Saturday, September 23, 2023

सगळ्यांना बरोबर घेऊन मनुवादी सरकार बदलून संविधान सुरक्षित ठेवावे लागेल. - डॉ भीमराव य आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️



☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
              दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया
राष्ट्रीय कार्याध्यक्ष : आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर.

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
                     संकल्प दिन समारंभ
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

बडोदा (23/9/2023)- विचारांचे परिवर्तन हे बघत आहे  की ,मनुवादाची प्रयोग शाळा गुजरात आहे. त्यामुळे आता येथून मनुवादी विचार संपवावे लागेल. सगळ्यांना बरोबर घेऊन मनुवादी सरकार बदलून संविधान सुरक्षित ठेवावे लागेल .असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष -दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समूह राष्ट्रीय अध्यक्ष -समता सैनिक दल ) यांनी केले . 

सारावंशाने , जिल्हाधिकारी कार्यालय बडोदा येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया  जिल्हा शाखा बडोदा यांनी व संकल्प भूमी येथे भीम आर्मी व संकल्प भूमी ट्रस्ट यांनी 106 वा संकल्प दिन समारंभ आयोजित केला .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या बडोदा संस्थान मध्ये नोकरीत असताना त्यांना हिंदू शिपाई व इतरांनी दिलेल्या अस्पृश्यतेच्या वागणुकीच्या विरोधात दिनांक 23/9/1917 रोजी केलेल्या संकल्पाचा 106 वा संकल्प दिन समारोह कार्यक्रम संपन्न झाला .सदर कार्यक्रमात डॉ भीमराव यशवंत आंबेडकर पुढे असे म्हणाले की, संकल्प दिनाला आता लाखो लोक येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संकल्प घेऊन जातात. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत आपली  व्यवस्था आणावी लागेल.तसेच संविधानाला मानणाऱ्या पार्टीलाच  सत्तेत आणावे असे आवाहनही केले.

              राजेंद्रपाल गौतम यांनी जाती छोडो समाज जोडो चा नारा देऊन आपल्या हक्क व अधिकारासाठी एकत्रित  संघर्ष  करावा असे आवाहन केले.

     सकाळी डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या काळात ज्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर बसत होते तेथे  (सध्याचे बडोदा जिल्हाधिकारी कार्यालय)  वंदन केले .त्यानंतर नवलखा मैदान ते संकल्प भूमी अशी  बहुजन अधिकार एकता संकल्प रॅली काढण्यात आली .त्यामध्ये डॉ भीमराव यशवंत आंबेडकर ,राजेंद्रपाल गौतम ( राष्ट्रीय अध्यक्ष मिशन जयभीम) ,विनय बौद्ध ( राष्ट्रीय अध्यक्ष ,जयभीम आर्मी ),दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया /समता सैनिक दलाचे कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी व आंतरराष्ट्रीय सचिव ),एस. के. भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर ),बी .एच. गायकवाड गुरुजी (राष्ट्रीय सचिव ), सामंतभाई सोळंकी ( गुजरात उत्तर राज्य अध्यक्ष ) , पी .एल .मारू ( गुजरात राज्य एस. एस. डी. अध्यक्ष ) भानूभाई चौहान (गुजरात अध्यक्ष -मिशन जयभीम ) , रिपब्लिकन पार्टीचे विजयभाई मैसुरिया इत्यादी सहभागी झाले होते.

जेथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संकल्प केला तेथे डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर व इतर मान्यवरांनी वंदन केले व भिख्खू संघाच्यावतीने वंदना घेण्यात आली.  तसेच  समता सैनिक दलाच्यावतीने  मानवंदना देण्यात आली .मानवंदनेचे संचालन एस. के .भंडारे यांनी केले. 

   संकल्प भूमीवर संकल्प भूमी ट्रस्टच्या वतीने ट्रस्टी अनिल प्रथम ( डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ) यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित केल्या कार्यक्रमात  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बडोदा जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या श्रामणेर शिबिर व उपासिका शिबिराचा समारोप करण्यात आला.

 सदर शिबिरासाठी भंते विशुद्ध बोधी ,केंद्रीय शिक्षक  अरुण तायडे व लताताई  तायडे काम केले. ही शिबिरे बडोदा जिल्हा शाखेचे अध्यक्ष रविंद्र गाडे यांनी आयोजित केली होती. डॉ भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते शिबिरार्थीना प्रमाणपत्र देण्यात आली. या संकल्प दिन च्या कार्यक्रमास जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Programme of BSI या ब्लॉगच्या माध्यमातून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यक्रमांना प्रसिद्ध देत आहे म्हणून आपणही programme of BSI च्या लिंक ला शेअर करा ही विनंती.






The Buddhist Society of India

Founder President : Dr. Babasaheb Ambedkar

National Patron: Respected High Priest Miratai Ambedkar

Trustee Chairman : Dr. Harish Ravalia

National Working President : Honorable Dr. Bhimrao Yashwant Ambedkar.


☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

                     resolution day begins

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

Baroda (23/9/2023)- Change of thought is seeing that Gujarat is the experiment school of manuwad. So now humanist thinking has to end from here. Dr. Grandson of Babasaheb Ambedkar Dr. Bhimrao Yashwant Ambedkar (Trustee / National Working President - The Buddhist Society of India and Group National President - Samata Sainik Dal) did. 


Saravansh, The Buddhist Society of India District Branch Baroda at Collectorate Baroda and Bhim Army and Sankalp Bhumi Trust at Sankalp Bhoomi organized the 106th Sankalp Day Ceremony.


The 106th Sankalp Day celebration program was concluded on 23/9/1917 against the treatment of untouchability by Hindu sepoys and others when Dr. Babasaheb Ambedkar was employed in the Baroda Institute of Sir Sayajirao Gaikwad Maharaj. Dr. Bhimrao Yashwant Ambedkar further said that That, on Sankalp Day now lakhs of people come and carry the Sankalp of Dr. Babasaheb Ambedkar. We will have to bring our system in the upcoming 2024 elections. He also appealed to bring the party that respects the constitution to power.


              Rajendrapal Gautam appealed to people to fight together for their rights and rights by chanting the slogan of Caste Chho Samaj Jodo.


     In the morning Dr. Bhimrao Yashwant Ambedkar Saheb and all officials and workers paid obeisance at the office where Dr. Babasaheb Ambedkar was sitting during the time of Sayajirao Gaikwad Maharaj (now Baroda Collectorate Office). After that Bahujan Adhikar Ekta Sankalp Rally was held from Navlakha Maidan to Sankalp Bhumi. Dr. Bhimrao Yashwant Ambedkar, Rajendrapal Gautam (National President Jaibhim Mission), Vinay Buddh (National President, Jaibhim Army), The Buddhist Society of India / Samata Sainik Dal Captain Pravin Nikhade (Trustee and International Secretary), S. K. Bhandare (National Vice President and Staff Officer), B.H. Gaikwad Guruji (National Secretary), Samantabhai Solanki (Gujarat North State President), PL Maru (Gujarat State S.S.D. President) Bhanubhai Chauhan (Gujarat President - Mission Jaibhim), Vijaybhai Mysuria of Republican Party etc. participated. .


Where Dr. Babasaheb Ambedkar resolved. Bhimrao Yashwant Ambedkar and other dignitaries paid obeisance and obeisance was taken on behalf of Bhikkhu Sangha. Salutations were also given on behalf of Samata Sainik Dal. By K. Bhandare. 


   Shramner Camp and Upasika Camp organized by The Buddhist Society of India Baroda District Branch concluded in a program organized on behalf of Sankalp Bhoomi Trust under the chairmanship of Trustee Anil Pratham (Director General of Police).


 Bhante Vishuddha Bodhi, Central Teacher Arun Taide and Latatai Taide worked for the said camp. These camps were organized by Baroda District Branch President Ravindra Gade. Certificates were given to the campers by Dr. Bhimrao Ambedkar. People attended this Sankalp Day program in large numbers.


Program of BSI is promoting the programs of The Buddhist Society of India through this blog, so please share the link of program of BSI.


No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...