डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक ,धार्मिक आणि राजकीय क्रांती एकत्रितपणे चालवावी, नाहीतर देशात एकाधिकारशाही येणार
-डॉ भीमराव य आंबेडकर
जयपूर (10/9/2023) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक ,धार्मिक व राजकीय क्रांती करून आपल्याला शैक्षणिक सुविधा व आरक्षण दिल्याने आपले लोक अधिकारावर पोहचले , समाजाची प्रगती झाली, चातुर्वर्णाच्या विरोधात बोलू लागले त्यामुळे विरोधकांनी आरक्षण संपविले आहे. खाजगीकरण केले या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही क्रांती एक साथ घेऊन चालाव्या लागतील याचा विचार करावा असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर (समूह राष्ट्रीय अध्यक्ष,समता सैनिक दल ) यांनी येथील विद्याधर स्टेडियम मध्ये राष्ट्रीय बौद्ध धम्म एकता संमेलनात केले.
ते पुढे असेही म्हणाले की, राजस्थान हा जास्त अँट्रॉसिटी असलेले राज्य आहे त्यामुळे येथे जागृतराहून एकत्रितपणे काम करावे लागेल. या विशाल धम्म संमेलन मध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्यावतीने 10 हजार धम्म दिक्षा प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली होती , भंते सुमित रत्न , राजरत्न आंबेडकर,राजेंद्रपाल गौतम ,डॉ हरीश रावलिया, के सी गुमारिया इत्यादी मान्यवरांच्या भाषणानंतर भिक्खू संघाच्या वतीने सर्व उपस्थित सुमारे 10 हजार लोकांना सार्वजनिक धम्म दिक्षा देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन मिशन जयभीम चे रघुनाथ बौद्ध यांनी केले होते. संमेलन सुरू होण्याच्या अगोदर डॉ भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या नेत्रुत्वखाली प्रथम भारतीय संविधानाची प्रास्ताविका सामूहिकपणे वाचन करून मेरा संविधान मेरा सन्मान रॅली काढण्यात आली ,रॅलीचे आयोजन महेंद्र खंडेलवाल यांनी केले होते.यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी /आंतरराष्टीय सचिव ),एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष /स्टाफ ऑफिसर ,समता सैनिक दल ), फुलसिंग बौध्द (अध्यक्ष ,राजस्थान उत्तर राज्य ), पुरनमल बौद्ध (उपाध्यक्ष ,राजस्थान दक्षिण राज्य ) ,ताराचंद (अध्यक्ष ,अलवर जिल्हा ) इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होती.सदर कार्यक्रमानंतर डॉ भीमराव य आंबेडकर यांची दोन्ही राजस्थान राज्य शाखेच्या पदाधिकारी व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया /समता सैनिक दल मध्ये काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्ते यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली व लवकरच संविधान च्या सन्मानार्थ राज्याचे अधिवेशन घेण्याचे ठरले.
No comments:
Post a Comment