Wednesday, August 16, 2023

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या ट्रस्टी वादात न पडता धम्माचे काम वाढवावे -डॉ भीमराव य आंबेडकर

              दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

संस्थापक अध्यक्ष  :  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संरक्षक   :   महाउपासिका मीराताई आंबेडकर

ट्रस्टी चेअरमन   :  डॉक्टर हरीश रावलिया

राष्ट्रीय कार्याध्यक्ष :डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

स्वातंत्र्य दिनी, ठाणे जिल्हा शाखेचा ३६ वा वर्धापन दिन डॉ  भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याच नेतृत्वावर विश्वास.


दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या ट्रस्टी वादात न पडता धम्माचे काम वाढवावे.

-डॉ भीमराव य आंबेडकर 

 चंद्रबोधी पाटील स्वतः अधिकृत नाहीत त्यांना काढायचा कोणताही अधिकार नाही.

  -कॅप्टन प्रविण निखाडे 

जर 70℅ जनता डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या पाठीशी आहे तर ..  त्यांच्याशी न बोलता निर्णय कसा घेतला ?

 -एस के भंडारे 

असलेले कागद कपाळाला लाऊन फिरा.

-बी एच गायकवाड 


कल्याण ( दि.15/8/2023) - महत्त प्रयत्नाने मिळालेले भारतीय स्वातंत्र्य पुढील हजारो वर्षे टिकले पाहिजे , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने आपले हक्क आणि अधिकार* *मिळविलेले आहेत ते टिकविण्यासाठी आपणांस काम काम करावे लागेल असे सांगून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या ट्रस्टी मधील वादात आपण पडू नये ,केलेल्या पत्रव्यवहाराला मी केराची टोपली दाखवितो अशी टिप्पणी करून कोणाचे किती काम आहे याची माहिती लवकरच देऊ , कार्यकर्त्यांनी धम्माचे  काम वाढविण्याच्या कामाला लागावे ट्रस्टीच्या वादात पडू नये अशा सूचना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर ( ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष ,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व राष्ट्रीय अध्यक्ष , समता सैनिक दल  ) यांनी अशा सूचना , दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया ( भारतीय बौद्ध महासभा ) या धम्मसंस्थेच्या ठाणे जिल्हा शाखेचा ३६ वा वर्धापन दिनी सूचना दिल्या.


 कॅप्टन प्रविण निखाडे(ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव ) यांनी, चंद्रबोधी पाटील यांनी त्यांच्या  भोपाळच्या बैठकीत केलेल्या वक्तव्याबाबत सविस्तर  खंडन  करून  चंद्रबोधी पाटील जी  स्वतःच  अधिकृत नाहीत त्यामुळे  त्यांना कोणाला  काढायचा अथवा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा  कोणताही अधिकार नाही तो अधिकार ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया यांना आहे , ट्रस्ट चा अधिकार एखाद्या Affidavit /POA ने दिला  जात नसतो असे सांगितले.


एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख ) यांनी,ठाणे जिल्हा शाखेने केलेल्या कार्याचा व दिलेल्या ऑडिट रिपोर्ट बाबत कौतुक करून  चंद्रबोधी पाटील जी  यांनीच स्वतः सांगितल्याप्रमाणे जर 70℅ जनता डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या पाठीशी आहे तर मग  त्यांच्याशी न बोलता दुसराच  निर्णय कसा घेतला ? .. भालकी (कर्नाटक ) शाखेने  डॉ भीमराव य आंबेडकर यांना न विचारताच गाडी कर्जावर घेतली होती परंतु  त्यांचा कारभार योग्य व पारदर्शक नसल्याचे निदर्शनास आल्यावर  त्यांनी प्रस्तावित केलेली गाडी परत करण्यास मौखिक व लेखी आदेश डॉ भीमराव आंबेडकर यांनी दिलेले आहेत.त्यामुळे डॉ भीमराव आंबेडकर किंवा डॉ बाबासाहेब यांच्या परिवारवर आरोप करताना दहा वेळा विचार करावा असे प्रतिपादन करून  खरच चर्चा करायची असेल तर थेट डॉ भीमराव आंबेडकर यांच्याशी करावी असे आवाहनही भंडारे यांनी केले.


तसेच बी एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव ) यांनी ,चंद्रबोधी पाटील हे सारखे कागद दाखवीत आहेत त्यामुळे त्यांनी  असलेले कागद कपाळाला लाऊन फिरा असा सल्ला देऊन आम्ही सर्व जनता आंबेडकर घराण्याच्या पाठीशी असून त्यांचा शब्द प्रमाण मानूनच काम करू असे सांगितले.


    अँड. एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ) यांनी,चंद्रबोधी पाटीलजी यांच्याकडे ते राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे व तेच सर्वासर्वो आहेत याचे चॅरिटी कमिशनर यांनी  शेड्युल्ड 1 मध्ये नमूद केले असल्याचे शेड्युल्ड दाखवावे असे आवाहन केले.


     या प्रचंड  सभेमध्ये चंद्रबोधी पाटीलजी यांच्यावर अविश्वास दाखऊन डॉ भीमराव य आंबेडकर यांच्याच  नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला.

       तसेच या प्रसंगी  राष्ट्रीय संघटक- ॲड .प्रकाश मौर्य.

केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख- सुप्रियाताई कासारे,केंद्रीय महिला विभाग सचिव -भारतीताई शिराळ यांनीही आपले विचार मांडले.

या प्रसंगी पुज्य भंते विशुद्ध बोधी , राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी.बी. तेलतुंबडे,  राष्ट्रीय सचिव वसंत पराड व  राजेश पवार, राष्ट्रीय सदस्य  एम.डी. सरोदे  ,केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिव अनिल मनोहर,   महाराष्ट्र राज्य शाखेचे यु.जी. बोराडे, विजय कांबळे व शामराव कांबळे तसेच माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधाकर बर्वे, जगदीश जाधव, ए.जी.तायडे, के.पी.गायकवाड, डी.टी. सोनवणे व भगवान गोडांबे  विशेष उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय गायकवाड, (ठाणे जिल्हा अध्यक्ष) होते  सुत्रसंचलन  प्रभाकर सुर्यवंशी( ठाणे जिल्हा सरचिटणीस ) यांनी केले .या प्रसंगी चैत्यभुमी येथे डाॅ. भीमराव य.आंबेडकर यांच्या आदेशाने  एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ) यांनी जाहीर केलेली महाराष्ट्र राज्य महिला कमिटी व मुंबई प्रदेश महिला कमिटी  वाचून दाखवली .तसेच त्यांनी ठाणे जिल्हा महिला कमिटी चे प्रमुख पदाधिकारी म्हणून जिल्हा अध्यक्ष शीलाताई तायडे, सरचिटणीस निर्मलाताई कांबळे, कोषाध्यक्ष जयश्रीताई सरोवदे यांची घोषणा केली .या प्रस़गी जिल्हा शाखेच्या वतीने आद. डाॅ. भीमराव साहेबांच्या शुभहस्ते आदर्श कार्यकर्ता, आदर्श उपासिका, आदर्श बौद्धाचार्य, आदर्श केंद्रीय शिक्षक, आदर्श के़द्रीय शिक्षिका, आदर्श सैनिक, आदर्श तालुका, आदर्श प्रवचनकार,दिर्घ अनुभवी के़द्रीय शिक्षक / शिक्षिका, बौद्धाचार्य, सैनिक आणि टार्गेट पुर्ण करणारे गुणानुक्रमें ३ तालुके व विशिष्ट दानदाते यांना धम्मध्वज पट्टा व ट्राफी / प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जुन्या सैनिकांना प्रमोशन देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी व सर्व तालुका / शहर शाखांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले व समता सैनिक दलाने चोख व्यवस्था ठेवली. या कार्यक्रमास प्रचंड लोक उपस्थित होते.







No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...