Thursday, September 7, 2023

बौद्ध धम्मीय राजे

 


दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर.

ट्रस्टी चेअरमन :  डॉक्टर हरीश रावलिया.

राष्ट्रीय कार्याध्यक्ष:  डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर.

चैत्यभूमी दादर येथील वर्षावास प्रवचन मालिकेतील पुष्प 23 वे

प्रवचनाचा विषय  : बौद्ध धम्मीय राजे

प्रवचनकार  : आयु. राजेश लक्ष्मण पवार (राष्ट्रीय सचिव)

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

बौध्द धम्मीय राजे हा विषय बौध्द समूहासाठी फार महत्त्वाचा आहे. ज्या ज्या राजांनी भगवान बुध्दाचा उपदेश ऐकला, त्यांच्या उपदेशाप्रमाणे ज्यांनी आचरण केले, त्यांचे कल्याण झाले व ते राजे भगवान बुध्द यांच्या इतिहासाबरोबर अमर झाले. एक दुसऱ्यापासून प्रेरणा घेतली व ते भगवान बुध्दाचे अनुयायी झाले. अशा निवडक राजाचे जीवन व कार्ये आपण पाहणार आहोत.

सम्राट बिंबिसार :

सम्राट बिंबिसार (इ. स. पू. ५४४ - इ. स. पू. ४९१ ) हा मगध साम्राज्याचा संस्थापक व अजातशत्रूचा पिता होता. मगधचा राजा बिंबिसार याला काशी हे महाजनपद हुंड्यात मिळाले होते.

राजा बिंबिसार हा बुद्धाच्या समकालीन असलेला राजा आहे. त्यावेळी भारताला जंबुद्विप असे संबोधले जात होते. त्यावेळी भारतात 16 महाजनपदे आणि 10 गणराज्य होती. मल्ल कुळातील लोकांचे दोन गणराज्य होते. एक पावा व दुसरा कुशिनारा. शाक्य कुळातील लोकांचे कपिलवस्तू, लिच्छवींचे वैशाली, कोलिय यांचे रामग्राम, मौर्य यांचे पिप्पलीवन ,बुली यांचे अलकप्प, कालाम यांचे केसपुत्त, भग्ग यांचे  सिसुमारगिरी,विदेह यांचे मिथिला  गणराज्य होती.

इ.स. पूर्व सहाव्या शतकात भारतात अंग , काशी , कोशल , वज्जी , मल्ल , चेदी , वत्स , मत्स्य , सौरसेन , अश्मक ,कुरू, पांचाल, गांधार, अवंती, मगध, कंबोज अशी सोळा महाजनपदे होती. यातील मगध महाजनपदाचे साम्राज्यात रूपांतर करण्याची सुरुवात बिंबिसारने केली. त्याने मगधला राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली.


बिंबिसार वयाच्या १५ वर्षी इ.स. पूर्व ५४३ मध्ये मगधच्या गादीवर आला. तो हुशार, मुत्सद्दी, धोरणी व पराक्रमी होता. सुपीक व संपन्न देश, भौगोलिक संरक्षण लाभलेला विभाग आणि सुसज्ज सैन्य यांचा सुयोग्य उपयोग करून साम्राज्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याने अवती भोवतीची महाजनपदे वेगवेगळ्या मार्गांनी वर्चस्वाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले.


कपिल वस्तूतील शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राज्यसत्ता चालवित होते. अशा प्रकारच्या राज्यसत्ता चालविणाऱ्या प्रमुखास राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोदनाची होती. हे शाक्यांचे राज्य भारताच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. हे एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कोशल देशाचा राजा प्रसेनजिताने शाक्यांच्या राज्यावर आपले अधिपत्य स्थापन केले. त्या काळी कोशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालिन राजे होत. भगवान बुध्दांच्या प्रथम उपासकांमध्ये राजा बिंबिसार याचा प्रथम क्रमांक लागतो. राजा बिंबीसाराला तीन राण्या होत्या १) कोसला देवी, २) चलना देवी, ३) खेमा. राजा बिंबीसार मगध देशाचा होता. त्याची राजधानी राजगृह नगरी होती. सिद्धार्थ गौतमाने शाक्य आणि कोलीय यांच्या रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षामुळे गृहत्यागाचा निर्णय घेऊन आषाढी पौर्णिमेला कपिलावस्तू नगरीतील भारद्वाज ऋषींच्या आश्रमात प्रव्रज्जा घेतली आणि गृहत्याग केला. कपिलवस्तूपासून चारशे मैल दूर असलेल्या राजगृह नगरीत प्रवेश केला आणि पांडव टेकडीच्या पायथ्याशी झोपडी बांधून राहू लागला व राजगृह नगरीत भीक्षाटनाला जाऊ लागला. तेव्हा नगरीतले लोक

त्याचेकडे कुतूहलाने पाहू लागले. हा तरुण, देखणा असताना संन्याशी का झाला असावा? हे दृष्य राजा बिंबीसाराने पाहिले तेव्हा त्याने त्याची चौकशी करून माहिती मिळवली. तो संन्याशी कपिलवस्तु नगरीचा राजा शुद्धोधनाचा पुत्र आहे. तेव्हा राजाने त्याची भेट घेतली आणि त्याचं मन वळविण्याचे प्रयत्न केले. आपले अर्ध राज्य देऊ केले. राज्याचे प्रमुख अधिकारी पद देण्याची ग्वाही दिली. मात्र सिद्धार्थ गौतमाने ऐकले नाही मला धन-दौलतीची व राजपदाची अशा नाही. माणसा, माणसात वैर भावना का ठेवतात? एक दुसऱ्याशी झगडा, युद्ध करून रक्तपात का करतात? याचे कारण शोधायचे आहे. ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी मी गृहत्याग केला आहे. असे सांगितल्यावर राजा म्हणाला ठिक आहे. आपण ज्ञान प्राप्त कराल तेव्हा माझ्या नगरीला भेट द्यावी अशी विनंती करून राजा बिंबीसार निघून गेला. ही बिंबीसार राज्याची आणि सिद्धार्थ गौतमाची पहिली भेट होती. सिद्धार्थ गौतमाने तसे वचन दिले होते.


सिद्धार्थ गौतमाने राजगृह नगरी सोडल्यावर वेगवेगळ्या आश्रमात विविध प्रकारचे ज्ञान संपादन केले. शेवटी गया येथे वैशाखी पौर्णिमेला पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ते फिरत फिरत सारनाथ येथे गेले. तिथे त्यांचे पूर्वाश्रमाचे पाच परिब्राजक कौडील्य, वप्प, महानाम, भद्दीय, अश्वजित हे त्यांना सोडून सारनाथ येथे आले होते. आपल्याला मिळालेले ज्ञान त्यांना द्यावे यासाठी ते तिथे गेले. त्या पाच परिव्राजकांना आपला उपदेश देऊन धम्मचक्र परिवर्तीत केले. ते पाच परिव्राजक प्रथम भीक्षु झाले. त्यानंतर यश नावांचा एक तरूण सामील झाला, नंतर यशचे पाच मित्र भीक्षु संघात सामील झाले. आणखी पन्नास लोक त्या भीक्षु संघात सामील झाले आणि भीक्षु संघाची स्थापना झाली. तीन महिने सारनाथ येथे वर्षावास केल्यावर आश्वीन पोर्णिमेला वर्षावास समाप्त होताच भगवान बुध्दांनी भीक्षु संघाला धम्म प्रचारासाठी जाण्याचा आदेश दिला. भीक्षुसंघ वाढत जात होता. हजारो लोक भीक्षु संघात सामील झाले होते. भगवान बुध्द भीक्षु संघाबरोबर फिरत राजगृह नगरीत आले व जेत वनात त्यांचा मुक्काम होता. ही माहिती राजा बिंबीसार राजाला मिळाली. तेव्हा राजा. बिंबीसार आपल्या सेवकासह जेत वनात गेले आणि भगवान बुध्दांना वंदन "करून बसले. त्यांनी भगवान बुध्दाचे प्रवचन ऐकून भगवान बुध्दांना आपल्या निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले. भोजनदान झाल्यावर मला आपला उपासक म्हणून स्वीकार करा, मला उपासक दीक्षा द्या. अशी बीबीसाराने विनंती केली. तेव्हा भगवान बुध्दाने राजाला व प्रजेला धम्म दीक्षा दिली. त्या दिवशी पौष पौर्णिमा होती. भोजना नंतर भगवान बुध्दांना

बिंबीसाराने आपले वेळूवन दान दिले. त्या वेळू वनात त्यांना राहण्यासाठी मोठे विहार बांधून सर्व सोई उपलब्ध करून दिल्या. धम्म प्रचारासाठी धनदौलत खर्च करू लागला. बिंबीसार राजाची राणी खेमा फार सुंदर होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व होता. ती भगवान बुध्दाच्या प्रवचन व दर्शनाला जात नव्हती. राजाला वाटत होते, आपली खेमा राणी बुध्दाच्या दर्शनाला जावी. तिने उपदेश ऐकावा, पण खेमा राणी तयार होत नव्हती. राजाने भगवान बुध्दाच्या गुणांवर रूपावर काही कलावंत बोलावून गीते गायला लावली. तेव्हा राणी म्हणाली खरेच भगवान बुध्द इतके बुध्दीवान, गुणवान, सौंदर्य संपन्न आहेत का ? आणि ती भगवान बुध्दांच्या दर्शनाला तयार झाली. राजाने राणीसाठी मेणापालखी, दास-दासी दिल्या. राणी वेळू वनात आली व भगवान बुध्दाचे प्रवचन ऐकून प्रभावित झाली आणि तिने भगवान बुध्दाच्या धम्माला अनुसरले. पुढे तिने धम्म प्रचार करण्यासाठी भीक्षुणी होण्यासाठी राजाकडे विनंती केली. राजाने परवानगी दिली आणि ती भीक्षुणी झाली. ती पुढे प्रज्ञावान भीक्षुणी म्हणून प्रसिद्ध पावली. राजा बिंबीसार भगवान बुध्द आणि संघाची सर्व व्यवस्था करण्यासाठी खूप खर्च करीत होता. 

भिक्षूंना वस्त्रदान देण्याची प्रथा राजा बिंबिसरा पासून सुरू झाली.

राजगृहात जिवक नावाचा वैद्य होता. तो शस्त्रक्रियेतील तज्ञ होता. ज्यांचे पालनपोषण अभय राजकुमार यांनी केले. जिवक अगदी लहान वयातच अत्यंत हुशार वैद्य झाला होता. एकदा मगधराज विंबिसाराला फिस्टुला रोग झाला. त्यामुळे राजा खूप अस्वस्थ झाला. राजाने आपल्या मंत्र्यामार्फत अभय राजकुमारला आपला रोग बरा करण्याची विनंती केली.अभय राजकुमारने राजा विंबिसाराचा आजार बरा करण्यासाठी आपल्या तरुण डॉक्टरला पाठवले.


वैद्य जीवक राजगीरला पोहोचले. त्याने राजाचा जुना फिस्टुला रोग फक्त एका पेस्टने बरा केला. राजाने प्रसन्न होऊन पाचशे (500) स्त्रियांना दागिने देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांना आपला राजवैद्य करून सन्मानित केले. राजाने जीवाला लोकांशी सेवेच्या भावनेने वागण्यास सांगितले.


एकदा तथागत पहाटे राजगीरच्या एका टेकडीवर प्रदक्षिणा घालत होते. तथागतांचा चुलत भाऊ देवदत्त, जो तथागतांचा शत्रू होता, त्याची नजर त्याच्यावर पडली तेव्हा त्याचे वैर पेटले. त्याला ते दिसले नाही, लगेचच भगवान बुद्धांना मारण्याच्या उद्देशाने एक मोठा दगड त्याच्यावर वरून ढकलून दिला. दगड डोंगरावरील खडकांवर आदळले आणि त्याचे तुकडे झाले, परंतु तरीही त्याचा एक छोटा तुकडा भगवान बुद्धांच्या डाव्या पायाच्या बोटावर पडला. तथागतांच्या पायाला दुखापत झाली आणि अंगठ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. तथागतांना खूप वेदना होत असताना महाराज बिंबिसार यांना सांगितल्यावर त्यांच्या उपचारासाठी वैद्य जीवक यांना बोलावण्यात आले. जीवकाने  भगवान बुद्धांच्या पायाला मलम लावले, त्यानंतर भगवान बुद्धांना आराम मिळाला आणि ते पुन्हा लोककल्याणाच्या कामासाठी निघून गेले.


  राजगृहातील श्रीमंत व्यापारी डोकेदुखीच्या आजाराने त्रस्त झाला होता  जीवक वेदनेने त्रस्त असलेल्या व्यापाऱ्याला भेटला. व्यापाऱ्याने जीवनाला सांगितले की आता मी जगू शकणार नाही कारण तुमच्या आधी एका वैद्याने माझा मृत्यू अवघ्या पाच दिवसांत तर दुसरा फक्त सात दिवसांत घोषित केला होता. कृपया माझा जीव वाचवा जीवक वैद्य यांनी आजारी व्यापाऱ्याला खाटेवर झोपवले आणि नंतर त्याला खाटेवर बांधून त्याच्या डोक्याची कातडी फाडून त्याची कवटी उघडली. त्यातील दोन किडे (प्राणी) बाहेर काढून लोकांना दाखवले. या किड्यांमुळे व्यापारी आजारी होते.  व्यापाऱ्याची कवटी पुन्हा शिवून जोडली गेली. जखम बरी झाल्यानंतर श्रीमंत व्यापारी स्वस्थ झाला.


श्रीमंत व्यापारी बरा झाल्यावर त्याने जीवकला बक्षीस म्हणून एक लाख (मोहरा) अश्फिया दिल्या आणि त्याच्या राजाला एक लाख अश्फियाही दिल्या. शस्त्रक्रियेच्या यशस्वी परिणामामुळे मगध राज्याचे राजवैद्य म्हणून त्यांचे नाव इतर राजांपर्यंत पोहोचले. राजा चंदप्रद्योत यांनाही जीवकचा चमत्कार कळला. त्यावेळी उज्जैनचा राजा चंदप्रद्योत पांडू रोगाने ग्रस्त होता. अगदी प्रसिद्ध वैद्यही राजाचा रोग बरा करू शकले नाहीत.


राजा चंदप्रद्योत याने राजा विंबिसराकडे दूत पाठवून जीवकाकडून उपचार करून घेण्याची परवानगी मिळवली. दूताची बातमी ऐकून राजा बिंबिसाराने स्वतः जीवकाला प्रद्योताचा रोग बरा करण्यासाठी उज्जयिनी (उज्जैन) येथे पाठवले. उज्जैनला पोहोचल्यानंतर जीवकने राजा चंदप्रद्योतच्या रोगाचे निरीक्षण केले. रोग ओळखल्यावर जीवका बोलला. तुपात औषध दिले जाईल. प्रद्योतने जीवकला सांगितले की तू तुप सोडून कशाचेही औषध देऊ शकतोस. मी कोणत्याही परिस्थितीत तूप स्वीकारत नाही. त्याचे नाव बघून किंवा ऐकून माझी तब्येत बिघडते. जो मला तूप खाऊ घालतो त्याला मी मारीन.


जीवक यांच्या म्हणण्यानुसार रोगांच्या निदानासाठी तुपात औषधे मिसळणे आवश्यक होते. त्याने अत्यंत हुशारीने औषधी तुपाचा रंग भगवा केला आणि नंतर त्याला केशराचा वास येण्यासाठी विस्तवावर शिजवले.


जीवकाने आपले औषध राजा प्रद्योताला दिले.

राजाला घाबरून चतुराईने चपळ हत्तीवर बसून राजगृहाकडे धाव घेतली. राजा चंदप्रद्योत माझा वध करतील हे जीवाला माहीत होते. कारण राजाच्या नकारानंतरही मी त्यांना तुपात औषध दिले होते. राजा प्रद्योत बरा झाला.त्याने जीवकांला आपल्या राज्यात बोलावले. पण जीवक राजाच्या भीतीने गेला नाही. शेवटी, राजाने जीवकाला एक उच्च दर्जाची शाल  भेट म्हणून पाठवली. , शाल घेतल्यानंतर जीवकाने सांगितले की, हे वस्त्र भगवान तथागत किंवा मगध राजा बिंबिसारा खेरीज इतर कोणासाठीही योग्य नाही.


जीवकाने ती मौल्यवान शाल राजा बिंबिसाराला दिली. शेवटी राजा बिंबिसारानेही त्यांच्या कार्याचा विचार करून तथागतांना ही शाल दिली. शाल स्वीकारल्यानंतर, तथागतांनी घोषित केले की उपासकांनी भिक्खूंना दिलेले कपडे दान म्हणून घेता येतील. तेव्हापासून उपासकांकडून भिक्खूंना वस्त्रदान करण्याची परंपरा सुरू झाली.

भगवान बुध्दाच्या संघामध्ये देवदत्त हा त्यांचा पूर्वाश्रमीचा आतेभाऊही होता. तो भगवान बुध्दांना नेहमी विरोध करीत होता. त्या देवदत्ताने राजा बिंबीसाराच्या मुलाला अजातशत्रूला आपल्या पित्याच्या विरूद्ध बंड करायला लावले व राजाला अटक करायला लावली. एका बंद खोलीत ठेवले व अन्नपाण्याविना राजाला तडफडून मारले आणि स्वतः अजातशत्रूस राजगृह नगरीचा राजा घोषित केले. पुढे देवदत्ताने भगवान बुध्दाला मारण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला. देवदत्ताचा कपटी कावा राजा अजातशत्रूने ओळखला व देवदत्ताला दूर केले आणि तो भगवान बुध्दाचा उपासक झाला. /राजा अजातशत्रूने भगवान बुध्दाच्या •महापरिनिर्वाणा नंतर त्यांची अस्थी राजगृह नगरीत आणली आणि भव्य स्तूप उभारला. पहिल्या धम्म संगीतीला राजाश्रय दिला. पाचशे भीक्खुंनी या धम्म संगीतीत भाग घेतला होता. त्यांची नऊ महिने निवास, भोजन आणि इतर व्यवस्था राजा अजातशत्रूने केली होती. या धम्म संगीतीचे अध्यक्ष भन्ते महास्थवीर महाकाश्यप होते. या धम्म संगीतीत त्रिपिटक मुखोद्गत करण्यात आले. त्याचे पाचशे भीक्खुंनी श्रवण केले आणि ते लोकांत प्रसारित करण्याचे काम या पाचशे भीक्खुंनी केले. यासाठी राजा अजातशत्रूचे फार मोठे योगदान लाभले आहे. राजा बिंबीसार नंतर अजातशत्रू हा दुसरा राजा भगवान बुध्दाचा उपासक झाला व भगवान बुध्दाच्या धम्म प्रसाराला फार मोठी मदत केली.



No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...