Sunday, July 9, 2023

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आज चिंतन शिबिर संपन्न.



दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक : महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरेश रावलिया
राष्ट्रीय अध्यक्ष आद. चंद्रबोधी पाटील
राष्ट्रीय कार्याध्यक्ष: आद. डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर
===================================             चिंतन शिबिर
===================================
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आज दिनांक नऊ जुलै 2023 रोजी चिंतन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. चिंतन शिबिरात पुढील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
धम्म चळवळ गतिमान कशी करता येईल.
प्रबोधन कारांची आचारसंहिता.
शाखांचा आर्थिक लेखाजोखा.
======================≠===≠========
ज्या शाखांचे फोटो उपलब्ध झाले त्या शाखांना programme of BSI  या ब्लॉग वर प्रसिद्धी दिली आहे.दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी programme of BSI या ब्लॉगच्या लिंक ला इतर ग्रुप वर शेअर करा ही विनंती.






 '  भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा स्तरीय चिंतन शिबिर *दिनांक ९ जुलै २०२३ रोजी* सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर भवन पंचशील बुद्ध विहार, तुर्भा स्टोअर्स, तुर्भे (पूर्व) येथे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आयु *. जयवंत यशवंत लव्हांडे* यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न झाले. प्रमुख मार्गदर्शक *आद. चंदाताई निलेश कासले* (केंद्रीय सदस्य महिला विभाग/असिस्टंट लेफ्टनंट जनरल समता सैनिक दल) यांनी उपस्थित जिल्हा अंतर्गत शहर शाखा व वार्ड शाखा पदाधिकारी तसेच केंद्रीय शिक्षक / शिक्षका, बौद्धाचार्य यांना योग्य मार्गदर्शन केले.

 *सदर शिबिरात ३५ जणांनी आजीवन सभासदत्व स्वीकारले.* 

आद. अलकाताई टेकाळे (केंद्रीय सदस्य) यांनी देखील या शिबिराला आवर्जून उपस्थिती लावली.

नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने कोषाध्यक्ष आयु. प्रकाश माने, संस्कार उपाध्यक्ष आयु. चंद्रकांत माने, महिला उपाध्यक्ष आयुनी. सुरेखाताई सावंत, उपाध्यक्ष पर्यटन विभाग आयु. नामदेव जगताप, कार्यालयीन सचिव आयु. दत्तात्रय हराळ, पर्यटन सचिव आयु. विनोद पाचपिंडे, महिला सचिव आयुनी सुनीताताई सुरवसे व आयुनी. राजश्रीताई पारधे, संस्कार सचिव आयु. सुनील गंगावणे, संघटक आयु. हिरामण थोरात इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


            *चंद्रकांत बयाजी माने* 

         *संस्कार उपाध्यक्ष नवी मुंबई* 

===================================



स्थानिक अकोला भारतीय  बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने आज दिनांक 9 जुलै 2023 ला आबासाहेब खेडकर सभागृह अकोला या ठिकाणी जिल्हास्तरीय चिंतन शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा संस्कार विभाग प्रमुख आदरणीय यु. जी. बोराडे साहेब यांनी केले.मंचावर जिल्हा शाखेचे अध्यक्ष आदरणीय पि. जे. वानखडे सर सरचिटणीस आयु. नंदकुमार डोंगरे व कोषाध्यक्ष आयु. विजयजी जाधव, विभागीय सचिव एस. डी. मोरे तसेच भारतीय बौद्ध महासभा भिक्षू संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पूज्य भन्ते बुध्दपाल महाथेरो हे उपस्थित होते. 

या चिंतन शिबिरामध्ये आद. यु.जी.बोराडे साहेब यांनी प्रबोधनाची आचारसंहिता तसेच धम्म चळवळ गतिमान कशी करता येईल? या विषयावर मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे विभागीय सचिव मान. एस. डी .मोरे यांनी दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मिशन या विषयावर मार्गदर्शन केलं. संस्थेच्या शाखांनी हिशोब कसा ठेवावा शंका समाधान  जिल्हा शाखेचे अध्यक्ष मान. वानखडे सर यांनी सांगितले.सुरुवातीलाच नवीन झालेल्या कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला. शिबिराला जिल्ह्याचे प्रचार, प्रसार, पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष विभागाचे प्रमुख आयु. राहुलजी अहिरे जिल्ह्याचे महिला उपाध्यक्षा आयु. सुनंदाताई तेलगोटे, जिल्ह्याचे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष मान. डी.एस.ननीर सर, जिल्ह्याचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष आयु. विजय हिवराळे हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे संस्कार विभागाचे सचिव आयु. पंचशील गजघाटे, सचिव प्रचार प्रसार पर्यटनआयु. राहुल गोटे, जिल्ह्याचे संघटक आयु. राजाभाऊ लबडे ,जिल्हयाचे हिशोब तपासणीस आयु. प्रशांत शिरसाट, महिला सचिव इंदुताई मेश्राम,महानगराचे अध्यक्ष आयु. विश्वासराव बोराडे महासचिव आयु. प्रकाश बागडे, कोषाध्यक्ष आयु. गोरखनाथ वानखेडे 

अकोला पूर्व अध्यक्ष आयु, आशिष मेश्राम, अकोला पश्चिमचे अध्यक्ष आयु. शेषराव शिरसाट ,मुर्तीजापुर तालुक्याचे अध्यक्ष आयु. आकाराम बोरखडे, तेल्हारा तालुक्याचे अध्यक्ष  नाजुकराव दारोकार, अकोट तालुक्याचे अध्यक्ष आयु. सतीश घनबहादूर, बार्शीटाकळी तालुक्याचे अध्यक्ष आयु. प्रविण वानखडे, पातुर तालुक्याचे अध्यक्ष आयु. राजेश सरकटे ,माजी अध्यक्ष आयु.रवीन्द्र दारोकार गुरुजी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष आयु. विजयजी जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्ह्याचे सरचिटणीस आयु. नंदकुमार डोंगरे यांनी केले.आभार प्रदर्शन आयु.संजय गवई यांनी केले. या चिंतन शिबिराला जिल्ह्याचे, तालुक्याचे, महानगराचे संपूर्ण पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका व उपासक-उपासिका बौद्धाचार्य मोठ्या संख्येने हे उपस्थित होते. असे एका पत्रकाद्वारे प्रचार ,प्रसार ,पर्यटन सचिव आयु. संजय गवई यांनी कळविले आहे.

===================================

सांगली -  भारतीय बौद्ध महासभेच्या  कामाची गती वाढण्यासाठी सांगली जिल्ह्याची पूर्व व पश्चिम अशा दोन विभागात विभागणी दिनांक 8, जुलै 2023 रोजी ओंकार हॉल, सांगली येथे झाली या अगोदर चिंतन शिबिर मध्ये एस .के .भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा स्टाफ ऑफिसर )यांनी चिंतन शिबिराचे उदघाटन पर  व प्रबोधनाची आचारसंहिता व हिशोब कसा असावा  या विषयावर बोलताना ,  कार्यकर्ता सक्षम कसा होईल , कोणती भूमिका घेतली पाहिजे ,सध्याच्या परिस्थितीत आपणांसमोर कोण कोणती आव्हाने आहेत याचा परिचय करून देत भारतीय बौद्ध महासभेचा बायोलॉज मधील कामकाज व नियम  सांगून उपस्थित यांना प्रेरित केले वा कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली . महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी भारतीय बौद्ध महासभेचे उद्देश आणि कार्यकर्त्यांनी पारपाडायची कर्तव्ये आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती अर्थात बी एस आय मिशन याविषयावर मार्गदर्शन केले , त्यांनी धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी चलो बुद्ध की ओर -जाती अंत या अभियान अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ  भिमराव य आंबेडकर  यांच्या नेत्रुत्वाखाली करोडो लोकाना बौद्ध धम्म दीक्षा देण्यासाठी कामाला लागावे  , प्रत्येक गावापर्यंत पोहचावे ,बुद्ध विहार व मंडळ जोडो अभियान राबवावे इत्यादी   8 गोल्डन मार्ग सांगितली दोन्ही जिल्ह्याचे काम चांगले होण्यासाठी भाग केलेचे सांगितले. जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर यांनी चिंतन शिबिर कशासाठी आवश्यक आहे ? सुरुवात कधी झाली सर्व कार्यकर्त्यांनी मन लावून या संस्थेचे काम करावे . संपूर्ण  भारत देशात बौद्धाचार्य ते राष्ट्रीय कार्यकारणी यांमधून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार कसा होत आहे. याचे विवेचन प्रास्ताविकात केले. शिबिरानंतर सांगली जिल्हा विभाजन करण्यात आले . पूर्व अध्यक्षपदी रुपेश तामगावकर आणि पश्चिम अध्यक्षपदी रविंद्र लोंढे यांची व इतर पदाधिकारी यांची निवड करण्यात आली व सभासद अभियान  मिरज तालुक्यापासून सुरू केले . यावेळी 47 आजीवन बौद्ध सभासद नोंदणी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस रतनजी तोडकर यांनी केले.शिबिरामध्ये जिल्ह्यातून





===================================

जिल्हा शाखा रायगड ( दक्षिण) चे चिंतन शिबीर उत्साहात संपन्न: भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद.डाॅ.भिमरावसाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यानूसार जिल्हा शाखा रायगड दक्षिण चे चिंतन शिबीर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक,महाड या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अनिल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी प्रमुख उपस्थिती पुज्यनिय भंते विशुध्दी बोधींसह सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक/ शिक्षिका,बौध्दाचार्य उपस्थित होते.प्रमुख विषयांचे मार्गदर्शन झाल्यानंतर सभासद पावती पुस्तके देण्यात आली.त्यानूसार ५० पावती पुस्तकांचे केंद्र व महाराष्ट्र राज्य शाखेचा भरणा १०,०००/ ( दहा हजार रुपये मात्र) चेक स्वरूपात व आजीवन सभासद १० यांचे दहा हजार रुपये रोख स्वरूपात घेण्यात आले. अध्यक्षीय भाषणानंतर शेवटी पुज्यनिय भंतेंचे आशिर्वाद व सरणंतय होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



===================================

जळगाव: येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व चे चिंतन शिबिर 'यशवंत भवन' मध्ये उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याकडून मार्गदर्शनासाठी नियुक्त करण्यात आलेले विभागीय सचिव के वाय सुरवाडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर 17 जून रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्राकडून नूतन कार्यकारणी गठीत करण्यात आली होती त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नंतर मुख्य मार्गदर्शक के वाय सुरवाडे यांनी चिंतन शिबिरामध्ये वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करून सविस्तर माहिती दिली. यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका यांची आचारसंहिता, पर्यटन प्रसार प्रचाराचे कार्य, संस्कार विभागाचे कार्य, वेगवेगळे शिबिर कसे घेण्यात यावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नंतर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र वानखेडे यांनी अध्यक्षीय भाषण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस आनंद ढिवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव यांनी मांडले.







===================================





जालना जिल्हा चिंतन बैठक

==≠=========================≠======






 दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया चद्रपुर पश्चिम जिल्हा शाखेच्यावतीने शनिवारी दी. 08.07.2023. रोजी दीक्षाभूमीवर चीतंन शिबिर आणि सभासद नोंदणी अभीयान प्रचंड उत्साहाने संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बी एच गायकवाड राष्ट्रीय सचिव दी बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी सांगितले की दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भिमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण भारतामध्ये अतिशय गतीने धम्म कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आहे. आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस पर्यंत दहा करोड लोकांना धम्म दीक्षा देण्यात येईल. आजच्या शिबिरामध्ये. प्रबोधनाची अचार सहींता. दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया चे मिशन  अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मक्रांती अधिक गतीमान करणे. तसेच हिशोबात येणाऱ्या अडचणी. या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शिबिराच्या सुरवातीला दीक्षाभूमी येथे वदंना घेण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नेताजी भरणे जिल्हा अध्यक्ष हे होते सुत्रसंचालन आद. खोब्रागडे यांनी केले. परीचय सपनाताई कुभांरे यांनी केला. तर प्रस्तावना संतोष सोनवणे यांनी केली. आभार सुजाता लाटे यानि मानले. तसेच शिबिराचे उदघाटन अशोक घोटेकर यांनी केले. शिबिरासाठी सर्व जिल्हा पदाधिकारी. तालुक्यातील पदाधिकारी आणि केद्रीय शिक्षक शिक्षिका प्रचंड प्रमाणात उपस्थित होते.

=============≠=====================


भारतीय बौद्ध महासभा शाखा पुणे जिल्हा पश्चिम व पिंपरी चिंचवड जिल्हा जिल्हा स्तरीय चिंतन शिबीर

प्रमुख मार्गदर्शक आयुणी.रागिणीताई पवार केंद्रीय सचिव महिला विभाग यांनी मार्गदर्शन केले











===================================

नंदुरबार जिल्हा शाखा चिंतन शिबिर.
====================================









≠=================================







लातूर (पश्चिम )-  भारतीय बौद्ध महासभा लातूर (पश्चिम ) जिल्हा शाखेच्या विद्यमाने चिंतन शिबिराचे आयोजन दिनांक 8जुलै,2023 रोजी बुद्ध गार्डन, लातूर येथे करण्यात आले होते.सदर शिबिराचे वर्षावास प्रवचन मालिका उदघाटन पर व प्रबोधनाची आचारसंहिता व शाखेचा हिशोब कसा असावा  यावर भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सचिव आयु बी एम कांबळे यांनी सखोल मार्गदर्शन केले व शेवटच्या विषया संदर्भात कार्यकर्त्यानी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.त्याचप्रमाणे आयु प्राध्यापक बापू गायकवाड लातूर जिल्हा माजी अध्यक्ष यांनी बी एस  आय मिशन तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. सदर शिबिराचे अध्यक्ष पद लातूर जिल्हा (प )अध्यक्ष आयु एम एम  बलांडे यांनी भूषवले व शिबिराचे प्रास्ताविक मांडले.आयु अशोक कांबळे सरचिटणीस  यांनी  सूत्रसंचालन केले तर आयु डॉ लहू वाघमारे   कोषाध्यक्ष यांनीआभार प्रदर्शन केले. यावेळी आयुनी ज्ञानेश्वरी बटवाड कोषाध्यक्ष, आयु हिराचंद अप्पाराव गायकवाड (उपाध्यक्ष, संस्कार ), आयुनी शारदा राजेंद्र हजारे (उपाध्यक्ष, महिला ), आयु राजाराम दादाराव साबळे (उपाध्यक्ष, संरक्षण ) व जिल्हा पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष व कार्यकारिणी ग्राम शाखा अध्यक्ष व कार्यकारिणी  व उपासक/ उपासिका शिबिरास मोठया संख्येने उपस्थित होते.


===================================





लातूर (पूर्व )-  भारतीय बौद्ध महासभा लातूर (पूर्व ) जिल्हा शाखेच्या विद्यमाने चिंतन शिबिराचे आयोजन दिनांक 9जुलै,2023 रोजी जेतवन बुद्ध विहार, हंगारगा, उदगीर येथे करण्यात आले होते.सदर चिंतन शिबिराचे व वर्षावास प्रवचन मालिका उदघाटन पर व प्रबोधनाची आचारसंहिता, बी एस आय मिशन तथा डॉ बाबासाहेब डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान कशी करावी?व शाखेचा हिशोब कसा असावा  यावर भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सचिव आयु बी एम कांबळे यांनी सखोल मार्गदर्शन केले व शेवटच्या विषया संदर्भात कार्यकर्त्यानी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.त्याचप्रमाणे सदर शिबिराचे अध्यक्ष पद लातूर जिल्हा (पूर्व )अध्यक्ष आयु एस. डी. कांबळे यांनी भूषवले व प्रास्ताविक आयुनी करुणाताई कांबळे उपाध्यक्ष, महिला यांनी केले तर सूत्रसंचालन आयु डॉ विश्वाम्बर धर्मा गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु प्राध्यापक सी. एम कांबळे यांनी केले. याप्रसंगी पूज्य भदंत महाविरो यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले व चिंतन शिबिराचे विषय ऐकून प्रभावीत झाले व  त्यांची भारतीय बौध्द महासभे मध्ये सामील होण्या साठी आपली तयारी दाखवली. यावेळी श्रीमंत अर्जुनराव कांबळे, कोषा ध्यक्ष व सर्व जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेविका आयुनी उषा कांबळे, जेतवन बुद्ध विहाराचे निर्माते आयु मनोहर कांबळे,सर्व तालुका अध्यक्ष व कार्यकारणी ग्राम शाखा अध्यक्ष व कार्यकारणी व उपासक/ उपासिका शिबिरास मोठया संख्येने उपस्थित होते.

==≠================================ 

आदरणीय डॉ. भीमराव य.आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा (उत्तर) विभागाचे श्रीरामपूर येथील लुम्बिनी बुद्ध विहारात आज चिंतन शिबिराचे आयोज करण्यात आले होते. 

आदरणीय सुगंधराव इंगळे जिल्हाध्यक्ष अहमदनगर उत्तर विभाग यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन शिबिर पार पडले. मुबंई प्रदेशाचे सरचिटणीस आदरणीय रवींद्र गवई साहेब यांनी चिंतन शिबरामध्ये तीन विषयावर मार्गदर्शन केले. 'पदाधिकाऱ्यांनी धम्म प्रचार प्रसार करतांना कोणत्या प्रकारची आचार संहिता पाळली पाहिजे', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्म क्रांती कशी करावी' व 'भारतीय बौद्ध महासभेच्या विविध शाखेमध्ये कार्यालयीन कामकाज कसे करावे' या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. 

त्याचप्रमाणे आदरणीय ऍडव्होकेट मोहन साहेबांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी नव्याने बौद्धाचार्य परीक्षा पास झालेले आदरणीय राहुल व आदरणीय कडूबाळ तुपे यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.  तसेच कार्यक्रमाचा समारोप आदरणीय संदीप त्रिभुवन, केंद्रीय शिक्षक यांनी केला. सूत्रसंचालन आदरणीय सी. एस. बनकर यांनी केले.

या शिबिराचा भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धम्म प्रचार प्रसार करतांना खूप फायदा होणार आहे.





===================================

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रायगड उत्तर चे चिंतन शिबीर व सभासद नोंदणी मोहीम उद्घाटन उत्साहात संपन्न: भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रायगड उऐचए चिंतन शिबीर व सभासद नोंदणी मोहीम उद्घाटन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन,रसायनी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आयु.विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.उद्घाटन महाराष्ट्र राज्य शाखेचे सरचिटणीस सुशील वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती केंद्रीय महिला सदस्या सुनंदा ताई वाघमारे यांची होती.यावेळी १४८ सभासद नोंदणी करण्यात आली त्यापैकी १९ सभासदांनी आजीवन सभासदत्व आणि नोंद केली.जिल्हा शाखेला ५० पुस्तकांचे वाटप करण्यात आले.त्याचे केंद्र व महाराष्ट्र राज्य शाखेचा भरणा १०,०००/( दहा हजार रुपये मात्र) व १९ आजीवन सभासदांचे १९,०००/ ( एकोणीस हजार रुपये मात्र) असे एकूण २९,०००/( एकोणतीस हजार रुपये मात्र) रोख स्वरूपात प्राप्त करण्यात आले.शेवटी सरणंतय होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



===================================

सप्रेम जयभीम, 

अहमदनगर जिल्हा दक्षिण विभाग तर्फे जिल्हा स्तरीय चिंतन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले अध्यक्ष स्थानी आद.भगवंत गायकवाड सर होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई प्रदेश सरचिटणीस  आद.रविंद्र गवई साहेब होते.प्रथमता गवई साहेबांनी "प्रबोधनाची आचारसहिता" या विषयावर मार्ग  दर्शन केले नंतर भगवंत गायकवाड सरां नी धम्म क्रांती गतिमान कशी करावी यावर प्रबोधन केले.व  शेवटी

 सरचिटणीस राजेंद्र साळवे यांनी संस्थेचे कार्यालयीन कामकाज व लेखा जोखा या विषयावर मार्ग दर्शन केले. पदाधिकारया  कडून आलेल्या  शंका चे निरसन आद. गवई साहेबांनी अगदी उत्तम पद्धतीने हाताळले.या प्रसंगी संस्थेच्या काही पदाधिकारयांनी आजीवन सभासद  स्विकारले. तसेच संस्थेचे सभासद वाढीसाठी सर्वांनी मनापासून जोरात मोहीम राबविण्याचे ठरवले.या शिबिरात जिल्ह्यातील पदाधिकारी आयु.माधवराव चाबूक स्वार, डी एस कांबळे, वीरेंद्र पवार, ,केंद्रीय शिक्षिका,शिक्षक प्रशांत चौहान, सुनिता ताई गायकवाड, सिंधू साळवे, सुरेखा सदाफूले, अरूणा सदाफूले, तसेच तालुक्यातील पदाधिकारी राहूल कांबळे, राम गायकवाड, दिपक पाटोळे, रविंद्र घोडके, बाबासाहेब वाघमारे, गिरीश गायकवाड, नवनाथ रामफळे,गौतम पाचारणे, अशोक आवहाड,पंडीत मोरे, पंडीत कांबळे, बाळासाहेब धस ,अरूण भोंगळे, हुसळे सर,संतोष गायकवाड, गोरख केदारे ,धोंडिबा राक्षे सर,पोपट जाधव सर,लक्ष्मण माघाडे, इत्यादी बहुसंख्येने उपासक,व उपासिका उपस्थित त होते.सुत्रसंचालन राजेंद्र साळवे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन रविंद्र कांबळे यांनी केले. 

अशा पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणात चिंतन शिबिर यशस्वी पार पडले .शेवटी धम्म पालन गाथा घेऊन कार्य क्रमाची सांगता करण्यात आली. 🙏💐💐🙏






===================================



       


 

        _दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभा   यवतमाळ जिल्हा पूर्व व पश्चिम चे वतीने आज दि. 9/7/2023 ला  बोधिसत्व बुध्द विहारात चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पुजन  पुष्पहाराने मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करुन करण्यात आले. आणि सामुहिक त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली...,_

       _कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रवि भगत होते या कार्यक्रमाचे उद्घाटन भगवान इंगळे अध्यक्ष यांनी केले  मंचावर राहुल राऊत कोषाध्यक्ष उपस्थित होते...,_

     _या कार्यक्रमाचे मार्गदर्श व्हि.डी.हिवराळे केंद्रीय शिक्षक मुंबई यांनी कार्यकर्त्यांची आचारसंहिता व हिशोबातील एकसुत्रता लेखापध्दती सभासद मोहीम या विषयावर प्रकाश टाकला रूपेश वानखडे-सरचिटणीस यांनी धम्मक्रांती कशी गतीमान करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे संचलन सुध्दा केले. यावेळी यवतमाळ -दारव्हा-दिग्रस-पुसद-उमरखेड-महागाव - आर्णि-घाटंजी - वणी -कळंब- पांढरकवडा- मारेगाव ईत्यादी तालुक्यातील पदाधिकारी केंद्रीय शिक्षक तथा केंद्रीय शिक्षिका व बौद्धांचार्य उपस्थित होते.या सर्व तालुका पातळीवर सभासद मोहीम राबविण्यासाठी सभासद पावती पुस्तकाचे वितरन केले. या कार्यक्रमाचे आभार रंजनाताई ताकसांडे उपाध्यक्ष जिल्हा शाखा यवतमाळ यांनी केले शवटी सरणतयं गाथेने या कार्यक्रमाची सांगता झाली...,_

==================================






*नाशिक जिल्हा "भारतीय बौद्ध महासभा" आयोजित जिल्हास्तरीय चिंतन शिबीर जेलरोड - नाशिकरोड याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले....!!*


◆प्रमुख मार्गदर्शक◆

आद. *आयु.नि.वैशालीताई आहिरे*

भारतीय बौद्ध महासभा प्रदेश सचिव


◆ अध्यक्षस्थानी◆

*आद.प्रविण बागुल*

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष


◆ सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन◆

*आद.राजूभाऊ जगताप*

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा महासचिव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

● आपला धम्मबंधु ●

*बौध्दाचार्य सोमनाथ गायकवाड*

भारतीय बौद्ध महासभा जिल्हासचिव

मो.9604115788

🟦🟨🟩🟪🟦🟥🟨🟩🟧⬛

नांदेड उत्तर जिल्हा शाखेत चिंतन शिबिर संपन्न.



===================================

*दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया* भारतीय बौद्ध महासभा शाखा रत्नागिरी जिल्हयाचे वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा व दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भिमराव आंबेडकर ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचे आदेशानुसार जिल्हास्तरीय एक दिवशीय चिंतन शिबीर खेडशी हायस्कूल खेडशी नाका  रत्नागिरी येथे संपन्न करण्यात आले.

मुख्य मार्गदर्शक आद.प्रदिप कांबळे गुरुजी चैत्यभूमी व्यवस्थापक तर अध्यक्ष स्थानी जिल्हा अध्यक्ष अनंत सावंत होते.

सर्व प्रथम तथागत भगवान बुद्ध व बोध्दिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे प्रदीप पूजन,पुष्प पूजन, सुगंधी पूजन करून सामूहिक त्रिसरणासह पंचशील घेण्यात आले तदनंतर प्रमुख मार्गदर्शक आद प्रदीप कांबळे गुरुजी व उपस्थित तालुका शाखांचे अध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले . प्रमुख मार्गदर्शक आद.प्रदिप कांबळे गुरुजी यांनी प्रबोधनाची आचारसंहिता व हिशोब कसे लिहावे या विषयांची मांडणी आपल्या ओघवत्या वाणीने सहज सुलभ व सोप्या भाषेत मांडून सर्वाँना मंत्रमुग्ध केले सर्वच विषयांना खूप चांगला न्याय दिला तर जिल्हा अध्यक्ष आद अनंत सावंत यांनी डॉ बाबासाहेबांची धम्मक्रांती गतीमान कशी करावी या विषयावर बहूमोल मार्गदर्शन केले .यावेळी जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, बौद्धचर्या केंद्रीय शिक्षक शिक्षिका सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कोषाध्यक्ष आद विजय कांबळे गुरुजी रत्नागिरी तालुका अध्यक्ष आद  विजय मोहिते गुरुजी जिल्हा कार्यालयीन सचिव आद प्रदीप जाधव गुरुजी जिल्हा संस्कार विभाग प्रमुख डॉ  जनार्दन मोहिते गुरुजी, आद. प्रकाश कांबळे गुरुजी, महावीर कांबळे गुरुजी, संजय कांबळे गुरुजी, जिल्हा संघटक विजय जाधव गुरुजी यांनी विशेष मेहनत घेतली.तर आद महेंद्र गमरे गुरुजी यांनी भोजन व्यवस्था उत्तमरीत्या पार पडली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हा सरचिटणीस आद एन.बी.कदम यांनी केले



==================================


*भारतीय बौद्ध महासभा  जिल्हास्तरीय चिंतन शिबिर संपन्न .* 

      भारतीय  बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने दिनांक 9 जुलै 2023 सुभेदार रामजीबाबा आंबेडकर सभागृह, राहुल नगर, या ठिकाणी जिल्हास्तरीय चिंतन शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन केंद्रिय प्रशिक्षण विभागाचे केंद्रिय साचिव आद. अनिल मनोहर साहेब यांनी केले.यावेळी जिल्हा शाखेचे अध्यक्ष आद. अशोकराव कांबळे ,सरचिटणीस आयु. डि. आय. खेडकर ,  व कोषाध्यक्ष आयु. विश्वनाथ झोडपे,  तसेच भारतीय बौद्ध महासभा भिक्षू संघाचे चैत्यभुमीचे सदस्य  पूज्य भन्ते पी. धम्मानंदजी  हे उपस्थित होते. 

       या चिंतन शिबिरामध्ये आद. अनिल महोहर साहेब यांनी प्रबोधनाची आचारसंहिता तसेच धम्म चळवळ गतिमान कशी करता येईल? या विषयावर मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे  दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मिशन या विषयावर मार्गदर्शन केलं. संस्थेच्या शाखांनी हिशोब कसा ठेवावा शंका समाधान  सांगितले. शिबिराला जिल्ह्याचे उत्तरचे आद, शामराव जोगदंड व सरचिटणीस आद. नरेंन्द्र सोनुले तसेच  प्रचार, प्रसार, पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष तथा विभागाचे प्रमुख आयु. बाबासाहेब धबाले, जिल्ह्याचे महिला सचिव भोरगेताई,  जिल्ह्याचे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष के. वाय. दवंडे , जिल्ह्याचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष आयु. आनंदा भेरजे, व्ही. व्ही. वाघमारे, कार्यालयीन सचिव  नागसेन हत्तीअंबीरे , डि, के. टोंम्पे , शिवाजीराव वाव्हळे , डि. एन. बहादुरे, तसेच तालुका अध्यक्ष शिवाजी लाटे, तानाजी आचार्य, दिलीप काकडे, नवनाथ साळवे, गायाकवाड  साखाराम पंडित , रमेश जोंधळे ,  हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे संस्कार विभागाचे सचिव आयु. एस. एस. साळवे,  हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष आयु. विश्वनाथ झोडपे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्ह्याचे सरचिटणीस आयु. डि. आय. खेडकर  यांनी केले.या चिंतन शिबिराला जिल्ह्याचे, तालुक्याचे, महानगराचे संपूर्ण पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका व उपासक,बौद्धाचार्य मोठ्या संख्येने हे उपस्थित होते. शेवटी सरणत्तय घेउन कार्यक्रम संपवण्यात आला.


================================== 


=*🙏भारतीय बौद्ध महासभा🙏*


*संस्थापक :बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर*

*राष्ट्रीय संरक्षक :आद. महाउपासिका मिराताई आंबेडकर*

*राष्ट्रीय अध्यक्ष :आद. चंद्रबोधि पाटिल*

*ट्रस्टी चेअरमन :आद.डॉ. हरिष रावलिया*

*राष्ट्रीय कार्याध्यक्ष :आद. भिमराव यशवंतराव आंबेडकर*

*राष्ट्रीय सल्लागार :आद. ऍडव्होकेट प्रकाश यशवंतराव आंबेडकर* 

==================================

            *शाखा :नासिक जिल्हा पूर्व*


*भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नासिक पूर्व चे चिंतन शिबिर उत्साहात संपन्न झाले*

भारतीय बौद्ध महासभा शाखा नासिक जिल्हा पूर्व चे चिंतन शिबिर आय.एम. ए. हॉल मालेगाव येथे आयु. गौरव पवार (जिल्हाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . चिंतन शिबिराला मार्गदर्शक म्हणून नियुक्त केलेले केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख आयु.नी सुप्रिया ताई कासारे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.


*आयु.नी सुप्रिया ताई कासारे (केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख)* यांनी प्रबोधनाची आचार संहिता या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की महामानव यांचे विचार सांगताना कोणतीही भेसळ करु नये , कोणत्याही धर्मावर टीका टिप्पणी करायची नाही , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करणे आर्थात बी एस आय मिशन या विषयावर मार्गदर्शन करताना धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी चलो बुद्ध की और या जाती अंत चळवळ अभियाना अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांना बौद्ध धम्मा ची दीक्षा देण्यासाठी कामाला लागावे.


प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात बुद्ध विहार नोंदणी करणे, बुद्धविहार , स्थानिक मंडळ जोडो अभियान राबविणे, पदाधिकारी यांनी लीच्छावी चे ७ नियम पाळून काम करणे,सर्वांनी एकत्रित समन्वयाने काम करणे नवदिक्षित झालेल्या लोकांबरोबर रोटी बेटी व्यवहार करणे त्यांना संघटनेत पसक्रिय सहभाग करून घेणे ,समाजातील  डॉक्टर / वकील यांच्या सोबत बैठक घेऊन समाजाला फायदा होईल असे अभियान राबविणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत सहायता व सल्ला केंद्र निर्माण करणे कार्यान्वित  . 

शाखांचा आर्थिक हिशोब कसा ठेवावा या विषया वर प्रत्येक शाखांनी कॅशबुक, प्रोसेडींग बुक,आवक / जावक रजिस्टर , फाईल, आदेश फाईल , व्हाउचर , भरणा बुक,  जमा खर्च अहवाल संस्थेच्या बॉयलॉज प्रमाणे करणे असे मार्गदर्शन करताना सांगितल.


कार्यक्रमाचे जिल्हाध्यक्ष गौरव पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, बौद्ध धम्म चळवळ ही आपल्याला गावतिथे पर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एक दिलाने कामाला सुरुवात करावी घर तिथे संस्थेचा पदाधिकारी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे.व भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी संपूर्ण भारतात धम्म चळवळीला गती देण्यासाठी जे आठ गोल्डन मार्क सांगितले होते त्याचा अवलंब करून आपल्या भागातील विहारांना संस्कार केंद्र द्वारे सक्रिय करून येणाऱ्या नव पिढीवर धम्म संस्कार शिबिराच्या माध्यमातून संस्थेत संस्थेतर्फे दिले जाणाऱ्या 24 प्रकारचे शिबिराचा आयोजन नियोजन सुरू करायचे सध्या सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या धम्म क्रांती पुढील आव्हाने हे जनमानसात जाऊन सांगायचे आहे. भारतीय बौद्ध महासभेतर्फे चलो बुद्ध की और या अभियान अंतर्गत प्रत्येक कुटुंबात बौद्ध कुटुंब नोंदणी व सदस्य अभियान याला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायचाय वाढणी आहे. आपापल्या भागाचा सर्वे करून सदस्य नोंदणी अभियान यशस्वी कसे होईल यासाठी सर्वांनी आराखडा तयार करून वर्षावास कालावधीत किमान दहा हजार सदस्य पूर्ण करण्याचा संकल्प आपण सर्व मिळून करूया. सभासद मोहीम यशस्वी करायची आहे. यावेळी संस्थेच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेचे अ जीवन सदस्य म्हणून 65 पदाधिकारी यांनी नाव व प्रथम सदस्य नोंदणी अभियान म्हणून 2500 पावतीचे वितरण करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्ह्याचे सरचिटणीस सतिष गांगुर्डे यांनी केले ,आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष जयवंत निकम यांनी केले.


चिंतन शिबिरास  पदाधिकारी उपस्थित होते. संदीप भास्कर खरे ,रमेश देवमन खरे, शांताबाई भालेराव, 

 सुजाताताई पटाईत , लतिकाताई निरभवणे ,वाल्मीक कापडे, 

 डॉ.मोतीराम पानपाटील , प्रदीप तुकाराम शिंदे ,प्रकाश दाणी ,

 नलिनीताई गायकवाड ,सिंधुताई म्हसाने ,प्रतिभाताईधिवरे ,

 काशाताई जाधव ,शोभाताई निकम , माणिक कटारे, भास्कर गांगुर्डे ,जगन्नाथ केदारे, मच्छिंद्र भोसले ,वाल्मीक गरुड, योगेश खैरे,  विलास भालेराव, आनंद मैराळे,संजय मोरे, बापू सवाखंडे, 

 विठाताई धिवर,  भास्कर रत्नाकर सोनवणे ,दिपक  यशोद, मंगला म्हसदे,  शालिनीताई धनराव , डॉ. सिद्धार्थ जगताप ,के एस महिरे, लक्ष्मी केदारे ,

 उषाताई पठाडे, राजश्री उत्तम सोनवणे ,पद्माताई जगन तायडे, 

रंजनाताई उबाळे ,उत्तम खरे, 

 यमुनाताई केदारे ,ज्योती अतुल जगताप,  उषाताई गायकवाड , मायाताई त्रिभवन, लताबाई उबाळे, रवींद्र निकम ,नानूताई सुळे, इंदुबाई पगारे, उषाताई संसारे,  इंदुबाई उबाळे, वाल्मीक देवरे ,मंगेश निकम, अभिजित पवार, विशाल पवार , संतोष धनराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.








=================================

शाखा औरंगाबाद जिल्हा  आयोजित

 *जिल्हास्तरीय चिंतन शिबीर व बौध्द सदस्य नोंदणी अभियान 

सविनय जयभीम,

बंधू व भगिनींनो आपल्या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भिमरावसाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच केंद्रीय महाराष्ट राज्य  आदेश पत्र क्रमांक ५०/२०२३ दि.२२/६/२०२३ घ्या आदेशानुसार आपणास कळविण्यात येते की, भारतीय बौद्ध महासभा औरंगाबाद  जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हास्तरीय चिंतन शिबीर *रविवार दिनांक ९ जुलै २०२३ रोजी* सकाळी ११.०० ते 5.०० वाजेपर्यंत

 *डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय औरंगाबाद *  येथे संपन्न झाले. 

सदरील शिबिरात सर्व श्रामणेर बौध्दाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका, जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी, सर्व तालुका व शहर शाखांचे सर्व पदाधिकारी यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवून उपस्थित राहीले.

आपल्या उपस्थितीची नोंद केंद्रीय कार्यालयात होणार आहे.

 *चिंतन शिबीर अध्यक्ष* 

आद.किशोर जोहरे  (जिल्हाध्यक्ष)

भारतीय बौद्ध महासभा औरंगाबाद 

*चिंतन शिबीराचे प्रमुख मार्गदर्शक*

*आद. रविंद्र इंगळे * 

(संरक्षण उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई )

 *आद. के.आर.पडवळ* (विभागीय सचिव तथा वरिष्ठ केंद्रीय शिक्षक )

 *सुत्रसंचलन* 

नानासाहेब बनकर (अध्यक्ष औरंगाबाद ग्रामीण)

 *शिबीर प्रास्ताविक* 

आद.एस.टी काळे  (संस्कार उपाध्यक्ष )

 *आभारप्रदर्शन* 

आद. अनिल राऊत  (संरक्षण उपाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम )

 *शिबीराचे विषय* 

१) प्रबोधनाची आचारसंहिता

(काय व किती बोलावे, काय करावे, कसे करावे)

२) दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कार्य पद्धती

३) बी. एस. आय. मिशन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक़ांती गतिमान करणे.

४) शाखेचा हिशोब कसा ठेवावा.

वरील विषयावर सविस्तर मार्गदर्शन शिबिरात झाली  व अनेक विषय हाताळले गेले. तसेच शिबीरमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे अजीवन सभासदत्व खालील धम्म बांधवांनी रू.1000/- भरून स्विकारले. 

1) संतोष पांडुरंग भिवसने 

2) राजेंद्र आसाराम पगारे 

3)रमेश नारायण बनसोडे 

4)जयवंत नामदेव गायकवाड 

5)भास्कर गंगाधर म्हस्के 

6) चंद्रकांत बाजीराव लहाने 

7) गंगाताई मुकुंदा सुरडकर 

8) अरविंद जयदेव चक्रनारायण 

9) सरस्वती दिपक काशिद 

10) मिलिंद प्रकाश खंडेराव 

11) संघपाल साहेबराव इंगोले 

12) किशोर बजरंग जोहरे इ.


अशा प्रकारे सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. 


आपला धम्मबंधू

जयवंत गायकवाड (हिशोब तपासनिस तथा मेजर )

भारतीय बौद्ध महासभा औरंगाबाद  जिल्हा.


प्रत -

आद.एस. के.भंडारेसाहेब,( राष्ट्रीय उपाध्यक्ष)

आद.भिकाजी कांबळे साहेब (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य )

  यांना माहितीसाठी सविनय सादर.





=================================


*अमरावती जिल्हा (पश्चिम)*

जिल्हा स्तरीय चिंतन शिबिर तथा

सभासद नोंदणी अभियान सभा

*रविवार दिनांक- 09 जुलै ,2023* ची क्षण चित्रे. सदर शिबिरात सुमारे 56 पदाधिकारी/ केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, समता सैनिक दल सैनिक उपस्थित होते. दिनांक 9 रोजी सकाळपासुन च सतात धार पाऊस सुरू असल्यामुळे उपस्थितीवर परिणाम झाला. व त्यामुळे उपस्थिती कमी होती. तःतपी चिंतन शिबिर उत्सहात संपन झाले.

सदर शिबिरात भा. बौध्द महासभा सभासद प्रत्येकी रू.1000/- चे *10* सभासद

रोख रक्कम देवून आजीव सभासद झालेले आहेत.

पावती पुस्तके प्राप्त न झाल्यामुळे त्यांना आज रोजी 

पावत्या देता आलेल्या नाहीत.

पावती पुस्तके प्राप्त झाल्या नंतर त्यांना पावत्या देण्याच्या सूचना

जिल्हा अधक्ष यांना देण्यात आल्या आहेत.

  आपला नम्र

विजयकुमार चौरपागर,

विभागीय सचिव, राज्य शाखा,

भारतीय बौद्ध महासभा.

प्रतीलीपी:-

1)मा.एस.के.भंडारे साहेब, राष्ट्रीय उपाधक्ष

2)मा.एस.एस.वानखेडे साहेब,

राष्ट्रीय सचिव

3)मा.भिकाजी कांबळे साहेब,

राज्य अधक्ष, महाराष्ट्र.

 यांना माहितीस सविनय सादर.





==============≠===================


-बातमी-                                               *दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य शाखा मुंबईच्या*    आदेशान्वे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने दिनांक ९ जुलै २०२३ रोज रविवारला सकाळी ११.००वाजता  पासून ते ५.०० वाजता पर्यंत सद्धम्म बुद्ध विहार, वैशाली नगर, भंडारा येथे *आद.प्राणहंस मेश्राम भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा भंडारा चे अध्यक्ष* यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेला होता. शिबिराचे उद्घाटन आद.सी.के.लेंढारे सर तालुका अध्यक्ष लाखनी यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून व उद्घाटकीय भाषण करून  उद्घाट  केलेले आहे त्यामध्ये *१)प्रबोधनाची आचारसंहिता ,२) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धमक्रांती गतिमान कशी करावी? अर्थात बीएसआय मिशन ३) शाखा कार्यालयीन कामकाज व शाखेचा हिशोब* या विषयांवर राज्य कार्यकारिणीचे कार्यालयीन सचिव *आद. आनंदा नामदेव सातपुते गुरुजी मुंबई* यांनी प्रबोधनाचे आचारसंहिता हा विषय अगदी उत्कृष्टपणे स्पष्टीकरण स्पष्टीकरण करून समजावून सांगितला त्यानंतर *आयु.भुरे शुक्रवारी वार्ड भंडारा येथील ओबीसी समाज* यांना धम्मदीक्षा आद. आनंदा सातपुते गुरुजी यांच्या द्वारा 22 प्रतिज्ञा देण्यात आली आणि भंते महाथेरो डॉक्टर बुद्धरत्न यांनी त्रिसरण पंचशील व आशीर्वाद दिले उर्वरित दोन्ही विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची प्रास्ताविका डॉ. रेवाराम खोब्रागडे यांनी केले सूत्रसंचालन आद. हरकर उके महासचिव यांनी केले तर आभार प्रदर्शन पृथ्वीराज वैद्य यांनी केले. शेवटी पू.भन्ते डॉक्टर बुद्धरत्न यांनी आशीर्वाद दिला आणि सरणतय घेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या चिंतन शिबिराला जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष आदरणीय एम डब्ल्यू दहिवले , बुद्ध विहार समीतीने सचिव आयु.रमेश जांगळे ,आयु.अशोक रंगारी सर,सुमन कानेकर , केंद्रीय शिक्षिका -अनिता नंदागवळी ,केशवजी रामटेके ,आणि जिल्ह्यातील सात तालुक्यातील अध्यक्ष- सरचिटणीस- कोषाध्यक्ष व त्यांची संपूर्ण कार्यकारणी तसेच शहर कार्यकारणी पदाधिकारी आणि जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी तसेच केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, बोधाचार्य व माजी श्रामणेर उपस्थित प्रामुख्याने उपस्थित होते.









=================================

*संस्थेच्या कामात हिशोबाची पारदर्शकता व प्रत्येक बौद्धाला सभासद करणे यातूनच धम्मकार्य गतिमान होणार*..........

 जिल्हा शाखा  पुणे पूर्व व पुणे शहर  - दि बुद्धिस्टा सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव साहेब यशवंतराव  आंबेडकर त्यांच्या मार्गदर्शनाने संस्थेचे कामकाज गतिमान करण्यासाठी चिंतन शिबिर महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येत महिला विभाग सचिव व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आयुष्मान भारतीताई शिराळ यांनी जिल्हा तालुका पदाधिकारी यांना दिवसभराच्या चिंतन शिबिरामध्ये अधिकाऱ्यांची जबाबदारी, कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाची पद्धत, व अभ्यासपूर्व प्रवचनकारांची फळी निर्माण करणे याबाबतचे मार्गदर्शन दिनांक नऊ जुलै 2023 रोजी स्थळ मिलिंद बुद्ध विहार ताडीवाला रोड पुणे येथे  मार्गदर्शन केले जिल्हा शाखा पुणे शहर चे अध्यक्ष सिद्धार्थ नागदेवते कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटन करून चिंतन शिबिरा सुरुवात केली मी जिल्हा पूर्वचे अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी स्वागत, सूत्रसंचालन सरचिटणीस  राजरतन थोरात, अनुमोदन जिल्हा कोषाध्यक्ष  संतोष आरवडे व दुपारच्या सत्राचे प्रवचन एडवोकेट सुधाकर सरदार धम्मक्रांती गतिमान करणे  या विषयावर संस्थेच्या कामाचा इतिहास आताच्या कामाची पद्धत त्यावर प्रकाश टाकला आभार प्रदर्शन जिल्हा कोषाध्यक्ष दिलीप कांबळे गुरुजी त्यांनी मानले

 या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा पूर्व चे चंद्रकांत गायकवाड व अनिल सोनवणे, सुजाता ताई ओव्हाळ, पुणे शहर जिल्ह्याचे मोहन रोकडे, दिलीप सरोदे, सुनीताताई रोकडे  व तालुका शाखांमध्ये धानोरी तालुक्याचे अध्यक्ष रवींद्र बाराथे, पूर्वावेलीचे विजय गायकवाड, रवींद्र कदम बारामतीचे बापूराव लोंढे दत्तवाडी चे समाधान भगत, दौंड चे श्रीकृष्ण मोरे, व अनंत अनेक तालुक्याचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे मेजर, ऑफिसर्स व सैनिक उपस्थित होते

   कार्यक्रमात प्रामुख्याने आजीवन सभासद जिल्हा शाखा पुणे पूर्वचे 9 सभासद यांचे 9000   रुपये पुणे शहर जिल्हा शाखेचे 8 सभासदांचे 8000 रुपये + सभासद पावती चे पाच हजार रुपये  जमा करण्यात आले दोन्ही जिल्हा शाखांना 25  सभासद पुस्तके दान देण्यात आली सक्रिय सभासदांची यादी आणि  दानदाते यादी लवकरच केंद्र जमा करण्यात येणार आहे असे प्रतिपादन दोन्ही जिल्हाध्यक्ष यांनी दिले बहुसंख्य उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम नियोजनबद्ध पार पाडण्यात आला










===≠===============================


भारतीय बौद्ध महासभा जि.बीड (पूर्व) शाखेचे चिंतन शिबीर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न !            भारतीय बौद्ध महासभा जि.बीड (पूर्व) शाखेचे चिंतन  शिबीर नालंदा विहार , मिलिंद नगर,अंबाजोगाई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले . चिंतन शिबिरासाठी आद. अशोक केदारे गुरुजी (केंद्रीय कार्यालयीन सचिव) उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आद.बी.बी.धन्वे (जिल्हाध्यक्ष) यांनी भूषविले. आद.अशोक केदारे गुरुजी यांनी ' 'प्रबोधनाची आचार संहिता '  व 'कार्यालयीन कामकाज व लेखापद्धती' या  दोन विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.जिल्हाध्यक्ष व केंद्रीय शिक्षक आद.बी.बी.धन्वे यांनी 'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान कशी करावी? अर्थात बी एस आय मिशन ' या विषयावर व आद.एस.बी.मोरे (केंद्रीय शिक्षक व जिल्हा संस्कार उपाध्यक्ष) यांनी 'हिशोबात येत असलेल्या अडचणी,शंका-समाधान चर्चासत्र ' या विषयवार मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आद.डॉ.एस.व्ही.बोबडे (जिल्हा सरचिटणीस) यांनी तर प्रास्ताविक आद. प्रा.एस.बी.शिंदे(जिल्हा कोषाध्यक्ष) यांनी केले.आदर्शांच्या पूजना नंतर सामुदायिक वंदना  झाल्यानंतर आद.एम.वाय.काळे (जि.हिशोब तपासणीस) यांनी 'अतिथी हा जयभीम  घ्यावा ' हे स्वागत गीत गाउन सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या चिंतन शिबिरास बीड (पूर्व) जिल्ह्यातील अंबाजोगाई,केज,परळी,माजलगाव व धारूर तालुका व शहर शाखांचे पदाधिकारी,समता सैनिक ,केंद्रीय शिक्षक-शिक्षिका,बौद्धाचार्य उपस्थित होते.या चिंतन शिबिरात एकूण सात पदाधिकारी 1000रू.भरून आजिवन सभासद झाले.सर्व शहर,  तालुका व जिल्हा पदाधिकारी यांनी स्वतः आजिवन सभासद  होऊन, जास्तीत जास्त सभासद बनविण्याचा संकल्प केला.सभासद पावती पुस्तकांचे सर्वांना वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार आद.के.व्ही.साळवे (जि.पर्यटन सचिव)यांनी मानले.सरणत्तयं होऊन चिंतन शिबिराची सांगता झाली.










===============≠=≠===============


No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...