सिद्धार्थ त्या पक्ष्याला वाचविण्यासाठी पुढे झाला त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला. त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले त्याने त्या पक्ष्याला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या पक्ष्याला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि उब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. ३०. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की, "या निष्पाप पक्ष्याला कोणी मारले असावे?*




भाग एक

थोडयाच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधानिशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की, ? "आकाशात उडत असलेल्या एका पक्ष्याला आपण बाण मारला. आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठे तरी पडला असावा तो पाहिलास काय?" सिद्धार्थाला तवाने विचारले.

文 ३१. सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला

दाखविला

३२ दवेदत्ताने मागणी केली की, "माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर पण कारले त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला ३३. देवदत्ताचे म्हणणे होते की, "या पक्ष्याचा मालक मी आहे. कारण शिकारीच्या

नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो

३४ सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली तो म्हणाला, "जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच तयाच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होउ शकतो?"

३५. या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोणच योग्य असत्याचा निर्णय दिला.

३६ त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की, आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप

पक्ष्याचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. ३७. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभावलक्षणे ही अशी

होती.

८. विवाह

१. दंडपाणि नावाचा एक शाक्य होता त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्यविषयी प्रसिद्ध होती. १२ यशोधरेने सोळाव्या वर्षात पर्दापण केले होते व दंडपाणि तिच्या लग्नाच्या चिंतेत

होता

३. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशांतील युवकांना निमंत्रणे पाडली

४. सिद्धार्थ गौतमलाही निमंत्रण पाठविण्यात आले होते.

५. सिद्धार्थ गौतमलाही खेळा वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्यादेखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती




प्रथम बंद

२६ त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणिग्रहण करण्यास सांगितले त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला.

७ जमलेल्या सर्व युवकांतून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले ८ दंडपाणि विशेष प्रसन्न नव्हता या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता.

१९. त्याला वाटले सिद्धार्थाला साबुमुनींच्या सहवासाचे विशेष वेड आहे. त्याला

एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होउ शकेल?" १० सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेलल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, सापूच्या व तपस्व्याच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे? यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते.

११ सिद्धार्थ गौतमा खेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमति देण्यास दंडपाणीला सांगितले. दंडपाणीने तशी संमती दिली.

१२. गौतमाच्या प्रतिस्पर्ध्याची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले.

१३ त्यांना वाटले की, त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे काही केले नाही. १४ त्या वेळी ते स्वस्थ बसले त्यांना वाटले दंडपाणि यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करु देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल.

१५. परंतु दंडपाणि जेव्हा या बाबतीत अवशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून

अशी मागणी केली की, धनुर्वियेचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी दंडपाणिता

त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले

१६ सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल, हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले. १७. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या

स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. १८. स्पर्धा सुरु झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य

दाखविले

१९. गौतमाची पाळी सर्वाच्या शेवटी आली. परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी

सर्वश्रेष्ठ ठरली.

२०. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोदन व दंडपाणि हवा देवांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला.




माग एक

२१ विवाह होउन अनेक वर्षे लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला त्याचे नाव राहूल असे ठेवण्यात आले.

९. पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना

१) आपल्या पुत्राचा विवाह होउन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याबरोबरच असितमुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवीत होती २ ते भविष्य खरे होउ नये म्हणून राजाने त्याला वैषयिक सुखविलासात गुंतवून

ठेवण्याचा विचार ठरविला

३. हा उददेश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोदनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहल बांधले एक उन्हाळयात राहण्यासाठीए एक पावसाळयात राहण्यासाठी व एक हिवाळयात राहण्यासाठी हे तिन्ही राजमहल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते.

४. प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षाची आणि फुलांची मनोहरी रचना

केलेले विस्तृत असे उद्यान होते. ५. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन याच्याशी सल्लामसलत करुन राजाने राजनासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त अशा अंत पुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविता 4. ऐसा शुद्धोदन राजाने जीवनातील सुखी राजकुमाराला यश कसे

करुन घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयीनास सांगितले.

७. अतःपुरात ठेवावयाच्या स्त्रियानां एकत्रित करून उदयीनाने त्यांनी

यश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली.

राजकुमाराला

८ त्यांना उददेशून तो म्हणाला, "तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलांत कुशल आहात, तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात, तुमच्या ठायी सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कसबात वाकबगार आहात'

९. "तुमच्या या कलागुणांनी ज्या ठायी नाही ना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचेसुद्धा तुम्ही वित्त अस्वस्थ करु शकता, आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांनासुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता!"

१०. "हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने,

तुमच्या शरीरसौष्ठवाने आणि अकृमिन अशा लावण्याने तुम्ही जर मियांनाही मोहित करु

शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल? ११. आपापल्या क्षेत्रात अथा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हांला राजपुत्राला जिंकून त्याला




प्रथम खंड

तुमचा बंदी करणे व प्रेमरज्जुंनी बांधून त्याला तुमच्या अंकित करून ठेवणे असाध्य नाही " १२ "या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे

मिटणाऱ्या एखद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही *- १३. निःसंशय, हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे । परंतु तुम्हांला त्याचे काय? स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे हाथ तुमचा दृढ निश्चय असू द्या!"

१४ प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान

तपस्व्याला काशीतील एक सौंदर्यवती वैशेने लाथा मारुन झिडकारून आपल्या पायी लोळण

पेत ठेवले होते.

१५ " आणि महान तपस्वी विश्रवामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही घृताची नावाच्या अप्सरेने दहा वर्षे जंगलात आपला बंदी करून ठेविला होता १६ “यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले तेथे ज्याचे

यौवनपुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा?"

१७. "हे असे असल्यामुळे तुम्ही बीटपणाने असे प्रयत्न करा की, राजकुळाची वंशपरंपरा सिद्धार्थाकडून सुटणार नाही १८ " सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की, ज्या असाधारण स्वभवाच्या पुरुषांना जिंकतात. *

१० राजपुत्राला वश करण्यात स्त्रियाचें अपयश

१ उदयीनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या "हृदयाला लागले व राजपुत्राला वश

करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला

२. तथापि, त्यांच्या भृकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे, त्यांचे हसणे, त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठायी असून सुद्धा त्या अंत पुरवासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतः बद्दल खात्री वाटत नव्हती

३ परंतु पुरोहित उदयनाच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला

४. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तिणींच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या

५. स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेउन आपल्या राजोद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता.




एक

६. त्यांच्यापैकी काही जणीनी कामाकुल होउन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पीनस्तनांशी दाबून धरले

७. तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला पट्ट आलिंगन

दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्या त्याच्यावर वाकल्या ८. तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या

अपरोष्ठांनी त्याच्या कानात पुटपुटल्या "माझं गुपित ऐकावं बरं का!"

९. ज्यांची शरीरे उटण्यांची ओली झाली होती अशा काही जणी त्याचे दोन्ही हात

आतुरतेने घटट धरून, जणू काय त्याला हुकूमच करीत म्हणत होत्या. "आमचा पूजाविधी

येथेच करा !" १० मद्य पिउल झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिथे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवित अशी उभी होती की, रात्री चमकणाऱ्या विद्युल्लतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती

११. काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या

१२ दुसऱ्या काही जनी आम्रवृक्षाची फांदी हातात धरुन सुवर्णकलशांप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुददाम दाखवीत उभ्या होत्या.

१३ कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमलपुष्पे हातात धरलेली एक कमलनयना

कमलावती पद्मादेवीसारखी त्या कमलमुख राजपुत्राशेजारी उभी होती.

१४ दुसरी एक सहज समजू शकेल असे मधूर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्रकटाक्षाने जणू काय म्हणत होती, तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराज!

१५ दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहन्यावर आपल्या भृकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा अविर्भाव आणून त्यांची नक्कल करीत होती.

१६. जिच्या कानातील कुंडले वाऱ्याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एक यौवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती, "जमत असेल तर पकडा मला!"

१७. दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेविले, तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या...

१८. त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणया दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोराची हात धरुन विषयवासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले, "हे




कुणाचे फूल आहे?"

१९ दुसरी एक जग पुरुषी आव आणून त्याला म्हणाली "स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा हो पृथ्वी पाक कर

२० दुसरी एक चंचलनवना आपले नीलकमल गीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दांत राजपुत्राला उद्देशून म्हणाली-

२१ नाथ, मधु-सुगंधी मोहाराने बहरलेला हा आम्रवृक्ष पहा! यावर बसून सोन्याच्या पिंजयात बंद करुन ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे २२ इकडे या आणि हा अशोकवृक्ष पहा। प्रेमिकांची दुबे तीव्र करणाऱ्या वा वृक्षावर बसून हे अमर असा गुंजारव करीत आहेत की, जणू काम से कामान्नीने होरपळून

निघाले आहेत.

२३ या हा आम्रवृक्षाच्या कोमल डहाळीने आलिंगिलेला "तिलक वृक्ष तर पहा जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे!" २४ "हा फुललेला "कुरवक" पहा रक्तचंदन रसा सारखा ताजा आणि टवटवीत

दिसणारा हा वृक्ष जणू काय रामणीच्या नखांच्या रंगापुढे आपण फिक्के आहोत असे वाटून

खाली वाकला आहे!*

२५: "या आणि सभोवर अंकुरलेला हा तरुण "अशोक बचा जणू काय आमच्या हातांच्या सौदर्यापुढे लज्जित होउन तो उभा आहे!"

२६ ज्याच्या काठावर समोवर "सिंदुरवरा" चे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा! जणू काय शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूपसुंदरीच आराम घेत पहुडावी असे. ते दिसत आहे

२७ “स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे

जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे" २८. आपल्याच तंदीत गात असलेल्या कोकिळाचे ते स्वरालाप ऐका दुसरी कोकिला जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते.

२९ "वसंत ऋतूत पक्ष्यात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसता, तर किती चांगले झाले असते!"

३० अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमदानी प्रेमबुद्धाच्या सर्व प्रकारच्या

क्लृप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला ३१ तथापि, अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हंसलाही नाही.



भाग एक

३२ त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करु लागला

३३ "या स्त्रियांत अशा कोणत्या गोष्टींची उणीव आहे की, त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे? कारण, वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते ते सर्व नष्ट करणारे आहे ३४ अशा प्रकारे हया स्तुतीसुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्षे सारखा चालला

होता परंतु तो सफल झाला नाही.

११ महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजुत

१. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयीनाच्या लक्षात आले २ राजनीतीला कुशल असलेल्या उदयीनाने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे

ठरविले

३ राजपुत्रास एकांतात भेटून उदयीन त्याला म्हणाला "तुझा एक अनुरुप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे " असे म्हणून उदयानाने सुरुवात केली ४ जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे जे हितकारक आहे ते

करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची तीन लक्षणे आहेत " १५. "मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल #

६. कपटानेसुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची नाही जाते व त्याचे रंजनही होते

७. "आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनीच स्त्रीचे हृदय बावले जाते.

सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात. कारण, स्त्रीला आदरभाव आवडतो "

८. "मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न नाही का करणार?" ९ "विनय हा स्त्रियांना सुगंधी उटण्याप्रमाणे सुखकर वाटतो विनय हा एक

बहुमोल अलंकार आहे. विनयावाचून सौंदर्य के पुष्पविहिन उद्यानासारखे आहे " १०. पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे मोठया कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा?"




प्रथम खंड

१" "काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले

१२ "अशाच प्रकारे अगस्ती ऋषीसुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाण झाला आणि श्रुती सांगतात, लोपामुद्रेचीही तीच गत झाली

१३ महान तपस्वी बृहस्पतीने औतव्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला

भोगून भारवजाला जन्म दिला १४ " श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती प्रदान करीत असताना

ग्रहण करून तिच्या ठायी दिव्य बुधाला जन्म दिला

१५ "अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीनेसुद्धा

यमुनानदीच्या काठी वरुणच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला " १६ "कामातुर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन

स्त्रीशी रत होउन कपिंगलाद नावाच्या पुत्राास जन्म दिला १७ "आणि वार्धक्याने गलितगात्र झालेला असताही राजपा ययाती चैत्ररथ वनात वित्राको अप्सरेबरोबर रममाण झाला

१८ आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यु ओढवेल हे जाणत असून सुद्धा

कौरवनरेश पंडू माद्रीच्या सौदर्यगुणावर मुग्ध होउन विषयसुखाच्या आधीन झाला १९ " यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामोपभोगाचा अवलंब केला तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशाचा अवलंब करणे किती सुखद होईल २०. आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौदर्यसंपन्न युवकाने ज्या सुखाच्या आधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावतः व तुझा हक्क आहे त्या सुखाची

उपेक्षा करायी हे आश्चर्य आहे!

१२. राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर

१ पवित्र परंपरेने समर्थिलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले

२ " माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे. परंतू माझयासंबंधी तुझी चूक कुठे होत आहे, ही मी तुला पटवून देईन

३. "मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही सर्व मानवमात्र त्यात गरफटलेला आहे. हे मला माहीत आहे. पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही "






४. यद्यापि हे स्विसौदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषयोपभोगातच आनंद मानून राहाणे सून माणसाला शोभणारे नाही ५ आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मे सुद्धा विषयवासनेला

बळी पडले, तरी त्याच्या त्या उदाहरणांना भुलू नकोस कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच

झालेला आहे. ६ "जेथे सर्वनाश आहे. किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे, अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही

७ आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करुन वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. ८. जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो, असेच मी म्हणेन

९. “मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषयवस्तूचे

दोष पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे? १०. "आणि विषयवासनेचे बळी जर एकमेकाची फसवणूक करु लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासाठी अपात्र आहेत, असेच नाही का?"

११. “या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की, अशा नीच विषयभोगाच्या

कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस

१२ राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निरुत्तर झाला, आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोदनास निवेदन केली

१३. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोदनाला समजले तेव्हा त्याला त्या सबंध रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विव्हल झाला

१४ राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोषण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोदनाने आपल्या मंत्रयाच्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला, पण आतापर्यत योजिलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही

१५ आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व







लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयांत लपवून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतःपुर विसर्जित करण्यात आले

१३ शाक्य संघात प्रवेश

१ शाक्यांचा एक संघ होता ववाची वीस वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे

२ सिद्धार्थ गौतमाला वीस वर्षे पूर्ण झाली होती संघाची दीक्षा घेउन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते.

३. शाक्यांचे एक सभागृह होते त्याला ते "संथागार" म्हणत ते कपिलवस्तु नगरात होते संघाच्या सभाही हवाच संथागारात होत असत ४ सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोदनाने शाक्यांच्या पुरोहिताला

संघाची सभा बोलवण्यास सांगितले.

५. त्यानुसार कपिलवस्तु येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली

६. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत

ठराव मांडला

७. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवरउठून उभा राहिला संघाला उददेशून त्याने पुढीलप्रमाणे भाषण केले "शाक्य वंशातील शुद्धोदनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो त्याचे वय वीस वर्षाचे असून तो सर्व दृष्टींनी हा संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे म्हणून त्याला या संघाचे सदस्य करुन घ्यावे, असे मी सुचवितो माझी अशी प्रार्थना आहे की, या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे

८. या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापती पुन्हा महणाला, "मी दुसऱ्यांदा

सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे " १९. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही सेनापतीने पुन्हा म्हटले,

"मी तिसऱ्यांदा सांगतो की, जे कोणी ह्या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे '

१०. तिसन्या वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही. ११ शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होउ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते १२. सेनापने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा

शाक्य संघात अंतर्भाव करुन तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले






१३. तदनंतर शक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले.

१४. सिद्धार्थाला उददेशून तो म्हणाला, “तुला सभासद करून घेउन संघाने तुझा केला हे तू मानतोस ना?" "होय महाराज " सिद्धार्थ उत्तरला. बहुमान

१५ " संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाउक आहेत काय?" "नाही महाराज पण ती जानून घेतल्याने मी सुखी होईन. सिद्धार्थ म्हणाला.

१६. पुरोहिताने म्हटले, "प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ती सांगतो" असे म्हणून तो पुरोहित त्याला संपाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला-

(१) तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तनमनधनपूर्वक केले पाहिजे. (२) संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये.

(३) कोणत्याही शाक्यांच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भिती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजेत.

(४) तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये. परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे. अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे"

१७. पुरोहित पुढे म्हणाला, "यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्याला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो

(१) तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस

(२) तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू

(३) तू चोरी केलीस तर संपाचा सभासद राहू शकणार नाहीस.

(४) तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद

राहू शकणार नाहीस "

१८. साने म्हटले, "महाराज शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशपासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो "

१४. संघाशी संघर्ष

१. सिद्धार्थात शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर आठ वर्षे लोटली

२. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वाना प्रिय झाला होता




प्रथम खंड

३. तो संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोदनाच्या कुटूंबांच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली

४. या दुरुखान्तिकेचा आरंभ कसा आहे

शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती

६. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबददल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. ७. सिद्धार्थाच्या वयाला अठठावीस वर्षे झाली त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या

सेवकांत नदीच्या पाण्यावरुन फार मोठा संघर्ष झाला दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती

झाल्या

८. जेव्हा या संघाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले.

९. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलाविले

१० संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, 'आपल्या लोकांवर कोलियानी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत पण या पुढे हे चालू देणे शक्य नाही हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियाच्याविरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियाच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकाराचे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे

११. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, "या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही बुद्ध करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसन्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. "

१२. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, "संघाने कोलियाच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करु नये, असे मला वाटते प्रथम दोष कोणाचा याची खात्री करुन घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकानी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपणसुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते

१३. सेनापतीने उत्तर दिले, "होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले, तथापि





आपण हे विसारता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती १४ सिद्धार्थ गौतम म्हणाला, "यावरुन स्पष्ट होते की, आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पांचवा

मनुष्य निवडून घ्यावा आणि या पांच जणांनी हे भांडण मिटवावे १५ सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले. परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, "माझी खात्री आहे की, कोलियाचा हा उपद्रव जोपर्यंत

त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही

१६. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली ती बहुसंख्येच्या मताधि क्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले

१७ सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला त्या प्रस्तावाला

विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करु

नये, अशी मी संघाला विनंती करतो शाक्य आणि कोलिय यांचा निकटचा संबंध आहे, त्यांनी

परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही

१८. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले त्याने जोर देउन सांगितले की, "क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करु शकत नाहीत. आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्ख्या भावाशी देखील लढले पाहिजे १९ यज्ञयाग करणे हा ब्राम्हणाचा धर्म आहे, युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे.

व्यापार करणे हा वैश्याचा धर्म आहे, तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक

वर्णला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे

२०. सिद्धार्थाने उत्तर दिले " धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही वैरावर प्रेमानेच मात करता येते "

२१ अस्वस्थ होउन सेनापती म्हणाला, "या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्यावी काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की, सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्तावमतास टाकून याची खात्री करून घेउ या २२ त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले

१५ देशत्यागाची तयारी

१. दुसरे दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्याच्या आपल्या योजनेचा





प्रथम बं

संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलाविली २. संघाची सभा भरल्यावर, कोलियांशी युद्ध करण्यासाठी २० ते २५ वर्षे वयाच्या

प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे, अशी घोषण करण्यास संघाने मला परवानगी यावी, असा सेनापतीने ठराव मांडला.

३. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी बुद्धाची घोषणा करण्याच्या बाजून मत

प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूंकडचे लोक या सभेत

उपस्थित होते.

४. ज्यांनी युद्धपुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता.

५. परंतु ज्या अल्पसंख्यांकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांना पुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्यापुढे प्रश्न होता- बहुसंख्यांकांच्यापुढे नमावे की नमू नये?

६. अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमावयाचे नाही अणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुदैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी.

७. जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की, आपणास पाठिबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला उपदेशून म्हणाला, "मित्रहो तुम्हांला जे वाटेल ते तुमही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की, सैन्यभरतीच्या तुमच्या निर्णयाला भी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही.

८. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देतांना सेनापतीने म्हटले, 'संघाचा सदस्य होतांना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शपथेची भंग केलास तरी तुला लोकनिदेला तोंड द्यावे लागले

९. सिद्धार्थाने उत्तर दिले, “होय, मी माझ्या तनमनधनाने शाक्यांचे हितरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांचा सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिदेची काय पर्या?"

१०. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणांवरून शाक्य हे कोशलार पतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करुन देउन सिद्धार्थाने संघाला साव गिरीचा इशारा दिला. तो म्हणाला, "हे समजणे कठीण नाही की, कोशल राजाला हे बुद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सब कारण निर्माण करुन देईल.




१. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषणकौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की, कोशल राजाच्या अनुवाचून संपाची आज्ञा मोडणान्याला देहान्ताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देउ शकत नाही आणि जर हत्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संपाने जरी फर्मावली तरी कोशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही

१२. पण लक्षात ठेव तुला शासन करण्याचे संपाजवळ दुसरे मार्ग आहेत संच

तुझ्या कुटुबांवर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुबांची जमीन जप्त करु

शकेल याकरिता कोशल राजाची अनुमती मिळविण्याची संघाला आवश्यकता नाही.

१३. कोलियांशी युद्धकरण्याच्या संपाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले. एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. दुसरा, देशान्तशासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे आणि तिसरा, आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेउन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होउ देण्यास तयार होणे

१४ पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता तित्तया पर्यायाविषयीचा विचारच त्याला असहय झाला या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला.

१५. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, "कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करु नका सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देउ नका त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेउन त्यांची उपासमार करु नका ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे माझ्या अपराधाची शिक्षा मला एकटयालाच भोगू द्या. मला देहान्ताची या देशत्यागाची यापैकी तुम्हांला योग्य वाटेल ती शिक्षा द्या, ती मी खूपीने स्वीकारीन याविषयी कोशलधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपणास अभिवचन देती

१६. मार्ग सापडला परिव्रज्या

१. सेनापती म्हणाला, “तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे कारण, जरी तू देहान्ताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कोशलपिपतीस समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढील की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारील "

२. सिद्धार्थ गौतम म्हणाला, “हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो तो एक प्रकाराचा देशत्यागच होय






प्रथम ड

३. सेनापतीला वाटले की, हा एक चांगला मार्ग आहे. तथापि, सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. ४. म्हणून सेनापतीने सिद्धांत विचारले, "तुझ्या आई-वडिलांची आणि पत्नीची

संमती घेतल्यावाचून तुला परिव्राजक कसे होता येईल?"

५. "आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करु," असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला, "त्यांची संमती मिळो वा न मिळो, हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो "

६. सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाथ या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग

आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला

७ सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वी एक तरुन शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, "कृपा करुन माझं म्हणणं ऐका, मला काही महत्वाची गोष्ट सांगावयाची आहे.

५. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, "सिद्धार्थ गौतम आपले वचन

पाळील आणि त्वरित देहत्याग करील याबद्दल मला शंका नाही. तथापि एक प्रश्न आहे की, ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही." ९. आता ज्या अर्थी सिद्धार्थ देवून लवकरच दृष्टीआड होणार आहे त्या अर्थ

कोलियाविद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय ?"

१०. “या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही

झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कोशलाधिपतीला कळणारच आहे. जर

कोलियाविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करणाच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळे त्याला देशत्याग करावा लागता असे कोशलाधिपतीला वाटेल हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही!" ११ म्हणून मी पुन्हा सुचवितो की, सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाउ द्यावा, म्हणजे कोशलाधिपतीला या दोन

घटनामध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही "

१२. संघाला पटले की, ही फारच महत्त्वाची सूचना आहे. आणि तात्कालिक निर्णयांच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले.

१३. अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःखपर्यवसायी सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता, परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबददल सुटकेचा निःश्वास सोडला..




१७ निरोप

शाक्य संघाच्या सभेत जे काही पडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम परी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाडयात पोहोचला होता

२. कारण घरी परतताय सिद्धार्थ गौतमाने पाहिले की, त्याचे मातापिता रहत आहेत व ते फार दुःखमन्न झाले आहेत

३. शुद्धोदन म्हणाला, 'आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो पण तू या घरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही ४ सिद्धार्थाने उत्तर दिले "मला सुद्धा गोष्टी या बराला जाउन पोहोचतील असे

वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्याची मने वळवू शकेन

अशी मला आशा होती

"दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही

चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणम झाला नाही ६. " तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच सत्य आणि न्याय यांपासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी

माझ्या स्वतःवरच ओढवून घेण्यात यशस्वी झाली "

७. शुद्धोदनाचे या योगाने समाधान झाले नाही तो म्हणाला, 'आमचे काय होणर याचा तू विचारच केला नाहीस, पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले,' सिद्धार्थाने उत्तर दिले "शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा ८ "पण तुझ्याशिवाय आम्हांला या जमिनीचा काय उपयोग आहे?" शुद्धोदन

आकवून म्हणला, "सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून सोडून तुझ्याबरोबर अज्ञात

वासात का जाउ नये?"

१९. रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोदनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली,

"हेच बरोबर आहे तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाउ शकतोस?"- १० सिद्धार्थ म्हणाला, 'आई. तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही तू का सांगत आलीस? हे खरे नाही का? मग तू धैर्य परले पाहिजेस. हा दुःखा वेग तुला शोभत नाही मी रणांगणावर जाउन मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस काय?"

११. "नाही गौतमी उतरली." ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण तू आता



प्रथम खंड

अरण्यात जात आहेस लोकापासून अगदी दूर हिस्त्र पशूच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगते. तू आम्हांला तुझ्यासोबत घेउन चल

१२. "भी तुम्हां सर्वाना कसा काय बरोबर नेउ? नंद अगदीच लहान मूल आहे माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे त्यांना येथे ठेवून तू येउ शकतेस काय?" सिद्धार्थाने गौतमीला विचारले. १३. याने गौतमीचे समाधान झाले नाही तिचे म्हणणे होते की, "आपण सर्वजण

शाक्यांचा देश सोडून कोशलाधिपतीच्या संरक्षणखाली राहण्याकरिता कोशल देशात जाउन राहू शकू

१४ " पण आई. सर्व शाक्यजन काय म्हणतील?" सिद्धार्थाने प्रश्न केला, “बाला ते देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परिव्रज्येचे कारण कोशलधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही, असे मी वचन दिले आहे " १५ "मला अरण्यात एकटयालाच राहावे लागेल हे खरे आहे, पण यात कुठले

श्रेयस्कर? अरण्यात राहने की कोलियांच्या हत्येत सहभागी हो?"

१६. " पण ही घाई कशाला?" शुद्धोदन मध्येच म्हणाला, "शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. " १७ "कदाचित युद्ध सुरुष होणार नाही मग तू परिव्रज्या का स्थगित करू नये?

कदाचित तुला शाक्यात राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्य आहे " १८ सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, "भी परिव्रज्या घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियाच्या विरुद्ध करण्याचे स्थगित केले आहे "

१६. “मी परिव्रज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त

शक्य आहे हे सर्व मी प्रथम परिव्रज्या घेण्यावर अवलंबुन आहे "

करणे

२०. "मी वचन दिले आहे आणि ते भी पुरे केलेच पाहिजे वचनभंगाचे परिणाम अपाणाला व शांततेच्या पक्षाला दोघानाही भयानक ठरतील

२१ आई, आता माझ्या मार्गात आड येउ नकोस मला आज्ञा दे आणि तुझे

आशीर्वाद दे जे पडत आहे ते चांगल्यासाठीच पडत आहे.

२२ गौतमी व शुद्धोदन स्तब्ध राहिले.

२३ सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेनेच स्तब्धता भंग केली, ती म्हणली

"कपिलवस्तु येथे संघाच्या सभेत काय पडले ते सर्व मला समजले आहे." २४ सिद्धार्थाने विचारले, “यशोधरा, मला सांग, परिव्रज्या घेण्याचा माझ्या






निश्वयाबद्दल तुला काय वाटते?"

२५ त्याला वाटले की ती मूच्छित होउन पडेल, पण तसे काही झाले नाही

२६ आपल्या भवनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उतरली, "मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करु शकले असते। कोलियांविरुद्ध युद्ध करण्याचा कामी मी निश्चतपणे भागीदारीण झाले नसते!!"

२७. "आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्या घेतली असती मी परिव्रज्या घेत नाही याचे एकच कारण, मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे'

२८ " असे झाले नसते तर फार बरे झाले असते. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे आपल्या मातापित्यांविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करु नका, माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करीन २९ "ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत

आहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल

मानवजीतीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे.

३० याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला यशोधरा किती शुर धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचीति त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग देवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्यदृष्टीने त्याने याकडे पाहिले आणि तो निघून गेला

१८. गृहत्याग

१. सिद्धार्थानि भारद्वाजाच्या हस्ते प्ररिव्रज्या घेण्याचा विचार केला भारद्वाजाचा

आश्रम कपिलवस्तूमध्ये होता. त्याचप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोडा कंटक यावर आरुढ होउन आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेउन आश्रमाकडे निघाला. २. तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवासाठी ती अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येउन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली

३ आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होउन त्याव्याकड पाहू लागते व त्यांनी अस्फुट का जोडून त्याला वंदन केले.





प्रथम खंड

४ ते त्याच्या सभोवती उभे उभे राहिले त्याची अंत करणे भावाकूल झाली होती. अणू काही प्रेमाने प्रफुल्लित होउन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते. ५ काही स्त्रियाना वाटले की, तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जात्याच सालंकृत होता

६. काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पुथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला

७. दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखुन हलकेच निःश्वास टाकीत होत्या.

८ अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहात राहिल्या होत्या त्याच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्याच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते परिव्रज्या घेण्याचा त्याच्या निर्णयाचा विचार करत दिड-मूढ स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या ९. मोतथा प्रवासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि

आश्रमाच्या दारात प्रवेश केला

१० आपण पव्रिज्या घेत असताना शुद्धोदनाने व प्रजापती गौतमाने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही कारण त्याला ठाउक होते की दुःखावेगाने ती स्वतःला सावरून धरु शकणार नाहीत परंतू ती त्याच्या न कळत अगोदरच आश्रमात येउन पोहाचली होती.

११. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले मातापिता

असल्याचे त्याने पाहिले

१२. आपल्या मातापित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्याचा आर्शीवाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की, त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता त्यानी रडरडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूनी न्हाउन काढले.

१३. उन्नाने कटकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तेथे उभा होता शुद्धोदन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरुन आले आणि तो रडू लागला

१४. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यांपासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले १५. त्याने परिव्रातकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा

चुलतभाउ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते सिद्धार्थाने

ते वस्त्र परिधान केले

१६. अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्व तयारी करुन सिद्धार्थ परिव्रज्येची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला.




भाग एक

१७ भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या साहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला

आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचं जाहीर केले. १८ परिव्रज्या घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असलयाचे स्मरण ठेवून परिव्रज्येचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला.

१९. जो जनसमुदाय आश्रामात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता. कारण गीतमाला परविज्या घ्यावयास लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाउ लागला २० त्याने कपिलवस्तु सोडले आणि तो अनोमा नदीच्या दिशेने जाउ लागला

त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने

पाहिला

२१ तो थांबला आणि त्या समुदायास उद्देशून म्हणाला, "बघूनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही मी शाक्य आणि कोलियाच्यामध् गील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला

२२ शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले.

२३ सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहाणे गौतमीला असहय झाले.

तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली. २४ परिव्रज्या (सन्यास) ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षाचे होते.

२५. लोक त्याची आठवण करुन त्याची प्रशंसा करुन म्हणत, “हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणसाठी तो स्वकीयांशी लढला!"

२६. “तो असा शाक्य युवक होता की, ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शीर झुकविले नाहीच, पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्कारले त्या शिक्षेचे अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुखसमुद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की, त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही.

२७. “हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह





प्रथम खंड

असेच म्हणावे लागेल

२८. शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते. “धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला. धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला!"

१९. राजपुत्र आणि त्याचा सेवक

१. कठकाला घेउन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते. पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंठकासह अनोभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचविण्याचा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली..

२. शेवटी ते सर्वजण अनोभा नदीच्या तीरावर वेउन पोचले. ३. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, "मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी

माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामिभक्तीने तू माझे हृदय जिंकिले आहेस." ४. “तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे " ५. "ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही? पण दैव फिरले की, आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी

वागतात "

६. “कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणा साठी जग आशेसाठी माया करते काही एक हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असूच शकत नाही. "

७. "तूच एक याला अपवाद आहेस आता हा घोडा घे आणि परत जा !"

८. “महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी

ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील " ९. " त्याना सांग की, मी त्याना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही "

१० “ घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करु नये. सहवास हा कितीही दीर्घ काळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच "

११. “ जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार

कसे येणार नाहीत?"

१२ " माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निःसंशय वारसाहक्क सांगणारे



भाग एक

लोक असतात परंतु त्याच्या सदगुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतातच "

१३. “महाराजांची माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की, मी अवेळी निघून गेलो पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते " १४ या आणि अशाच शब्दांत मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरुन ते माझी

आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा

१५ "आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हापुन्हा सांग की, तिच्या वात्सल्यप्रेमाला मी किती तरी अपान आहे. ती फार थोर स्त्री आहे. तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारथी नाही "

१६. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातिरेकाने कंठ दाटून

येउन उत्तरला १७ "स्वामी, चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा रुतून बसावा, तशी तू तुझ्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझया मनाची स्थिती होत आहे ".

१८. "तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळयात अश्रू आल्याशिवाया राहणार नाहीत? ज्यांचे अंतःकरण प्रेमाने

उचबळले आहे त्यांची तर गोष्टच बोलावयास नको?" १९ "कुठे तुझा तो प्रासादांत तोडणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण

कुशायांनी भरलेली तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमि"

२०. 'हे राजपुत्रा, तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेउन नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाउ ?"

कपिलवस्तु

२१ "एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सदधर्माला सोडून देईल काय? त्याचप्रमाणे स्वतच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय?" २२. “आणि तुझी सावत्र आई-जिने तुला लहानाचे मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या

तिला एखादा कृतघ्न माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय?" २३. “जी सदगुणाची खाण आहे, जिच्यामुळे कुटुबाची शोभा वाढली आहे, जी पतिभक्तिपरायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय?"

२४. "धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यांत सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निगरगट्ट उप या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उपलून आकावे तसे, ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या ता लहानग्या बाळाला सोडून जाणार काय?"

२५. “आणि तू तूने आप्त नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी, हे अन्नदात्या, तू मला सोडून जाणर नाहीस असा मला विश्वास आहे. कारण




तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे "

२६ "अशा प्रकारे माझे अंतःकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाउच शकत नाही -

२७. तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील? आणि

कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू?" २८ राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर जसे तू सांगतोस. पण ते कोण खरे मानील? आणि कोण त्यावर विश्वास ठेवील?" छन्न पुढे म्हणाला, "आणि जरी निर्लक मनाने आणि जीभ टाळयाला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही

२९ जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुळीच शोभत नाही म्हणून मागे फीर आणि मायावर दया कर

३० दुःखाकुल छन्नाने ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले. ३१. "छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे, अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे ३२ प्रेमामुळे मी माझ्या अतनातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे

एकमेकास सोडण्यास भाग पाडील

३३ "ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती जाता कुठे आहे?"

३४ पक्षी जसे आपल्या निवान्यासाठी झाडावर एकत्र जाउन बसतात आणि नंतर

एकमेकापासून दूर जातात तसे प्राणिमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो " ३५ ढग जसे जवळ जवळ येउन पुन्हा दूर दूर जातात तसाच मी प्राणीमात्रांचा सहवास व वियोग मानतो.

३६. आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे त्या अर्थी भीतिदायक असणाऱ्या संयोगकाळात हे माझे ते माझे असे मानणे बरोबर नाही, ३७ आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा तू दुःख करु नकोस परत जा आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू पोटाळत असतील तर तू आधी जा आणि नंतर परत ये

३८ "माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तुच्या लोकांना जाउन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार ऐका "

३९ स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंठक घोडयाने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रू ढाळले





माग एक

४०. ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली, ज्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्यावे तळवे मध्ये खोलगट होते अशा आपल्या हाताने गौतमाने कंटक घोडयाच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला, ४१ "अश्रू ढाळू नकोस कंटका! आवर ते अश्रू तुझ्या कष्टाचे तुला लवकरच

फळ मिळेल ४२. त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या कापाय वस्त्रांना नमन केले.

४३ कंठक आणि छन्न यांचा निरोप घेउन गौतम आपल्या मार्गाने जाउ लागला. ४४ अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्त्रानिशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या उन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला

४५. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहात तो मोठमोठ्याने रडू लागला आपल्या बाहूनी कंटक घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला

४६. मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही काही वेळा चालतांना अडखळे व काही वेळा जमिनीवर पडे आणि अशा रीतीने जात असतांना स्वामिभक्तीने विदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की, आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते.

२० छन्न परतला

१. आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला यामुळे दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. २. त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की, ज्या रस्त्याने कंठकासह तो एका

रात्रीत कूच करत असे, त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार

करीत प्रवास संपविण्यात त्याला आठ दिवस लागले. ३. कंटक घोडा जरी मोठ्या शूराच्या आवेशाने कूच करीत होता तरी तो अगदी गलितगात्र निस्तेज झाला होता. जरी तो अलंकारभूषनांनी सजविलेला होता तरी बरोबर

आपला पनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता.

४. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात विकत होता. तो जरी अजय भुकेलेला होता तरी पूर्वीप्रमाणे भात गवत किंवा पाणी यांची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्यांना तोंडही 





प्रथम

लावले नाही

५. हळूहळू ते शेवटी कपिलवस्तुला येउन पोहोचले. कपिलवस्तु नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघे कपिलवस्तु शरीराने पोचले, मनाने नाही..

६ जरी कपिलवस्तु नगरी अधून मधून कमळांच्या ताटव्यांनी भरलेल्या जलाशयामुळे व फुलांनी बहरलेल्या वृक्षांमुळे उल्हसित व शोभावान दिसणारी होती तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला होता

७. निस्तेज चेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळू हळू शहरात प्रवेश केला तेंव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले.

८. जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कठक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलितगात्र स्थितीत परत आलेले पाहिले तेव्हा त्यांनी कळवळा अश्रू ढाळले!

९. "कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाचा व राज्याचा कुलदीप?" असे म्हणून व अश्रू ढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले.

१० गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहात आहे ती नगरी आहे. गीतमाशिवाय या शहराचे आम्हांला काहीसुद्धा आकर्षण वाटत नाही.

११ इतक्यात राजपुत्र आला" असा हर्षोद्गार काढीत नगरयुवती रस्त्याच्या

बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेा त्यांनी घोडयाची पाठ रिकामी

पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या.

२१. शोकाकुल कुटुंब

१. शुद्धोदनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहात

होती. त्यांना आशा होती की, छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडील २. राजाच्या अश्व शाळेत शिरताच कंठक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठयाने खिंकाळला

३. राजाच्या अंतः पुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, "ज्या अर्थी घोडा कंटक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा. "

४ आणि दुःखाने मूर्च्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोष होउन डोळे विस्फारीत राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंटक घोडाच त्यांना दिसला. ५. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मुच्छित





झाली आणि रडत असतानाच ती ओरडली.

६. "जो आजानुबाहू आहे, ज्याथी कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलाच्या डोळ्यांसारखे ज्याचे डोळे, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक ज्याची छाती रुंद व आवाज दुंदुभी किंवा मेघगर्जनेसारखा आहे अशा वीरपुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय?" ७. असा सर्वगुणसंपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर

कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे?

१८. ज्यांची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत ज्यांचे घोटे स्नायूखाली लपलेले, नीलकमळासारखे दिसणाऱ्या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या त्या सुकोमल दोन पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल? १९. ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे प्रावरणे, सुगंधी अतरे व चंदनाने सजविलेल्या

प्रसादाच्या गच्चीवर पहुडण्याची सवय तो पौरुषसंपन्न देह अरण्यात थंडी वारा व उन पावसाच्या मान्याला नेहमी मोकळया असलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल?

१०. ज्याला आपले कुटुंब चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य यांचा अभिमान वाटतो, जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो, पण घेण्यास नसतो, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल ?" ११ "जो स्वच्छ सुवर्ण शय्येवर झोपला असतांना वाद्यवृंदाच्या नादमाधुर्याने रात्री

ज्याला जागे केले जाते, तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या

विंध्यावर कसा काय झोपणार? हाय रे देवा!"

१२. हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा

घालून, थरथरणाऱ्या वेली जशा आपल्या कुलांतून मध गाळतात तशा आपल्या डोळ्यांतून

अनुवार गाळीत होत्या. १३. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाउन दिडमूढ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले.

१४ "मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेविले त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारीन करावयास पाहिजे होते.

. १५. "मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही माझी एकच इच्छा की माझ्या प्रिय पतीले मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाउ नये!"

१६ "विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी जपान असले तरी या शिवाय राहुताने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेडू नये काय?"





१७. हाय रे देवा! त्या सूज्ञ पुरुष नायकाचे अंतःकरण किती निष्ठूर त्याच्या सुकोमल सौदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दय व कूरो शत्रूलाही मोहित करील अशा

बोबड्या बोलाच्या या बालकाला आपण होउन कोण बरे सोडून जाईल ?" १८ "माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे, होय अगदी दहाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे कारण त्या हृदयाचा नाथ सुखोपभोग घेण्यास समर्थ असतांना व एखाद्या

पोरक्यासारखा आपले सर्व राजवैभव सोडून देउन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू? आता मला हे दुःख सहनच होत नाही।" १९ अशा तऱ्हेने दुःखाने मुच्छित होउन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावतः जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःखद स्थितीने तिच्या भवदिवा बंधारा फुटला होता

२० अशा प्रकारे दुःखाने दिड-मूढ होउन मोठमोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठयाने ओरडल्या आणि मोठवाने कमळांवर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यांतून गालांवर वाहू लागल्या २१. छन्न आणि कंठक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढनिश्चय

समजताच दुःखित होउन राजा शुद्धोदन बरणीवर पडला. २२ दुःखविळ झालेल्या शुद्धोदनाला सेवकांनी सावरून वरले तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विव्हळून तो रडू लागला

२३ त्यानंतर शुद्धोदन उठला आणि मंदिरात गेला त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजाअर्चा करुन आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली. अशा प्रकारे, "देवा, कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू" असे म्हणत शुद्धोदन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली.



मरा

भाग दुसरा

कायमचा संसारत्याग

१. कपिलवस्तुहून राजगृहाकडे प्रयाण

१. कपिलवस्तु सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला.

२. राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता मोठमोठे तत्वन आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते. ३ हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता तो तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला

४. वाटेत तो प्रथम साकी नावाच्या एका ब्राम्हण योगिनीच्या आश्रमात पांचला, नंतर तो पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राम्हण योगिनीच्या आश्रमात गेला, आणि मग रैवत नावाच्या ब्राम्हण ऋषीच्या आश्रमात जाउन राहिला त्या सर्वांनी त्याचे आदरातिथ्य केले.

५. त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व, उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्वाने अंगावर संन्याशाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करु लागले.

६. त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राही तर उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग घालू लागे सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे, तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही

७. काही लोक त्याला दोन्ही हातांनी वंदन करीत तर काही पूज्य बुद्धीने मस्तक

नमवून त्याला अभिवादन करीत काही जण प्रेमळ शब्दांनी त्याला संबोधित कोणीही मनुष्य

त्याला अभिवादन केल्याखेरीज जात नसे

१८. ज्यांनी रेगबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटे. वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत त्याला पाहिल्यावर कुणाच्याही मनात वाईट विचार येत नसत ९. त्याच्या भुवया, त्याचा भालप्रदेश, त्याचे मुख, त्याचे शरीर, हात-पाय किंवा

त्याची चालण्याची ढब यांपैकी त्याच्या कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली की त्या

क्षणीच त्याची दृष्टी तेथे खिळून राही. १०. दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर, पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजीनी




रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृह नगरीत गौमत येउन पोहोचला. ११. राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली

व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्याने तयार केली.

१२. राजगृहापासून कपिलवस्तु पायवाटेने जवळजवळ ४०० मैल अंतरावर आहे १३. हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीच केला.

२. राजा बिंबिसाराचा उपदेश

१. दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला फार

मोठा जमाव त्या वेळी त्याच्याभोवती जमला

२. त्या वेळी मगधाधिपती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली. तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढीलप्रमाणे सांगितली- ३. "ज्याच्याबद्दल ब्राम्हणांनी असे भविष्य वर्तविले होते की, "हा एक तर उच्चतम

ज्ञान प्राप्त करुन घेईल किया या पृथ्वीचा सम्राट होईल" तोच हा शाक्यांचा राजाचा पुत्र आहे,

त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत

४. हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आता

दिली की, "जा! तो कुणीकडे जात आहे ते पाहून मला येउन सांग!" तो सेवक राजाची आज्ञा

होताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाउ लागला

१५. स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ जोखड़भर अंतरापर्यतच पाहात शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे विचार कहचात ठेवून तो याचक श्रेष्ठ सावकाश आणि मोजून

पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता ६. मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवान्त कोपऱ्यात जाऊन बसला

आणि तेथे अन्नसेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला. ७. लोम्रवृक्षांनी दाटलेल्या आणि मयूरांच्या केकारवांनी निनादलेल्या त्या अरण्यात

रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानवजातीचा सूर्य पूर्वदिशेच्या पर्वतराजीवरील बालसूर्यासारखा तळपू लागला

८. याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत

सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजमा घेउन

तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला.

९. पर्वताप्रमाणे चिपाड असा तो राजा टेकडी चढून गेला.





१०. या ठिकाणी आसनत्व आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गीतन त्याच्या दृष्टीस पडला जनू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचे शिखर आहे, असा त्याला भास झाला 11. शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनःशांती यामुळे वैशिष्टयपूर्ण दिसणाऱ्या गीतमाला

त्या नराधिपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होउन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्याच्याव

गेला १२ बिबिसारने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाउन त्याच्या शरीरस्वास्थ्याविषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याव ममत्वाने आपले मन स्वस्थ व शरीर सर्व

व्यापासून मुक्त असल्याची खात्री दिली १३ त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या

मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतून तो म्हणाला, १४ बाळ तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे ती वंशपरंपरागत असून तिथी दृढता चांगली सिद्ध झालेली आहे म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तु नीट ऐक. तू

१५ सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश, नवतारुण्य, डोळयांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटतो की, इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत असा राजोपभोगापेक्षा सर्वस्वी संन्याशाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला

१६ "तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंधच योग्य आहे रक्तवर्णाची ही जातीभरडी वस्त्रे त्यांना शोभत नाहीत या तुझ्या प्रजाजनांचे रक्षण करावे, दुसऱ्याने दिलेले अन्न धारण करणे त्याला शोभत नाही १७ म्हणून सौजन्यशील युवका, जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर

माझ्या अर्ध्या राज्याचा तू औदार्याने स्वीकार कर ११८ या प्रमाणे तू केलेस तर तुझ्या आप्तस्वकीयांना दुःखाचे कारण उरणार नाही. कालांतराने सार्वभौम सत्तादेखील अखेरीस धीरगंभीर अशा पुरुषांच्या आश्रयासाठी धाव घेते. म्हणून या बाबतीत तू मला उपकृत कर सज्जनांच्या साहाय्यामुळे सज्जनांचा उत्कर्ष जास्त

प्रभावी ठरतो

१९. परंतु तुझ्या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणांसह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर

२०. म्हणून तू यापैकी एका गोष्टीचा स्वीकार कर धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वाग प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसार जीवनाची ही तीन




उद्दिष्टे आहेत जेव्हा माणसे मरतात तेका केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो " २१ म्हणून जीवनाच्या वा तीन उद्दिष्टांना अनुसरून प्राप्त करून तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे, असे म्हणतात की, धर्म, संपत्ती आणि सुख यांची ज्या वेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याच वेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो

२२. "धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुझे दोन बलवान बाहू

निरुपयोगी राहू देऊ नकोस ते ही पृथ्वीच काय पण त्रैलोक्य जिंकण्यास आधिक समर्थ (अहित २३ "मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे. सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे तुझा हा याचकवेष पाहून माझे मन अनुकपेने भरून आले आणि मी अश्रू ढाळीत आहे "

२४ "याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा नामवंत अशा तुझ्या वंशाला

साजेसे तुझे सौंदर्य, वार्धक्य येउन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आताच सर्व 

सुखांचा उपभोग घे.

२५. “वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळवू शकतो सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धापकाळ असा असतो म्हणून असे म्हणतात की, सुखे ही तरुणांसाठी असतात संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषासाठी असते, आणि धर्म वृद्धांसाठी असतो

२६ "आजच्या या जगात यौवन हे धर्म व संपत्ती यांचा शत्रू आहे आपण स्वतःला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही म्हणून जिये सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या बौवनाने त्यांचा उपभोग घ्यावा

२७ "वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते ते गंभीर आणि शांत राहण्याच्या

बाबतीत तत्पर असते फारसे आवास न करता अपरिहार्यपणे ते विकारविरहित होते लज्जा

हेही त्याचे कारण आहे

२८ " म्हणून चंचल बाह्य वस्तूकडेच आकर्षित होणाऱ्या निष्काळजी, उतावळ्या

आणि दूरदृष्टी नसलेल्या यौवनाच्या फसव्या कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून

सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसांप्रमाणे सुटकेचा निःश्वास टाकतात.

२९ " म्हणून अविचारी आणि भ्रामक असा हा यौवनाचा चंचल काल जाउ दे आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्षे सुखाकरिता राखून ठेवलेली असतात इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही।

३० "किंवा धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर यज्ञ करुन

सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करणे ही तुझया बुटुबांची अति प्राचीन अशी प्रथा आहे " ३१. “मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती, सुवर्णकंकणांनी ज्यांचे हात भरलेले असत आणि ज्यांचे चित्रत्रविचित्र मुकुट रत्नाच्या प्रकाशामुळे चकाकत असत अशा राजर्षीनी यज्ञाच्या मार्गाने करून घेतली आहे "






३. गौतमाचे बिंबिसारास उत्तर (पूर्वार्ध)

१. याप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दांत उपदेश केला परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही. तो पर्वताप्रमाणे अचल राहिला. २. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण

चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढीलप्रमाणे उत्तर दिले

२. "आपण जे सांगितलेत त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही महाराज, सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या अर्थी आपण जन्मला आहात, आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करणारे आहात, त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे "

४. "दुष्ट मनाच्या माणसांच्या बाबतीत त्याच्या कुळात योग्य असा स्नेहभाव खोत होतो आणि विलयास जातो. फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात

५. आपल्या मित्रांचे दैव फिरले तरी त्यांच्यापाशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो भाग्यशाली पुरुषाला वैभवकाळ प्राप्त झाला असता त्याच्यापाशी कोण मैत्री करीत नाही?"

६. या जगात संपत्ती मिळविल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा

उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते

तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही.

७. "महाराज, माझ्याविषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध औदार्य आणि मित्रत्व यांचीच प्रेरणा आहे. मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटेन मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही. ८. "मला हा ऐहिक वस्तूची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची, आकाशातून

होणाऱ्या वज्राघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही "

९. “आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लूटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनाप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. त्यांची नुसती आशा केली तरीही माणसांची मने ती मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात "

१०. "सुखाला बळी पडलेल्यांना देवाच्या स्वर्गात देखील आनंद मुळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही. वाऱ्याचा मित्र असलेला अग्नि ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही त्याप्रमाणे जो तृष्णार्त आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही.





११. "या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही लोक भ्रमामुळे सुखासक्त होतात. सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा वरील?" १२. "समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची

दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते. सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही.

तरच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तुप्त होत नाही १३. "याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लाभली. त्यांने सर्व खंड जिंकले वादेखील अर्ये राज्य पादाक्रांत केले. तरीही त्याची ऐहिक पदार्थाविषयी आसक्ती कमी झी नव्हती

१४. "इंद्र जेव्हा वृत्ताच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राज्याचा नहुषाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठ मोठ्या ऋषींना  वाहावयास लावली, तरीही तो संतुष्ट झाला नव्हता. "

१५. "इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले. चिंध्या ज्यांचे कपडे होते, कंदमुळे, फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषिमुनींना देखील ज्याने जिंकले त्या यासुख नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील?"

१६ सुखासाठी जे धडपडत आहेत आणि ऐहिक साच्याच्या जे पाठीस लागले आहेत, त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योगय वाटते

१७. "सुखप्राप्तीतील यश म्हणजेच सुखी माणसांवरील विपत्ती समजली पाहिजे.

कारण त्याने इच्छिलेली सुखे त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत होतो. उन्मत्तपणामुळे जे करू

नये ते तो करतो व जे करावे ते तो करीत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे

त्याचा शेवट अयः पातात होता

१८. कष्ट करुन मिळवून ठेवलेली, तुम्हांला फसवून जिथून आली तिथे परत जागारी व काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे वा सुखांत कोणता आत्मसंयमी मनुष्ठ तो जर शहाणा असेल तर रममाण होईल?*

१९. "ज्यांचा शोष करुन ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात, अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल?"

२०. "जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या मासांच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकाकडून उपभोगिली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात, अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ?"




भाग दुसरा

२१. "ज्या सुखात रममाण होणाऱ्या माणसावर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात

आणि जी वासनाप्रमाणे विनाशकारी आहेत, अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी मसाला समाधान लाभेल?* २२ "ज्यांच्या अंतःकरणाचा या सुखांनी चावा घेतला आहे अशा आत्मरयमी पुरुषांचाही नाश होतो त्यांना आनंद मिळत नाही संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असल्या

या सुखामध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ?"

२३. हा पपडीत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखाचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही मेलेल्या हाडांच्या सापळयाप्रमाणे असल्या हवा सुखामध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ?

२४ "अशा सुखाच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे जो

कपाळकरंटा सुखोपभोगांच्या आशेचा दरिद्री गुलाम आहे, त्याने या जीवसृष्टीत मृत्यूचे दुख

भोगावे हेच योग्य होय २५. गाण्यावर लुब्ध होउन हरिणी स्वतः चा नाश ओढवून घेतात तेजावर भा पतंग अग्नीत झेप घेतात. आमिषाला भुलून माता लोखंडाचा गळ गिळतो. म्हणून ऐहिक सु अंती दुःख निर्माण करतात "

२६. "सुखे म्हणजे उपभोग, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कसोटीला

लागल्यास त्यापैकी एकही उपभोगण्याचा योग्यतेचे आहे असे आढळत नाही. सुंदर वस्त्रे आणि

इतर सुखे म्हणजे पदार्थाचे केवळ सोबती होत. दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्व मानते

पाहिजे

२७ तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते. वारा उन आणि पाउस यांच्या निवारणासाठी परवे असते आणि आपली नावासून संरक्षण करण्यासाठी कपड आवश्यकता असते "

२८. याप्रमाणे झोपेची गुंगी घालवण्यासाठी बिछाना असतो. प्रवासाचा शीण होउ नये म्हणून वाहन असते. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराची शुद्धी, आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते "

२९. म्हणून वस्तू म्हणजे मानवाच्या दुःखनिवारणाची साधने होत. ते आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हेत. केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्यांचा उपयोग केला जातो अशा त्या बाह्य वस्तूपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो, असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करील?"

३०. “पित्तप्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना, जो त्या उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे



समजते

तोच सुखांना आनंद है। [ देतो. " नाव ३१. "ज्या अर्थी सर्व सुखामध्ये चंचलता आढळून येते त्या अर्थी मी त्यांना आनंद

देउ शकत नाही. कारण सुखामागून दुःख येणे हेच मुळी त्याचे वैशिष्टय आहे. ३२. "भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफड या वस्तू हिवाळयात सुखदायक अाता परंतु उन्हाळयात त्रासदायक ठरतात आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळयात सुक असतात पण हिवाळयात दुःखदायक ठरतात.

३३. "सर्वाना माहीत असलेला फायदा आणि तोटा, या आणि इतर अनेक परस्परविरोधी जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तू अविभाज्य संबंध आहे. म्हणून काही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःख नाही

३४. "सुख आणि दुःख यांचे स्वरुप संमिश्र आहे असे दिसून येते तेव्हा

राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो. राजा नेहमीच हसत

असतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो. "

३५. "राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात. कारण राजा हा खुटीसारखा आहे. तो जगासाठी त्रास सहन करीत असतो ३६. "जे राजपद जाण्याची भिती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते

अशा राजपदावर जर राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुदैवी होय. आणि याउलट जर

त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्रया राजाला सुख तरी कसे मिळणार

३७. "आणि संबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वसतिस्थान म्हणून होउ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच पर हे निवासस्थान होउ शकते तर मग राज्यपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हेत काय?"

२८. आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमविण्याइतके अन्न त्याला पुरेसे असते. त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्यांचीच राजाला गरज असते... याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरविण्यासाठी असतात .

२९. आणि समाधान लाभवे म्हणून जर या सर्व फलांची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेन आणि जर माणसाला या जगात एकदा समाधान लाभले तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय?" ४० “म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत कर

फसणार नाही. आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेउन मी विचारतो की, सुखांना काही

किंमत आहे काय?"

४१. "मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकूट धुळीस







मिळाला म्हणून किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करुन घेण्याची माझी काय आहे

म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही न

४२. अत्यंत विषारी कोषाविष्ठ सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो

पकडण्याचा प्रयत्न करील किंवा एकदा पेटविलेल्या गवताची पूड ती पुन्हा धरण्याचा जो करील, असा मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्यांच्या पाठीमागे लागेल ४२असून याचा हेवा करील, स्वतंत्र असून बंधनात असलेल हेवा करील, श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करील, शहाण असून वेढयाचा हेवा कर तोच मी म्हणतो, फक्त तोच मनुष्य, ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा

करील?"

४४ सम्म जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची कीव करण्याचे कार

नाही पाया जगत उत्कृष्ठ समाधान लाभते. संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टी

परलोकातील सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात

४५ परंतु संपत्तिमान असूनही जो लोभीष्ट आहे, त्याला या जगात शांतीचे समा

न लाभत तर नाहीच, पण परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागते, त्याची मात्र कीच केली

पाहिजे.

४६. "आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य, आपला जीवनमार्ग आणि

आपले कुल यांना शोभेल असे आहे आणि माझा निश्चय पार पाहणे हे देखील माझे चारित्रय,

माझा जीवनमार्ग आणि माझे कुक यांना शोभेल असेच आहे. '

४. गौतमाचे उत्तर (उत्तरार्थ)

जगत कल्समुळे मी पायाळ झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दुःखाया अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय पण स्वर्गलोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही. २. आणि महाराज, तीन पुरुषार्थाचा पाठपुरावा करने हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय, हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे मला वाटते ते दुःख होय, असे

आपण म्हणता, त्याविषयी बोलावयाचे म्हणजे आपले ते तीन पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि

संतोषदायकी नाहीत.

३ आणि आपण म्हणता वृद्धापकाळ येईपर्यंत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते. याविषयी बोलावयाचे म्हणजे हा निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे कारण वृद्धावस्थेतही अस्थिरता असू शकते. ४ परंतु या अर्थी देव आपल्या कलेत इतके कुशल आहे की, ते जगाला







८१

प्रथम खंड

कोणत्याही काही आपल्या कह्यात ठेवू शकते, त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहिती नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धापकाळाची वाट पाहात बसेल?"

५. “वृद्धत्वरुपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरुपी बाणानी देवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धावघेणाऱ्या प्राणिमात्रावार प्रहार करीत मृत्यू ज्या वेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो, त्या वेळी दीर्घायुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होउ शकेल?

६. "ज्यांचे अंतःकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण, वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल. "

७. “आणि आपण म्हणता की, तुझ्या वंशाला शोभणरे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा अशा यज्ञांना माझा नमस्कार! "दुसऱ्यांना दुःख देउन तू मिळणारे कोणतेही फळ मिळविण्याची माझी इच्छा नाही.

८. “भावी फळाच्या आशेने अहयय पशूला ठार करण्याचे यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारेही असले तरी देखील दयाशील आणि सहृदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्यच कृती ठरेल " ९. " आत्मसंयमन, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म

जरी दुसऱ्या एखाद्या अगदी निराळया नीतिनियमात बसत नसला, तरी देखील केवळ हत्या

करुन सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते, त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार

नाही "

१०. “दुसऱ्याला दुःख देउन मिळविलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते, ते देखील शहाण्या, दयाशील अंतःकरणाला तिरस्करणीय वाटते तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल?"

११. “भावी, फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही. महाराज! पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही. असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपटयाप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात "

१२. स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, “तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही. तुला जे जे काही करावयाचे आहे ते ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर "

१३ “पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकासह राजवाडयाकडे परतला "





भाग दुसरा

५. शांततेची वार्ता

१. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी पाच परिव्राजक आले आणि त्य देखील गीतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली.

हे होत.

२. हे पाच परिव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भटिक ३. ते देखील गौतमाचे रुप पाहून थक्क झाले आणि त्याने परिव्रज्या का स्वीकारली

असावी याचा त्यांना प्रश्न पडला. ४. राजा बिंबिसाराने त्याला याविषयी जसे विचारले, तसेच त्यांनीही विचारले

५. आपल्याला परिव्रज्या कोणत्या स्थितीत स्वीकारवी लागली हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले, “आम्ही त्याबद्दल ऐकले आहे. परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय पडले ते तुम्हांला माहीत आहे काय?"

६. सिद्धार्थ म्हणाला, "नाही" नंतर त्यांनी त्याला सांगितले की, त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली.

७. स्त्री-पुरुषांनी, मुलांमुलींनी निदर्शने केली आणि "कोलीय हे आमचे भाऊ आहेत भावाने भावा विरुद्ध हद्दपारीचा विचार करा" अशा प्रकारच्या घोषणचे फलक होतात घेउन त्यांनी मिरवणुका काढल्या. ८. या चळवळीचा परिणाम असा झाला की, शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी

लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला. या वेळी कोलियांशी समेट घडवून

आणण्याच्या बाजूने बहुमत होते.

९. कोलियाशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत महणून पाच शाक्यांची

निवड करण्याचे संघाने ठरविले.

१०. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला त्यांनी शाक्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी पाच कोलियांची निवड केली.

११. दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरुपाचे लवादमंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपा बाबतीतील प्रत्येक वाद मिटविण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूना • बंधनकारक ठरविण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला.

१२. कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले, “आता यापुढ तुम्ही परिव्राजक म्हणून राजण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाउन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही?"

१३. सिद्धार्थ म्हणाला, “ही शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा






प्रथम खंड

माझा विजय आहे. परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये यापुढेही मी परिव्राजकच राहिले पाहिजे "

१४. त्या पाच परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, “आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही ?" सिद्धार्थ म्हणाला, "लवकरच येईन पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे " १५ नंतर ते पाच परिव्राजक निघून गेले.

६. नव्या परिस्थितीतील समस्या

१. कोलीय आणि शाक्य यानी केलेल्या समेटाची त्या पाच परिव्रातकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला.

२ एकटाच राहिल्यावर आपल्या स्वत च्या स्थितीविषयी तो विचार करु लागला

आणि आपली परिव्रज्या पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला ३ त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता? त्याने स्वतः लाच विचारले. ४. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते. "आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिलल्क राहिला आहे काय? युद्ध संपले याचा

अर्थ माझ्यापुढील प्रश्न सुटला असा होतो काय?

५. खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले ६. “युद्धसमस्या ही मूलत कलहसमस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो

केवळ एक भाग आहे "

७. “हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे तर क्षत्रिय आणि ब्राम्हण यांच्यात, कुटुंब प्रमुखात मातापुत्रात, पितापुत्रात, भावाबहिणीत आणि

सहकाऱ्यात देखील चालू आहे. "

८. "राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरुपाचा असतो हा संघर्षच जगातील सर्व दुःखांचे मूळ होय. "

९. “युद्धामुळे मी घर सोडले हे खरे पण शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाउ शकत नाही मला आता असे दिसून येते की, माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे.

१० “जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल?" ११. “त्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय?"

१२ प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला.






भाग तिसरा

भाग तिसरा

नव्या प्रकाशाच्या शोधात

१. भृगुऋषींच्या आश्रमात

१. इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलारकालाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले.

२ मार्गात त्याने भृगु ऋषींचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला.

३. सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राम्हण हातांत सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेउन नुकतेच परतले होते. तपस्वेत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले. ४ आश्रमवासीयांच्या आदरसत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील

गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले.

५. मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सूज सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळया प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यानी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला.

६. त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या

तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले.

७. त्यानंतर तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेल्या भृगुषींनी गीतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फले समजावून सांगितली.. ८. “पाण्यातून उत्पन्न होणारे, न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र

धर्मग्रंथात सांगितलेले साबुतपस्व्यांचे अन्न होय, परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात '

1

९. “काही जण पक्ष्याप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात, काही जण हरणाप्रमाणे गवत खातात, तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात. जणू काय ते मुंग्यांची वारुळेच झाली आहेत. "

१०. “दुसरे काही जण महत्प्रयासाने दगड खाउन आपली भूक भागवितात. तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात. इतर काही जण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजविल्यावर जर काही उरले तरच ते स्वत साठी ठेवतात. "

११. "दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्रे गाउन







प्रथम खंड

अग्नीला दोनदा अर्घ्य अर्पण करतात आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारुन राहतात त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात '

१२. "अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने मृत्युलोक मिळतो. दुःखमार्ग हेच पुण्याचे मूळ आहे."

१३. "हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहात आहे. तुमचा हा तपश्चर्येचा नियमही मला समजलेला नाही "

१४. "या वेळी मी इतकेच सांगू शकतो की, ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वतः समाधि मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे. "

१५ " याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्यंतिक दया दाखविली, परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे, असा जेका भी विचार करतो तेव्हा माझ्या आप्तस्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुख होते १६ “मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक

झाली म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे, असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या

धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात १७. या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलारकालाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे "

१८. त्याचा निश्चय पाहून आश्रमप्रमुख भृगुपी म्हणाले, "राजपुत्रा, तुझे ध्येय हे खरोखर शूराचे ध्येय आहे. तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस. तू खरोखर दूर आहेस!"

१९. “तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब

यकोष्टास जा. आलारकालाम ऋषी तेथे राहा आहेत. शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी

मिळविले आहे "

२०. “त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल. परंतु माझी अशी कल्पना आहे की, त्योच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उदिदष्ट त्याच्याही पलीकडील आहे, असे तुला दिसून येईल

२१. गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला, त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देउन ते आपल्या तपोवनात परत गेले.







भाग तिसरा

२. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास

शोधावयास निघाला...

१. भृगुऋषींचा आश्रम सोडल्यावर गौतम आलारकालाम मुनीचे वसतिस्थान

२ आलारकालाम त्या वेळी वैशालीस राहात होते. गौतम तेथे गेला. वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला. ३ आलारकालामांकडे जाउन तो म्हणाला, 'आपल्या सिद्धान्ताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे "

४. त्यावर आलारकालाम म्हणाले, "तुझे स्वागत असो माझा सिद्धान्त असा आहे.

की, तुझयासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होउन तो

आत्मसात करुन घेता येईल आणि त्या सिद्धान्तानुसार वर्तनही करता येईल "

५. “खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तू अगदी पात्र आहेस " ६. आलारकाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने

७. मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता

उत्तर दिले

माझ्यावर दाखवीत आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहाचलो आहे असा मला भास

होत आहे "

८. "म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय ?"

९. आलारकालाम म्हणते, "तुझ्या मनाची थोरवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा

आणि तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझया पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही "

१० "हे श्रोतृश्रेष्ठा, आमची तत्वे ऐक!" ११. "नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली

.

१२. आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलारकालाम म्हणाले,

१३. "गीतमा ही आमच्या तत्वानातील मूलत आहेत. मी तुला ती सारांशाने

सांगितली आहेत

१४. आलारकालामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित

झाला.

३. समाधि मार्गाचे शिक्षण

१. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळया मार्गाचे परीक्षण






प्रथम खंड

करीत असताना ध्यानमार्गाची (समाधीची) माहिती करुन घ्यावी असे त्याला वाटले.

२ ध्यानमार्गाचे तीन पंथ होते

३. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान-साधनेसाठी

श्वासोच्छवास नियंत्रण ठेवणे

४. एका पंथाने (अनापानसति) नावाची श्वासानियंत्रणाची पद्धती अनुसरली होती.

५. दुसऱ्या पंथाने "प्राणायाम" नावाची पद्धती अवलंबिली होती या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेचे तीन भाग पडतात (१) श्वास आत घेणे (पूरक), (२) श्वास रोखून चरणे (कुमक) आणि (३) श्वास बाहेर सोडणे (रचक) तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखिला जात होता.

६. आलारकालाम ध्यानमार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते आलारकालामांच्या

मार्गदर्शनाखाली आपणाला

ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले.

७ म्हणून तो आलारकालामाशी त्याविषयी बोलाला आणि मला ध्यानमार्गाचे

शिक्षण देण्याची कृपा कराल काय? असे त्याने त्याना विचारले ८. “मोठ्या आनंदाने!" आलारकालामांनी उत्तर दिले

९. आलारकालामांनी ध्यानमार्गाचे तंत्र त्याला शिकविले त्याच्या एकूण सात सिद्धी

होत्या

१० गौतम त्या तंत्राचा दरदोज अभ्यास करु लागला.

११ त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यावर "आणखी शिकण्यासारखे काही आहे

काय?" असे गौतमाने आलारकालामांना विचारले. १२ आलारकालामांनी उत्तर दिले, “नाही मित्रा, माझ्याजवळ शिकविण्यासारखे

जे होते ते ऐवढेच " नंतर गौतमाने आलारकालामांचा निरोप घेतला

१३ उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. आलारकालामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती.

१४. त्याचा तो ध्यानविधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला म्हणून तो उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला...

१५. थोडक्याच काळात उद्दकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी त्यांने आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाचे आलारकालामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्दक रामपुत्तालाही विचारला की, "आणखी काही शिकण्याजोगे आहे काय?"






भाग तिसरा

८८

१६. आणि उद्दक रामपुतताने तेच उत्तर दिले, “नाही मित्रा! तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही. "

१७. आलारकालाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी कोशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते की, मगध देशातही अशा प्रकारे

प्यानमार्गसंपन्न योगी आहेत त्यांच्या पद्धतीचे शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला. १८. त्याचप्रमाणेगीतम मगध देशात गेला.

१९. त्याला असे आढळून आले की, त्याची ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कोशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती.

२० ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. २१ गौतम ही प्रक्रिया शिकला श्वासोच्छवास थाबवून चित्ताची एकाग्रता

करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आले

झाला

२२. ती दुःखदायक प्रक्रिया होती तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी

समाधि मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते.

४. वैराग्याची कसोटी

१ गौतमाने सांख्य आणि समाधिमार्ग यांची कसोटी घेतली होती. परंतु वैरागय मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगुऋषींचा आश्रम सोडला होता,

२. त्याला असे वाटले की, त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वत अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपल्याला आधिकारवाणीने बोलता येईल.

३. त्याप्रमाणे गौतम गयानगरीस गेला तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली, आणि उरुबेला येथे गयेचे राजर्षी नेगरी यांच्या आश्रमात वैराग्यमार्गाचा अभ्यास करण्यासाठी वसती करण्याचे त्याने निश्चित केले वैराग्यमार्गाच्या अभ्यासासाठी नेरजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकान्तातील स्थळ होते,

४ राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते आणि शाततेची बार्ता ज्यांनी आणली होती ते पाच परिव्राजक त्याला उरुवेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते.

५. त्या भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून




८९

प्रथम खंड

त्यांनी विनंती केली गौतमाने त्यांची विनंती मान्य केली. ६ नंतर त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली.

ते नम्रतेने त्याच्या बरोबर राहू लागले. ७. गौतमाने सुरु केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वपरूप अत्यंत उग्र होते.

८. काही वेळ तो भिक्षेसाठी दान घरी जाई पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी तो जात नसे प्रत्येक घरी केवळ दोन घासांची भिक्षा घेई पण सातापेक्षा आधिक घासांची भिक्षा तो स्वीकारीत नसे. ९. दररोज तो फक्त एक वाटीभर अन्नावर जगत असे. पण सात वाट्यापेक्षा

अधिक अन्न तो स्वीकारीत नसे १०. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर दोन दिवसांनी एक वेळ याप्रमाणे जेवत असे कधी आठवड्यातून एकदा तर काधी पंधरवड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे

११. त्याचा वैराग्यमार्गाचा अभ्यास अधिकाधिक होउ लागल्यावर हिरव्या वनस्पति किंवा रानातले ज्वारी-बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आंत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे...

१२ रानटी फळे व कंदमुळांवर किवा वाऱ्याने झाडांवरुन पडलेल्या फळांवर तो आपली गुजराण करीत असे.

१३. त्याचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्याचे, झाडांच्या सालींचे, काळविटाच्या सबंध किंवा अर्ध्या कातडयाचे, गवताचे, झाडाच्या सालींचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे, माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे पंखाचे असत घुबडाच्या

१४ त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे.

१५. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करुन तो वैराग्याच्या इतक्या

पराकोटीला गेला की, आपलया शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो

जगू लागला

१६. शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेला येउन पोचला की, त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर इतके साचले की, शेवटी ते आपोआप पडू लागले.

१७ अरण्याच्या भयाण अशा अन्तर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयाण होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ






भाग तिसरा

मूर्ख मनुष्यच करु शकला असता.

१८. जेव्हा हिवाळयात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्णपक्षाच्या रात्री तो डघड्या हवेत राहात असे आणि दिवसा तो काळ्याकुट्ट गर्द झाडीत राहात असे... १९. परंतू पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येई तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरवून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही

२० जळलेल्या हाडांची उशी करुन तो स्मशानात झोपे २१. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर एखाद्या

तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करु लागला २२. ज्या वेळी दररोज तो फक्त एक फळ खाउन राहू लागला त्या वेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले

२३ तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कण त्याच्या हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता...

५. वैराग्याचा त्याग

१. गौतमाने सुरु केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश याचे स्वरुप अत्यंत

उग्र असे होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षेपर्यत चालले होते. २ सहा वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की, त्याला हालचालही करता

येत नव्हती

३ तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता, आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केन्द्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किचितही उलगडा झाला नव्हता.

४. तो स्वतःशीच विचार करु लागला, "हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण

ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. "

५. काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्गलोकासाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणिमात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुखात पडतात ”

६. " माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय?"

७. “मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे. कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे "





प्रथम खंड

८. "माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय ?" ९. "ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते, त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय वचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे "

१० “जर केवळ शरीराचाच विचार करावयाचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते, पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच पण त्याचा काय उपयोग?" ११. “ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यानी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होउ शांति

नाही "

१२ " जे ध्येय मनाच्या साहाय्याने गाठावयाचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल?" १३ “खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तुप्तीनेच योग्य

प्रकारे लाभते "

१४ त्या वेळी उरुवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहात होता. सुजाता नावाची त्याला मुलगी होती...

१५ सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दर

वर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता. १६ तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची

जागा तयार करण्यासाठी पाठविले

१७ त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्ना वाटले की, तो वृक्षदेवच

अवतरला आहे.

१८. सुजाता आली आणि स्वतः शिजविलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले.

१९ ते पात्र घेउन तो नदीकाठी गेला सुप्पतिठ्ठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले.

२० याप्रमाणे त्याची वैराग्यमार्गाची कसोटी संपली

२१ तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले.





भाग पदया

भाग चवथा

ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी

१. नव्या प्रकाशासाठी चिंतन

१. अन्नभक्षण करुन ताजातवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यतच्या अनुभवाविषयी विचार करु लागला. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले. २. ते अपयश इतके मोठे होते की, कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य

आले असते. तयाला अर्थातच वाईट वाटले पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही. ३. एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे. त्याला इतकी आशा वाटे की, सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली. आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला.

४. त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला, “जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाउ दे । नसेल तर खालच्या दिशेने जाउ दे ।" आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले '

५. आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येउन त्याने उरुवेला सोडली आणि संध् याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला तेथे त्याने एक पिंपळवृक्ष पाहिला. आपल्या नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याच्या त्याने विचार केला. ६. चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केला. कारण, सर्व

प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात.

७. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळवृक्षाखाली बसला. ज्ञान प्राप्ती करुन घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, "कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही. "

८. नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती





प्रथम खंड

निश्चित करुन घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढीलप्रमाणे स्तुती केली.

९. "हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच!"

१०. "हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशात पंखफडफडीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंदमंद वायुलहरी वाहात आहेत, त्या अर्थी आपण आपले ईप्सित साध्य होउन आपण बुद्ध होणार हे निश्चित!"

११. चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना ज्यांना

पुराणांतरी माराची (कामाची) मुले असे म्हणतात त्यांनी मनावर आक्रमण केले.

१२. कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू

निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली... १३. दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषि आणि ब्राम्हण बळी पडले हे त्याला माहीत होते.

१४ म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला - “माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील. पण माझा निश्चिय ढासळून टाकणे तुम्हांला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. "

१५. एखादा गोड घास मिळेल, या आशेने चरबीच्या गोळयाप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले १६. गोड पदार्थ न आढल्यामुळे कावळा तिथून निघून जातो त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले.

२. ज्ञानप्राप्ती

१. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते.

२. मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजातवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली.. अशाप्रकारे ज्ञान प्राप्ती करुन घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. ३. ज्ञानप्राप्ती करुन घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चार पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्ती करुन घेतली.





भान चवथा

९४

४ पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला. त्यांच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली...

५. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली.

६. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे घेतले...

साहाययक ७. चवच्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि ! सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली

८. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले.

९ चवथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला त्याला स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या

१०. याप्रमाणे शेवटी चार आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होउन प्रकाशाचा उदय झाला अज्ञान नष्ट होउन ज्ञान उदयास आले त्याला एक नवा मार्ग दिसला.

३. नव्या धम्माचा शोध

१. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य

ततवज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती २. त्याच्या मते जगती व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद

वस्तुस्थिती होती.

३. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता. सांख्म तत्वज्ञानाने हया प्रश्नाचा विचार केला नव्हता.

४. आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित केंद्रित

केले

५. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की, "व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती?"

६. त्याचा दुसरा प्रश्न असा होता की, "दुःख नाहीसे कसे करता येईल?" ७ या दोन्ही प्रश्नांचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले, ते उत्तर म्हणजे, सम्यक संबोधी (घरी ज्ञानप्राप्ती)







प्रथम खंड

८. याच कारणामुळे त्या पिंपळवृक्षाला "बोधिवृक्ष" असे नाव मिळाले घेतली... बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर "बुद्ध" होतात.

४. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर "बुद्ध" होतात

१. ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर ते "बुद्ध" झाले.

२ बोधिसतव कोणला म्हणावे? आणि बोधिसत्व म्हणजे काय? ३. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व !

४. बोधिसत्व बुद्ध कसा होतो?

• बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची दहा स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पहिजे?

६ बोधिसत्य आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत "मुदिता" (आनंद) प्राप्त करुन घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते.

७. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला "विमलता” (शुद्धता) प्राप्त होते. या वेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो. तो सर्वाना दया दाखवितो तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सदगुणाविषयी त्यांना नाउमेद करीत नाही.

८. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत “प्रभाकारी" अवस्था (तेजस्विता) प्राप्त करुन घेतो. या वेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो.

९. जीवनाच्या चवथ्या अवस्थेत तो "अर्चिष्मती" (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता) प्राप्त करुन घेतो या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील याच्यावर आपले चित्त केंद्रित करतो.

१० जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो "सुदुर्जया” (जिंकण्यास कठीण अशी स्थिती) प्राप्त करुन घेतो सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते.

११ जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो "अभिमुखी” होतो या अवस्थेत पदार्थाची उत्क्राती आणि तिचे कारण याची "बारा" निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी







झालेली असते. आणि "अभिमुखी" नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणिमात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात अगाध करुणा उत्पन्न होते.

१२. जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व "दूरडमा" (दूर जाणे) ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातीत असतो. तो अनन्ताशी एकरुप झालेला असतो.. तथापि, सर्व प्राणिमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम-रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहात नाही. तो आपल्या

सहचरांतील तृष्णा शांत करतो. परोपकारबुद्धी, सहनशीलता, व्यवहारचातुर्य, शक्ती, शांत

वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो.

१३. या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते. परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो. आपण व्यव्हाराचातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करुन घेतले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याच वेळी प्राणिमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यत्किचितही कमी होत नाही किया प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवीत नाही, म्हणून

दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही च्युत करू शकत नाही. १४. जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो "अचल" होतो. या अढळ अवस्थेत बोधि सत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविकत च अनुसरतो तो जी जी गोष्ट करील त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होतो.

१५ जीवनाच्या नवव्या अवस्थेत तो "साधुमति" होतो. ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत, आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशाची "साधूमति" ही अवस्था असते १६. जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो “धर्ममेध" होतो. बोधिसत्वाला बुद्धाची

दिव्यदृष्टी प्राप्त होते. १७. बोधिसत्य ही दहा सामर्थ्य प्राप्त करुन घेतो. कारण बुद्ध होण्यास त्याची

आवश्यकता असते. १८. बोधिसत्वाची स्थित्यंतरे होत असताना त्याने ही दहा सामर्थ्य मिळविली पाहिजेत, इतकेच नव्हे तर त्याने दहा पारमिताप्चाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे

१९. एक "पारमिता" ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीपायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये.





प्रथम खंड

२०. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो "बुद्ध" होतो. बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय

२१. बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या

अवतारवादाच्या ब्राम्हणोक्त सिद्धांतासारखा वाटतो.

२२. जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार बावर आध रलेला आहे. २३. अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही.

अवतारवादी ब्राम्हणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की, देव निरनिराळे अवतार घेउन आपल्या भक्तांचे रक्षण करतो मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. २४ बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा दहा जीवनावस्थांतूनच गेला पाहिजे या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या

संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही.












No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...