Wednesday, August 23, 2023

सभासद नोंदणी अभियान २०२३-२४

 ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

चला धम्म चळवळ अधिक गतीमान करू या!!! 

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

गाव/वार्डापासुन सुरु होणाऱे धम्मकार्य अधिक व्यापक व प्रभावी ठरणार!

 =================================

    सभासद नोंदणी अभियान हे सर्व शाखांकरिता आर्थिक सुबत्तता आणण्याचे एक साधन आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका/शहरातील व ग्राम/वार्डातील पदाधिकारी जेवढे कष्ट, मेहनत, परीश्रम घेतील, त्याप्रमाणात ग्राम, तालुका व जिल्हा शाखा आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. 

   त्याकरिता प्रत्येक शाखेतील सर्व पदाधिकारी, बौध्दाचार्य, केन्द्रीय शिक्षक-शिक्षिका, व समता सैनिकांनी हाती सभासद नोंदणी चे पुस्तक घेऊन गावोगाव पायपीट करुन विक्रमी सभासद संख्या वाढवावी. 

  आजचा आपला त्याग, पुढील पिढी करिता प्रेरणादायी ठरणार आहे. 

ज्या जिल्ह्यांना आजीवन, सक्रिय किंवा सभासद नोंदणी ची पुस्तके लागतील त्यांनी मागणी करावी. 

   महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका/शहराची सभासद संख्या जाणण्याकरिता,जिल्हा पदाधिकाय्रांनी तालुकानिहाय पुस्तके वाटपाबद्दल(पुस्तक क्रमांक सहित) माहिती माझ्याकडे व्हाट्स अप वर पाठवावी. हि विनंती.


             जय भीम-नमो बुद्धाय 

               आयु.यु. जी. बोराडे.

उपाध्यक्ष : संस्कार विभाग महाराष्ट्र राज्य शाखा

No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...